|
1. येत्या 2 दिवसात मान्सून देशासह राज्यातून काढता पाय घेणार असा
अंदाज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीने वर्तवला असून त्यामुळे
शेतकर्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
2. "संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीची विश्वासार्हता
टिकवायची असेल, तर त्याच्या रचनेत सुधारणा करणे आवश्यक आहे, ” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या
शाश्वत विकास परिषदेमध्ये ते बोलत होते.
3. सौदी अरेबियातील मक्का हज यात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यू
झालेल्या 717 जणांमध्ये 18 भारतीय नागरिकांचा समावेश आहे, अशी माहिती
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी आज शनिवारी दिली.
4. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी हिमाचल प्रदेश मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या
निवासस्थानी व कार्यालयांवर आज शनिवारी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकार्यांनी
छापे घातले, तसेच त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
5. कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी आरोपी समीर गायकवाडच्या पोलीस कोठडीत २
दिवसांची(२८ सप्टेंबरपर्यंत) वाढ करण्यात आली आहे.
6. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र
मोदींनी ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या.
7. नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीवेळी किमान आधारभूत किंमतीचा फॉर्म्युला
सांगितला होता, तो तातडीने लागू करुन शेतकर्यांच्या
आत्महत्या थांबवा, अशी मागणी शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीसांना पत्र लिहून केली आहे.
8. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून अनंत चतुर्दशीनिमित्त (गणेश विसर्जन)
उद्या रविवारी मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वे मार्गावर
होणारा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे.
9. चिनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी 'विवो' ने 'वो वाय २७ एल' स्मार्टफोन
भारतात नुकताच सादर केला आहे. फोर जी, एलटीआय, ब्ल्यू टूथ, वायफाय, जीपीएसला
सपोर्ट करणार्या या फोनची किंमत १२९९० रूपये असल्याचे समजते.
10. १९८९ साली हिट ठरलेल्या 'राम लखन' चित्रपटाचा रिमेक करण
जोहर बनवणार असून यात अभिनेत्री अथिया शेट्टीची महत्वाची भूमिका करणार असल्याचे
समजते, पण याबाबत अथियाने मात्र मौन बाळगले आहे.
इंडियन आर्मी
मध्ये 'टेक्निकल ग्रॅज्युअट
कोर्स' साठी ७० जागा भरणे
आहेत. बीटेक / एमएससी धारक दि. २७ ऑक्टोबर २०१५ पर्यंत अर्ज करू शकतात. अधिक
माहितीसाठी भेट द्या http://goo.gl/HaJmk6
HCL बेंगळुरू,
हैद्राबाद, दिल्लीसाठी ’सॉफ्टवेअर डेव्हलपर’पदाच्या 20 जागा भरणे आहे. बी.टेक, बी.ई, कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज करु शकतात.(पगार-2,00,000 ते 3,00,000 वार्षिक). आधिक माहितीसाठी भेट द्या http://goo.gl/tOcraC
'Film and Television Institute of India (FTII)'पुणेसाठी 'Lower Division Clerk' पदाच्या 11 जागा भरणे आहेत. उच्चपदस्थ दि. 28 ऑक्टोंबर 2015 पर्यंत अर्ज करु शकतात.
'Film and Television Institute of India (FTII)'पुणेसाठी 'Production Assistant &
More Vacancies'पदाच्या 60 जागा भरणे आहेत. कोणत्याही शाखेतील पदवीधर
किंवा उच्चपदस्थ दि. 17 ऑक्टोंबर 2015 पर्यंत अर्ज करु शकतात.
'Wipro Technologies Ltd'पुणे, चेन्नई,
हैद्राबादसाठी 'Service Desk
(Technical)' पदाच्या जागा भरणे
आहेत. डिप्लोमा, बी.ई, बी.टेक, बी.बी.एम,एम.बी.ए,
पदवीधर, उच्चपदस्थ अर्ज करु शकतात. आधिक माहितीसाठी भेट द्या http://goo.gl/kB3wbm
'KPMG'मुंबई, नोएडा, पुणेसाठी 'Accounts Executive/Accountant' जागा भरणे आहेत. कोणत्याही शाखेतील पदवीधर,
सी.ए अर्ज करु शकतात. आधिक माहितीसाठी भेट
द्या http://goo.gl/M5YT7p
'Amazon'साठी 'Web
Development Engineer'पदाच्याजागाभरणेआहेत.
बी.ई, बी.टेक धारक अर्ज करू
शकतात. आधिक माहितीसाठी भेट द्या http://goo.gl/sQm2UA
'Jitsinfotech' पुणेसाठी 'management
executive' पदाची जागा भरणे आहे.
इच्छुक jitsinfotech@gmail.com या मेल आयडीवर
आपला रिझ्यूम पाठवू शकतात किंवा आधिक माहितीसाठी 8983056789 या क्रमांकावर संपर्क साधावा.
|
More details
In English http://sainikdarpan.blogspot.in
आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा