सातारा, दि. 11 (प्रतिनिधी) : व्यावसायिकांनी ग्राहकांना दर्जात्मक सुविधा पुरविल्या पाहिजेत. तो त्यांचा अधिकार आहे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी केले.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक आज घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस पोलास निराक्षक ए. डी. फडतरे, सदस्य केदार नाईक, रंगराव जाधव, सुनीता राजेघाडगे, डॉ. उर्मिला येळगावकर, प्रल्हाद कदम, दिलीप पाटील उपस्थित होते.
बारवे म्हणाल्या, जिल्ह्यातील पेट्रोलपंपांची तपासणी केली जाईल. ग्राहकांना दर्जात्मक, गुणात्मक सुविधा देण्याबाबत पेट्रोलपंप धारक असोसिएशनच्या माध्यमातून शिबीर घेण्यात येईल. या माध्यमातून भेसळयुक्त पेट्रोल कसे तपासता येईल याबाबत प्रशिक्षण दिले जाईल.
ग्राहक हा राजा आहे, त्याला त्याचे अधिकार मिळाले पाहिजेत, याची नोंद सर्वांनी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीत ग्राहकांच्या विविध तक्रारींबाबत चर्चा करण्यात आली. प्रामुख्याने विज वितरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एसटी तसेच सातारा नगर परिषद, विसावा नाका येथे पोलीस चौकी उभारणे, वाहतूक आराखडा आदींचा समावेश होता. बैठकीला संबंधित अधिकारी अनुपस्थित राहतात.
यावरही चर्चा करण्यात आली. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातील महिला अधिकारी, कर्मचारी तसेच परिषदेच्या महिला सदस्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
Dailyhunt
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा