नवी दिल्ली - मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरवर लिहिण्यासाठी असलेली 140 शब्दांची मर्यादा लवकरच 10 हजार अक्षरांपर्यंत वाढणार असल्याची माहिती तंत्रविषयक वृत्त देणाऱ्या एका ऑनलाईन संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
ट्विटर वापरणाऱ्या युजर्सना सध्या केवळ 140 शब्दांमध्ये व्यक्त होण्याची सुविधा आहे. मात्र ही मर्यादा 10 हजार अक्षरांपर्यंत वाढविण्याबाबत ट्विटर विचार करत असून ही सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे. मात्र याबाबतची नक्की तारीख अद्याप निश्चित केलेली नाही. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या शेवटी म्हणजेच मार्चअखेरपर्यंत ही सुविधा उपलब्ध होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. शब्दमर्यादा वाढल्यानंतर ट्विटरच्या टाईमलाईनमध्ये कोणताही बदल होणार नाही. सध्याप्रमाणेच सुरुवातीचे 140 शब्द दिसतील आणि त्यानंतर पुढील मजकूर वाचण्यासाठी क्लिक करावे लागेल. दरम्यान याबाबत ट्विटरने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा