नवी दिल्ली, (3-12-2015) रक्कम काढण्यासाठी ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सुलभ अर्ज काढला आहे. हा अर्ज केवळ एक पानाचा असून याअंतर्गत 5 ते 6 प्रकारची माहिती केवळ द्यावी लागणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी अर्ज 11 (नवा) भरला आहे आणि मालकांनी केवायसीप्रमाणे आधार व बँकेची माहिती दिली असेल, डिजिटल सहीद्वारे ती यूएएन पोर्टलवर दिली असेल त्या कर्मचाऱ्यांना हा अर्ज लागू आहे. या कर्मचाऱ्यांना पीएफ दाव्यांसाठी मालकाच्या साक्षांकनाची गरज नाही.
(PIB श्रम व रोजगार)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा