हुतात्मा दिन : वंदे मातरम संघटनेच्या वतीने सामाजिक उपक्रम
दापोडी, दि. 24 (वार्ताहर)- देशाकरिता आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या 86 व्या स्मृतिदिनानिमित्त वंदेमातरम संघटनेने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 114 रक्तदात्यांनी रक्तदान करुण शहिदांना आदरांजली वाहिली.
पूना ब्लड बॅंकेच्या सहकार्याने आगरवाल धर्मशाळा येथे आयोजित शिबिराचे उद्घाटन आगरवाल समाज खडकी विभागाचे अध्यक्ष दिपक आगरवाल व वंदेमातरम संघटनेचे प्रांत अध्यक्ष विकास हांडे यांच्या हस्ते झाले. यावेळी संघटनेचे प्रांत कार्याध्यक्ष राजेश शर्मा, खडकी विभाग अध्यक्ष शिरीष रोच, खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष दत्ता सावंत, फ्रान्सिस डेव्हीड, रवींद्र बोजवारे आदी उपस्थित होते.
वंदे मातरम संघटनेच्या वतीने मागील 26 वर्षांपासून हा समाजाभिमुख उपक्रम राबवला जात आहे. शहीद दिनानिमित्त रक्तदान शिबिरात शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुण आदरांजली वाहण्यात आली. सकाळी दहापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत 114 दात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिरात सहभाग घेणाऱ्या रक्तदात्याचा या वेळी संघटनेच्या वतीने स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून अशा या सामाजिक उपक्रमास सर्वांनी हातभार लावून सामाजिक कर्तव्य व बांधिलकी जपली पाहिजे, असे संघटनेचे प्रांत अध्यक्ष विकास हांडे व प्रांत कार्याध्यक्ष राजेश शर्मा या वेळी म्हणाले.
पूना ब्लड बॅंकेचे मिलिंद भुजबळ व त्यांच्या सहकाऱ्यांचे या वेळी मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल सोनवणे, आनंद रेड्डी, राजेश राजपूत, सेल्वराज ऍन्थोनी. राजेश काकडे, सतीश बटेल्लु, राजेश बागनाईक, विकी सारसर व योगेश आडबल यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा