For Advertise in this Section please connect 9422264829 or mail at sainik.darpan@gmail.com

Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan

सोमवार, ३० नोव्हेंबर, २०१५

फौजी म्हणजे………

फौजी म्हणजे फीरता वारा
फौजी म्हणजे वाहता झरा।
फौजी म्हणजे रात्री एकटाच
अंधारात चमकनारा तारा।।

      फौजी अंगावरील शहारा
      फौजी रात्रीचा पहारा।
       फक्त फौजीच आहे
       सुख अन दु:खाचा सहारा।।

फौजी जन हिताचा नारा
फौजी आहे अनमोल हिरा।
फौजी म्हणजे गुन्हेगारांचा
एक बापच आहे दुसरा।।

       फौजी म्हणजे धाक दरारा
       त्याचाच आहे वचक सारा।
       काहीही करु शकतो पोलीस
       जर असेल तो नितीनं खरा।।

फौजीवर प्रेम करुन पहा

एकदा तरी फौजीवर
प्रेम करुन पहा।
मनापासुन त्याच्यावर
तुम्ही मरुन पहा।।

         जीवाला जीव देईल तुमच्या
         त्याचा हात धरुन पहा।
         त्याचं नाव काळजावर
         एकदातरी कोरुन पहा।।

कसा जगतो एकटा
तुम्ही चोरुन पहा।
प्रेमाचे दोन शब्द
त्याच्याशी बोलून पहा।।

          त्याच्या सारख्या यातना
         एकदा तरी सोसुन पहा।
          अनोळखी जगात तुम्ही
           एकटे बसुन पहा।।

दु:ख असुन मनात
तुम्ही हसुन पहा।
त्याच्या सारखे तुम्ही
ऊन्हात ऊभे राहुन पहा।।

         एकदा तरी फौजीवर
          प्रेम करुन पहा।
          तो रोज मरतो तुम्ही
          एकदातरी मरुन पहा।।

लेकरासाठी झुरतो तो
तसं भेटीसाठी झुरुन पहा।
तुम्हाला काय वाटतं तुम्ही
फौजीच्या यातना सोसुन पहा।।

         एकदा तरी फौजीवर
          तुम्ही प्रेम करुन पहा………

शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २०१५

राष्ट्रीय महामार्गालगत हरित पट्टा विकासाच्या पथदर्शी प्रकल्पाला एनएचएआयची मंजूरी

नवी दिल्ली, (27-11-2015 ): राष्ट्रीय महामार्गाच्या लगत हरितपट्टा निर्माण करण्यासंदर्भातल्या आराखड्यावर नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने केलेल्या वैज्ञानिक अभ्यासाच्या सहाय्याने सादर केलेल्या पथदर्शी प्रकल्पाला भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. राष्ट्रीय महामार्ग 7 च्या नागपूरमधील जाम व हिंगणघाटमधील 5 किलोमीटरच्या पट्टयात हा प्रकल्प राबवण्यात येणार असून याचा अंदाजे खर्च 11.80 कोटी आहे. या पट्टयामध्ये अनेक रांगात रस्त्याच्या दुतर्फा वैज्ञानिकदृष्ट्या निवड केलेल्या अंदाजे 20 हजार झाडांची लागवड करण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रकल्प 5 वर्षांसाठी राबवण्यात येणार असून या कालावधीमध्ये हरितपट्टा विकासाच्या परिणामांच्या नोंदी करण्यासाठी एनईईआरआय(निरी) प्रयोगशाळेत विविध प्रयोग केले जातील.

[PIB]

गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०१५

🇮🇳🇮🇳२६/११ 🇮🇳🇮🇳 भावपूर्ण श्रद्धांजलि

ताज हॉटेल
जळत होते
लाल रक्त
गळत होते
खरे भक्त
साळसकर
दूर शासना आळसकर
पुन्हा सव्वीस
अकरा नको
कसाब सारखा
छोकरा नको
नापाक पाकडे
भामटे होते
शर्थीने लढणारे
कामटे होते
तुकारामाने
कमाल केली
कसाब पकडून
धमाल केली
लढता -लढता
शहीद झाले
तेंव्हा आम्हाला
माहित झाले
नांगरे पाटलांचा
विश्वास होता
ताज हॉटेलचा
अभ्यास होता
आत शिरून
आतंकी मारले
ओलीस धरलेले
नागरिक तारले
नमन त्यांच्या
कार्याला आहे
सलाम त्यांच्या
शौर्याला आहे
🇮🇳🇮🇳२६/११ 🇮🇳🇮🇳
भावपूर्ण श्रद्धांजलि

मंगळवार, २४ नोव्हेंबर, २०१५

कर्नल संतोष महाडिक ह्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी विंग कमांडर मनीष यांनी व्यक्त केलेल्या भावना

कर्नल संतोष महाडिक ह्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी विंग कमांडर मनीष यांनी व्यक्त केलेल्या भावना

भावानुवाद –अंबर कर्वे

मी संभ्रमात आहे,
हा निरोप समारंभ आहे का?
स्वागत समारोह आहे ?
याला दुखःद शेवट म्हणावा का?
एक आश्वासक सुरुवात ?

गावात सगळीकडे त्या सैनिकाचे फोटो असलेले फलक झळकत होते.
रस्ते रांगोळ्या आणि फुलांनी सजलेले होते.
पाच हजार लोक,हजारो किलो फुले, कडक सैनिकी गणवेषातले आर्मीचे जवान!

आणि एक मृतदेह ...

मी संभ्रमात आहे,
हा नेमका निरोप समारंभ आहे का?
स्वागत समारंभ आहे ?

आर्मीची सजवलेली गाडी येते, तिरंग्यात लपेटलेले कॉफीन, स्पेशल फोर्सच्या जवानांच्या बळकट खांद्यांवर विश्वासाने सोपवले जाते. हजर असलेला प्रत्येकजण त्या 'कॉफीन ला स्पर्श करण्यासाठी, खांदा देण्यासाठी धडपडत असतो. अर्थात प्रत्येकजण तेवढा सुदैवी नसतो.

आर्मीच्या सैनिकांची शिस्तबद्ध पावले टाकत पुढे सरकतात. कॉफीन जड झालं आहे.भावना तर थोड्या जास्तच ...

मी संचलन करत मागे वळतो...
तिथे प्रचंड गर्दी आहे. लोकं पाण्याच्या टाकीवर, घरांच्या छपरांवर चढून बघत आहेत.

अरे, असं तर मी क्रिकेट मॅचच्या अन्  हिंदी सिनेमाच्या शुटींगच्या प्रसंगी बघतो ना ?
तसं तर इथं काहीच नाहीये..

मी संभ्रमात आहे ...
मला कॅमेरे दिसतायत खूप, काहींना परफेक्ट अँगल हवा आहे, काहीजण मुलाखती घेण्याच्या प्रयत्नात आहेत.
त्यांच्या पुढेच काही सुन्न झालेल्या लोकांचा घोळका उभा दिसतो आहे.

ही ब्रेकिंग न्यूज आहे का?
कोलमडून तुटलेलं एक घर ?

मी संभ्रमात आहे ...

त्वेषाने पाकिस्तान मुर्दाबादच्या बरोबरच “भारतमाता कि जय” च्या घोषणा जोरात दिल्या जात आहेत.
मी तर इथं स्वतःबरोबरच्याच युद्धात आहे,
खात्रीनं माझ्यासोबतचे बरेचसे लोकही ...

त्याच्या बायकोसमोर कॉफिन ठेवले जाते.
ती विमनस्क अवस्थेत ते कॉफिन घट्ट धरते,जसे एखाद्या मातेने आपल्या बालकाला बिलगावे तसे.
’त्याची’ दहा वर्षांची मुलगी येवून सलाम करते...
कडक सलाम ...

गर्दी अभिमानाने तिच्याकडे बघतच राहते...
माझे डोळे पाणावतात...शेकडो आया शांतपणे आपला संताप व्यक्त करत आहेत.
शेकडो युवक सैन्यात जायची प्रतिज्ञा करतात..
एका वाघाचा मृत्यू झाला आहे का? शेकडो बछडे जन्माला आलेत ?

मी संभ्रमात आहे...

