मलप्पुरम (केरळ)- पठाणकोटमधील दहशतवादी हल्ल्यानंतर बॉम्ब निकामी करताना हुतात्मा झालेले कर्नल निरंजन इ कुमार यांच्या विरोधात प्रतिक्रिया देणाऱया एकाला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (मंगळवार) दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुतात्मा कर्नल निरंजन यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अन्वर सिधीक (वय 24) याने फेसबुकवर निरंजन यांच्याविरोधात प्रतिक्रिया नोंदविली होती. सिधीक याने नोंदविलेली प्रतिक्रिया सोशल नेटवर्किंगवर शेअर होत होती. अनेकांनी या विरोधात नाराजी व्यक्त केली होती. या घटनेनंतर सिधीक विरोधात तक्रार दाखल करून आज सकाळी अटक करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.
[वृत्तसंस्था]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा