भारतीय जनतेनी जी जबाबदारी दिली आहे, ती पार पाडणार आहे. त्यासाठी शरीराच्या कणा-कणातून परिश्रम करणार आहे, देशासाठीच जगणार आणि देशासाठीच मरणार, असा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत केला आहे. केंद्राप्रमाणे राज्य सरकारनेही 2022 पर्यंत शहरी भागात सर्वांना परवडणारे घर देण्याच्या योजनेचा आराखडा तयार केला असून लवकरच तो मंजुरीसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाईल, अशी माहिती नगरविकास विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली. गोविंद पानसरे यांच्या हत्येतील संशयित आरोपी समीर गायकवाड याच्या ब्रेन मॅपिंगची परवानगी द्या अशी विनंती कोल्हापूर पोलीसांनी न्यायालयाकडे केली असून या अर्जावर उद्या मंगळवारी सुनावणी होणार आहे. कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिका, या दोन्ही महापालिकांसाठी रविवारी 1 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून सोमवारी 2 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केली. धार्मिक तणाव निर्माण होऊ नये यासाठी 3 दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये बंद ठेवण्यात आलेली मोबाईल इंटरनेट सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मुंबईतल्या सुप्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दरबारात तरुणीला पोलिसांकडून झालेल्या मारहाणीची थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. कोर्ट चित्रपटाचे दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांना वॉशिंग्टन येथे पार पडलेल्या दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवात सर्वोत्तम दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. मंगळ ग्रहावर पाणी असल्याचे स्पष्ट संकेत मिळाल्याचा दावा अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासाने केला आहे. वैज्ञानिकांनी सांगितले की, उन्हाळ्यात तेथे खाऱ्या पाण्याचे प्रवाह वाहतात. अंकेक्षण अहवाल आणि आयकर विवरण सादर करण्यास मुदतवाढ देणारा कोणताही आदेश आयकर खात्याने जारी केलेला नाही. याबाबत २६ सप्टेंबर रोजीचा आदेशच मूळात बनावट आहे, असे स्पष्टीकरण आयकर खात्याने दिले आहे. येत्या वर्षभरात दीड लाख किलोमीटरचा ग्रीन हायवे बांधण्याचा निर्धार केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. तसेच आज मंगळवारी ते नव्या हायवे पॉलिसीची घोषणा करणार आहेत. सौदी अरेबियातील मीना येथे दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भारतीय यात्रेकरूंची संख्या ४५ वर पोहचली आहे. त्यात महाराष्ट्रातील दोघांचा(निसार अहमद शेख व सलीम शेख) समावेश असून ते मुंबईतील आहेत. राज्य सरकारने महानंदचे(सहकारी दूध महासंघ र्मयादित, मुंबई) संचालक मंडळच बरखास्त केले. तसेच याच संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हॅकर म्हणून प्रसिद्ध असलेला अंकित फाडिया याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्प ‘डिजिटल इंडियाचा ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. आपल्या कुत्र्यांचे फोटो चांगले फोटो काढता यावे यासाठी ‘किक स्टार्टर’ या कंपनीने ‘पूछसेल्फी’ नावाचे अनोखे उपकरण बाजारात आणले आहे. ‘पूछसेल्फी’ म्हणजे एक सेल्फीस्टिक आहे. दिनविशेष - आज आंतरराष्ट्रीय कॉफी दिन. १९१६ - जॉन डी. रॉकफेलर हा १ अब्ज डॉलर संपत्ती असलेला पहिला मनुष्य ठरला. नाशिक - जिल्ह्यातील नवीन 6 नगरपंचायती आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला असून, 1 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे, तर 2 नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल. नाशिक - जुन्या नाशकातील फैज र्मकन्टाईल सहकारी बॅँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची आज मंगळवारी मतदानाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. नाशिक - भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांबाबतची प्रतीक्षा शहराध्यक्ष जिल्हाध्यक्षांसह पदाधिकारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने संपुष्टात आली आहे. |
हिंदीमे http://sainikdrpanhindi.blogspot.in/
In English http://sainikdarpan.blogspot.in
आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा