इराणच्या आग्नेयेला असलेल्या चाबाहर बंदराच्या विकासाचा पहिला टप्पा 2018 साली पूर्ण करू, असा विश्वास केंद्रीय जहाज, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.
"आम्ही पहिल्या टप्प्याचे काम 2018 साली पूर्ण करू.यासाठीचा निधी लवकरच देऊ. या कामाच्या निविदा काढलेल्या आहेत," गडकरी म्हणाले.
चाबाहर बंदरातील टर्मिनल ट्रॅक्टर ट्रेलर्स, फॉर्कलिफ्ट्स, रीच स्टॅकर्स, एम्प्टी कन्टेनर हँडलर्स आणि यार्ड क्रेन्सच्या पुरवठा व क्रियान्वयनासाठी कांडला बंदराने निविदा जारी केल्या आहेत, असे गडकरी यांनी पुढे सांगितले.
इराणसोबत व्यापार व गुंतवणूक वाढविण्याच्या दृष्टीने चाबाहर बंदराच्या विकासाला मंत्रिमंडळाने गेल्या वर्षी मंजुरी दिली होती.
चाबाहर बंदर विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जहाज मंत्रालयाने इराणमध्ये स्वतंत्र कंपनी स्थापित करावी, यासाठीही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती.
चाबाहर बंदर हे पर्शियन खाडीमध्ये इराणच्या दक्षिण किनारपट्टीवर सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात आहे. पाकिस्तानला टाळून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरून या बंदराला सुलभरीत्या जाता येते.
Dailyhunt
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा