For Advertise in this Section please connect 9422264829 or mail at sainik.darpan@gmail.com

Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan

रविवार, २८ ऑगस्ट, २०१६

ब्लॉगर्स डे : सुंदर हस्ताक्षराचा मूलमंत्र -- किशोर कुळकर्णी

 
 
 
 
 
 
 
 
 
 
आजच्या इंटरनेट आणि मोबाईलच्या जमान्यातही चांगले हस्ताक्षर असणे गरजेचे आहे.  ते सुधारावे यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. हस्ताक्षर तज्ज्ञ किशोर कुलकर्णी यांनी सुंदर हस्ताक्षरासाठी व्रतच घेतलेले आहे. राज्यात आणि राज्याबाहेरही त्यांनी आजतागायत हजारोंना त्याबाबत मार्गदर्शन केले आहे. तत्कालिन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनीही त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले होते. त्यांचा हा ब्लॉग हस्ताक्षर

सुधारविण्याची इच्छा असलेल्या सर्वांसाठी…

kishor-kulkarniकिशोर कुळकर्णी, 9420607059

“मुलांनो आपल्या शाळेत हस्ताक्षराचं भित्तीपत्रक काढायचं आहे. विद्यार्थ्यांची लेखन, संपादन आणि निर्मिती समिती आपल्याला तयार करायची आहे. ज्यांना यात सहभाग घ्यायचा त्या विद्यार्थ्यांनी आपली नावं माझ्याकडे द्यावीत.” सरोदे सरांनी पाचव्या इयत्तेतल्या आपल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना सूचना केली. शाळेच्या या नव्या उपक्रमात सहभागी होण्याबद्द्ल शाळेतल्या सर्वच विद्यार्थ्यांना उत्सुकता होती. त्यामुळे सगळ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदानं फुलले होते. सरोदे सरांनी पुन्हा सूचना केली…“मुलांनो, वर्गातल्या सर्वच विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार नाही. पणं ज्यांचं अक्षर सुंदर आहे त्यांना प्राधान्य असेल.” ज्यांचं अक्षर सुंदर अशाच विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल हे समजल्यावर विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला. सुंदर हस्ताक्षर कुणाचं आहे त्यांनी हात वर करा.  ५० ची संख्या असलेल्या या वर्गातल्या फक्त १० विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे हात उंच झाले. “अरे, अरे.. काय ही अवस्था. मुलांनो हस्ताक्षर सुधारा.. अजून देखील तुम्हाला हस्ताक्षर सुधारण्याची संधी आहे.” सरांनी विद्यार्थ्यांना पुढं काही बोलण्या आधी तुषार हा विद्यार्थी उभा राहिला अन्‌ म्हणाला, “ सर, आम्हाला या संधीचं सोनं करायचं आहे. आमचं अक्षर आम्हाला सुधारायचं आहे.” विद्यार्थी एका सुरात म्हणाले. “मित्रहो, सुंदर हस्ताक्षर हा दागिना असतो. लहानपणापासूनच याकडे लक्ष दिलं तर कुणाचंही अक्षर अगदी सुंदर, सुघड होऊ शकतं. ती म्हण तुम्हाला ठाऊक आहे ना, प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे.”

“सर, आम्ही सुंदर हस्ताक्षरासाठी संकल्प घेत आहोत. आम्हाला त्याबद्दल मार्गदर्शन करणारे तज्ज्ञ मिळाले म्हणजे आम्ही आमचे अक्षर सुंदर करून दाखवू”. सरोदे सरांना विद्यार्थी  म्हणाले.

विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पक्क्या निश्चयामुळं मी देखील आता तुमच्या अक्षर सुधार उपक्रमात सहभागी होणार आहे. यासाठी सुंदर हस्ताक्षराबाबत मार्गदर्शन करणारे तज्ज्ञांना मी आपल्याकडे बोलावतो. मला विश्वास आहे की तुम्ही प्रयत्नपूर्वक आणि परिश्रमानं तुमचं गचाळ अक्षर सुंदर करून घ्याल.

शाळेच्या एका प्रसंगामुळे मला सुंदर हस्ताक्षराबाबत मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. शाळेतल्या त्या वर्गातल्या चाळीस विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहानं माझ्या या सुंदर हस्ताक्षर अभ्यास वर्गात सहभाग घेतला. विद्यार्थी अत्यंत उत्साही होते. त्यांनी अवघ्या महिन्यात सुंदर हस्ताक्षर केले. या चाळीस विद्यार्थ्यांनी निश्चय केला, जिद्दीनं सराव करून घेतला आणि त्यांना हा सुंदर हस्ताक्षराचा दागिना मिळाला. मुलांनो, ही किमया तुम्हाला सुद्धा करता येईल. होय, अगदी गच्चाळ, वाचता न येण्या सारखं अक्षर किमान वाचता येईल असं होऊ शकतं याचा विश्वास मी हस्ताक्षराचा मार्गदर्शक म्हणून नक्कीच देतो. देशदूतच्या मधला हा लेख तुम्हा वाचा, दिलेल्या प्रमाणे सराव करा आणि बघा तुमचं अक्षर कसं सुंदर रुप घेतं ते.

पेनबाबत थोडं

मित्र हो, सुंदर हस्ताक्षरासाठी बाजारात अनेक पेन उपलब्ध आहेत, पणं शक्यतो तुम्ही फाउंटन पेन (नीब-जीपचा शाईचा) पेन घेतला तर अधिक चांगलं. बॉल पॉईंटचे पेन, किंवा जेल पेन, बारीक टोकदार पेन देखील बाजारात उपलब्ध आहेत पणं शाईचा पेन बरा. पेन कसा निवडला यावर देखील तुमचं हस्ताक्षर अवलंबून आहे. लिहायला अत्यंत गुळगुळीत कागद नको, मित्रांनो, लिहायला बसताना आपल्या पाठीचा कणा सरळ असावा म्हणजे ९० अशांचा कोन असावा. पेन धरताना कसा धरावा? काही विद्यार्थी आपल्या पाचही बोटांचा उपयोग पेन धरताना करतात. हलवाई जिलेबी बनविताना कापडाच्या पुरचुंडीत पातळ द्रवरुप मैदा तळायला घेतो तसा काहीसा पेन धरण्याची पद्धत आहे. मित्रहो. अशी पेन धरण्याची पद्धत अत्यंत चुकीची आहे. पेन अंगठा, तर्जनी आणि मध्यमा या तीन बोटांनीच धरायचा. सहज धरायचा अगदी जोर, दाब देऊन अजिबात पेन धरु नका. महत्त्वाचं म्हणजे वही किंवा कागद पेन यांचा किती अंशाचा कोन व्हावा तर ४५ अंशाचा कोन व्हावा. दोन कोन लक्षात घ्या. बसताना ९० अंश आणि पेन आणि वही यांच्यात ४५ अंशाचा कोन असावा. अक्षर वळविताना सहज वळविता येते. पेन कुठलंही वापरा पणं पेनाच्या टोकापासून तर पेन धरण्याचं अंतर हे सुयोग्यच असावं. साधारण पणे आपल्या बोटाचं एक पेरू एवढं अंतर पुरेसं असतं. त्यापेक्षा कमी किंवा जास्त अंतर नसावं.

देवनागरी लिपी आणि मूळ चिन्हं..

आपली देवनागरी लिपी ही तीन प्रमुख चिन्हांनी बनलेली आहे मित्र हो. वर्तुळ, अर्धवर्तुळ आणि रेषा. या तीन चिन्हांना अजून सहा उपचिन्हे मी जोडली आहेत. तुम्ही अगदी पहिल्या इयत्तेत असताना ग म भ म मूळाक्षरे गिरवीत असाल त्यावेळी ही चिन्हे कदाचित शिकले असाल. या चिन्हांचा योग्य तो सराव केला तर तुमच्या अक्षराला छान वळण प्राप्त होईल. ही ९ चिन्हे आपणं बघू या.

गोल वर्तुळ ,  वरच्या बाजूला तोंड असलेले अर्धवर्तुळ, खालच्या बाजूला तोंड असलेले अर्ध वर्तुळ, डाव्या बाजूला तोंड असलेले अर्धवर्तुळ, आणि उजव्या बाजूला तोंड असलेले अर्ध वर्तुळ

रेषा – उभी रेषा, आडवी रेषा, डावीकडून उजवीकडे खाली येणारी रेषा आणि उजवीकडून डावीकडे खाली येणारी रेषा अशा नऊ चिन्हांचा उपयोग आपल्या देवनागरी लिपीत तहोतो.आपल्या अक्षरांना सुंदर वळण प्रप्त करण्यासाठी या मूळ चिन्हांचा भरपूर सराव करा मित्रहो. बघा हा आपल्याला काढायचा असेल तर दोन अर्धवर्तुळ, उभी रेषा आणि आडवी रेषा यांचा उपयोग झाला.

अक्षरांचे नियम

  • अक्षरांची उंची समान यातच अक्षरांचा प्राण –

विद्यार्थी मित्रहो, आपलं अक्षर फार मोठं अथवा फार लहान नसावं. साधारणपणे एक रेघी वहिच्या दोन ओळींच्या अर्ध्या इतके छान प्रमाण योग्य असते. तुम्ही वहिच्या पहिल्या ओळीत ज्या आकाराचं अक्षर लिहिता आहात तेवढ्याच आकाराचं किंवा उंचीचं एक समान अक्षर तुम्ही काढायला हवे. ते थेट शेवटच्या ओळीपर्यंत हा नियम नीट ध्यानात घेतला पाहिजे. सुरवात ज्या प्रमाणबद्धतेने तुम्ही अक्षर काढत आला आहात त्याच पद्धतीनं शेवटच्या ओळीपर्यंत तुम्ही अक्षर काढा.

  • अक्षरांची मुख्य रेषा सरळ आणि अक्षरांच्या मुख्य रेषेच्या निम्मे अक्षरांचे अतर अवयव-

या माझ्या नियमाचा तुम्ही अगदी काटेकोर पालन करायला हवे. तुम्हाला सुंदर हस्ताक्षर काढायचं असेल तर तुमची मुख्य रेषा अगदी सरळ यायला हवी. उदाहरणच द्यायचे झाले तर तुमचा अभय हे नाव लिहिले तर या शब्दाच्या प्रत्येक वर्णाची मुख्य रेषा ही सरळ असावी हे सूत्र आहे. अ हे वर्ण घेतले तर दोन अर्ध वर्तूळ, दोघं वर्तुळांना जोडणारी आडवी रेषा आणि शिरोरेषा म्हणजे आडवी रेषा आणि बरोबर काटकोन करणारी उभी रेषा ही अ ची मुख्य रेषा आहे. ही मुख्य रेषा सरळच काढायला हवी. याच नियमाचा पुढचा भाग म्हणजे मुख्य रेषेच्या निम्मे इतर अवयव.. अर्ध गोल, आणि अर्ध गोलाला जोडणारी आडवी छोटी रेषा यांचे प्रमाण जर तुम्ही ध्यानात घेतलं तर हा नियम तुम्हाला दिसेल.  अगदी याच पद्धतीनं तुम्ही सराव करणं गरजेचं आहे.

  • रेषे एवढे दोन शब्द आणि दोन ओळींमध्ये अंतर –

मित्रहो, शिवाजी महाराजांच्या काळात सोळाव्या शतकात समर्थ रामदासांनी दास बोधात अक्षर कसे काढावे याची नियमावली दिलेली आहे. नीटनेटके अक्षर कसे काढावे याचे नियम अगदी आजही लागू पडतात. मुख्य रेषे इतके दोन शब्दांमध्ये अंतर असावे. या नियमाचा दुसरा भाग म्हणजे दोन ओळींमध्ये मुख्य रेषे इतके अंतर. हा नियम तुम्ही कोरे कागदावर लिहित असाल तर लागू होतो. तुम्ही मुलं रेषी वहीत, रेघी पानांवर लिहिता त्यामुळे दोन ओळींचं अंतर बरोबर सोडलं जातं. या सगळ्या नियमांचे अनुसरण करा. बघा या नियमांचे पालन केले तरी तुमच्या अक्षरात आहे त्यापेक्षा किती फरक पडतो ते.

मुलांनो, तुम्हाला सराव करणं अत्यंत आवश्यक आहे. अक्षराच्या सरावासाठी २०० पेजेस वही करा. त्याचे दोन समान भाग करा. पहिल्या भागात वर्णमाला ज्या ९ चिन्हांनी बनते त्या चिन्हांचा सराव करा. उर्वरित दुसरा भाग त्याची तीन भागांमध्ये विभागणी करा. पहिला भाग फक्त वर्णांसाठी, दुसरा भाग शब्दांसाठी आणि तिसरा भाग वाक्यांसाठी, परिच्छेदासाठी वापरा. बघा तुमचं अक्षर महिन्यातच कसं सुंदर होतं ते. सुंदर हस्ताक्षर ही साधना आहे. ही साधना कशी करावी हे मी तुम्हाला सांगितले. सुंदर हस्ताक्षराचे गुपितं मी तुम्हाला सांगितले आहे. आता सराव आणि मेहनत तुम्हाला करायची आहे. मला खात्री आहे तुम्ही तुमचे अक्षर सुंदर घडवाल.

  • किशोर कुळकर्णी,

४४, वैष्णवी पार्क, मातोश्री स्कूल जवळ,

निमखेडी शिवार, नॅ.हायवे ६ शेजारी, जळगाव खान्देश.

9420607059

sundarakshar@outlook.com

Original article was published in Deshdoot Aug 20, 2016. http://www.deshdoot.com

 

सोमवार, १५ ऑगस्ट, २०१६

सशक्त समाजाशिवाय देशाची प्रगती अशक्य- मोदी

नवी दिल्ली - सशक्त भारत हा सशक्य समाजाशिवाय होऊ शकत नाही. सशक्त समाज हा सामाजिक न्यायाशिवाय शक्य नाही, त्यामुळे प्रत्येकाने सामाजिक न्याय जपला पाहिजे. सशक्त समाजाशिवाय देशाची प्रगती अशक्य आहे. सर्व जातींचा सन्मान केला पाहिजे. दलित, वंचित असो, आदिवासी, साक्षर किंवा निरक्षर, सर्व आमचे कुटुंब आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

भारताच्या 70 व्या स्वातंत्र्यादिनानिमित्त आज (सोमवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केले. मोदी म्हणाले की, जनतेला घोषणा नको तर काम पाहिजे, सामान्य लोकांच्या जीवनशैलीत बदल आणायचाय. गोष्टी टाळण्यावर आमचा विश्वास नाही, गोष्टींना भिडणे मी महत्त्वाचे मानतो. काम करण्यासाठी नियत असणे गरजेचे आहे. भारताचे वय 70 वर्षे नसून, स्वातंत्र्यानंतर प्रगतीसाठी केलेला हा प्रवास आहे.

पंतप्रधानांच्या भाषणातील वैशिष्ट्ये -

- एक भारत, श्रेष्ठ भारतचे स्वप्न आम्ही पूर्ण करू

- स्वातंत्र्यदिन नवा संकल्प घेऊन आला आहे

- उपनिषद ते उपग्रह, महाभारतातला भीम ते भीमराव, सुदर्शन चक्रधारी मोहन ते चरखा चक्रधारी मोहन हा भारताचा इतिहास आहे

- भीमपासून भीमरावरपर्यंत भारताचा इतिहास, देशाचा इतिहास हजारो वर्ष जुना आणि समृद्ध आहे

- सरदार पटेल यांनी देशाला एक बनविले, आता आपल्याला श्रेष्ठ करायचे आहे

- वेद ते विवेकानंदांपर्यंतचा भारताचा प्रवास आहे

- अगणित महापुरुषांचा स्वातंत्र्यासाठी अविरत संघर्ष,त्यामुळे आपण आज मोकळा श्वास घेत आहे

- स्वराज्याला सुराज्यामध्ये परिवर्तन करण्याचा संकल्प देशवासियांनी केला पाहिजे.

- आशा आणि अपेक्षा असतील तरच सुराज्याकडे आपण जाऊ शकतो.

- क्रांतिकारकांच्या बलिदानाच्या प्रेरणेतून स्वराज्य मिळाले आहे

- एक काळ होता जेव्हा देशातली सरकारं आरोपांनी घेरलेलं असायची, पण आमचं सरकार अपेक्षांनी घेरलेलं आहे

- गेल्या दोन वर्षांत आम्ही जनतेची कामे केली

- काम करण्यासाठी नियत आणि जबाबदारीची गरज आहे

- हे वर्ष संकल्प पर्व असणार आहे

- चांगल्या कारभारासाठी सरकार संवेदनशील असणे गरजेचे होते

-  देशात समस्या खूप आहेत, मात्र समस्या असल्यानेच समाधान आहे

- आता एका मिनिटांत 15 हजार रेल्वे तिकीट मिळतात

- गेल्या दोन वर्षांत सरकारने असंख्य कामे केली आहेत. त्याचा पाढा वाचायचा म्हटले तर आठवडाभर बोलत बसावे लागेल

- पासपोर्ट काढण्यासाठी लाखो जण अर्ज करत आहेत, त्यांना सहजरित्या पासपोर्ट मिळत आहेत

- आता आठवडाभरात पासपोर्ट मिळतो, 2015-16 या वर्षात आम्ही पावणे दोन कोटी पासपोर्ट दिले

- प्राप्तीकर रिफंड आता फक्त तीन आठवड्यात मिळतो आणि तोही थेट बँक खात्यात जमा होतो

- आगोदर 70-75 किमीचे रस्ते रोज बनत होते. आज दररोज प्रतिदीन 100 किमीचे रस्ते बनविले जात आहेत

- एक काळ होता जेव्हा सरकार आरोपांनी घेरले होते, पण आमचे सरकार अपेक्षांनी घेरलेले आहे

- 9 हजार पदांसाठी तरुणांची मुलाखत न घेता नोकरीची संधी देण्यात आली

- एक वेळ होती, सरकारने योजना घोषित केली तरीही जनता खुश व्हायची, 70 वर्षांत जनता बदलली आहे.

- केवळ योजनांच्या घोषणा केल्याने जनता समाधानी होत नाही

- आपल्याला कामाचा वेग आणखी वाढविला पाहिजे

- गेल्या 60 वर्षांत केवळ 14 कोटी गॅस कनेक्शन देण्यात आली होती. पण, गेल्या सहा आठवड्यात 4 कोटी गॅस कनेक्शन देण्यात आली आहेत

- देशातील 70 कोटी नागरिक आधारकार्डशी जोडले गेले आहेत

- जनधन योजनेच्या माध्यमातून 21 कोटी नागरिकांना जोडण्यात आले आहे

- आमचे जबाबदार जनतेच्या अपेक्षापूर्तीसाठी झटत आहे

- कायद्याचं जंजाळ लोकांसाठी अडचणीचे ठरत आहे, आम्ही त्यात सुसुत्रीकरण करतोय, कायदे कालसुसंगत बनवतोय

- नागरिकांनी आपल्या एलईडी बल्ब लावून देशाचे सव्वालाख कोटी रुपये वाचविले पाहिजेत

- आतापर्यंत 13 कोटी बल्ब वाटले गेले. 77 कोटी बल्ब वाटण्याचे ध्येय आहे

- देशातील 10 हजार गावांत वीज पोहचविण्यात आम्हाला यश आले आहे

- उघड्यावर शौचास बसणे बंद झाले पाहिजे, गावागावात शौचालय झाले पाहिजे, 2 कोटीपेक्षा जास्त गावांमध्ये शौचालय आहेत

- भारत स्वच्छता मिशनमध्ये 70 हजार पेक्षा जास्त गावे स्वच्छ झाली

- गेल्या सरकारच्या काळात महागाईच दर 10 टक्क्यांवर गेला होता

- आम्ही महागाई नियंत्रित ठेवण्याचा प्रय़त्न करत महागाई दर 6 टक्क्यांवर जाऊ दिला नाही

- शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकार आहे

- डाळींचे उत्पादन वाढवून भाव नियंत्रित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत

- आम्ही जलसिंचन, जलसंरक्षणावर भर देत, शेतकऱ्यांसाठी पाणी कसे उपयोगी येईल याकडे लक्ष दिले आहे

- देशात शेतकऱ्यांशिवाय कोणाचेही हात पवित्र नाहीत

- दुष्काळ असूनही मुबलक धान्य पिकविल्याबद्दल मी शेतकऱ्यांचे आभार मानतो

- जनतेच्या अपेक्षा स्वाभाविक आहेत, मी त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे

- 2022 मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दीष्ट आहे

- आतापर्यंतची सरकार स्वतःची इमेज बनविण्यासाठी आटापिटा करत होती

- आता सरकारच्या इमेजपेक्षा देशाच्या इमेजला महत्त्व दिले जात आहे

- मागील सरकारने सुरु केलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे

- जवळपास 270 प्रकल्प पूर्ण करण्यावर जोर देण्यात येत आहे

- स्पष्ट नियत, स्वच्छ नितीमुळे आमचे सरकार वेगळे ठरत आहे

- एअर इंडिया, बीएसएनएल, शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया यांना फायद्यात आणण्यात यश आले आहे

- बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेचा फायदा घेतला पाहिजे

- महिलांचे सशक्तीकरण करण्यात येईल

- गरिबीविरोधात लढाई लढण्यासाठी महिलांची संपन्नता असणे आवश्यक आहे

- मुद्रा योजनेचा साडेतीन कोटी नागरिकांनी घेतला आहे

- पोस्ट ऑफिसला पेमेंट बँक करण्याचा प्रयत्न करणार

- महिलांना प्रसुती रजा 26 आठवड्यांची करण्यात आली आहे

- बुलेट ट्रेन लवकरच भारतात धावणार

- जीएसटीच्या माध्यमातून करप्रणालीत समानता आणण्याचा प्रयत्न केला

- युवा शक्तीला अधिकाधिक शक्ती दिल्याने देश सशक्त होईल

- नक्षलवाद किंवा दहशतवादासमोर देश झुकणार नाही

- विविधतेतून एकता ही आपली सर्वात मोठी ताकद

- पेशावरमधील शाळेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत अश्रू गाळत होता, हीच आपली मानवता आहे.

- बलुचिस्तान, पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांनी माझे अभिनंदन केल्याने मी त्यांचे आभार मानतो

- स्वातंत्र्यसैनिकांच्या निवृत्तीवेतनामध्ये 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे

वृत्तसंस्था

पराक्रमी हंगपान दादांना अशोकचक्र

नवी दिल्ली - उत्तर काश्‍मीरमधील तेरा हजार फूट उंचीवर हिमालयाच्या पर्वतराजीमध्ये रक्त गोठविणाऱ्या थंडीत पाकिस्तानी घुसखोरांना कंठस्नान घालत देशासाठी प्राणार्पण करणारे हवालदार हंगपान दादा यांना मरणोत्तर अशोकचक्र जाहीर झाले आहे. पठाणकोट हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांना सडेतोड प्रत्त्युत्तर देणारे लेफ्टनंट कर्नल निरंजन आणि कार्पोरल गुरूसेवक सिंह यांच्यासह संरक्षण आणि निमलष्करी दलांमधील 82 कर्मचाऱ्यांना शौर्यपदके प्रदान करून त्यांचा गौरव केला जाणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींकडून अशोकचक्रासमवेत, 14 शौर्यचक्रे, 63 सेनापदके, दोन नौसेना पदके आणि दोन वायूसेना पदकांची घोषणा करण्यात आली.

मागील वर्षी गोव्यामध्ये अपघातग्रस्त झालेल्या डॉर्नियर विमानामधून दोन जवानांचे मृतदेह बाहेर काढणारे नौदलाचे खलाशी वीर सिंह आणि लेफ्टनंट कमांडर विकासकुमार नरवाल यांना नौसेना पदक जाहीर झाले आहे. स्क्वाड्रन लीडर अभिषेकसिंह तन्वर आणि स्क्वाड्रन लीडर भावेशकुमार दुबे यांची वायू सेना मेडलसाठी निवड झाली. भारतीय तटरक्षक दलाचे कमांडंट राधाकृष्ण राजेश नांबिराज आणि कुलदीप प्रधान यांत्रिक यांना तटरक्षक पदक बहाल केले जाणार आहे. लष्कराला एक अशोकचक्र (मरणोत्तर) 11 शौर्यचक्रे (यातील 6 मरणोत्तर) आणि 63 सेनापदके जाहीर झाली असून, यातील 12 ही मरणोत्तर बहाल केली जाणार आहेत. "ऑपरेशन मेघदूत‘, "ऑपरेशन रक्षक‘ आणि "ऑपरेशन ऱ्हिनो‘ यांसारख्या मोहिमांमध्ये उल्लेखनीय कामगारी करणाऱ्या जवानांसाठीही 28 शौर्यपदके जाहीर झाली आहेत.

पराक्रमाचे दादा

यंदा मे महिन्यामध्ये उत्तर काश्‍मीरमधील शामसाबरी भागातून घुसखोरी करणाऱ्या चार दहशतवाद्यांना हंगपान दादांनी कंठस्नान घातले होते. हंगपान दादा हे मूळचे अरुणाचल प्रदेशचे. त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये ते "दादा‘ नावाने परिचित होते. मागील वर्षी त्यांची येथील डोंगराळ भागामध्ये नियुक्ती झाली होती. दादांच्या लष्करी करिअरला 1997 मध्ये आसाम रजिमेंटमधून सुरवात झाली होती. त्यानंतर त्यांची 35 राष्ट्रीय रायफल्समध्ये नियुक्ती झाली होती. मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यामध्ये त्यांच्या पथकाला सीमावर्ती भागामध्ये संशयास्पद हालचाली आढळून आल्या होत्या. दादांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने दहशतवाद्यांशी चोवीस तास झुंज देत त्यांना रोखून धरले. तीन दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर दादांनी अन्य एका दहशतवाद्याशी थेट दोन हात करून त्याला ठार मारले. या संघर्षामध्ये दादा गंभीर जखमी झाले होते.

पोलिस, राज्यसेवेचाही सन्मान

केंद्रीय आणि राज्य पोलिस दलांमधील 948 कर्मचाऱ्यांना आज शौर्यपदके जाहीर झाली, भारत तिबेट सीमा पोलिस दलातील तीन कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींचे पोलिस पदक जाहीर झाले. केंद्रीय राखीव पोलिस दलाचे निरीक्षक गुलाम नबी भट यांच्यासह तेलंगणमधील तीन पोलिस कर्मचाऱ्यांचाही राष्ट्रपती पदकाने गौरव होणार आहे. "सीआरपीएफ‘ने यंदाही सर्वाधिक म्हणजे 43 शौर्यपदके पटकावली असून, यातील बहुसंख्य पदके ही नक्षलविरोधी कारवायांमधील सरस कामगिरीबद्दल बहाल करण्यात आली आहे. मागील सात वर्षांपासून "सीआरपीएफ‘ सर्वाधिक शौर्यपदके पटकावत आहे. मागील वर्षी 27 जुलै रोजी पंजाबच्या दिनानगर भागामध्ये कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या तीन गृहरक्षक दलाच्या जवानांना शौर्यपदके प्रदान केली जाणार आहेत.

यावर्षी मुंबईतील अग्नितांडवामध्ये कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या अग्निशामक दलाच्या चौघा कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती शौर्यपदके जाहीर झाले आहेत. सात कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींचे पोलिसपदक, 170 कर्मचाऱ्यांना पोलिस शौर्य पदक, 88 कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठीचे राष्ट्रपती पदक तर, 683 कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण कामगिरीसाठीचे पोलिसपदक जाहीर झाले आहे. राष्ट्रपतींचे शौर्यपदक जाहीर झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये तेलंगणमधील 24, ओडिशातील 16, महाराष्ट्रातील दहा, झारखंडमधील आठ, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमधील नऊ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

सीबीआय कर्मचाऱ्यांचाही गौरव

केंद्रीय अन्वेषण विभागात (सीबीआय) कार्यरत असलेल्या 31 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींचे पोलिसपदक जाहीर झाले आहे. विशेष आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ही पदके त्यांना बहाल केली जाणार आहेत. सहा अधिकाऱ्यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलिसपदक दिले जाणार असून, 25 कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलिसपदक बहाल केले जाणार आहे. अग्निशामक दलातील 67 कर्मचाऱ्यांचाही सेवा पदके बहाल करून सन्मान केला जाणार आहे.

पीटीआय

शनिवार, १३ ऑगस्ट, २०१६

राष्ट्रीय स्मारकांसमोर सेल्फी काढू नका

नवी दिल्ली - स्वातंत्र्य दिनानिमित्त सुरक्षेच्या कारणास्तव 12 ते 15 ऑगस्ट या काळात राष्ट्रीय स्मारकांसमोर सेल्फी काढू नये, अशी सूचना पर्यटन मंत्रालयाने बुधवारी केली आहे. सर्व राज्यांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.

स्वातंत्र्य दिन व "भारत पर्व‘ निमित्त देशभरात विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे सुरक्षेचे उपाययोजना म्हणून सेल्फी न काढण्याचा सल्ला मंत्रालयाने दिला आहे. शुक्रवारपासून (ता.12) सोमवारपर्यंत हा निर्बंध लागू राहणार आहे. यंदाच्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वांत जास्त धोका असल्याने दिल्ली पोलिसांनी खबरदारी घेत कडेकोट सुरक्षा व्यवस्था आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून लाल किल्ल्याच्या परिसरातील तीन हजार 140 झाडांभोवती सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत.

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था "ड्रोन‘च्या मदतीने भेदण्याचा प्रयत्न करण्याबाबतचे दहशतवाद्यांचे संभाषण सुरक्षा संस्थांच्या हाती आल्याने पोलिसांनी दक्षता घेतली आहे.

- वृत्तसंस्था

तेजसची आता लेहकडे भरारी

भोपाळ - हवाई दलाचे बहुचर्चित लढाऊ तेजस विमान आज भोपाळच्या राजा भोज विमानतळावर तपासणीसाठी उतरले. हवाई दलतज्ज्ञाच्या पथकाने तपासणी केल्यानंतर तेजस लेहकडे उड्डाण करणार आहे.

विमानतळाचे संचालक आकाशदीप माथूर म्हणाले, की तेजस विमान येथून लेहकडे उड्डाण करणार आहे. नव्या कार्यक्रमपत्रिकेनुसार बुधवारी सायंकाळी भोपाळहून लेह एअरबेसला पाठविण्यात येणार आहे. यादरम्यान स्थानिक विमान अभियंते विमानाची तपासणी करणार असून, त्यात इंधन भरण्यात येणार आहे. तेजस विमानाला तीस वर्षांचा इतिहास असून, 1983 मध्ये पहिल्यांदा लाइट कॉम्बॅट एअर क्राफ्टच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर तेजसच्या निर्मितीला चालना मिळाली. प्रकल्पाच्या 33 वर्षांनंतर देशाला लढाऊ विमान मिळाले आहे. 4 जानेवारी 2001 मध्ये तेजसने पहिल्यांदा उड्डाण केले होते. 2003 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी या लढाऊ विमानाला तेजस नाव दिले होते. तेजस हा संस्कृत शब्द असून, त्याचा अर्थ पॉवरफुल एनर्जी असा होता.

तेजसची वैशिष्ट्ये

तेजस विमान हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर क्षेपणास्त्र सोडू शकतो.

क्षेपणास्त्राबरोबरच बॉंब आणि रॉकेटचाही मारा करू शकतो.

तेजस 50 हजार फूट उंचीपर्यंत उड्डाण करू शकतो.

तेजसच्या निर्मितीसाठी सुमारे 7 हजार कोटी लागले आहेत.

 

- - यूएनआय

काश्‍मीर हा भारताचा अविभाज्य घटक

नवी दिल्ली - काश्‍मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर यावी, यासाठी आवाहन करणारा आणि काश्‍मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे, या वज्रनिर्धाराचा पुनरुच्चार करणारा ठराव एकमुखाने मंजूर करून लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाची आज सांगता झाली. काश्‍मीरच्या मुद्द्यावर भारत कोणताही तडजोड करणार नाही, असेही संसदेने पुन्हा एकदा स्पष्टपणे बजावले. 

राज्यसभेमध्ये दोन दिवसांपूर्वी काश्‍मीरप्रश्‍नी प्रदीर्घ चर्चा होऊन एकसुरात काश्‍मीरच्या अविभाज्यतेचा ठराव मंजूर करण्यात आला होता. आज लोकसभेमध्ये कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी असा ठराव मांडण्याची सूचना केली. संपूर्ण सभागृहाने पाठोपाठ गृहमंत्री राजनाथसिंह यांनीही या सूचनेला संमती दर्शविली. लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी या प्रस्तावाचे वाचन केल्यानंतर एक आवाजात ठराव मंजूर करण्यात आला.

लोकसभेने या प्रस्तावाद्वारे काश्‍मीरमध्ये दीर्घकाळापासून सुरू असलेली संचारबंदी आणि हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच तेथील परिस्थिती सुरळीत होण्यासाठी त्वरित पावले उचलण्यासाठी सरकारला आवाहनही केले. देशाची एकता, अखंडता आणि राष्ट्रीय सुरक्षा सर्वोच्च आहे. त्यावर कोणत्याही प्रकारची तडजोड मान्य केली जाणार नाही; परंतु काश्‍मीरमधील तणाव निवळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, जेणेकरून तेथे शांतता प्रस्थापित होईल आणि सामान्य जनतेला सोसाव्या लागणाऱ्या अडचणी दूर होतील. जम्मू-काश्‍मीरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे यावे. तसेच तेथील तरुणाईमध्ये विश्‍वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्पही लोकसभेने सोडला.

सलग दुसऱ्यांदा सहमती
जम्मू-काश्‍मीरवरील ठराव एकमुखाने मंजूर झाल्यामुळे संपूर्ण सभागृहाचे एकाच मुद्द्यावर एकमत होण्याचा एका आठवड्यात हा दुसरा प्रसंग असल्याची टिप्पणी तृणमूल कॉंग्रेसचे नेते सुदीप बंदोपाध्याय यांनी केली. या ठरावाआधी मालमत्ता आणि सेवाकराबाबतचे (जीएसटी) घटना दुरुस्ती विधेयक दोन्ही सभागृहांनी सर्वसंमतीने मंजूर केले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

-- सकाळ न्यूज नेटवर्क

राज्यसभा सदस्यांनाही हवी वेतनवाढ

नवी दिल्ली - दिल्ली, तेलंगण व महाराष्ट्राच्या धर्तीवर संसद सदस्यांच्याही वेतन, भत्ते आणि निवृत्तिवेतनात वाढ करण्याची मागणी राज्यसभेत आज गाजली. सरकारी कर्मचारी वगैरेंचे वेतन वाढवत नेताना संसदीय लोकप्रतिनिधींच्या वेतनवाढीसाठी आर्थिक कारण सरकार पुढे करत असेल, तर ती शरमेची बाब आहे, असे समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव यांनी सांगितले. खासदार निधीत वाढ करण्याची मागणी तर खुद्द भाजपचेच खासदार करीत आहेत.

शून्य प्रहरात यादव यांनी हा मुद्दा मांडताना सांगितले, की सातवा वेतन आयोग नुकताच लागू झाला आहे. अन्य कर्मचाऱ्यांनाही वेतनवाढ मिळाली आहे. मात्र, खासदारांना अनेक राज्यांतील आमदारांपेक्षाही कमी वेतन आहे. खासदारांकडे रोज शेकडो लोक येतात. त्यांच्या चहापाण्याचा खर्च करावा लागतो, तर कोणाला प्रवासासाठी पैसे द्यावे लागतात. सरकार महागाई वाढवतच चालले आहे. खासदारांनी खर्च करायचा कोठून? महाराष्ट्र व तेलंगणाच्या आमदारांपेक्षा निम्मे वेतन खासदारांना मिळते. यात वाढ व्हायलाच हवी. खासदारांचे वेतन हे मंत्रिमंडळ सचिवांपेक्षा जास्त पाहिजे. केंद्राने ज्यांचे पगार वाढविले त्यांना जनतेशी काही देणे-घेणे नसते वा ते जनतेच्या समस्यांशी थेट संबंधितही नसतात. तरीही त्यांना वेतनवाढ मिळते व खासदारांची स्थिती दयनीय झाली आहे. गेल्या किमान दोन अधिवेशनांपासून दर अधिवेशनातच सरकार म्हणते, की खासदार पगारवाढीवर अधिवेशन संपेपर्यंत निर्णय करू. प्रत्यक्ष निर्णय काहीच होत नाही. याबाबत संसदीय समितीने आपल्या शिफारशी देऊनही सरकार त्यांची अंमलबजावणी करण्याबाबत उदासीन आहे. येथे येणारे खासदार जनतेचे प्रतिनिधी असतील, तर महागाईच्या काळात त्यांना इतके कमी वेतन मिळणे ही शरम वाटावी अशी बाब आहे. हुसेन दलवाई व आनंद शर्मा यांनीही यावर आपले विचार मांडले. शर्मा म्हणाले, की पंतप्रधानांच्या विश्‍वभ्रमणाचे सत्र सुरूच आहे. त्यांच्या या दौऱ्यांवर हजारो कोटींचा खर्च करणाऱ्या सरकारला खासदारांची वेतनवाढ करण्याची बुद्धी का होत नाही हे कोडे आहे.

पाकिस्तानबाबत आता 'धटासी धट...'

नवी दिल्ली - काश्‍मीरमधील ताज्या संघर्षाला चिथावणी देणाऱ्या पाकिस्तानातील बलुचिस्तान आणि व्याप्त काश्‍मीरमधील नागरिकांची दैन्यावस्था, त्यांच्यावरील पाकिस्तानचे अत्याचार व तेथील हिंसाचार आंतरराष्ट्रीय व्यासपीठाच्या चव्हाट्यावर मांडण्याचे "धटासी असावे धट...‘ असे आक्रमक धोरण आखण्याचे भारताने ठरविले आहे. संसदेत काश्‍मीर मुद्द्यावर आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "काश्‍मीरचा तर सवालच नाही; पण पाकिस्तानने बळकावलेले काश्‍मीर (पीओके) हाही भारताचाच अविभाज्य भाग आहे,‘ असे ठणकावून हा विषय प्रथमच ऐरणीवर आणला.

काश्‍मीरमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठविण्याची विरोधकांची मागणी सरकारने तातडीने मान्य केली नाही. मात्र, "काश्‍मीरमधील सर्व संबंधित गटांशी केंद्र चर्चा करेल,‘ असा दिलासाही दिला. खोऱ्यातील परिस्थिती निवळल्यानंतर मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याशी बोलून सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या दौऱ्याचा कार्यक्रम ठरवता येईल, असे गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सांगितले. काश्‍मिरातील सामान्य जनजीवन पूर्वपदावर येत असून, शिक्षणसंस्था, बाजारपेठा, पर्यटनादी उद्योग हळूहळू सुरू होत आहेत, असे अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले. देशाच्या अखंडतेबाबत सर्वच पक्षनेत्यांनी "वयं पंचाधिकं शतम्‌,‘ अशा एका सुरात भावना मांडल्याचे राजनाथसिंह यांनी सांगितले.

काश्‍मीरमध्ये गेले 34 दिवस जारी असलेली संचारबंदी, 60 हून जास्त जणांचे मृत्यू व किमान पाच हजार सुरक्षारक्षक व नागरिक जखमी झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर संसदेत झालेल्या सर्वपक्षीय चर्चेत विरोधी पक्षांनी केलेली सर्वपक्षीय बैठकीची मागणी सरकारने मान्य केली होती. त्यानुसार संसदीय ग्रंथालय भवनात पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी साडेबारा ते साडेतीन अशी तब्बल तीन तास बैठक झाली. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, तसेच राजनाथसिंह, जेटली, सुषमा स्वराज, जितेंद्रसिंह, हंसराज अहिर हे मंत्री उपस्थित होते. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, मुलायमसिंह यादव, "पीडीपी‘चे नेते मुझफ्फर बेग व रसूल मीर, सीताराम येचुरी, भर्तुहरी महाताब, नवनीत कृष्णन, शरद यादव, रामदास आठवले, संजय राऊत व चंद्रकांत खैरे आदी नेतेही उपस्थित होते. नॅशनल कॉन्फरन्स पक्ष बैठकीला गैरहजर होता. त्याबद्दल सरकारी गोटातून, डॉ. फारुख अब्दुल्ला प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ शकले नाहीत, असे सांगण्यात आले.

या बैठकीत काश्‍मिरी नागरिकांना आश्‍वस्त करणे व भारत त्यांच्या भल्याची काळजी करतो, याची खात्री त्यांच्या मनात निर्माण करणे आवश्‍यक असल्याचा सल्ला डॉ. मनमोहनसिंग यांनी दिला. काश्‍मीरमधील सर्व राजकीय प्रवाहांशी चर्चा करण्याचा आग्रह आपण धरल्याचे बेग यांनी नमूद केले. काश्‍मिरी निदर्शकांवर पॅलेट गनचा मारा त्वरित थांबवावा, अनावश्‍यक तेथून लष्कराला माघारी बोलवावे, सर्व पक्षांशी चर्चा करताना फुटीरतावाद्यांना वगळू नये, अशा सूचना डाव्या पक्षांनी केल्या. काश्‍मीरमधील हिंसाचाराला व चिथावणीला पाकिस्तानच जबाबदार असल्याचे सिद्ध झाल्याने भारतानेही व्याप्त काश्‍मीरमध्ये तसेच धोरण आखावे, असे आठवले यांनी सांगितले.

राजनाथसिंह व जेटली यांनी अधिकृत निवेदन करताना सांगितले, की काश्‍मीरमध्ये शांततेची पुनर्स्थापना करण्यासाठी सर्व पक्षांनी केलेल्या विधायक सूचनांची अंमलबजावणी सरकार करेल या वचनबद्धतेचा पुनरुच्चार बैठकीत करण्यात आला. काश्‍मीर मुद्द्याचे समाधान घटनात्मक चौकटीत करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार करण्यात आला. प्रत्येक काश्‍मिरी नागरिक भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत व शांततामय जीवन जगू इच्छितो, असे सांगताना मोदींनी शेजारी देशाच्या चिथावणीचा उल्लेख केला. सामान्य काश्‍मिरी नागरिकांचे संचारबंदीमुळे होणारे हाल व त्यांच्या वेदनांकडे केंद्र सहानुभूतीने पाहते व त्यासाठी जीवनावश्‍यक वस्तू, भाजीपाला, स्वयंपाकाचा गॅस आदींचा वेळोवेळी पुरवठा केला जात आहे. पॅलेट गनचा कमीतकमी मारा करण्याच्या सूचना लष्कराला दिल्या आहेत. मात्र याबाबत तज्ज्ञांची समिती चौकशी करत आहे व तिचा अहवाल आल्यावरच त्यांच्या वापराबद्दल निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. काश्‍मीरमध्ये 2010 पासूनच पॅलेट गनचा वापर सुरू आहे, याकडे जेटली यांनी सूचकपणे लक्ष वेधले. मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यातील हॉटलाइन संवादावर जेटलींनी, पाकिस्तानच्या कागाळ्यांबद्दल याआधीचे सारेच पंतप्रधान त्या देशाला वेळोवेळी जाहीर समज देत आले आहेत. त्यासाठी हॉटलाइनच हवी असे नाही, अशी कोपरखळी मारली.

पंतप्रधान बैठकीत म्हणाले...

- काश्‍मीरमध्ये अलीकडे घडलेल्या घटना व हिंसाचारामुळे अन्य देशवासीयांप्रमाणेच मीदेखील दुःखी आहे.

- राजकीय मतभेद असले, तरी देशाची एकता व अखंडतेसाठी आम्ही सारे एकजूट दाखवतो, हे या बैठकीत पुन्हा दिसले.

- जम्मू-काश्‍मीर, लडाख याबरोबरच व्याप्त काश्‍मीर हाही भारताचाच अविभाज्य भाग.

- पाकिस्तानमधील सर्व संबंधित गटांशी चर्चा करणार; पण देशाच्या सुरक्षेशी व अखंडतेशी तडजोड नाही.

- काश्‍मिरातील अशांततेची पाळेमुळे सीमेपलीकडील दहशतवादात आहेत. शेजारी देशाकडून काश्‍मिरातील दहशतवादी गटांना बळ व रसद मिळते.

- पाकिस्तान हे विसरतो, की तो स्वतःच्याच देशवासीयांवर लढाऊ विमानांद्वारे बॉंबचा वर्षाव करतो. पाकिस्तानला आता बलुचिस्तान व व्याप्त काश्‍मिरातील लोकांवर होणाऱ्या अत्याचाराचे उत्तर साऱ्या जगाला द्यावे लागेल, ती वेळ आता आली आहे.

- जम्मू-काश्‍मीरच्या मुद्द्यावर कायमस्वरूपी व शांततामय तोडगा काढण्यासाठी भारत वचनबद्ध आहे. त्यासाठी केंद्र सरकार अटलबिहारी वाजपेयी यांनी दाखविलेल्या मार्गावरून जात आहे.

-- सकाळ न्यूज नेटवर्क

पाकव्याप्त काश्मीर भारताचाच भाग- पंतप्रधान

नवी दिल्ली- काश्मीरमध्ये अशांतता ही पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादामुळे आहे. दहशतवादाशी कठोरपणे सामना करू, तसेच पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठणकावून सांगितले. मोदी म्हणाले, "कायद्याच्या राज्याशी भारताची असलेली निष्ठा ही कमजोरी आहे असे विरोधी शक्तींनी समजू नये. पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना सहभागी केल्याशिवाय काश्मीरचा मुद्दा सोडविला जाऊ शकत नाही. पाकव्याप्त काश्मीरचे जे लोक दुसरीकडे राहत आहेत त्यांनाही चर्चेत सहभागी करणे आवश्यक आहे." काश्मीरच्या सद्यस्थितीवर विचार करण्यासाठी येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीच्या समारोपावेळी मोदी यांनी भाषण केले. त्यावेळी ते म्हणाले की, संविधानाच्या मूलभूत सिद्धांतांनुसार काश्मीर प्रश्नावर शांततापूर्वक आणि स्थायी स्वरुपाचा तोडगा काढण्यासाठी सरकार प्रतिबद्ध आहे. त्यासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी दाखविलेल्या मार्गावरून आम्ही जात आहोत.

गुरुवार, ११ ऑगस्ट, २०१६

प्रसूती रजा आता सहा महिन्यांची - यूएनआय

नवी दिल्ली (11 ऑगस्ट) - खासगी क्षेत्रात किंवा संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, प्रसूती रजेच्या कालावधीत वाढ करण्यावर कॅबिनेट मंत्रिमंडळाने शिक्‍कामोर्तब केले आहे. केंद्र सरकारने प्रसूती अधिनियमाच्या संशोधनाला मंजुरी दिली असून, त्यानुसार महिला कर्मचाऱ्यांना प्रसूतीच्या काळात 26 आठवड्यांपर्यंत पूर्ण पगारी रजेचा लाभ मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. सध्या महिला कर्मचाऱ्यांना प्रसूतीच्या काळात तीन महिन्यांची पगारी रजा मिळते. या निर्णयाचा फायदा संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या 18 महिला कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे दोन अपत्यांपर्यंत या रजेचा लाभ महिला कर्मचाऱ्यास लागू राहणार आहे. त्याचबरोबर महिला कर्मचारी एखाद्या बाळास दत्तक घेत असेल, तर तिला 16 आठवड्यांची पगारी रजा दिली जाणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना ही सुविधा अगोदरच लागू आहे; मात्र आता सरकारच्या निर्णयाने खासगी क्षेत्रातही अशा प्रकारची रजा लागू होणार आहे. त्याचप्रमाणे 50 हून अधिक कर्मचारी असणाऱ्या कार्यालयात पाळणाघर असावे, अशीही तरतूद करण्यात आली आहे.