नवी दिल्ली, 2-12-2015 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, भारत व जर्मनी यांदरम्यानच्या एका सामंजस्य कराराला मंजुरी देण्यात आली. हा करार भांडवली मालमत्ता क्षेत्रात तसेच युरोपमध्ये उपयोजित औद्योगिक संशोधन करणाऱ्या 65 संस्थांचे प्रतिनिधित्व करणारी जर्मन संस्था Fraunhofer Gesellschaft (Fraunhofer) “मेक इन इंडिया” मोहिमेची अमलबजावणी करण्याबाबत झाला आहे. अवजड उद्योग विभाग व Fraunhofer यांदरम्यानच्या या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यामागचा उद्देश 12 व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत तंत्रज्ञानातील अंतर ओळखणे व ते मिटवणे, त्यासाठी Fraunhoferचे तज्ज्ञ, तसेच क्षमतांचा सहज संपूर्ण वापर यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना तसेच भांडवली मालमत्ता क्षेत्रातील विभागांना व्यासपीठ मिळवून देणे हा आहे. भारत सरकारचे विविध भागीदार, उद्योग व उपयोजित औद्योगिक संशोधन तसेच तंत्रज्ञान विकास यातील वाढत्या सहकार्य व सहभागातील शैक्षणिक संस्था यांसोबत निर्मिती क्षेत्रातील प्रकल्प ठरविण्याच्या कामात Fraunhofer "तंत्रज्ञान स्रोत भागीदार" असेल
[PIB]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा