नवी दिल्ली - पठाणकोट हल्ल्याच्या तपासात पाकिस्तानचे पूर्ण सहकार्य असेल, असे आश्वासन पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. सध्या श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या शरीफ यांनी आज दूरध्वनीवरून मोदी यांच्याशी चर्चा केली. शरीफ यांनी या वेळी पठाणकोटमधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आणि तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन मोदींना दिले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी काल पाकिस्तानला काही महत्त्वाचे पुरावे देत त्यावर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली. पाकिस्ताननेही हे पुरावे तत्काळ न नाकारता योग्य पावले उचलण्याचे आश्वासन दिले.
पंतप्रधान मोदींनीही शरीफ यांना याप्रकरणी तत्काळ कृती आवश्यक असल्याचे सांगितले. शरीफ यांच्याशी बोलताना मोदी यांचा आवाज धारदार झाला होता, असे सूत्रांनी सांगितले आहे.
[यूएनआय]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा