नवी दिल्ली, 2-12-2015 भारत आणि मालदीव यांच्यात क्रीडा आणि युवक कल्याण क्षेत्रासंबंधीच्या ऑक्टोबर 2015 मध्ये झालेल्या सामंजस्य करारावर स्वाक्ष-या करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. द्विपक्षीय संबंध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताच्या खेळाडूंची कामगिरी सुधरवण्यासाठी आणि दोन देशांमधील संबंध बळकट करण्यासाठी या द्विपक्षीय विनिमय कार्यक्रमांतर्गत क्रीडा विज्ञान, क्रीडा औषध, प्रशिक्षण तंत्र, युवक मेळावे आणि शिबिरांमध्ये सहभाग इत्यादी विषयासंबंधी ज्ञान आणि कौशल्य विस्तार मध्ये सहकार्य मिळणार आहे.
[PIB]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा