नवी दिल्ली, (2-12-2015) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गोवा, जम्मू, केरळ आणि कर्नाटकमध्ये 6 नव्या आयआयटी अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्था स्थापन करायला मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाने सोसायटी नोंदणी अधिनियम 1860 अंतर्गत नोंदणीकृत सोसायटी म्हणून या नव्या सहा संस्थांना मंजुरी दिली आहे जेणेकरून या संस्थांचा समावेश तंत्रज्ञान संस्था अधिनियम 1961 मध्ये करण्यासाठी कायद्यात सुधारणा होईपर्यंत त्यांना वैधानिक दर्जा मिळू शकेल. प्रत्येक आयआयटीमध्ये पहिल्या वर्षी 180 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकेल. दुसऱ्या वर्षी ही संख्या 450 आणि तिसऱ्या वर्षी 928 होईल.
[PIB]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा