‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषात, ढोल-ताशाच्या दणदणाटात, बँड पथकांच्या तालावर, गुलाल व फुलांची प्रचंड उधळण करीत राज्यात लाडक्या
गणरायाचे उत्साहात विसर्जन झाले.
फेसबुकच्या
मुख्यालयात गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्नोत्तरा दरम्यान रडू कोसळलं.
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गने मोदींना आईबाबत प्रश्न विचारलं असता,
मोदी भावूक झाले.
संसद सदस्यांना
किती वेतन व भत्ते मिळावे, या मुद्यावर 3 सदस्यीय समिती गठित करण्याचा प्रस्ताव
केंद्र सरकारने सुचविला आहे.
मर्सिडीज
बेंझच्या महाराष्ट्रातील १००० कोटीच्या अतिरीक्त गुंतवणुक प्रकल्पास तातडीने
मंजुरी: मुख्यमंत्री
अहमदनगर:
जिल्ह्यातील कर्जत, पारनेर व अकोले या नव्या नगरपंचायतींची १
नोव्हेंबरला निवडणूक
जनलोकपाल
विधेयक हे जवळ जवळ पूर्ण झाले असून पुढील अधिवेशनात ते! मंजुरीसाठी सादर होईल
अशी अपेक्षा आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
गोविंद पानसरे
यांच्या हत्येतील संशयित आरोपी समीर गायकवाड याच्या ब्रेन मॅपिंगची परवानगी द्या
अशी विनंती कोल्हापूर पोलीसांनी न्यायालयाकडे केली असून या अर्जावर उद्या
सुनावणी होणार आहे.
कल्याण
डोंबिवली महापालिकेमध्ये १२२ जागांसाठी निवडणुका होणार असून एकूण १३ लाख मतदार
आहेत. तर कोल्हापूरमध्ये ८२ जागा असून ४.५ लाख मतदार आहेत.
संपूर्ण
निवडणूक प्रक्रिया संपूर्ण होऊन १ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आणि २ नोव्हेंबर
रोजी मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
सार्वजनिक
क्षेत्रातील बँकांना निर्णय घेताना स्वातंत्र्य देण्याची गरज, त्यांना राजकीय
दबावातून मुक्त केले पाहिजे - अर्थमंत्री अरुण जेटली
कॉ़. पानसरे
हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाडला कोर्टासमोर हजर करण्यात आले.
कोळसा
घोटाळ्यात मनमोहन सिंग यांना आरोपी बनवण्याच्या मधू कोडा यांच्या याचिकेला
सीबीआयने कोर्टासमोर विरोध दर्शवला
हज येथील
चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत आणखी 6 भारतीयांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला असून आता मृत भारतीयांचा आकडा ३५ वर
गेला आहे, अशी माहिती परराष्ट्र
मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली.
महापौर आणि
आरोग्य मंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर मुंबईतील केईएम रुग्णालयातील निवासी
डॉक्टरांचा संप मागे घेण्यात आला. डॉक्टरांना मारहाण करणा-या 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अभिनव बिंद्रा
याने आशियाई एअरगन चॅम्पियनशिपमध्ये १० मीटर एअर रायफलस्पर्धेत सुवर्ण पदक
पटकावले.
संजय दत्त
स्वतःच्याच आयुष्यावर चित्रपट काढणार असून या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर
संजयची भूमिका साकारणार आहे.
दिनविशेष - आज
जागतिक हृदय दिन. जागतिक कर्णबधिर दिन. Green Consumer Day. १९२९ - पार्श्वगायिका, गान कोकिळा लता मंगेशकर यांचा जन्म.
गणपती विसर्जन
मिरवणुकीला जुन्या नाशकातील वकडी बारव येथून सुरुवात झाली. यामध्ये प्रमुख २२
मोठी मंडळ सहभागी झाली होती. सर्व मंडळांनी मेनरोड, एम जी रोड, अशोक स्तंभ, आर के मार्गे
मालेगाव स्टॅंडवरून गोदावरी नदीवर जाऊन गणेश विसर्जन केले.
गोदावरी नदी
प्रदुषणमुक्त राहावी, यासाठी अनेक
पर्यावरण तसेच सामाजिक संस्थानी गणेश मूर्ती दान करण्याचे आवाहन केले आहे. याला
भविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
|
More details
In English http://sainikdarpan.blogspot.in
आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा