सोमवार, 4 जानेवारी 2016 - 11:27 AM IST
बंगळूर- पठाणकोट हवाई तळावरील दहशतवादी हल्ल्यानंतरच्या कारवाईदरम्यान रविवारी हौतात्म्य आलेले राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या बाँबविरोधी पथकाचे लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार यांचे पार्थिव आज (सोमवार) सकाळी विमानाने बंगळूरला आणण्यात आले.
दरम्यान, गरुड दलाचे हुतात्मा कमांडो गुरसेवक सिंग यांचेही पार्थिव अंबाला येथील गर्नाला येथे नेण्यात आले आहे. गुरसेवक यांचे पार्थिव पोचल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांसह त्यांच्या उपस्थितांना अश्रू अनावर झाले.
लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार यांचे पार्थिव बंगळूर येथील बीईल मैदानावर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनी येथे पार्थिवाचे दर्शन घेऊन आदरांजली वाहिली. दुपारी तीन वाजेपर्यंत पार्थिव येथे ठेवून नंतर कुमार यांच्या केरळमधील मूळ गावी अंत्यसंस्कारांसाठी नेण्यात येईल.
[Sakal]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा