नवी दिल्ली - माजी सैनिकांच्या वन रॅंक वन पेन्शनबाबतचे आंदोलन जोर धरत असतानाच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी निवृत्ती वेतनातील वार्षिक सुधारणांना स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. मात्र, कमी वयामध्ये निवृत्त होणाऱ्या सैनिकांच्या भल्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत जेटली म्हणाले, ""निवृत्ती वेतनामध्ये दरवर्षी सुधारणा करणे जगातील कोणत्याही सरकारला शक्य नाही. जरी सरकारने माजी सैनिकांना वन रॅंक वन पेन्शनचे आश्वासन दिले असले, तरी "आकड्यां‘चा विचार करता ते केवळ अशक्य आहे.‘‘ वन रॅंक वन पेन्शनबाबत वाजवी निकष असावेत, असेही जेटली यांनी या वेळी सांगितले. आर्थिक सुधारणा या काटेकोर अंमलबजावणीने कराव्यात यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
माझे काम गृहिणीप्रमाणे गृहिणीला घरी खर्च करताना प्रत्येक रुपयाचे नियोजन, तसेच काटकसर करीत बचतीने कुटुंबाची उन्नती साधायची असते; अगदी असेच काम माझ्या वाट्याला आले आहे. त्यामुळे देशाला आर्थिक शिस्त लावण्याकरिता एका क्षमतेपेक्षा जास्तीचा विचार करणे योग्य नाही, असेही जेटली म्हणाले.
[पीटीआय]
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारात निवृत्त जवानांच्या वन रॅंक, वन पेन्शनबाबत दिलेली आश्वासने सव्वा वर्षे होत आली, तरी तशीच अधांतरी आहेत. फक्त मते मिळविण्यासाठी त्यांनी प्रचारात आश्वासने दिली होती का हा प्रश्न निर्माण झाला असून, मोदी सरकारकडून देशाच्या जनतेचा, शेतकऱ्यांचा, निवृत्त जवानांचा भ्रमनिरास झाला आहे, असे स्पष्ट मत समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज व्यक्त केले.
‘वन रॅंक वन पेन्शन‘साठी 2 ऑक्टोबरपासून उपोषणाचा इशारा
नवी दिल्ली- ‘वन रँक, वन पेन्शन‘च्या मागणीसाठी देशभरात निदर्शने करणाऱ्या लष्करातील माजी अधिकाऱ्यांसाठी लवकरच एक ‘गुड न्यूज‘ मिळेल, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.
लुधियाना - "वन रॅंक, वन पेन्शन‘च्या मागणीसाठी देशभरातील निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांच्या संघटनांनी देश पातळीवर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान लुधियानामधील "एक्स-सर्व्हिसमॅन थिंकर्स फोरम‘ या संघटनेने या आंदोलनात सहभाग घेणार नसल्याचे जाहीर केले आहे.