सैनिकाच्या चितेभोवती जवळचे मित्र फोटो काढून घेण्यासाठी उभे राहतात.
ही नेमकी शोकसभा आहे का?
कुठला उत्सव ?

मी संभ्रमात आहे...
सगळेजण परत गेलेत. संधिप्रकाश पडतो आहे. मी एकटाच त्या ज्वालांच्या जवळ उभा आहे. थंडगार वारे वाहू लागले आहेत,
पण मला ऊब जाणवते आहे...

हा प्रकाश उगवत्या सूर्याचा आहे?
का शीतलता आहे मावळत्याची ?

मी संभ्रमात आहे...

मी परतीच्या विमानात बसतो.
ऐकायला थोडं विचित्र वाटेल...
पण मी शांत आहे ..मनातून शांत ...
मी माझ्या मित्रांच्या प्रेमात पडतोय ..
मी माझ्या माणसांच्या प्रेमात पडतोय ..

मी माझ्या देशाच्या प्रेमात पडतोय ..
मी माझ्या तिरंग्याच्या प्रेमात पडतोय..
पुन्हा एकवार ...
तो नेमका निरोप होता का? स्वागत...
तो नेमका शेवट होता का? एक आरंभ...

मी कर्नल संतोष महाडिक बोलतोय..कवी - दिपक पारधे

मायभूमी वाचविण्यासाठी, जवान सरहद्द लढवतोय,
अहो ऐकताय का ?
मी कर्नल संतोष महाडिक बोलतोय...🇮🇳

लहान पणापासून वाढलो, सह्याद्रीच्या कुशीत,
निडर पणाने लढलो, देशाच्या वेशीत,
वीरगती मिळाली पण एक खंत तुम्हाला सांगतोय,
अहो ऐकताय का ?
मी कर्नल संतोष महाडिक बोलतोय...🇮🇳

राजकारण, अर्थकारण ह्यात मी शून्यच होतो,
देशासाठी जगायचं, ह्याच विचारानं पेटलो होतो,
कट्यावरच्या गप्पा, मला कधी जमल्याचं नाही,
शत्रू वाटचाल करीत असताना, मला गप्पं बसवलंच नाही,
बसू तरी शांत कसा, जेव्हा परका माय माझी ओरबाडतोय,
अहो ऐकताय का ?
मी कर्नल संतोष महाडिक बोलतोय....🇮🇳

आज शांत झोपलोय, पण मन अजूनही शांत नाही,
माझ्या देशातील बांधवांना, अजूनही खात्री नाही,
आतून बाहेरून, कट कारस्थाने रचली जातायेत,
पण आमचे मंत्री अजूनही, अंतर्गत कलह माजवतायेत,
जवान देशासाठी तर पुढारी श्रेयासाठी लढतोय,
अहो ऐकताय का ?
मी कर्नल संतोष महाडिक बोलतोय...🇮🇳

वीरगती नंतर मी पुन्हा माझ्या, जन्मभूमीत पोहोचलो,
स्वकीयांचे डोळे घायमोकळून रडत होते, पण मी न बोलू शकलो,
जमलेल्या कित्येकांमध्ये आता, देश प्रेरणा जागृत होईल,
पण पाठफिरवताच तेथून, राजकारणामुळे तो पुन्हा शांत होईल,
मी मेल्याचा शोक नाही, तर माझ्याच बांधवांची खंत सांगतोय,
अहो ऐकताय का ?
मी कर्नल संतोष महाडिक बोलतोय...🇮🇳

मेल्यानंतर हि आज, छाती भरगच्च फुगलीये,
एवढ्या गर्दी समोर, मी तिरंग्याची चादर ओढलीये,
पण हा मान कसला आहे हे सगळ्यांना नाही कळणार,
माझ्या मातेचे लक्तरे तोडणाऱ्याला, थोडी ना वीरगती मिळणार,
मायभूमीसाठी शहिद होण्याचे सुख काय असते,
ह्याची जाण तुम्हाला करून देतोय,
अहो ऐकताय का ?
मी कर्नल संतोष महाडिक बोलतोय...🇮🇳

चला माझ्या निघण्याची वेळ झाली,
माझ्या इतर शहीद बांधवांना भेटण्याची वेळ आली,
आज सुखानं विलीन होत अनंतात जाईल,
पण का माझ्या गाथेने तुमच्या मध्ये देशप्रेम जागृत होईल,
जर असे झालेच तर मी माझे जीवन अजून सार्थक समजेल,
आणि ह्याच मायभूमीत पुन्हा जन्म मिळो असेच मागणे मागेल,
चला एवढे बोलून, तुमची रजा घेतोय,
मी तुमचा आणि तुमचाच, कर्नल संतोष महाडिक बोलतोय...🇮🇳🇮🇳

कवी  दिपक पारधे
९८२०२६३३९६
कळवा, ठाणे.
आवडल्यास नक्की शेअर करा.....
जय हिन्द
२०/११/२०१५

शनिवार, २१ नोव्हेंबर, २०१५

शहीद संदीप संतोष ह्याळीज

भावपूर्ण श्रध्दांजली

 

बागलान तालुकयातील आखातवाडे गावातील भूमीपूत्र श्री संदीप संतोष ह्याळीज सीमेवर लढाईत वीरमरण आले. पार्थिव आज संध्याकाळपर्यंत आखातवाडे येथे आणण्यात येणार आहे.



 

शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०१५

तीन मिनिटांत टोल घ्या; अन्यथा रस्ता खुला करा!

जिल्हा प्रशासनाचे महामार्ग प्राधिकरण आणि टोल कंपनीला आदेश

पुणे - तुम्ही टोल नाक्‍याच्या गर्दीत फसला असाल आणि तीन मिनिटांहून अधिक वेळ होऊन गेला असेल, तर शुल्क न भरता पुढे जाऊ शकता... या वेळेत नागरिकांकडून शुल्क घेतले नाही, तर नाक्‍यांचे गेट विनाशुल्क खुले करून देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने महामार्ग प्राधिकरणास दिले आहेत. सातारा आणि नाशिक रस्त्यांवरील नाक्‍यांसाठी हा आदेश देण्यात आला आहे.
महामार्गावर टोल वसूल करताना तीन मिनिटांमध्ये ते काम करण्याची तरतूद राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि टोल वसूल करणारी कंपनी यांच्या करारामध्ये आहे. मात्र, आतापर्यंत त्यानुसार कार्यवाही केली जात नव्हती. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे नुकतीच बैठक झाली. त्यामध्ये सातारा आणि नाशिक रस्त्यांवर करारातील अटींचे पालन करण्याच्या स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिल्या आहेत. लोकांचा वेळ वाचावा म्हणून ही सूचना दिली असून, या संदर्भात उद्या (ता.20) प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची एक बैठक बोलावण्यात आल्याचे जिल्हाधिकारी राव यांनी सांगितले.

पुण्यात येणाऱ्या सातारा आणि नाशिक रस्त्यावरील टोल नाक्‍यांवर वाहनांच्या सतत रांगाच्या रांगा लागतात. प्रवाशांना शनिवारी-रविवारी अर्धा तास, तर कधी तासभर नाक्‍यावर थांबावे लागते. टोल घेण्यासाठी पुरेशी यंत्रणा नसल्याने ही प्रतीक्षा करावी लागते व त्यांचा वेळ वाया जातो. आता मात्र या वेळेची किंमत टोल नाकाचालकांना मोजावी लागणार आहे. तीन मिनिटांपेक्षा अधिक काळ वाहनांच्या रांगा कायम राहिल्यास टोल नाक्‍याचे सर्व दरवाजे खुले करून द्यावे लागणार आहेत. जिल्हा प्रशासनाने या तरतुदीची दखल घेतल्याने करारातील नागरिकांच्या हक्काचा भाग समोर आला आहे.

प्राधिकरणाचा पाठिंबा कंपनीला

महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी टोल कंपन्यांची बाजू घेतली. रस्त्यांचे बांधकाम सुरू असल्याने या तरतुदीची अंमलबजावणी करता येत नसल्याची हतबलता त्यांनी व्यक्त केली. ज्या ठिकाणी रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे, तेथेही रांगा लागतात. त्या ठिकाणी टोल वसूल का केला जातो, या प्रश्‍नाचे उत्तर मात्र अधिकाऱ्यांना देता आले नाही.

करारानुसार नियम काय आहे?

कराराप्रमाणे प्रत्येक टोल नाक्‍यावर शुल्काची पावती घेऊन दहा सेकंदांत एक वाहन पुढे सरकले पाहिजे आणि वाहनाचा प्रतीक्षा कालावधी तीन मिनिटांचा आहे. मात्र, प्रकल्प अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रस्त्यांची कामे सुरू असल्याने एक वाहन पुढे सरकण्यास (सेवा कालावधी) सोळा सेकंद लागतात आणि प्रतीक्षा कालावधी पाच मिनिटे आहे, असे पाहणीत आढळले आहे.

काम अपूर्ण असताना ‘वसुली‘ का?

रस्त्याची दुरुस्ती सुरू असल्याने करारातील नियमांची अंमलबजावणी करता येत नाही, असे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, नागरिकांना अनेक टोल नाक्‍यांवर पाच ते दहा मिनिटांपेक्षा अधिक वेळ प्रतीक्षा करावी लागते. तरीही तेथे टोल आकारणी केली जाते. याबद्दल अधिकाऱ्यांकडे कोणतेही उत्तर नव्हते. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर टोलवसुली करणाऱ्या यंत्रणेला नियमांचे पालन करण्यास भाग पाडले जाईल, असे त्यांचे म्हणणे आहे. मग काही रस्त्यांची कामे अपूर्ण असताना टोल आकारणी करताच कशी, असा सवाल वाहनचालक उपस्थित करीत आहेत.

‘टोल नाक्‍यावर शुल्क देण्यासाठी एखादे वाहन किती वेळ थांबाविण्यात यावे, यासंबंधी स्पष्ट तरतूद करारात आहे. त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना महामार्ग प्राधिकरणास दिल्या आहेत. रस्त्याचे काम सुरू असले, तरी कंपनीकडून टोल वसूल केला जात असल्याने करारातील टोलसंबंधी नियमांचे पालन करणे त्यांच्यावर बंधनकारक आहे.‘‘
- सौरभ राव, जिल्हाधिकारी, पुणे
 
 
- संतोष शाळिग्राम  [ सकाळ वृत्तसेवा ]   शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2015 - 03:45 AM IST  
 
 
 
 
 
 


सीमेवरचा सैनिक

सीमेवरचा सैनिक आज शांतपणे झोपला होता

कित्येक दिवसांनी तो आज चिरकाल निद्रिस्त झाला होता

आज त्याचे खूप लाड होत होते

लहान बालकाप्रमाणे लोक त्याला स्नान घालीत होते

कित्येक दिवसानंतर त्याने खादी गणवेश उतरवला होता

कित्येक दिवसानंतर त्याने पांढरे शुभ्र कपडे परिधान केले

हार फुलांनी त्याला सजविले गेले तरीही

त्याच्या शरीराला मातृभूमिच्याच मातीचा सुगंध येत होता

सीमेवरचा सैनिक आज शांतपणे झोपला होता

सीमेवर रात्रंदिवस पहारा द्यायचा, तसा

उच्च अधिकार्याचा फर्मानच होता

म्हणून आजही त्याचे डोळे अर्धे उघडे होते

कारण त्याने मातृभूमीच्या रक्षणाचे धडे गिरविले होते

ऐंशी वर्ष्याची त्याची आई त्याला पाहून टोहो फोडीत होती

सुरुकुतलेल्या हाताने ती त्याला गोंजारीत होती

पंच्यायेंशी वर्ष्याचा दृष्टी आणि ऐकू कमी येणारा

त्याचा बाप घरासमोर कसला जलसा जमला आहे

असे अनेकांना विचारीत होता आणि लवकरच

आपला मुलगा सुट्टी घेवून येणार असल्याचा

प्रत्येकाला सांगत होता

सीमेवरचा सैनिक आज शांतपणे झोपला होता

भांबावलेला त्याचा चिमुरडा एकटक आपल्या पित्याकडे पाहत होता

आणि हा कोणता विधी आहे असे प्रश्न करीत होता

सैनिकाची पत्नी खिन्नपणे त्याच्या शेजारी बसली होती

जमलेल्या स्त्रिया तिच्या हातातून सौभाग्य चुडा उतरविता होती

तिला दिलेली सर्व वचने मोडून तो तिला कायमचा

सोडून निघून गेला होता

जमलेले त्याचे मित्र त्याला आवाज देवून त्याला उठवीत होते

आणि त्याला अशी मस्करी करायची सवय आहे 

असे एकमेकांना सांगत होते

कुठलाच आवाज कुठलाच आक्रोश

त्याला आज ऐकू येत नव्हता

सीमेवरचा सैनिक आज शांतपणे झोपला होता

मोठ्या दिमाखात त्याची अंतयात्रा निघाली

तोफांनी त्याला सलामी दिली

सर्व नात्यांची मिठी आज सैल झाली

देशभक्तीचा रंग परत आज उदयास आला होता 

भारतमातेचा आणखी एक पुत्र

मातृभूमीच्या रक्षणार्थ

आज शहीद झाला होता

आज शहीद झाला होता 

© सौ सविता मल्लिकार्जुन इंगळे 

Wife of  Mallikarjun Ingale Ex  CPO (Indian Navy)

गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०१५

सलाम राष्ट्रभक्तिला

कर्नल महाडिक,
माझ हे पत्र आपल्यापर्यन्त पोहोचणार नाही, तरी पण लिहितोय. आपले आभार मानायचे होते. धन्यवाद ! आपण आमच्यासाठी केलेल्या सर्वोच्च बलिदाना बद्दल शतशः धन्यवाद.
आमच्या सारखी छोटी माणस एवढंच करू शकतात. तुम्ही तिकडे आमच्यासाठी प्राणार्पण केले, आम्ही मात्र मोदी कसे वाईट आहेत,तुरडाळ कशी महागली,लव जिहाद,घर वापसी,मंदीर मस्जिद,स्मारक कुठे असावे या वर वाद घालत बसलो. कदाचित आमच्यातल्या काहींची वैचारिक ऊँची कधी वाढणारच नाही अस वाटतंय. तुम्ही गेल्याने काहींना काहीच फरक पड़त नाही. आमच् ऑफिस, आमचा व्यवसाय, आमच्या राजकीय कुरघोड्या आणी चिखलफेक, आमची जातीय समीकरण, आमचे हॉटेलिंग, आमच्या ओल्या-सुक्या पार्ट्या काही काही थांबणार नाही. एवढंच काय, आमच्या अतिव्यस्त दिवसात दोन मिनिट थांबुन तुमच्यासाठी दोन अश्रुंची श्रद्धाञ्जलि देण्या इतका पण आमच्याकडे वेळ नसतो. आम्हाला काहीच, कशाचाच फरक पड़त नाही. पण फरक पडेल तुमच्या घरच्यांना, ज्यांनी काळजावार दगड ठेऊन तुम्हाला देशासाठी...आमच्यासाठी... सरहद्दीवर जाऊ दिल. फरक पडेल तुमच्या अर्धांगिनीला. तुम्ही सगळ्यात जास्त अठवताल तुमच्या 11 आणी 5 वर्षाच्या पिल्लांना. बाकी सर्व आपल्या आपल्या खुज्या दुनियेत मशगूल राहणार. हे सर्व सत्य आपल्याला माहीत असताना देखील आपण आमच्यासाठी प्राणाहुती दिलीत.
सलाम तुमच्या त्यागाला, सलाम तुमच्या राष्ट्रभक्तिला, सलाम तुमच्या माता-पित्यांना ज्यांनी असा पुत्र घडविला, सलाम तुमच्या सारख्या तमाम जवानांना.
भारतीय सैनिक

बुधवार, १८ नोव्हेंबर, २०१५

शहिद संतोष मधुकर घोरपडे - वेटरन दिलीप हिरे

शहिद मुळ नाव संतोष मधुकर घोरपडे
जन्म पोगरवाडी ता सातारा
शेजारील आरेदरे गावात माऊशी रहाते
माऊशीने दत्तक घेतले तेव्हा पासुन त्याचे नाव
संतोष महाडिक
संतोषचे वडीलांचे दुकान पोवई नाका येथील विजय टेलर
त्यांच्या वडीलांचे गेल्या वर्षी निधन झाले
त्याचा भाऊ दुध व्यवसाय करतो
साताऱ्यातल्या पोगरवाडीत आज कमालीची शांतता आणि शोककळा आहे. पोगरवाडीनं आणखी एक सुपुत्र गमावलाय. कर्नल संतोष महाडिक दहशतवाद्यांविरोधात लढताना धारातीर्थी पडलेत. कर्नल संतोष महाडिक यांना श्रीनगर इथं लष्कराच्या जवानांची मानवंदना दिली. त्यानंतर त्यांचं पार्थिव त्यांच्या मूळगावी नेण्यात आलंय.

साताऱ्यातलं पोगरवाडी हे त्यांचं मूळ गाव आहे. काल दुपारपासूनचं गावात अनामिक शांतता  पसरलीय. कर्नल महाडिकांचे मित्र, आप्तेष्टांचं ऊर त्यांच्या आठवणी सांगताना भरून येतोय. संध्याकाळी याच गावात कर्नल महाडिकांवर संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंत्कार होणार आहेत. 

संपुर्ण जगाच्या नजरा या सीरियावर आहेत. याच दरम्यान काश्मीरमध्ये देशाचा एक जवान दहशतवाद्यांच्या गोळ्यांचा शिकार बनला. लष्कर-ए-तोयबाच्या चार ते पाच अतिरेक्यांनी १२ दिवसांपूर्वी घुसखोरी केल्याची पक्की खबर लष्कराला मिळाली होती.

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ मनीगाहमध्ये हे अतिरेकी दडून बसले होते. त्यांना कंठस्नान घालण्यासाठी कर्नल संतोष महाडिक निघाले होते. 

तब्बल १२ दिवस चाललेल्या या ऑपरेशनमध्ये जाँबाज सैनिकांनी दहशतवाद्यांना तीन वेळा कोंडित पकडलं. मात्र, तिन्ही वेळा ते पळून गेले. अखेर लष्करानं कर्नल संतोष महाडिक यांच्याकडे या ऑपरेशनचं नेतृत्व दिलं. यानंतर सुरु झाली अतिरेकी आणि जवानांमधली चकमक. १६०-टीए बटालियनचे जवान मजलूम अहमद यांच्यासह तीन जवान जखमी झाले. 

एकीकडे जवान जखमी होत असताना कर्नल महाडिकांनी झुंज सुरूच ठेवली. दुपारी अडीचच्या सुमारास त्यांनी आपल्या जवानांसह अतिरेक्यांच्या दिशेनं कूच करायला सुरूवात केली... पण... मात्र एका बेसावध क्षणी अतिरेक्यांच्या गोळीनं हा जाँबाज लढवय्या टिपला. त्यांच्या डोक्यात आणि पोटाला गोळ्या लागल्या. त्यांच्या सहकाऱ्यांनी लगेचच त्यांना रुग्णालयात हलवलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता.

वेटरन दिलीप हिरे
मालेगांव जय जवान संघ

बुधवार, ११ नोव्हेंबर, २०१५

आता माजी सैनिकांच्या ‘पदकवापसी’चा सिलसिला

First Published :11-November-2015 : 03:20:10

चंदीगड/नवी दिल्ली : ‘वन रँक, वन पेन्शन’योजनेबाबत केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या सुमारे दोन हजारांवर माजी सैनिकांनी मंगळवारी आपली पदके परत केली. दिल्ली, हरियाणा व पंजाबातील अनेक माजी सैनिकांनी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांत पदकवापसी करून संबंधित अधिसूचनेस विरोध दर्शवला. दरम्यान, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पदकवापसी करणाऱ्या माजी सैनिकांना अप्रत्यक्षपणे फैलावर घेत, हे सैनिकांसारखे काम नसल्याचे म्हटले.

‘वन रँक, वन पेन्शन’संदर्भातील अधिसूचना म्हणजे या योजनेची हत्या आहे. आम्हाला दिलेल्या आश्वासनांपासून फारकत घेण्याचा हा प्रकार आहे. आमचा या अधिसूचनेला विरोध आहे.

हा विरोध नोंदविण्यासाठी देशभरातील माजी सैनिकांनी आपापली पदके परत केली. याउपरही सरकार जुमानणार नसेल तर आम्ही अधिसूचनेविरोधात ‘काळी दिवाळी’ साजरी करू, असे आंदोलकर्त्या माजी सैनिकांचे प्रवक्ते कर्नल (सेवानिवृत्त) अनि

( Lokmat )

Happy Diwali



मंगळवार, १० नोव्हेंबर, २०१५

माजी सैनिकांची आजपासून ‘पदकवापसी’

संरक्षणमंत्र्यांच्या विधानावर आंदोलनकर्त्यां माजी सैनिकांनी टीका केली आहे.

पीटीआय, नवी दिल्ली | November 10, 2015 2:45 AM
 

आंदोलनकर्त्यांनी मंगळवारपासून आपली पदके परत करून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन
‘एक पद- एक निवृत्तीवेतन’ योजनेच्या औपचारिक अधिसूचनेबाबत आंदोलनकर्त्यां माजी सैनिकांनी असमाधान व्यक्त केल्याच्या संदर्भात, ‘सर्वच मागण्या पूर्ण केल्या जाऊ शकत नाहीत’, असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटले आहे. आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त करताना मंगळवारपासून आपली पदके परत करून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

सैनिकांच्या ‘बहुतांश’ मागण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत यावर भर देऊन, या संदर्भात स्थापन केले जाणार असलेला न्यायिक आयोग सर्व ‘समस्यांकडे’ लक्ष देईल, असे पर्रिकर म्हणाले. लोकशाहीत प्रत्येकालाच मागणी करण्याचा हक्क आहे. एकाच पदासाठी सारखे निवृत्तीवेतन ही त्यांची मुख्य मागणी मान्य करण्यात आली असून, इतर गोष्टी आम्ही ५ सप्टेंबरला जाहीर केल्यानुसार आहेत. स्वेच्छानिवृत्तीवेतनाबाबतचा (व्हीआरएस) संभ्रमही आम्ही दूर केला आहे, असे पर्रिकर एका कार्यक्रमानंतर म्हणाले.
सरकारने शनिवारी जाहीर केलेल्या अधिसूचनेबाबत माजी सैनिक नाराज आहेत याचा उल्लेख केला असता पर्रिकर म्हणाले की, ‘मूलभूत महत्त्वाचे मुद्दे’ सोडवण्यात आले आहेत आणि तरीही काही अडचण असेल, तर न्यायिक आयोग त्याकडे लक्ष देईल.
दरम्यान, सरकारने एक पद- एक निवृत्तीवेतनाच्या मुद्याबाबत निर्देश दिले असून प्रत्येकाने ते मान्य करायला हवेत, असे मत वायुदलप्रमुख अरुप राहा यांनी व्यक्त केले. याउपरही काही त्रुटी राहिल्या असतील, तर योग्य वेळी त्या दूर केल्या जाऊ शकतात असेही ते म्हणाले.
दरम्यान, संरक्षणमंत्र्यांच्या विधानावर आंदोलनकर्त्यां माजी सैनिकांनी टीका केली आहे. ‘एक पद- एक निवृत्तीवेतन’ ही आमची एकच मागणी असून, सरकारने हा मुद्दा जटिल करणाऱ्या काही तरतुदी अधिसूचनेत जोडल्या आहेत. आम्हाला ही योजना तिच्या व्याख्येनुसार हवी आहे. कुठल्याही कनिष्ठ सैनिकाला त्याच्या वरिष्ठापेक्षा जास्त निवृत्तीवेतन मिळायला नको, यावर सैनिकांनी भर दिला.
सरकारच्या अधिसूचनेच्या विरोधात आम्ही उद्यापासून आमची पदके परत करणे सुरू करणार आहोत. १०-११ नोव्हेंबरला देशभरातील माजी सैनिक त्यांची पदके परत करण्यास सुरुवात करतील. त्यांनी संबंधित जिल्हा दंडाधिकाऱ्यांना याबाबत आधीच कळवले आहे, असे इंडियन एक्स-सव्‍‌र्हिसमेन मूव्हमेंटचे (आयईएसएम) सरचिटणीस व निवृत्त ग्रूप कॅप्टन व्ही.के. गांधी यांनी सांगितले.

दिल्लीमध्ये इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनलबाहेर सैनिक पदके परत करतील. गर्दीच्या ठिकाणांची निवड करण्याचा उद्देश, सामान्य माणसाला या मुद्याबाबत माहिती देणे हा असल्याचे गांधी म्हणाले.

[ PTI ] [ Loksatta ]  First Published on November 10, 2015 2:43 am

माजी सैनिकांचे ‘पदकवापसी’ आंदोलन दिशाभूल करणारे- पर्रिकर

‘एक पद- एक निवृत्तीवेतन’ आंदोलनात सहभागी असणाऱ्या माजी सैनिकांकडून छेडण्यात आलेले पदकवापसी आंदोलन दिशाभूल

एक्स्प्रेस वृत्तसेवा, नवी दिल्ली | November 10, 2015 4:08 PM    

गेली ५० वर्षे ज्या मागण्यांचा साधा विचारही झाला नव्हता, त्या कमी-अधिक प्रमाणात पूर्णही झाल्याचे असे पर्रिकरांनी यावेळी सांगितले.

‘एक पद- एक निवृत्तीवेतन’ आंदोलनात सहभागी असणाऱ्या माजी सैनिकांकडून छेडण्यात आलेले पदकवापसी आंदोलन दिशाभूल करणारे असल्याचे केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मंगळवारी सांगितले. आंदोलन करणे हा त्यांचा लोकशाहीतील हक्क आहे. मात्र, ते या माध्यमातून दिशाभूल करत असल्याचे पर्रिकरांनी म्हटले. ‘एक पद- एक निवृत्तीवेतन’ योजनेची अधिसूचना काढणे, हे माझे मुख्य काम होते, ते मी केले आहे. त्याबाबत असमाधानी असल्यास आंदोलकर्त्यांनी आयोगाशी चर्चा करावी. गेली ५० वर्षे ज्या मागण्यांचा साधा विचारही झाला नव्हता, त्या कमी-अधिक प्रमाणात पूर्णही झाल्याचे असे पर्रिकरांनी यावेळी सांगितले.
‘एक पद- एक निवृत्तीवेतन’ योजनेच्या औपचारिक अधिसूचनेबाबत आंदोलनकर्त्यां माजी सैनिकांनी असमाधान व्यक्त केल्याच्या संदर्भात ‘सर्वच मागण्या पूर्ण केल्या जाऊ शकत नाहीत’, असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटले होते. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त करताना मंगळवारपासून आपली पदके परत करून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला होता.
 
माजी सैनिकांची आजपासून ‘पदकवापसी’ 


[ Loksatta ]

लढा, पण सबुरीने..

‘एक पद एक निवृत्तिवेतन’ या मागणीसाठी गेली चार दशके सरकारशी वेगवेगळ्या मार्गानी चर्चा सुरू

मुंबई | November 10, 2015 3:52 AM              

‘एक पद एक निवृत्तिवेतन’ या मागणीसाठी दिल्लीत सप्टेंबर महिन्यात  अधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले होते

देशातील असहिष्णू वातावरणाचा निषेध म्हणून लेखक- कलावंतांनी ‘पुरस्कारवापसी’चा मार्ग वापरल्यामुळे हे वातावरण सहिष्णू होणार का, हा प्रश्न अद्याप सुटलेला नसताना, देशातील लष्करी अधिकाऱ्यांनी केवळ आपल्या निवृत्तिवेतनविषयक मागण्यांसाठी त्याच मार्गाचा अवलंब करून आपली पदके परत करण्याची भाषा करणे अनाकलनीय आहे.

‘एक पद एक निवृत्तिवेतन’ या मागणीसाठी गेली चार दशके सरकारशी वेगवेगळ्या मार्गानी चर्चा सुरू होती. आजवरच्या सत्ताधाऱ्यांनी निवृत्त लष्करी जवान आणि अधिकाऱ्यांच्या या प्रश्नाकडे कधीच फारसे गांभीर्याने पाहिले नाही. अशा स्थितीत अखेरचा मार्ग म्हणून दिल्लीत सप्टेंबर महिन्यात या अधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले. त्या वेळी देशासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या या निवृत्त अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन तातडीने निर्णय देण्याची घोषणा झाली. त्यानुसार शनिवारी सरकारने त्याबाबतची अधिसूचनाही जारी केली. आता त्या परिपत्रकात आपल्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, असे कारण देत याच अधिकाऱ्यांनी त्यांना मिळालेली शौर्यपदके परत करण्याची घोषणा केली आहे. ४० वर्षांपूर्वी लष्कराच्या माजी अधिकारी व जवानांना मूळ वेतनाच्या ७० टक्के प्रमाणात मिळणाऱ्या निवृत्तिवेतनात तत्कालीन सरकारने कपात करून ते ५० टक्क्यांवर आणले. कारण काय, तर इतर आस्थापनांमध्ये अखेरच्या मूळ वेतनाच्या ५० टक्के निवृत्तिवेतन दिले जात असताना लष्कराला वेगळा निकष का, असा प्रश्न तेव्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वर्तुळातून पुढे केला गेला. लष्कराकडे पाहण्याचा सरकारी बाबूंचा दृष्टिकोन आणि त्याला त्या त्या वेळच्या सत्ताधाऱ्यांनी दिलेला पाठिंबा यामुळे हा प्रश्न इतके दिवस भिजत पडला. देशातील २४ लाख निवृत्त अधिकारी आणि मृत पावलेल्या सहा लाख जवानांच्या पत्नी यांना ‘एक पद एक निवृत्तिवेतन’ ही योजना संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी जाहीर केली. त्यानुसार वर्षांकाठी किमान आठ ते दहा हजार कोटी रुपयांचा अधिक खर्च सरकारने उचलण्याचे ठरवले आहे. या सर्वाना १ जुलै २०१४ पासून नवे वेतन लागू होईल. आंदोलकांना ते १ एप्रिलपासून हवे होते. जुलै २०१४ ते नोव्हेंबर २०१५ या काळातील फरकाची रक्कम चार हप्त्यांत दर सहा महिन्यांनी दिली जाणार असून वीरपत्नींना मात्र एकाच हप्त्यात देण्यात येणार आहे. यापूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या अधिकाऱ्यांनाही हे निवृत्तिवेतन लागू करायचे, मात्र नव्याने स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्यांना ते द्यायचे नाही, असा निर्णय सरकारने घेतला आहे. निवृत्तिवेतनात दर दोन की पाच वर्षांनी वाढ करायची, हा कळीचा मुद्दा होता. सरकारने दर पाच वर्षांनी वाढ करण्याचे मान्य केले. महत्त्वाच्या मागण्या मान्य झाल्यानंतरही उर्वरित मागण्यांसाठी आंदोलन रेटणे हे आंदोलनाच्या तत्त्वज्ञानात बसणारे नसते. अधिक मागण्या मान्य करून घेण्यासाठी आंदोलकांनीही काही काळ थांबून श्वास घ्यायचा असतो. सगळ्या मागण्या एकाच वेळी आपल्याला हव्यात तशाच स्वरूपात मान्य करून घेण्याचा हा हट्ट वृथाही आहे आणि अन्यायकारकही आहे. चर्चेने जे प्रश्न गेली चार दशके सुटले नाहीत, ते आंदोलनाने काही महिन्यांत सुटले असतील, तर त्यातील त्रुटी दूर करण्यासाठीही सरकारला वेळ देणे आवश्यक असते, याचे भान आंदोलकांनी ठेवायलाच हवे.
 

सोमवार, ९ नोव्हेंबर, २०१५

निमंत्रण

Hभाऊबीजेचे चार कार्यक्रम, सर्वांना आपुलकीचे निमंत्रण

गुरुवार  12 नोव्हेंबर
वीरमाता सन्मान /  भाऊबीज वीरमाता शुभदा कदम  (शहीद ले. क. मनीष कदम * कीर्ती चक्र )यांच्या मातोश्री मुपो. सिंधुदुर्ग
स्थळ कसबा गणपती मंदिर सकाळी दहा वाजता.

🙏🙏🙏🙏
13 नोव्हेंबर सकाळी दहा
बेपत्ता आणि शहीद सैनिकांच्या वीरपत्नींच्या सन्मानार्थ भाऊबीज
पाहुणे ब्रिगेडियर हेमंत महाजन

🙏🙏🙏
रविवार 15 नोव्हेंबर सकाळी साडेदहा, खडकी पॅराप्लेजिक सेंटर
पाहुणी ** संस्कृती बलगुडे

🙏🙏🙏
18 नोव्हेंबर सायंकाळी साडेसहा वंचित विकास. श्रीनाथ समोर.
सर्वांना यथाशक्ती सहभागी होण्याची विनंती आहे. 🙏

More details at  +919822861303

मोदी सुधारा, नाहीतर अवस्था वाईट होईल - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

                            
                               
मुंबई- ‘अजूनही वेळ आहे, सुधारा... नाहीतर पुढे आणखी वाईट अवस्था होईल‘ असा सल्ला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे.

बिहार निवडणुकांमध्ये भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) लालू-नितीश-राहुल यांच्या महाआघाडीने धडा शिकविल्याने विरोधी पक्ष आनंद साजरा करीत आहेत. त्याचवेळी अण्णा हजारेंनी मोदींना वरील सल्ला दिला आहे.



बिहार निवडणुकांमध्ये महाआघाडीला मिळालेले घवघवीत यश आणि एकूण निकाल याबद्दल बोलताना अण्णा हजारे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना अजूनही सुधारण्यासाठी वेळ आहे. ते सुधारले नाहीत तर यापेक्षाही वाईट अवस्था होईल.

आधी करा, मग सांगा
लोकसभा निवडणुकांपूर्वी जनतेला मोठी आश्वासने दिली, परंतु ती पूर्ण केली नाहीत त्यामुळे लोकांचा मोदी सरकारवरील विश्वास उडाला. जर आश्वासने पूर्ण करायची नव्हती तर ती आश्वासने दिलीच का, असा सवाल विचारत ‘आधी काम करा आणि मग आश्वासन द्या‘ असे अण्णा हजारे यांनी सांगतिले.

‘ते‘ जाणतात विकास कसा करावा
निवडणुकीतील विजयाबद्दल नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांचे अण्णा हजारे यांनी अभिनंदन केले. विकास करावा हे नितीश कुमार यांना माहीत आहे. नितीश यांनी पाणी व्यवस्थापनावर काम करायला हवे. त्यामुळे बिहारी लोकांना तिथेच रोजगार मिळेल, बाहेर जावे लागणार नाही, असे त्यांनी सांगितले.


[ वृत्तसंस्था ]

अण्वस्त्रवाहु अग्नि-4 चे यशस्वी प्रक्षेपण

हैदराबाद - अग्नि-4 या सुमारे 4 हजार किमी पल्ला असलेल्या अण्वस्त्रवाहु क्षेपणास्त्राची ओडिशा तटाजवळील व्हीलर बेटावरुन आज (सोमवार) यशस्वी चाचणी करण्यात आली. या क्षेपणास्त्रावरुन सुमारे एक टन वजनाची स्फोटके डागली जाऊ शकतात.

"ही मोहिम यशस्वी झाली. मोहिमेआधी निश्‍चित करण्यात आलेले सर्व निकष यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले,‘‘ असे संरक्षण विज्ञान आणि विकास (डीआरडीओ) विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. डीआरडीओमधील ज्येष्ठ वैज्ञानिक, तंत्रज्ञ आणि संरक्षण मंत्र्यांचे विज्ञानविषयक सल्लागार असलेले जी सतीश रेड्डी हे यावेळी उपस्थित होते.

भारताच्या क्षेपणास्त्र विकास धोरणामधील अग्नि क्षेपणास्त्रांचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते.
 
[ वृत्तसंस्था ]

आता प्रकाशातूनही होणार ‘डेटा ट्रान्स्फर’! (वेबटेक) - व्यंकटेश कल्याणकर

तंत्रज्ञान जसजसे पुढे जात आहे, तसतशी नवी आव्हानेही समोर येत आहेत. भारतासारख्या विकसनशील देशांसह विकसित देशांनाही मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये स्वस्त डिव्हाइसेसच्या उपलब्धतेसह जगाशी कनेक्‍ट करणारे प्रभावी नेटवर्क ही प्रमुख आव्हाने आहेत. स्मार्टफोन्ससारखी डिव्हाइसेस स्वस्तात उपलब्ध होत आहेत, तर नेटवर्कवरील अडचणींवरही जगभर उपाय शोधले जात आहेत. अलीकडेच ‘फेसबुक’नेही या समस्येवर नव्या उपाययोजना करत असल्याचे जाहीर केले आहे. त्यामध्ये ‘इंटरनेट डॉट ओआरजी’ हा केवळ विनामूल्य सेवा देण्याचा उपक्रम नसून, कनेक्‍ट करण्याची ती व्यापक मोहीम असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच त्यासाठी काम सुरू आहे. नेटवर्क समस्येचा विचार करताना भारतासारख्या विकसनशील आणि मोठी व्यावसायिक संधी असलेल्या देशांना ‘फेसबुक’सारख्या प्रमुख कंपन्यांनी केंद्रस्थानी ठेवले आहे. नेटवर्कची सुविधा देण्यासाठी सॅटेलाईट, ड्रोन आणि ‘वाय-फाय’ सुविधेचाही वापर करण्याची या कंपन्यांची योजना आहे. उपग्रहाद्वारे कनेक्‍टिव्हिटी देण्यासाठी ‘बोइंग ७३७’च्या पंखांप्रमाणे रचना असलेले, तसेच सौरऊर्जेवर चालणारे तंत्रज्ञान ‘फेसबुक’ विकसित करत आहे. पुढील वर्षापर्यंत हे काम पूर्ण होईल. याशिवाय ड्रोनद्वारेही कनेक्‍टिव्हिटी देण्यात येणार आहे. तसेच यूझर्सना आकर्षित करण्यासाठी अल्पदरात ‘वाय-फाय’ सुविधेचाही प्रभावी वापर करण्याची योजना आहे. अशाच काही योजना ‘गुगल’ही राबविणार आहे. तज्ज्ञांच्या मते येत्या तीन-चार वर्षांत सर्व जग विविध माध्यमांतून कनेक्‍ट होण्याची शक्‍यता आहे. मात्र कनेक्‍टिव्हिटीसाठी उपग्रह, ड्रोन आणि ‘वाय-फाय’शिवाय अन्य पर्यायांचा जगभर शोध घेण्यात येत आहे. त्यातून प्रकाशातून डेटा ट्रान्स्फर करणाऱ्या ‘लाय-फाय’चा शोध लागला आहे.

काय आहे ‘लाय-फाय’?
सभोवताली असलेल्या प्रकाशाच्या माध्यमातून डेटा ट्रान्स्फर करण्याच्या पद्धतीला ‘लाय-फाय’ म्हणतात. ही पद्धत ‘वाय-फाय’प्रमाणेच काम करते. या पद्धतीत एलईडीद्वारे (लाइट इमिटिंग डायोड) पडणाऱ्या प्रकाशाच्या माध्यमातून माहितीची देवाणघेवाण होते. त्यासाठी एलईडी बल्बमध्ये छोटी चीप बसविण्यात येते. या चीपद्वारे डेटा बायनरीमधून डिजिटल पद्धतीत बदलला जातो. त्यासाठी आवश्‍यकतेप्रमाणे प्रकाशाची तीव्रता कमी-जास्त करण्यात येते. मात्र ही तीव्रता मानवी डोळ्यांना जाणवत नाही. एलईडी बल्बच्या प्रकाशातून मिळणारी माहिती डिव्हाईसमधील फोटोसेप्टरद्वारे स्वीकारली जाते, तसेच पाठविलीही जाते. एलईडीच्या एका बल्बमध्ये प्रतिसेकंद १.७ जीबी एवढा डेटा ट्रान्स्फर करण्याची क्षमता असून, ती प्रतिसेकंद १० जीबीपर्यंत वाढविता येते, असा दावा करण्यात येत आहे. ‘वाय-फाय’च्या तुलनेत ही पद्धत अधिक प्रभावी असून, एलईडीच्या प्रकाशात कोणत्याही अडथळ्याविना डेटा ट्रान्स्फर करता येईल, असे संशोधकांचे मत आहे.

‘लाय-फाय’समोरील आव्हाने
‘लाय-फाय’समोरील प्रमुख आव्हान म्हणजे डेटा ट्रान्स्फर करताना यूझर पुरेशा प्रकाशातच असणे आवश्‍यक आहे. प्रकाशाच्या स्रोतापासून थोडी हालचाल झाल्यास ‘डेटा ट्रान्स्फर’ प्रक्रियेत अडथळा निर्माण होण्याची शक्‍यता आहे. अर्थातच, अंधारात हे तंत्रज्ञान निरुपयोगी आहे. या तंत्राचे ब्रिटनमधील जनक, एडिनबरो विद्यापीठातील प्राध्यापक हेराल्ड हास यांच्या मते आपल्या सभोवताली पुरेसा प्रकाश उपलब्ध असल्याने हे तंत्र प्रभावी ठरेल. हास यांनी ‘डी-लाईट’ प्रकल्पांतर्गत ‘लाय-फाय’वर संशोधन केले आहे. या प्रकल्पांतर्गत ‘व्हिजिबल लाईट कम्युनिकेशन’चा अभ्यास करण्यात आला आणि त्यातून हे तंत्र समोर आले.

‘लाय-फाय’चे भवितव्य
इ.स. २०१९ पर्यंत जगभरात स्मार्टफोन्स, लॅपटॉप्ससारखे शंभर कोटींपेक्षा अधिक डिव्हाईसेस असतील. त्यामुळे डेटा ट्रान्स्फर करण्यासाठीची वर्तमान पद्धत त्यावेळी अपुरी ठरेल. त्यासाठी आतापासूनच नव्या पर्यायांचा शोध घेण्यात येत आहे. त्यामुळे २०१३ ते २०१८ दरम्यान ‘लाय-फाय’ च्या व्यवसायात दरवर्षी ८२ टक्‍क्‍यांची वाढ होण्याची शक्‍यता आहे. तसेच २०१८ पर्यंत या व्यवसायाची वार्षिक उलाढाल शंभर कोटी डॉलरच्या पुढे जाण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.
 
- व्यंकटेश कल्याणकर 
[ Esakal ]                               
सोमवार, 9 नोव्हेंबर 2015 - 03:00 AM IST

कर सुधारणांतूनच विकासाला गती - भरत फाटक

सोमवार, 9 नोव्हेंबर 2015 - 03:45 AM
आर्थिक प्रगतीसाठी उपलब्ध संधीचा लाभ उठवायचा असेल, तर औद्योगिक क्षेत्रात मोठी क्रांती आवश्‍यक आहे. तेव्हा औद्योगिक वाढीचा दर वाढविण्यासाठी करप्रणालीत दूरगामी सुधारणा कराव्या लागतील.

जा गतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग मंदावत असताना ७ ते ७.५ टक्के वाढीचा दर असणारी भारतीय अर्थव्यवस्था जगाचे लक्ष वेधून घेत आहे. चीनच्या वाढीचा वेग येत्या पाच वर्षांत ६.५ टक्‍क्‍यांच्या आसपास राहील. युरोप, जपान यांच्यामध्ये लोकसंख्येचे वय ५५ ते ६० मध्ये असून, वाढीचा दर एक ते दोन टक्‍क्‍यांमध्ये घुटमळतो आहे. या पार्श्‍वभूमीवर आपला देश तारुण्याच्या ऐन बहरात आहे. सरासरी वय २६ आणि जगात सर्वाधिक तरुणांची संख्या असणारी ही अर्थव्यवस्था पुढची २० ते ३० वर्षे आर्थिक प्रगतीची मोठी संधी प्रत्यक्षात उतरवू शकेल.

या संधीचा लाभ उठवण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात मोठी क्रांती आवश्‍यक आहे. आपल्या राष्ट्रीय उत्पन्नात औद्योगिक उत्पादनाचा हिस्सा फक्त १५ टक्के आहे. राष्ट्रीय औद्योगिक धोरणात २०२२ पर्यंत हे प्रमाण २५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी औद्योगिक वाढीचा दर १६ टक्‍क्‍यांवर नेणे क्रमप्राप्त आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी हा वेग आवश्‍यक आहे. पण सध्या औद्योगिक वाढीचा दर ३ ते ४ टक्केच आहे. तो १६ टक्‍क्‍यांवर नेण्यासाठी आमूलाग्र बदल करावे लागतील. पायाभूत सुविधा वाढवाव्या लागतील. कामगार कायद्यात बदल करावे लागतील. उद्योगांमध्ये मोठी गुंतवणूक करावी लागेल. कारखाने, रस्ते, बंदरे, वीज यासाठी भांडवल आकर्षित करावे लागेल. देशांतर्गत आणि विदेशी अशा दोन्ही मार्गांनी हे करणे निकडीचे आहे. भारतीय आणि परदेशी उद्योजकांना कारखाने काढण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रम तयार केला आहे. तो यशस्वी करण्यासाठी करप्रणालीत दूरगामी सुधारणा कराव्या लागतील.

कर कायद्यात निश्‍चितता, अंमलबजावणीत सुसूत्रता आणि करदात्यांना विश्‍वास वाटेल अशी वर्तणूक या गोष्टी कोणत्याही उद्योजकासाठी आवश्‍यक आहेत. कायद्यातील तरतुदींचा नक्की अर्थ काय याबद्दल संभ्रम असेल, तर नवीन गुंतवणूक करण्याची उमेद राहणार नाही. या गोंधळामुळे एखादी योजना राबविल्यानंतर त्यावरील करांची रक्कम बदलली किंवा त्याविषयी दुमत झाल्यामुळे कोर्ट-कचेऱ्यांतील विवादात रक्कम अडकली, तर त्याचाही उद्योगांवर विपरित परिणाम होतो. त्यातही सर्वोच्च न्यायालयाने एखाद्या खटल्यात करदात्याच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर कायद्यात जुन्या तारखेपासून बदल करणे (रेस्ट्रोस्पेक्‍टिव्ह अमेंडमेंट) अशी पद्धत अवलंबण्यात आली. भविष्यकाळ हा अनिश्‍चित असतोच, पण अशा बदलांमुळे भूतकाळही अनिश्‍चित ठरण्याची विचित्र स्थिती उद्‌भवते! ‘व्होडाफोन’ प्रकरणात लावलेला अर्थ किंवा यंदाही परकी वित्तसंस्थांवर मागील काळासाठी किमान पर्यायी कर (मॅट) आकारला जाण्याबद्दल उडालेला धुराळा पाहिला, तर यातून औद्योगिक प्रगतीला खीळ बसण्याची भीती उत्पन्न होते.

जगाच्या बाजारात अधिकाधिक उद्योगांना स्वतःकडे आकर्षित करण्याची चढाओढ चालू आहे. व्यवसाय करण्याची सुलभता(ईझ ऑफ डुइंग बिझिनेस)ची क्रमवारी जागतिक बॅंक जाहीर करीत असते. त्यातील १८९ देशांमध्ये भारताचा क्रमांक १३० वर पोचला आहे. बारा स्थाने वर येण्याची प्रगती आपण वर्षभरात केली असली, तरी कर सुलभतेमध्ये आपला क्रमांक १५७ इतका खाली आहे. आपल्या अर्थमंत्र्यांनी कंपनी प्राप्तिकराचा दर २५ टक्‍क्‍यांपर्यंत खाली आणण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे. कर टाळण्याच्या कायदेशीर युक्‍त्यांविरुद्ध असणारा ‘जनरल अँटी-अव्हॉइडन्स रुल्स’ (गार) कायदा २०१७ पर्यंत पुढे ढकलला आहे. यातही आगामी बदलांची पारदर्शक पद्धतीने आगाऊ सूचना देऊन विश्‍वासाचे वातावरण तयार केले पाहिजे. आंतरराष्ट्रीय कर व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि करदात्यांच्या माहितीची देवाणघेवाण सरकारी स्तरावर करण्यासाठी अमेरिकेने ‘फॉरिन अकाउंट टॅक्‍स कम्प्लायन्स ॲक्‍ट’ (फॅटका) २०१० पासून लागू केला आहे. जुलै २०१५ मध्ये या कायद्याच्या अंतर्गत भारत व अमेरिकेमध्ये करार झाला असून, भारतीय वित्तसंस्था व बॅंकांना अमेरिकेत वास्तव्य असणाऱ्या व्यक्तींच्या खात्याचे तपशील अमेरिकेला द्यावे लागतील. युरोपीय समूहानेही असा कायदा केला असून, अनेक देशांमध्ये करविषयक माहितीची देवाणघेवाण करारही होत आहेत. संगणकाचा वापर वाढत असल्याने ही देवाणघेवाण जलद व सुलभ होईल. यात सहकार्य करण्यासाठी करविषयक व वित्तीय माहितीचे संकलन करण्याचे बदल भारतातही अपेक्षित आहेत. प्रत्यक्ष करांमध्ये परदेशी कंपन्यांना त्यांचे भारतात कार्यालय आहे काय, या कारणावरून भारतातील करपात्रता ठरते. अनेक परकी कंपन्या या कारणामुळे येथे औद्योगिक उत्पादन करण्यास उत्सुक नसतात. स्पेशल इकॉनॉमिक झोन(एसईझेड)सारख्या संकल्पनेमुळे यातून मार्ग काढता येईल. ‘एसईझेड’मधील कंपन्यांना ‘मॅट’ आणि लाभांश कर या तरतुदी जाचक ठरतात. ‘एसईझेड’च्या मूळ संकल्पनेत या करांना स्थान नव्हते. ‘मेक इन इंडिया’ला बळ देण्यासाठी त्यातून सवलत फायदेशीर ठरेल. अप्रत्यक्ष करांमध्ये राष्ट्रीय स्तरावर मुख्यतः सीमा शुल्क, उत्पादन शुल्क आणि सेवा कर यांचा समावेश होतो. मात्र राज्य स्तरावर ‘व्हॅट’ व स्थानिक पातळीवर ‘एलबीटी’ कर हेही अंतर्भूत होतात. शिवाय अनेक ठिकाणी ‘एंट्री टॅक्‍स’ही असतो. जकात, ‘एलबीटी’ व आंतरराज्यीय ‘एन्ट्री टॅक्‍स’सारख्या तरतुदींमुळे करप्रणाली किचकट होते.

या सर्वांवर मात करण्यासाठी गुडस अँड सर्व्हिसेस टॅक्‍स (जीएसटी) लावून एकच करवसुली आणि एकाच ठिकाणी कागदपत्रांची पूर्तता करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. ‘जीएसटी’ प्रत्यक्षात आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांचे एकमत होऊन घटनेत बदल करून यासंबंधीची मंजुरी मिळणे आवश्‍यक आहे. एक एप्रिल २०१६ पासून ‘जीएसटी’ लागू होणे अपेक्षित आहे. हा कायदा अमलात आल्यास राष्ट्रीय उत्पन्नात एक-दीड टक्का वार्षिक वाढ शक्‍य आहे, असे मानण्यात येते. देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा ५० टक्‍क्‍यांहून अधिक भाग सेवाक्षेत्रातून येतो. त्यातून वगळलेल्या सेवांची ‘निगेटिव्ह लिस्ट’ सोडता सर्वच सेवांचा त्यात अंतर्भाव आहे. ‘रिव्हर्स चार्ज’च्या माध्यमातूनही त्याची व्याप्ती वाढली आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी वाढेल, तशी करसंकलनात मोठी वाढ होईल. कर विवरणपत्रे भरणे, कराची रक्कम भरणे, मुळात कर कापून घेणे व त्याची पावती देणे यासाठी आता ई-फायलिंग व ई-पेमेंट वापरणे सक्तीचे आहे. यामुळे सर्व प्रकारची माहिती इलेक्‍ट्रॉनिक स्वरूपात सरकारकडे उपलब्ध होते. संपत्ती कर हटविल्यामुळे प्रत्यक्ष करांसाठी प्राप्तिकर कायदा हा एकच कायदा आहे. डायरेक्‍ट टॅक्‍स कोड (डीटीसी) करण्याची आवश्‍यकता आता नाही. प्राप्तिकर कायद्याखालीच संपत्तीचे विवरण व ताळेबंद देणे अनेक करदात्यांवर बंधनकारक आहे. त्यामुळे इलेक्‍ट्रॉनिक माध्यमातून संकलित होणाऱ्या माहितीची सांगड घालणे, अप्रत्यक्ष व प्रत्यक्ष करांच्या माहितीचा ताळा करणे, यामुळे करांचे जाळे अधिक करपात्र व्यक्तींपर्यंत पोचू शकेल.

परदेशातील मालमत्ता जाहीर करून त्यावर कर भरण्याची योजना सरकारने जुलै ते सप्टेंबरमध्ये खुली ठेवली होती. तिला विशेष प्रतिसाद मिळाला नाही. ‘फॅटका’सारख्या कायद्यामुळे भविष्यात वाढणारी पारदर्शकता पाहता अधिक करसंकलन करण्यासाठी या बाबतीत काय पावले उचलली जातात, ते पाहणेही औत्सुक्‍याचे ठरेल.
 
 
- भरत फाटक ((आर्थिक घडामोडींचे अभ्यासक)
Esakal ] सोमवार, 9 नोव्हेंबर 2015 - 03:45 AM IST
 

रविवार, ८ नोव्हेंबर, २०१५

जनजागरण फेरीने गडहिंग्लज दुमदुमले

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत पुणे पत्र सूचना कार्यालयाच्या वतीने तसेच मंत्रालयाच्या इतर विविध विभागांच्या सहकार्याने, गडहिंग्लज येथे दिनांक ६ ते ८ नोव्हेंबर २०१५ दरम्यान लोक माहिती अभियानाचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्ताने कोल्हापूरच्या क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्या वतीने जनजागरण फेरीचे आयोज करण्यात आले होते.

येथील महाराणी राधाबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेच्या प्रांगणातून सकाळी ९ वाजता या फेरीस प्रारंभ झाला. या फेरीस, कोल्हापूरचे प्रांताधिकारी डॉ. कुणाल खेमनार, गडहिंग्लजचे तहसीलदार हणमंत पाटील व पुणे पत्र सूचना कार्यालयाच्या संचालिका अल्पना पंत-शर्मा यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. यावेळी ए.पी.आय. श्रीमती शेळके, मुंबई पत्र सूचना कार्यालयाचे माध्यम अधिकारी सय्यद अख्तर, कोल्हापूर क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे सहाय्यक प्रमोद खंडागळे, पणजी क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे प्रदीप पवार, पुणे पत्र सूचना कार्यालयाच्या  अधिकारी शिल्पा पोफळे, एम. आर. हायस्कूलचे प्राचार्य डॉ. जी. बी. कळमकर, साधना महाविद्यालयाचे प्राचार्य जी. एस. शिंदे, जीवन शिक्षा विद्यामंदिर, वडरगेचे मुख्याध्यापक सुहास शिंत्रे आदि मान्यवरांची उपस्थिती होती.
 
जीवन शिक्षा विद्यामंदिर, वडरगे प्रशालेच्या विद्यार्थ्यांच्या झांज पथकाच्या गजरात ही फेरी एम. आर. हायस्कूलच्या प्रांगणातून बुरुड गल्ली-शिवाजी चौक-बस स्थानक मार्गे पुन्हा एम. आर. हायस्कूल येथे आली. यावेळी विद्यार्थ्यांच्या हातामध्ये बेटी बचाओ-बेटी पढाओ, मुलापेक्षा मुलगी बरी; प्रकाश देते दोन्ही घरी, मंत्र आहे नवयुगाचा; मुलींना हक्क प्रगतीचा, पेड लागाओ-देश बचाओ, स्वच्छ भारत-स्वस्थ भारत आदि घोषवाक्यांचे फलक दिसत होते. यावेळी गडहिंग्लज मधील नागरिक कुतूहलाने या फेरीकडे पाहत होते.
PIB मुंबई, 6-11-2015