पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९६५ मधील युद्धातील जवानांना आज मंगळवारी अमर ज्योती येथे श्रद्धांजली अर्पण केली. १९६५ ला पन्नास वर्षे पूर्ण झाल्या निमित्त शौर्यांजली नावाचे प्रदर्शन लष्करातर्फे आयोजित करण्यात आले होते. या आधी पंतप्रधान मोदींनी 'मन की बात' कार्यक्रमातून शौर्यांजली प्रदर्शनाची माहिती सांगितली होती.
नेपाळमध्ये भूकंपाचे सौम्यधक्के बसले असून ४.५ रिश्टर स्केल इतकी तीव्रता नोंदली गेली आहे.
लोकप्रिय सर्च इंजिन गूगलने भारतात ऑनलाईन आयटी कोर्स सुरु केला आहे. या अंतर्गत गूगलकडून मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम आणि अँड्रॉईड अॅप तयार करण्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअर विकसित करण्याची तांत्रिक माहिती शिकवली जाणार आहे.
कॉल ड्रॉपच्या बडग्यातून वाचण्यासाठी एअरटेल कंपनीने देशातील सर्वच प्रीपेड ग्राहकांना प्रति सेकंद बिल योजनेत स्थलांतरित केले आहे. त्यामुळे ग्राहकांना जितके बोलाल, त्याचेच पैसे भरावे लागतील. देशातील कोणत्याही नेटवर्कला फोन करताना ही सुविधा मिळेल.
कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप असलेले आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारती यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला आहे.
चंदिगडमधील पार्कमध्ये सोमवारी रात्री अकराच्या सुमारास सेक्टर 27 मधील पार्कमध्ये राष्ट्रीय नेमबाज सिप्पी सिद्धू याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. चौकशीनंतर हा मृतदेह सिद्धूचा असल्याचे स्पष्ट झाले. सिद्धूच्या हत्येमागचे कारण मात्र समजू शकलेले नाही.
अमेरिकेने सीरियातील निर्वासितांसह 2016 मध्ये 85 हजार तर 2017 मध्ये सुमारे 1 लाख निर्वासितांना आश्रय देण्याचा निर्णय घेतला आहे, याबाबतीत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी सांगितले.
जगमोहन दालमिया यांच्या निधानमुळे रिक्त झालेल्या बीसीसीआयच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची निवड होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
LG कंपनीने आपला मिड-रेंज स्मार्टफोन 'LGक्लास' लाँच केला आहे. हा फोन गोल्ड, सिल्वर आणि ब्ल्यू ब्लॅक कलर वेरिएंटमध्येही उपलब्ध असणार असून त्याची किंमत जवळपास रु. 22,500 आहे. तर विक्री सोमवार पासून सुरु होणार आहे.
आतंरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या सामनाधिकारीपदी वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रिची रिचर्ड्सन यांची नियुक्त करण्यात आली आहे. रिचर्ड्सन यांच्या नियुक्तीवर आयसीसीने शिक्कामोर्तब केले आहे.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर १.७ करोड करोडचा आकडा पार केला असून अमिताभ यांनी यावेळी त्यांच्या प्रशंसकाचे आणि त्यांना ट्विटरवर अपशब्द वापरणार्यांचेही धन्यवाद केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा