नवी दिल्ली, 2-12-2015 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, भारत व जर्मनी यांदरम्यानच्या एका सामंजस्य कराराला मंजुरी देण्यात आली. या करारावर ऑक्टोबर 2015 मध्ये स्वाक्षरी करण्यात आली होती. तांत्रिक तसेच आर्थिक सहकार्यातून भारतामध्ये सौर उर्जेचा वापर वाढवून सौर उर्जा क्षेत्रातील द्विपक्षीय विकास सहकार्य वाढविण्यासाठी हा करार करण्यात आला आहे.दोन्ही देशातील द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यासाठी हा सामंजस्य करार मदत करेल. या करारांतर्गत, जर्मनी Kreditanstalt fur Wiederaufbau (KfW) च्या माध्यमातून पुढील पाच वर्षात एक अब्ज युरो रुपयांचे कर्ज सवलतीच्या दरात उपलब्ध करून देईल. KfWचा निधी सहभागी बँकांच्या मार्फत शेवटच्या वापरकर्त्याला कर्ज देण्यासाठी देखील वापरला जाईल. करारात समाविष्ट गोष्टी:
१. सौर छत तयार करण्यासाठी सहकार्य
२. सौर उद्यानांचा किंवा सौर क्षेत्रांचा विकास (शक्य झाल्यास भारत-जर्मन आर्थिक सहकार्याअंतर्गत KfW पुरस्कृत हरित उर्जा मार्ग)
३. स्वच्छ व अक्षय ऊर्जा वापर प्रक्रिया सुधारण्यासाठी सौर ऑफ-ग्रीडचा अनुप्रयोग
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा