हैदराबाद - अग्नि-4 या सुमारे 4 हजार किमी पल्ला असलेल्या अण्वस्त्रवाहु क्षेपणास्त्राची ओडिशा तटाजवळील व्हीलर बेटावरुन आज (सोमवार) यशस्वी चाचणी करण्यात आली. या क्षेपणास्त्रावरुन सुमारे एक टन वजनाची स्फोटके डागली जाऊ शकतात. "ही मोहिम यशस्वी झाली. मोहिमेआधी निश्चित करण्यात आलेले सर्व निकष यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले,‘‘ असे संरक्षण विज्ञान आणि विकास (डीआरडीओ) विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. डीआरडीओमधील ज्येष्ठ वैज्ञानिक, तंत्रज्ञ आणि संरक्षण मंत्र्यांचे विज्ञानविषयक सल्लागार असलेले जी सतीश रेड्डी हे यावेळी उपस्थित होते.
भारताच्या क्षेपणास्त्र विकास धोरणामधील अग्नि क्षेपणास्त्रांचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते.
[ वृत्तसंस्था ]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा