For Advertise in this Section please connect 9422264829 or mail at sainik.darpan@gmail.com

Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan

रविवार, २६ ऑगस्ट, २०१८

निवृत्त सेनाधिकाऱ्यांचे पुनर्वसन योग्यप्रकारे व्हावे

सध्या वन रँक वन पेन्शनची चर्चा सुरू असली तरी निवृत्तांच्या पुनर्वसनाकडे अधिक गांभीर्याने बघायला हवे.

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: August 25, 2018 06:26 AM | Updated: August 25, 2018 06:28 AM

Retired Army officers should be rehabilitated properly | निवृत्त सेनाधिकाऱ्यांचे पुनर्वसन योग्यप्रकारे व्हावेनिवृत्त सेनाधिकाऱ्यांचे पुनर्वसन योग्यप्रकारे व्हावे

- वरुण गांधी
भारतीय लष्करात सध्या काम करीत नसलेल्या पण अत्यंत प्रशिक्षित आणि उच्च प्रतीचे कौशल्य असलेल्या २५ लाख अनुभवी व्यक्ती या त्यांना राष्ट्राच्या उभारणीत संधी मिळेल याची सध्या वाट बघत आहेत. या संख्येत दरवर्षी ६०,००० सैनिकांची भर पडत असते. ते एक तर निवृत्त होतात किंवा त्यांच्यातील कौशल्याचा जेथे वापर होत नाही अशा तºहेची कामे करीत असतात. या साºया ३५ ते ४५ वयोगटातील व्यक्ती असतात. सेनादलातून निवृत्त झालेल्या अधिकाºयांपैकी ८४ टक्के लोकांचे म्हणणे आहे की, त्यांना पुनर्वसन कार्यक्रमाचा कोणताच लाभ मिळाला नाही. याशिवाय सेनादलातून निवृत्त झालेल्या ८२ टक्के लोकांच्या अभ्यासातून हे दिसून आले की, त्यांनासुद्धा पुनर्वसन योजनेचा लाभ मिळाला नाही.
सेनादलात कार्यरत असणाºया अधिकाºयांसाठी निवृत्त हा शब्द वापरणेही भ्रममूलक आहे. हे अधिकारी निवृत्तीनंतर स्वत:च्या करियरमध्ये बदल करीत असतात. आयुष्याच्या मध्यंतरात त्यांना मुलकी जीवनाकडे वळावे लागते. एकूणच सेनादलातील सुरक्षित जीवनाकडून ते अशा जीवनाकडे वळतात जेथे भविष्याची अनिश्चिततता असते आणि तणावपूर्ण वातावरण असते. सैनिकी जीवनाकडून नागरी जीवनाकडे परतल्यावर असे अधिकारी अधिक काळ घरच्या वातावरणातच घालवतात. कारण बाह्य जीवनाशी जुळवून घेणे त्यांना कठीण होते. सध्या वन रँक वन पेन्शनची चर्चा सुरू असली तरी निवृत्तांच्या पुनर्वसनाकडे अधिक गांभीर्याने बघायला हवे. अनुभवी व्यक्तींकडे कोणतीही संस्था लक्ष देत नाही, अशी स्थिती नाही. त्यांच्यासाठी केंद्रीय सैनिक बोर्डाच्या अधिपत्याखाली काम करणारी जिल्हा सैनिक बोर्ड अस्तित्वात आहेत. ही बोर्डस् एक्स सर्व्हिसमेनच्या कल्याणाकडे लक्ष देत असतात. सीएसडी (कॅन्टीन स्टोअर्स डिपार्टमेंट)च्या माध्यमातून या निवृत्तांना शासकीय मदतीतून धान्य, घरगुती उपकरणे आणि दैनंदिन वापराचे सामान दरमहा मिळत असते.
सेवानिवृत्त अधिकाºयांना प्रशासकीय सेवेचा लाभ मिळतो तर आर्म्ड फोर्सेस वाईव्हज् वेल्फेअर असोसिएशनतर्फे पूर्वसैनिकांच्या पत्नींना आणि मुलांना विविध प्रकारचे वित्तीय आणि गैरवित्तीय साहाय्य मिळत असते. सेनादलातील निवृत्त अनुभवी व्यक्तींना आरोग्य योजनांचाही लाभ मिळतो तसेच ईसीएचएस पद्धतीतून त्यांना कॅशलेस वैद्यकीय सोयीही मिळतात.
वायुदलाचे प्लेसमेंट सेलही कार्यरत आहे (पण ज्यांची लाभ मिळवून देण्याची क्षमता असमाधानकारक समजली जाते.) तसेच केंद्र सरकारचे रोजगार केंद्रसुद्धा त्यांना रोजगाराच्या संधी मिळवून देत असते. सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांमध्ये एक्स सर्व्हिसमेनसाठी राखीव जागा असतात. पण प्रत्यक्षात त्याचा लाभ १६ ते १८ टक्केच लोकांना मिळतो. त्याचे कारण अशातºहेच्या संधी उपलब्ध आहेत. याची माहितीच अनेकांना नसते, तसेच त्यासाठी घेतल्या जाणाºया योग्यता परीक्षा उत्तीर्ण करणे काहींना शक्य होत नाही. या व्यक्तींच्या समायोजनाची व्यवस्था सेनादलाने केली असून, त्याचा लाभ काही व्यक्ती घेत असल्या तरी केंद्रीय सुरक्षा दलाने याबाबतीत आपल्या क्षमतेचा विस्तार करण्याची आवश्यकता आहे. खासगी क्षेत्रात सेनादलातील निवृत्तांचा उपयोग सिक्युरिटी म्हणूनच करण्यात येतो. कॉर्पोरेट वातावरणात सेनादलातील अनुभवी व्यक्तींना सन्मानपूर्वक वागणूक जरी मिळत असली तरी त्यांना सेवेत घेण्याबाबत कॉर्पोरेट जगत मागे-पुढे बघत असते. कारण त्यांना अधिक चांगल्या व्यक्ती बाहेरून मिळू शकतात. तेव्हा अनुभवी व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून देणे हा चिंतेचा विषय बनला आहे. अशास्थितीत केंद्राच्या रोजगार केंद्रांनी त्यांना प्राधान्याने नोकरीच्या संधी उपलब्ध केल्या पाहिजेत. इतकेच नव्हे तर निवृत्त कर्मचाºयांना खासगी क्षेत्रात आपोआप नोकरी मिळाली पाहिजे.
महासंचालक पुनर्वसन यांच्याकडे अनुभवी व्यक्तींच्या दुसºया करियरसाठी प्रशिक्षणाचे काम सोपवलेले असते. ते नामवंत संस्थांमध्ये विविध कोर्सेसचे आयोजन करून अनुभवी व्यक्तींना शिकवण्याचे काम करीत असतात. पण या कोर्सेसचा व्यवहाराशी संबंध नसल्याने त्याचा काहीच उपयोग होत नाही. तेव्हा महासंचालकांनी उद्योगांशी संपर्क साधून त्यांना उपयुक्त ठरतील अशा कोर्सेसचे नियोजन केले पाहिजे. एकूणच नियोजन अशा पद्धतीने केले पाहिजे जेणेकरून कुशल अनुभवी व्यक्तींचा योग्य उपयोग होऊ शकेल. केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘स्किल इंडिया’ या कार्यक्रमांचा उपयोग सेनादलातील निवृत्त पण अनुभवी व्यक्तींसाठी करता येईल. ब्रिटनच्या सरकारने सेनादलातील निवृत्तांसाठी ज्या तºहेचा कार्यक्रम आखला आहे त्याच पद्धतीचा कार्यक्रम आखून सेवानिवृत्तांना आरोग्य सेवा आणि राहण्यासाठी घर देत असताना रोजगारही मिळण्याची व्यवस्था करावी लागेल. निवृत्तांना स्वत:साठी उपजीविकेचे साधन शोधण्याची पाळी येऊ नये. नागरी समाजात एकरूप होण्याच्या दृष्टीने सरकारने खासगी संस्थांच्या भागीदारीत काम करायला हवे. परिणामकारक पुनर्वसनाशिवाय सेनादलातील अनुभवी व्यक्तींचे नीतीधैर्य टिकून राहणार नाही. तसेच तरुणांना लष्करात सामील होण्याची प्रेरणाही मिळणार नाही.

(लेखक भाजपचे खासदार आहेत.)

बॅँक शाखाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा: सुभाष भामरे

बिकट आर्थिक परिस्थितीला कंटाळून मृत्यूला कवटाळलेल्या उत्राणेच्या दिव्यांगाला मरणोपरांतही न्याय मिळत नसल्याने छावा क्र ांतिवीर सेना आणि संभाजी ब्रिगेडने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची भेट घेऊन कैफियत मांडली. यावेळी भामरे यांनी पगार कुटुंबीयाला दोन लाखांच्या मदतीची घोषणा केली, तसेच चौकशी करून संबंधित बॅँक शाखाधिकाºयाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow | Published: August 25, 2018 12:21 AM | Updated: August 25, 2018 12:22 AM

 Substitute complaint against bank branch officer: Subhash Bhamare | बॅँक शाखाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा: सुभाष भामरे 

बॅँक शाखाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा: सुभाष भामरे

ठळक मुद्देउत्राणे येथील युवकाच्या कुटुंबीयांना दोन लाखांची मदत

सटाणा : बिकट आर्थिक परिस्थितीला कंटाळून मृत्यूला कवटाळलेल्या उत्राणेच्या दिव्यांगाला मरणोपरांतही न्याय मिळत नसल्याने छावा क्र ांतिवीर सेना आणि संभाजी ब्रिगेडने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची भेट घेऊन कैफियत मांडली. यावेळी भामरे यांनी पगार कुटुंबीयाला दोन लाखांच्या मदतीची घोषणा केली, तसेच चौकशी करून संबंधित बॅँक शाखाधिकाºयाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या.
२० आॅगस्ट रोजी उत्राणे येथील प्रवीण कडू पगार या ३५ वर्षाच्या दिव्यांग मराठा तरुणाने सेंट्रल बँक आॅफ इंडिया (शाखा म्हसदी, जिल्हा धुळे)च्या शाखाधिकाºयाने सतत ७ महिने केलेल्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती़
सबळ पुरावा उपलब्ध असूनही प्रशासनाने बँक शाखाधिकाºयाविरुद्ध गुन्हा दाखल केला नाही. प्रवीणच्या कुंटुंबीयांना आर्थिक मदतही दिली गेली नसल्याची कैफियत यावेळी भामरे यांच्यापुढे मांडण्यात आली. यावेळी भामरे यांनी दोन लाखांच्या मदतीची घोषणा केली. तसेच चौकशी करून शाखाधिकाºयाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी करण गायकर यांच्या समवेत प्रा. उमेश शिंदे, शिवाजी मोरे, संतोष माळोदे,भूषण आहेर, सागर शेजवळ, सतीश नवले, भारत आहेर, योगेश सोनवणे, विकास काळे या छावा
क्र ांतिवीर सेनेच्या कार्यकर्त्यांसह संभाजी ब्रिगेडचे सचिन अहिरराव, चारुदत्त खैरनार, निकिता सावंत, परेश भामरे, मयूर पगार, अक्षय पगार, विशाल धोंडगे, ऋषिकेश शिरसाठ, मोहन पगार, सुनील पगार, सतीश कापडणीस, विजय अहिरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
पात्रता असूनही कर्ज मिळत नाही, लोकप्रतिनिधींना सांगूनही न्याय मिळत नाही म्हणून नैराश्याने ग्रासलेल्या प्रवीणने विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. आत्महत्येपूर्वी प्रवीणने आपली कैफियत सांगणारी चिठ्ठी मुख्यमंत्र्यांच्या नावाने लिहून ठेवली होती. इतकेच नव्हेतर बँक शाखाधिकाºयाने प्रवीण आणि त्याच्या वृद्ध आईचा छळ केल्याची चित्र- ध्वनीफीतही उपलब्ध आहे.

सोमवार, २० ऑगस्ट, २०१८

शिक्रापूरच्या यशकीर्तीकडून सैनिकांना राख्या

शिक्रापूर- येथील यशकीर्ती सामाजिक संस्थेच्या महिलांनी सैनिकांसोबत नाते जोडले असून त्यांनी सीमेवर भारताचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना रक्षाबंधन निमित्ताने एक हजार राख्या आणि शुभेच्छा पत्र पाठविले.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील यशकीर्ती सामाजिक संस्था सैनिकांना एक हजार राख्या पाठवून सैनिकांचे हात आपल्या सीमेचे रक्षण करण्यासाठी असून बळकट केले आहेत. याप्रसंगी यशकीर्ती सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा मंगल सासवडे, सचिव वैशाली खेडकर, भाग्यश्री जाधव, कविता जकाते, सीमा भाऊसार, उषा कळमकर, संगिता तावरे, निर्मला तोडकर, वैष्णवी भाऊसार, ओवी जाधव तसेच माहेर संस्थेच्या कार्यकर्त्या सुरेखा थिटे यांसह आदी उपस्थित होते.
या महिलांनी सैनिकांना राख्या पाठविताना सिमेवरील सैनिकांना पत्राद्वारे तुम्ही सिमेवर रक्षण करणारे आमचे खरे भाऊ आहात. त्यामुळे आम्ही तुमच्या बहिणी म्हणून तुम्हाला राखी पाठवत आहोत. तुम्ही आमचे रक्षण करो, अशी आम्ही प्रार्थना करतो. आम्ही तुमच्या सख्ख्या नाहीत परंतु पक्क्‌या बहिणी असल्याचे महिलांनी पत्राद्वारे सांगितले आहे. यावेळी शिक्रापूर येथील माजी सैनिक संघाच्या माध्यामतून या राख्या टपालने सीमेवरील सैनिकांना पाठविण्यात आल्या आहेत.

रविवार, १९ ऑगस्ट, २०१८

सैनिकांमुळे आपण सुरक्षित : आमदार औटी

because of soldiers we are Safe says MLA Auti

टाकळी ढोकेश्वर : दिवसरात्र देशाच्या सेवेसाठी व आपल्या संरक्षणासाठी सिमेवर सैनिक दिवसरात्र उभा असतो म्हणुन आपण सुरक्षित वावरत आहोत त्यांचे उपकार कधीच विसरता येणार नाही प्रत्येक सैनिक कौतुकास पात्र आहे, असे मत आमदार विजय औटी यांनी व्यक्त केले.

अळकुटी (ता.पारनेर) येथे सेवानिवृत्त सैनिक विलास परंडवाल यांच्यासह परीसरातील सैनिकांचा सत्कार आमदार औटी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ दाते, शिवसेनेचे उपप्रमुख रामदास भोसले,तालुकाप्रमुख विकास रोहकले,सैनिक दिलीप डेरे,माजी सभापती कुंदन साखला उपस्थित होते.

टाकळी ढोकेश्वर : दिवसरात्र देशाच्या सेवेसाठी व आपल्या संरक्षणासाठी सिमेवर सैनिक दिवसरात्र उभा असतो म्हणुन आपण सुरक्षित वावरत आहोत त्यांचे उपकार कधीच विसरता येणार नाही प्रत्येक सैनिक कौतुकास पात्र आहे, असे मत आमदार विजय औटी यांनी व्यक्त केले.

अळकुटी (ता.पारनेर) येथे सेवानिवृत्त सैनिक विलास परंडवाल यांच्यासह परीसरातील सैनिकांचा सत्कार आमदार औटी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ दाते, शिवसेनेचे उपप्रमुख रामदास भोसले,तालुकाप्रमुख विकास रोहकले,सैनिक दिलीप डेरे,माजी सभापती कुंदन साखला उपस्थित होते.

औटी म्हणाले, सीमेवर दिवसरात्र सैनिक उभा असतो. तो आपल्या सेवेसाठीच,कोणता शत्रु कधीही हल्ला करेल,त्याचा हल्ला परतुन लावण्याची ताकद आपल्या सैनिकांत आहेत. म्हणून आपण सुरक्षित आहोत. सेवानिवृत्तीनंतर प्रत्येक सैनिकांचे कौतुक करावे त्यांना मान सन्मान द्यावा. देशसेवेतून परंडवाल निवृत्त होत असताना त्यांचा मुलानेही सैनिक व्हायचे ठरवून तो देशाच्या सेवेसाठी भरती होऊन प्रशिक्षण घेत आहे.

सनी सोनावळे शनिवार, 18 ऑगस्ट 2018

http://www.esakal.com/paschim-maharashtra/because-soldiers-we-are-safe-says-mla-auti-138322

चार ठिकाणी लवकरच वैमानिक प्रशिक्षण संस्था

अमरावती, धुळे, कराड आणि शिर्डी येथे लवकरच खासगी सहभागातून वैमानिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) दिला आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow | Published: August 18, 2018 11:34 PM | Updated: August 18, 2018 11:35 PM

Aeronautical training institute at four places soon | चार ठिकाणी लवकरच वैमानिक प्रशिक्षण संस्थाचार ठिकाणी लवकरच वैमानिक प्रशिक्षण संस्था

- यदू जोशी
मुंबई : अमरावती, धुळे, कराड आणि
शिर्डी येथे लवकरच खासगी सहभागातून वैमानिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्रविमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) दिला आहे.
वैमानिक तसेच
विमानतळावर आवश्यक अन्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण महाराष्ट्रातच देण्याबाबतचे धोरण एमएडीसीने तयार केले, त्यास शासनाने मंजुरी दिल्यानंतर तीन महिन्यांच्या आत पहिली प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात येईल, असे एमएडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांनी लोकमतला सांगितले. वैमानिक, क्रू मेंबर आदींचे प्रशिक्षण देणाºया कंपन्या/संस्थामार्फत हे प्रशिक्षण दिले जाईल. कंपन्या राज्य सरकारला विशिष्ट मोबदला देतील, प्रशिक्षणासाठी आवश्यक सुविधा स्वत:च निर्माण करतील. स्थानिकांना रोजगार मिळेल आणि प्रशिक्षित हवाई वाहतूक कर्मचारीही उपलब्ध होतील. चारपैकी फक्त शिर्डीतून सध्या प्रवासी वाहतूक चालते. प्रशिक्षणाचे काम निविदा काढून दिले जाणार आहे.
शिर्डी विमानतळाची सध्याची धावपट्टी २५०० मीटर इतकी आहे. ती आता ३२०० मीटर लांब बनविण्याचे काम सुरू आहे. तसेच नाईट लँडिंग सुविधाही तेथे लवकरच सुरू होणार आहे. दोन्ही कामे तातडीने पूर्ण झाली नाहीत तरी आॅक्टोबरपासून शिर्डी विमानतळावरून दिल्ली, इंदूर, बंगळुरू, भोपाळ, नागपूर, चेन्नई या शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. सध्या शिर्डीतून
मुंबई व हैदराबादसाठी विमानसेवा
सुरू आहे.
उडाण योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात पाच लहान शहरांमधून विमान वाहतूक सुरू करण्याचे उद्दिष्ट होते. त्यातील सोलापूर वगळता
कोल्हापूर, नांदेड, नाशिक व जळगावमधून विमान वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
अकोला, चंद्रपूरलाही संधी
अकोला विमानतळ बंद असून त्याचा ताबा देण्याची मागणी एमएडीसीने प्राधिकरणाकडे केली आहे. तसे झाल्यास अकोला विमानतळाच्या विकासाचा मार्ग मोकळा होईल.
चंद्रपूर जिल्ह्यात राजुरानजीक नवे विमानतळ उभारण्यात येणार आहे. त्याच्या भूसंपादन प्रक्रियेस एक महिन्यात सुरूवात होईल. विमानतळ उभारणीसाठी सल्लागाराची नियुक्ती १५ दिवसांत होईल.

रविवार, १२ ऑगस्ट, २०१८

मंचरमध्ये आज माजी सैनिकांचा मेळावा

मंचर - आंबेगाव तालुक्‍यातील माजी सैनिकांचा वार्षिक मेळावा रविवार (दि. 12) सकाळी 10 वाजता पिंपळगाव फाटा-एस कॉर्नर मंचर येथील गणराज मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती माजी सैनिक संघाचे आंबेगाव तालुक्‍याचे अध्यक्ष विलास अभंग व सचिव यशवंत गांजाळे यांनी दिली. माजी सैनिक मेळाव्यामध्ये विविध विषयावर चर्चा होणार आहे. त्यामध्ये निवृत्तीवेतन, कॅन्टीन, वैद्यकीय सुविधा, पाल्यांच्या शैक्षणिक सवलती यावर चर्चा होईल. याशिवाय आयुर्वेदिक शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.

देशाचे पहिले महिला SWAT पथक सज्ज

पथकात सर्व महिला ईशान्य भारतातील
नवी दिल्ली - देशात पहिल्यांदाच महिला स्पेशल वेपन्स अँड टॅक्‍टिस म्हणजेच SWAT कमांडो पथक सज्ज झाले आहे. 36 महिलांचे हे पथक स्वातंत्र्यदिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी लाल किल्ल्यावर तैनात असणार आहे. तसेच इंडिया गेटवरही महिलांचे SWAT पथक तैनात असेल.

या पथकाची स्थापना सुमारे 15 महिन्यांच्या कठीण प्रशिक्षणानंतर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्या महिलांचा SWAT पथकात समावेश झाला आहे त्या सर्व ईशान्य भारतातील आहेत. या पथकाला देशासह परदेशातील तज्ज्ञांनी प्रशिक्षण दिले आहे. या महिला पथकाला बॉम्ब निकामी करणे, इमारतींवर चढणे आणि ओलिसांची सुटका करणे याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या पथकाने कालच (10 ऑगस्ट) आपल्या कामाला सुरुवात केली आहे.

याआधी या पथकासाठी पुरुषांनाच प्राधान्य होते. महिला SWAT पथक बनवण्याआधी 36 महिलांना 15 महिने कठोर प्रशिक्षण देण्यात आले. पूर्णत: तरबेज झाल्यानंतर त्यांना 'स्पेशल वेपन्स अँड टॅक्‍टिस' पथकात सामील करण्यात आले. महिला कमांडोंचे हे पथक पुरुषांच्या सर्व पाच SWAT पथकांसोबत मिळून दिल्लीत काम करणार आहे.

या महिलांनी "SWAT मधील पुरुषांचे वर्चस्व मोडले आहे. महिला हे काम करु शकत नाही, असा अनेकांचा गैरसमज असतो. पण महिला पुरुषांच्या बरोबरीत आहे, हे सांगताना मला अभिमान वाटत आहे, असे दिल्ली पोलिसातील वरिष्ठ अधिकारी प्रमोद कुशवाहा म्हणाले.

शनिवार, ११ ऑगस्ट, २०१८

शाळांमध्ये क्रीडा तास अनिवार्य करणार : राजवर्धनसिंग राठोड

नवी दिल्ली : देशात क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धनसिंग राठोड यांनी पुढाकार घेतला आहे. आता 2019 सालापासून शालेय अभ्यासक्रमात 50 टक्के कपातकरुन शाळांमध्ये क्रीडा तास अनिवार्य करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. रग्बी या खेळाचा विश्‍वचषक भारतात आला आहे. या ट्रॉफीचे नवी दिल्लीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी क्रीडामंत्री बोलत होते. 2022 सालापर्यंत 'साई' (स्पोर्टस् इंडिया) च्या कर्मचार्‍यांमध्ये कपात करणार आहे. यामधून जो पैसा वाचेल तो खेळाडूंसाठी वापरणार असल्याचे यावेळी क्रीडामंत्री म्हणाले. तसेच शालेय अभ्यासामध्येही 50 टक्के कपात करणार असल्याचे संकेत राजवर्धनसिंग राठोड यांनी दिले.

तर तुमचेही खाते होऊ शकते रिकामे - स्टेट बँकेने दिला इशारा

 

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक इंडियाच्या नावाने खोटे फोन करून गंडा घालणाऱ्या टोळीला अटक करण्यात आल्यानंतर एसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी इशारा जारी केला आहे. एसबीआयच्या नावाने काही लोक खोटे संदेश पसरवत आहेत आणि त्यामुळे ग्राहकांचे खाते पूर्णपणे रिकामे होऊ शकते, असे स्टेट बँक ऑफ इंडियाने दिला आहे.

बँकेच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून हा संदेश जारी करण्यात आला आहे. बँकेच्या वतीने ग्राहकांना कोणतीही माहिती मागण्यात आलेली नाही. या संदर्भात काही बनावट एसएमएस पसरविण्यात येत आहेत. मात्र बँकेच्या ग्राहकांनी कोणालाही माहिती देऊ नये आणि त्यांनी ती दिलीच तर बँकेला त्वरित कळवावे, असेही बँकेने म्हटले आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा रिझर्व्ह बँकेच्या नावाने फसवेगिरी करणाऱ्या एका टोळीला दिल्ली पोलिसांनी गेल्या महिन्यात अटक केली होती. या टोळीने 2000 ग्राहकांना फोन करून 5 कोटी रुपयांचा गंडा घातला होता. या टोळीत 22 टेलिकॉलर महिलांसहित एकूण 30 जण होते. त्यानंतर बँकेने हा इशारा दिला आहे.

भारताचे दरडोई उत्पन्न 80 हजारावर

 

नवी दिल्ली - भारताचे दरडोई उत्पन्न 79 हजार 882 रूपयांवर गेले आहे. गेल्या चार वर्षातील ही उच्चांकी स्थिती आहे असे सरकार तर्फे आज संसदेत सांगण्यात आले. देशाचे दरडोई उत्पन्न सन 2011 ते 2014 या अवधीत 67 हजार 594 इतके होते.

या पार्श्‍वभूमीवर दरडोई उत्पन्नात झालेली ही वाढ लक्षणीय आहे असे सांख्यकी विभागाचे मंत्री विजय गोयल यांनी लोकसभेतील लिखीत उत्तरात सांगितले. गेल्या चार वर्षात 4.6 ते 6.9 टक्के या टप्यांमध्ये नागरीकांच्या दरडोई उत्त्पन्नात वाढ झाल्याची माहिती मंत्र्यांनी दिली. देशाच्या दरडोई उत्पन्नाबाबत सदस्यांनी सरकारकडे प्रश्‍न विचारले होते त्यावर उत्तर देताना मंत्र्यांनी ही आकडेवारी दिली.

शहीद पोचीराम कांबळेंना स्मृती दिनानिमित्त अभिवादन

सातारा,दि.8(प्रतिनिधी) - मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर चळवळीत आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या पोचीराम कांबळे यांना 4 ऑगस्ट रोजी टेंभुर्णी ता. नायगाव जि. नांदेड येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी स्मृती स्तंभाचा लोकार्पण सोहळा त्यांच्या पत्नी धोंडामाई आणि परिवाराच्या उपस्थित पार पडला. यावेळी प्रबुद्ध रंगभूमीचे निर्माते भिमपुत्र टेक्‍सास गायकवाड, क्रांती थिएटर्सचे अमर गायकवाड, डी. एस. नरसिंगे, लेखक सुरेश पाटोळे, कीर्तीपाल गायकवाड आणि विवेक घाडगे यांनी तत्कालिन घटनेला उजाळा देताना हा स्तंभ भावी पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे अधोरेखित केले.
प्रबुद्ध रंगभूमी आणि क्रांती थिएटर्सच्यावतीने राज्यात नाटकांचे 32 प्रयोग महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सादर करून मिळालेल्या मानधनातून नामांतराच्या लढ्यातील नायकाचा स्तंभ पोचीराम कांबळे यांच्या गावात उभारला. याच ठिकाणी स्मारक बांधण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. नामांतराच्या लढयात मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यासाठी पहिली आहुती 4 ऑगस्ट 1978 रोजी पोचीराम कांबळे यांना द्यावी लागली. टेंभुर्णी गावातील कार्यक्रमात स्तंभाचे लोकार्पण करताना अमर गायकवाड म्हणाले,पोचीराम कांबळेंच्या बलिदानामुळे बहुजन चळवळीला गती मिळाली.
टेंभुर्णीतील क्रांतीमुळे चळवळीतील आमदार-खासदार आणि मंत्री झाले. मात्र, गेल्या चाळीस वर्षात टेंभुर्णी दुर्लक्षित राहिली. कलाकार हा समाजाचा आरसा असतो, हे पुन्हा सिद्ध झाले. शहीद पोचीराम यांच्या पत्नी गेल्या चाळीस वर्षांपासून नवऱ्याच्या त्यागाला न्याय मिळणार कधी, या प्रतिक्षेत होत्या.
कलाकारांनी निर्माण केलेला स्मृती स्तंभ पाहून त्या गहिवरल्या. भिमपुत्र टेक्‍सास गायकवाड यांनी टेंभुर्णीत स्मारक बांधण्यासाठी कटीबद्ध असल्याचे स्पष्ट केले. यावेळी नांदेड जिल्ह्यासह मुंबई, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे भागातील विविध सामाजिक संघटनांचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

प्रत्येक ग्राहकाच्या नावाने एक वृक्ष लावते 'हे' हॉटेल

नवी दिल्ली - दिल्लीच्या क्लार्क्‍स ग्रुप ऑफ हॉटेलमध्ये तुम्ही जेवण करण्यासाठी गेलात हे हॉटेल पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी तुमच्या नावाने एक वृक्ष लावते. आपल्या हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाच्या नावाने ज्यात ते वृक्ष लावतात. व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर)नुसार वृक्षारोपणची ही मोहीम चालवली जात आहे.

एक ऑगस्टला या हॉटेलने २०० झाडे लावून या उपक्रमाला सुरुवात केली. २०१८-१९ मध्ये १०००० झाडे लावण्याचे लक्ष्य या ग्रुपने ठेवले आहे. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी हॉटेलकडून ही मोहीम चालवली जात आहे. हॉटेलने ठरवून दिलेल्या जागेवर हे वृक्षारोपण केले जाणार असून हे हॉटेलच त्याची देखभाल करणार आहे. पुढच्या वर्षासाठीसुद्धा हॉटेलने वृक्षारोपणाचे लक्ष्य ठरवले आहे. हॉटेलकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०१९-२०मध्ये १० हजार झाडे लावण्याचे लक्ष्य ठरवण्यात आले आहे. क्लार्क्‍स ग्रुपचे प्रबंध निर्देशक अपूर्व कुमार यांनी सांगितले, की पर्यावरण स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आमच्या हॉटेलकडून राबवला जात आहे.

संघ लोकसेवा आयोग - कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसच्या 414 पदासाठी भरती

नवी दिल्ली - संघ लोकसेवा आयोगाने युपीएसी कम्बाइन्ड सर्व्हिसेस (CDS-II 2018) साठी पदांच्या भरती साठी नोटीफिकेशन जाहीर केले आहे. एकूण 414 पदाच्या जागेसाठी भरती असणार आहे. कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिस पदासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.

पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 सप्टेंबर आहे. एकूण 414 पदांमध्ये इंडियन मिलिट्री अॅकडमी, (देहरादून)एकूण पद 100, इंडियन नेवल अॅकडमी(एझिमला) पद45, एअर फोर्स अॅकडमी (हैद्राबाद) पद 32, आॅफिसर्स ट्रेनिंग अॅकडमी (चेन्नई,पुरुष) पद 225, आॅफिसर्स ट्रेनिंग अॅकडमी (चेन्नई, महिला) पद 12 अशी पदसंख्या आहे.

अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर असणे जरूरीचे आहे. सर्व पदांसाठी वेगवेगळी योग्यता ठरविण्यात आलेली आहे. संबंधित पदांच्या अधिक माहितीसाठी संघ लोकसेवा आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ upsc.gov.in पहावे.

आगामी काळात ई-लर्निंग/ई-स्कूल प्रकल्पावर भर देणे आवश्यक - मुख्यमंत्री

मुंबई : राष्ट्रीय पातळीवरील शैक्षणिक गुणवत्तेत महाराष्ट्राला आघाडीवर ठेवण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. माहिती व तंत्रज्ञानाची कास धरीत येणाऱ्या काळात ई-लर्निंग आणि ई-स्कूलसारखे प्रकल्प राबविण्यावर शालेय शिक्षण विभागाने अधिकाधिक भर द्यावा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक वर्षा निवासस्थानी आज झाली. या बैठकीला शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले, जानेवारी 2016 मध्ये फक्त 10हजारहून अधिक शाळा डिजिटल झाल्या होत्या. आता जून 2018 अखेर 63 हजार500 हून अधिक शाळा डिजिटल झाल्या आहेत, असे असले तरी येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना ई- लर्निंग आणि ई-स्कूल यासारख्या सोयी मिळाव्यात. यासाठी शालेय शिक्षण विभागाने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

शाहूपुरी येथे क्रांतीदिनी हुतात्म्यांना अभिवादन

शाहूपुरी ः हुतात्म्यांना अभिवादन करताना शाहूपुरी माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी.

सातारा, दि. 9 (प्रतिनिधी)- शाहूपुरी येथील आपल्या शाहूपुरी माध्यमिक विद्यालयाच्यावतीने हुतात्मा स्मारक गेंडामाळ येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शालाप्रमुख सौ. एस. एस. क्षीरसागर, अध्यापक संजय बारंगळे, जगदीश सुपेकर यांच्यासह अध्यापक, दत्तात्रय कुचेकर व विद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी सौ. क्षीरसागर यांनी स्वातंत्र्य चळवळीचा आढावा घेऊन अनेक अनामिकांनी देशासाठी प्राणांचे बलिदान दिले. त्यांच्या या अपूर्व त्यागाची जाणीव ठेवून सद्यस्थितीत लोककल्याणार्थ कार्यात निरपेक्ष वृत्तीने प्रत्येक भारतीयाने काम करण्याची गरज असल्याचे सांगितले.

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

मिरारोड - काश्‍मिरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांना अवघ्या 29 व्या वर्षी वीरमरण आले. कौस्तुभ राणे यांच्या पार्थिवावर गुरूवारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शहीद कौस्तुभ राणे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मिरारोड येथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी "कौस्तुभ राणे अमर रहे'च्या घोषणा नागरिकांनी दिल्या. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही कौस्तुभ यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत राणे कुटुंबीयांचे सांत्वन केले.

मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथील असलेले कौस्तुभ राणे हे मीरारोड येथील रहिवासी होते. शहीद मेजर कौस्तुभ यांच्या पश्‍चात आई-वडील, पत्नी, दोन वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.

उत्तर काश्‍मिरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्‍टरमध्ये दहशतवादी एलओसी (नियंत्रण रेषा) पार करुन घुसखोरी करणार असल्याची माहिती 7 ऑगस्टच्या रात्री उशिरा सैन्याला मिळाली होती. त्यानंतर अचानक दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरु झाला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 29 वर्षीय मेजर कौस्तुभ राणे यांच्यासह मनदीप सिंग रावत, हमीर सिंग, विक्रम जीत सिंग हे जवान शहीद झाले.

मिरारोड भागात कौस्तुभ राणे लहानाचे मोठे झाले. येथील हॉली क्रॉस शाळेत त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. कौस्तुभ यांच्या घरातील कोणीही लष्करात नव्हते. कौस्तुभ यांचे वडील टाटा कंपनीत कार्यरत होते, तर आई ज्योती राणे मालाडच्या शिक्षण प्रसारक मंडळीच्या उत्कर्ष मंदिर शाळेच्या माजी मुख्याध्यापिका आहेत. सध्या दोघेही निवृत्त आहेत.
कौस्तुभ यांच्या पत्नी कनिका मुलाला घेऊन गावी गेल्या होत्या, तर आई-वडीलही गावी जायच्या तयारीत होते.

मात्र कौस्तुभ यांच्या शहीद झाल्याच्या वृत्ताने राणे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. यंदा कौस्तुभ यांना सेना पदकाने सन्मानित करण्यात आले होते.

इतिहास जमा होणार 'पोस्टमन' हा शब्द

आतापर्यंत तुमच्याकडे टपाल आणणारे पोस्टमन यापुढे हे काम करणार नाहीत. तर टपाल घेऊन येण्याचे काम पोस्टपर्सन करणार आहेत. पोस्टमनचे नाव बदलून त्यांना 'पोस्टपर्सन' असा शब्द देण्यावर सध्या सरकार दरबारी विचार सुरू आहे.

माहिती तंत्रज्ञानविषयक संसदीय समितीने या नामांतराची शिफारस केली आहे. त्यावर हा बदल करण्याबाबत विचार सुरू असल्याचे टपाल खात्याने समितीला कळविले आहे. तसेच पोस्टमनसाठी हिंदीत असलेला शब्द 'डाकिया' हा लिंग-निरपेक्ष असल्याचेही खात्याने सांगितले आहे.

भाजपचे खासदार अनुराग ठाकुर हे या समितीचे अध्यक्ष आहेत. टपाल खात्याच्या अनुदान मागणीवरील आपल्या अहवालात समितीने टपाल पोचविणाऱ्या व्यक्तींसाठी वापरण्यात येणारी शब्दावली मागविली होती. त्यातच पोस्टमनला पर्याय म्हणून पोस्टपर्सन हा शब्द वापरण्याची शिफारस करण्यात आली.

मंगळवारी या समितीचा अहवाल संसदेपुढे ठेवण्यात आला. टपाल खात्यात पोस्टमन आणि पोस्टवुमेन हे दोघेही काम करतात. मात्र पोस्टमन हा शब्द केवळ पुल्लिंगवाचक आहे. त्यामुळे हा शब्द बदलण्यासाठी गरज असल्याचे समितीने म्हटले आहे. डाकिया हा शब्द लिंग-निरपेक्ष असल्याबाबतही समितीने संमती व्यक्त केली आहे.

केंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय; वाहतूक पोलिसांना मूळ कागदपत्र दाखवण्याची गरज नाही

नवी दिल्ली - केंद्र सरकारने राज्यांमधील वाहतूक विभाग आणि वाहतूक पोलिसांना तपासणी करण्यासाठी मूळ कागदपत्र घेऊ नका असा आदेश दिला असल्यामुळे यापुढे आता वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन केल्यास वाहतूक पोलिसांकडे तुमचा वाहतूक परवाना किंवा मूळ कागदपत्रे सोपवण्याची किंवा दाखवण्याची आता गरज नाही. यासाठी फक्त तुमच्या मोबाइलमध्ये असणारी कागदपत्रांची ई-कॉपी पुरेशी आहे.

वाहतूक मंत्रालयाने वाहतूक पोलीस आणि राज्यातील अन्य वाहतूक विभागांना माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्यामधील तरतुदींचा उल्लेख करत आदेश दिला आहे की, तपासणीसाठी ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि इन्शुरन्स पेपरसारख्या कागदपत्रांची मूळ प्रत घेतली जाऊ नये. डिजीलॉकर (DigiLocker) किंवा एमपरिवहन (mParivahan) अॅपमध्ये असणारी कागदपत्रांची ई-कॉपी दाखवली तरी चालणार आहे. याचा अर्थ आपल्याकडील मोबाइलवरुन क्यूआर कोड स्कॅन करत वाहतूक पोलीस चालक किंवा वाहनाची संपुर्ण माहिती डेटाबेसवरुन मिळवू शकतात. त्यासाठी मूळ कागदपत्र जप्त करण्याची किंवा घेण्याची गरज नाही.

वाहतूक पोलीस अनेकदा भरधाव वेगाने गाडी चालवणे, वाहतूक सिग्नल तोडणे तसंच गाडी चालवताना फोनवर बोलणे अशा प्रकरणी कारवाई करत कागदपत्र जप्त करतात. पण ही कागदपत्र अनेकदा पोलिसांकडून गहाळ होतात. अशा वेळी आपली कागदपत्र पुन्हा मिळवण्यासाठी लोकांनी तक्रार करुनही वाहतूक विभाग ती मिळवू शकलेला नाही. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार, ई डेटाबेसच्या आधारे पोलीस संबंधित वाहन आणि वाहनचालकाची संपूर्ण माहिती मिळवू शकतात. त्यासाठी कागदपत्रांची मूळ प्रत जमा करण्याची काहाही गरज नाही.

महाराष्ट्रातील 10 स्वातंत्र्य सैनिकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

नवी दिल्ली : 'भारत छोडो' आंदोलन, गोवा मुक्ती, हैद्राबाद मुक्ती आंदोलनात मोलाचे योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील 10 स्वातंत्र्य सैनिकांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवन येथे सन्मान करण्यात आला. क्रांतिदिनाचे औचित्य साधून भारत छोडो आंदोलनाच्या 76 व्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रपती भवनात स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

सन्मान झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांमध्ये महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथील देवप्पा खोत, नागपूर जिल्ह्यातील गणपतराव गभणे, परभणी जिल्ह्यातील डॉ.अवधूत डावरे आणि वसंत अंबुरे, मुंबईतील गदाधर गाडगीळ आणि अनंत गुरव, पुणे जिल्ह्यातील बाळासाहेब जांभूळकर, अरविंद मनोलकर, वसंत प्रसादे तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील वसंतराव माने या स्वातंत्र्यसैनिकांचा समावेश आहे.

स्वातंत्र्यसैनिक देवाप्पा खोत हे सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथील आहेत. सध्या 99 वर्षाचे आहेत. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात श्री.खोत यांनी कुपवाड सेंटर (चावडी) येथे झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये सहभाग घेतला होता. कुपवाड येथून जवळ असणारे माधवनगर येथे रेल्वेरुळ त्यांनी उद्धवस्त केले होते. तसेच तत्कालीन धुळे कोषागार कार्यालयालाही हानी पोहोचविली होती.

आता वाहनपरवाना पोलिसांना दाखविण्याची नाही गरज !

 

 

Now there is no need to show the vehicle ownership to the police

नवी दिल्ली : वाहतूक पोलिसांकडून अनेकदा वाहनांची कागदपत्रे आणि वाहनपरवानाची मागणी केली जात असे. या कागदपत्रांची पूर्तता न केल्यास संबंधित वाहनचालकाला दंड आकारला जात असे. मात्र, आता यापुढे पोलिसांना वाहनपरवाना आणि वाहनाच्या कागदपत्रांची मागणी करता येणार नाही.

माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये बदल करण्यात आल्याने आता यापुढे वाहतूक पोलिसांना वाहनपरवाना आणि वाहनाच्या कागदपत्रांची मागणी करता येणार नाही. याबाबत परिवहन मंत्रालयानेही अध्यादेश जारी केला असून, यामध्ये डिजिलॉकर किंवा एम- परिवहन या अॅपवर कागदपत्रे अपलोड केल्यास ती अधिकृत समजण्यात येणार आहेत.

यापूर्वी अनेकदा वाहनांची कागदपत्रे, वाहनपरवाना, पीयूसी, इन्शुरन्स कागदपत्रेसोबत ठेवणे शक्य होत नव्हते. यामुळे वाहतूक पोलिसांनी अडविल्यास नाहक त्रास भोगावा लागत होता. तसेच भुर्दंडही भरावा लागत होता. मात्र, सरकारच्या या निर्णयामुळे वाहनचालकांना मोठा फायदा होणार आहे.

वाहन क्रमांकावरून पोलिस त्यांच्या मोबाईल अॅपवर सर्व माहिती पाहू शकणार आहेत. तसेच वाहनचालकही आपल्या अॅपवरून ही कागदपत्रे त्यांना दाखवू शकणार आहेत. याचा फायदा वाहनचालकांसह पोलिसांनाही होणार आहे.

दरम्यान, एम- परिवहन हे अॅप सध्या अँड्रॉइडवर उपलब्ध असून, येत्या 10 दिवसांत ते आयओएसवरही उपलब्ध करण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

वृत्तसंस्था 

शुक्रवार, १० ऑगस्ट, २०१८

हुतात्मा मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांना साश्रू नयनांनी निरोप

मुंबई - काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेले मेजर कौस्तुभ प्रकाश राणे (29) यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मीरा रोडच्या वैकुंठपार्क स्मशानभूमीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो नागरिकांनी त्यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला.

"धीरल सागर' इमारतीबाहेर हुतात्मा राणे यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आज सकाळपासूनच रांग लागली होती. सकाळी पावणेदहाच्या सुमारास लष्कराच्या सजवलेल्या ट्रकमधून अंत्ययात्रा निघाली.

अंत्ययात्रा मार्गस्थ होत असताना चौकाचौकांत नागरिक सहभागी होत होते. शीतल नगर परिसरात पार्थिवावर पुष्पवृष्टी करण्यात आली. मीरा रोड स्थानक परिसरापर्यंतचा संपूर्ण रस्ता फुलांच्या पाकळ्यांनी सजवला होता. अंत्ययात्रा मार्गस्थ होत असलेले दोन्ही बाजूंकडील रस्ते वाहनांसाठी बंद होते. दुकानदार दुकाने बंद करून अंत्ययात्रेत सहभागी झाले.

मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीचे राणे कुटुंब 30 वर्षांपासून मीरा रोड परिसरात राहत आहे. कौस्तुभ यांच्या मागे आई, वडील, पत्नी, बहीण, दोन वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कौस्तुभ यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत राणे कुटुंबीयांचे सांत्वन केले. गढवाल रायफल्स युनिटचे दक्षिण-पश्‍चिम कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल चेरीश माथसन यांच्या नेतृत्वाखाली राणे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कोकण विभागाचे पोलिस महानिरीक्षक नवीन बजाज, ठाणे ग्रामीण पोलिस आणि लष्कराच्या तिन्ही दलांच्या जवानांनी त्यांना मानवंदना दिली.

बहिणींकडून शेवटची राखी
मेजर कौस्तुभ राणे यांना एक लहान सख्खी बहीण व चार चुलत बहिणी आहेत. ते लष्करात गेल्यापासून बहिणी टपालाने राखी पाठवत. काही दिवसांवर आलेल्या राखीपौर्णिमेसाठी आपल्या लाडक्‍या भावाला आता राखी पाठविता येणार नसल्यामुळे त्यांनी कौस्तुभला आवडत असलेले कॅडबरी चॉकलेट व राखीची भेट देत अखेरचा निरोप दिला. ते पाहून सर्वांना अश्रू अनावर झाले.