🔷 लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी
आलेल्या महिलेला मारहाण करणा-या दोन महिलां पोलीसांना निलंबित करण्यात आलं आहे.
🔶 पश्चिम रेल्वेच्या नवीन वेळापत्रकाचे आज प्रकाशन, १ ऑक्टोबर पासून नवे वेळापत्रक येणार अमलात 🔷 शिर्डीः सामूहिक बलात्कार प्रकरणी तीन आरोपींना अटक, संगमनेर पोलिसांची कारवाई 🔷 तामिळनाडूतील नमक्कल येथे डोंगरावर सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात विद्यार्थ्याचा दरीत पडून मृत्यू. 🔶 अहमदनगरमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, अपघातानंतर शिवसेनेच्या महिला आघाडीचा रास्तारोको. 🔷 कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरण, संशयित आरोपी समीर गायकवाडच्या ब्रेन मॅपिंगवर ३ ऑक्टोबरला सुनावणी. 🔶 मुंबई महापालिकेच्या सुधार समितीत विरोधकांचे ठिय्या आंदोलन, अध्यक्षांनी बोलू न दिल्याचा विरोधकांचा आरोप. 🔷 रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात करताच स्टेट बँक ऑफ इंडियाने पायाभूत व्याजदरात ०.४० टक्क्यांची कपात केली, ५ ऑक्टोबरपासून नवीन व्याजदर लागू. 🔶 मंत्रालयाच्या अधिका-यांसोबत १ ऑक्टोबर रोजी मुंबईत पुन्हा बैठक होणार, एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांची माहिती. 🔷 लालबागचा राजा मंडळाला मुंबई महापालिकेचा दणका, मंडपामुळे पडलेल्या खड्ड्यांसाठी ३ लाख रुपये भरण्याचे आदेश दिले. 🔶 पुण्यातील क्रॉसवर्ड येथे सोमवारी सकाळी लागलेल्या आगीत सुमारे २५० कोटी रुपयांचे नुकसान 🔷 शशांक मनोहर यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली आहे, मनोहर बहुमताने निवडून येतील अशी आशा आहे - अनुराग ठाकूर, बीसीसीआयचे सचिव 🔶 रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आज मंगळवारी जाहीर केलेल्या द्विमाही पतधोरणाच्या आढाव्यात रेपो दरात 0.50 टक्क्यांची कपात केली आहे. आता रेपो रेट 7.25 टक्क्यांवरून 6.75 टक्के करण्यात आला आहे. 🔶 भारत सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी फेसबुकचा प्रोफाईल फोटो तिरंग्यात बदलल्याने 'इंटरनेट डॉट ओआरजी' या फेसबुकच्या उपक्रमाला पाठिंबा मिळतो हा गैरसमज आहे, असे स्पष्टीकरण देत या 2 उपक्रमांमध्ये कोणताही संबंध नाही, असा खुलासा फेसबुकच्या वतीने करण्यात आला आहे. 🔶 भारतातील 400 रेल्वेस्थानकांवर 2016 पर्यंत मोफत वायफाय सुविधा सुरु करण्यात येणार आहे. जगप्रसिद्ध इंटरनेट सर्च इंजिन गूगल हा उपक्रम राबवणार आहे. या उपक्रमासाठी गूगलने भारतीय रेल्वेची मदत घेतली आहे. 🔶 राज्यातल्या १६ नोंदणीकृत पक्षांनी या वर्षी आयकर विवरण पत्र न भरल्याने त्या पक्षांची मान्यता रद्द करण्यात येऊ शकते.रिपब्लिकन पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, लोकभारती, रिपब्लिकन सेना यासह १२ अन्य पक्षांवर करवाई होणार आहे. 🔶 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौर्याचं शिवसेनेने कौतुक केलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'तून मोदींवर स्तुतीसुमने उधळली आहेत. 🔶 माजी नायब राज्यपाल आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रा. राम कापसे यांचे वयाच्या 82 वर्षी दिर्घ आजाराने निधन झाले. आज मंगळवारी पहाटे 4 वा. कल्याण येथील राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 🔶 भारत नेपाळच्या कामकाजा मध्ये हस्तक्षेप करत असल्याने नेपाळमध्ये केबल टीव्ही ऑपरेटर्सनी भारतीय चॅनल्स अनिश्चित काळासाठी ब्लॅक आउट करण्याचा निर्णय घेतला आहे. 🔶 चीनमधील स्मार्टफोन बनवणारी कंपनी उमीने (Umi) एक नवा स्मार्टफोन 'उमी फेअर' लॉन्च केला असून या हँडसेटची किंमत 99 डॉलर म्हणजे 6 हजार 500 रुपये आहे. 🔶 'फ्लिपकार्ट'चा बिलियन सेल दि. १३ ते १७ ऑक्टोबर पर्यंत असणार आहे.या सेल मध्ये ७०हून अधिक उत्पादन, खास ऑफर्स आणि डिस्काऊंची घोषणा केली आहे. 🔶 मुंबईत ४ ऑक्टोबर रोजी होणार बीसीसीआयची सर्वसाधारण सभेत बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा निर्णय होणार आहे. 🔶 अभिनेत्री स्मिता तांबे 'जीत' या आगामी मराठी सिनेमात स्मिता लावणी सादर करताना दिसणार आहे. 🔶 अमेरिकेकडून लष्करासाठी लढाऊ आणि मालवाहू हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याच्या 300 कोटी रुपयांच्या करारावर उभयपक्षाकडून स्वाक्षरी करण्यात आली. यानुसार भारत अमेरिकेकडून 22 लढाऊ तर 15 मालवाहू हेलिकॉप्टर्स खरेदी करणार आहे. 🔶 उत्तराखंडमधल्या पिठूरगड जिल्ह्यामध्ये ४.८ रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला आहे. 🔶 मुंबईमधील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवादी हल्ला होणार असल्याचा इशारा देणारा दूरध्वनी आल्यानंतर या विमानतळाची सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे. 🔶 भारत ‘अ‘ संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यामध्ये 8 गडी आणि 2 चेंडू राखून विजय मिळविला. दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 189 धावा केल्या, तर भारत ‘अ‘ संघाने हे आव्हान 19.4 षटकांत पूर्ण केले. 🔶 नाशिक - झोन १ च्या डीसीपी म्हणून एन. अंबिका यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 🔶 नाशिक - १०८ न. च्या जीवनदायीनी रुग्णवाहिकेचा खासगी रुग्णालयांकरिता सर्रास वापर होत असून नागरिकांकडून पैसेही उकळले जात आहे. जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या बैठकीत या प्रकरणाची सखोल तपासणीची मागणी करण्यात आली आहे. 🔶 नाशिक - येथील जिल्हा रुग्णालय कर्मचारी पतसंस्था संचालक मंडळाची निवडणूक बुधवार दि. ३० सप्टेंबर रोजी होणार असून जनलक्ष्मी बँक गडकरी चौक येथे मतदान होणार आहे. |
More details
हिंदीमे http://sainikdrpanhindi.blogspot.in/In English http://sainikdarpan.blogspot.in
आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा