नवी दिल्ली, 16-3-2017 : सरकारी तज्ञ गटाचा अहवाल आणि परिक्षणावर आधारीत समानसंधी आयोग विधेयकाचा मसुदा आंतरमंत्रालयीन सल्लामसलतीसाठी जारी करण्यात आला आहे. सच्चर समितीच्या शिफारशींना अनुसरुन दुर्बल घटकांच्या तक्रारींना न्याय मिळवून देण्यासाठी समानसंधी आयोगाची रचना आणि कार्ये निश्चित करण्याच्या दृष्टीने सरकारने एका तज्ञ गटाची स्थापना केली होती. त्या तज्ञ गटाने या मसुद्यासंदर्भातील अहवाल तयार केला.
अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी पंतप्रधानांच्या 15 कलमी कार्यक्रमांतर्गत 11 मंत्रालये-विभागांच्या 24 योजना-कार्यक्रम अल्पसंख्याक विभागातर्फे राबवले जातात. मंत्रालयाच्या www.minorityaffairs.gov.in या संकेतस्थळावर याचे तपशील उपलब्ध आहेत.
अल्पसंख्याक राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
PIB
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा