नवी दिल्ली -सध्या 12 लाख कोटी रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या असल्याची माहिती केंद्रीय अर्थ अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत दिली आहे.
नवीन नोटा व्यवहारात आणण्याच्या योजनेत रुपये 500 आणि 2,000 च्या नोटा पद्धतशीरपणे चलनात आणल्या जात आहेत. 24 फेब्रुवारी 2017 रोजी भारतीय रिझर्व बॅंकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 11,64,100 कोटी रुपये किमतीच्या नवीन नोटा चलनात आलेल्या होत्या.
त्यानंतर आता पंधरवडा उलटून गेल्याने हा आकडा आता 12 लाख कोटीपेक्षा अधिक झाला असेल असे जेटली यांनी सांगितले.
मात्र जमा झालेल्या जुन्या नोटांचा अचूक तपशील या वेळी देता येणार नाही, असे जेटली यांनी स्पष्ट केले आहे. जमा झालेली प्रत्येक जुनी नोट ही खरी आहे, की बनावट हे तपासून पाहावे लागते, अस्सल व बनावट नोटा वेगळ्या कराव्या लागतात. हे काम फार वेळ खाणारे आहे आणि ही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय जमा झालेल्या जुन्या नोटांचा निश्चित आकडा जाहीर करता येणार नाही. भारतीय रिझर्व बॅंकेचे हे काम पूर्ण होताच सदनात त्याची आकडेवारी सादर करण्यात येईल, असे जेटली यांनी लोकसभेत सांगितले.
रु. 500 च्या एका नोटॅचा निर्मितीखर्च 2.87 ते 3.09 रु; 1,000 आणि 2,000 रु. च्या एका नोटेचा निर्मिती खर्च 3.34 तेऱ् 3.77 रु. असल्याची माहिती अरुण जेटली यांनी दिली. मात्र हा खर्च दरवर्षी बदलतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा