राळेगणसिद्धी - माजी सैनिकांना "वन रॅंक वन पेन्शन‘ लागू करणे आणि भूसंपादन विधेयक मागे घ्यावे, या मागण्यांबाबत जनजागृतीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची पहिली सभा ऑगस्ट क्रांतिदिनी रविवारी (ता.9) हरियानातील रोहतक येथे होणार आहे.
हजारे दिल्लीतील रामलीला मैदानावर दोन ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण व आंदोलन करणार आहेत. त्यापूर्वी जनजागृतीसाठी देशभर दौरा करणार आहेत. त्याची सुरवात रोहतकपासून होणार असल्याची माहिती त्यांचे सहायक दत्ता आवारी यांनी दिली. या दौऱ्यासाठी हजारे उद्या (शनिवारी) येथून रवाना होणार आहेत. हजारे उद्या राळेगणसिद्धी येथून पुण्याला जातील. तेथून रविवारी ते रोहतकला जातील. तेथे जाहीर सभेनंतर 10 ऑगस्टला ते पुन्हा राळेगणसिद्धीला येणार आहेत. त्यानंतर 16 ऑगस्ट रोजी राजस्थानातील सिकर व 17 ऑगस्टला आग्रा (उत्तर प्रदेश) येथे त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. उत्तर भारतातील या सभांनंतर हजारे दक्षिणेतील काही राज्यांमध्ये जनजागृती दौरा करणार असल्याचे आवारी यांनी सांगितले.
[सकाळ वृत्तसेवा]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा