फौजी म्हणजे फीरता वारा
फौजी म्हणजे वाहता झरा।
फौजी म्हणजे रात्री एकटाच
अंधारात चमकनारा तारा।।
फौजी अंगावरील शहारा
फौजी रात्रीचा पहारा।
फक्त फौजीच आहे
सुख अन दु:खाचा सहारा।।
फौजी जन हिताचा नारा
फौजी आहे अनमोल हिरा।
फौजी म्हणजे गुन्हेगारांचा
एक बापच आहे दुसरा।।
फौजी म्हणजे धाक दरारा
त्याचाच आहे वचक सारा।
काहीही करु शकतो पोलीस
जर असेल तो नितीनं खरा।।
फौजीवर प्रेम करुन पहा
एकदा तरी फौजीवर
प्रेम करुन पहा।
मनापासुन त्याच्यावर
तुम्ही मरुन पहा।।
जीवाला जीव देईल तुमच्या
त्याचा हात धरुन पहा।
त्याचं नाव काळजावर
एकदातरी कोरुन पहा।।
कसा जगतो एकटा
तुम्ही चोरुन पहा।
प्रेमाचे दोन शब्द
त्याच्याशी बोलून पहा।।
त्याच्या सारख्या यातना
एकदा तरी सोसुन पहा।
अनोळखी जगात तुम्ही
एकटे बसुन पहा।।
दु:ख असुन मनात
तुम्ही हसुन पहा।
त्याच्या सारखे तुम्ही
ऊन्हात ऊभे राहुन पहा।।
एकदा तरी फौजीवर
प्रेम करुन पहा।
तो रोज मरतो तुम्ही
एकदातरी मरुन पहा।।
लेकरासाठी झुरतो तो
तसं भेटीसाठी झुरुन पहा।
तुम्हाला काय वाटतं तुम्ही
फौजीच्या यातना सोसुन पहा।।
एकदा तरी फौजीवर
तुम्ही प्रेम करुन पहा………









हैदराबाद - अग्नि-4 या सुमारे 4 हजार किमी पल्ला असलेल्या अण्वस्त्रवाहु क्षेपणास्त्राची ओडिशा तटाजवळील व्हीलर बेटावरुन आज (सोमवार) यशस्वी चाचणी करण्यात आली. या क्षेपणास्त्रावरुन सुमारे एक टन वजनाची स्फोटके डागली जाऊ शकतात.
तंत्रज्ञान जसजसे पुढे जात आहे, तसतशी नवी आव्हानेही समोर येत आहेत. भारतासारख्या विकसनशील देशांसह विकसित देशांनाही मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये स्वस्त डिव्हाइसेसच्या उपलब्धतेसह जगाशी कनेक्ट करणारे प्रभावी नेटवर्क ही प्रमुख आव्हाने आहेत. स्मार्टफोन्ससारखी डिव्हाइसेस स्वस्तात उपलब्ध होत आहेत, तर नेटवर्कवरील अडचणींवरही जगभर उपाय शोधले जात आहेत. अलीकडेच ‘फेसबुक’नेही या समस्येवर नव्या उपाययोजना करत असल्याचे जाहीर केले आहे. त्यामध्ये ‘इंटरनेट डॉट ओआरजी’ हा केवळ विनामूल्य सेवा देण्याचा उपक्रम नसून, कनेक्ट करण्याची ती व्यापक मोहीम असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच त्यासाठी काम सुरू आहे. नेटवर्क समस्येचा विचार करताना भारतासारख्या विकसनशील आणि मोठी व्यावसायिक संधी असलेल्या देशांना ‘फेसबुक’सारख्या प्रमुख कंपन्यांनी केंद्रस्थानी ठेवले आहे. नेटवर्कची सुविधा देण्यासाठी सॅटेलाईट, ड्रोन आणि ‘वाय-फाय’ सुविधेचाही वापर करण्याची या कंपन्यांची योजना आहे. उपग्रहाद्वारे कनेक्टिव्हिटी देण्यासाठी ‘बोइंग ७३७’च्या पंखांप्रमाणे रचना असलेले, तसेच सौरऊर्जेवर चालणारे तंत्रज्ञान ‘फेसबुक’ विकसित करत आहे. पुढील वर्षापर्यंत हे काम पूर्ण होईल. याशिवाय ड्रोनद्वारेही कनेक्टिव्हिटी देण्यात येणार आहे. तसेच यूझर्सना आकर्षित करण्यासाठी अल्पदरात ‘वाय-फाय’ सुविधेचाही प्रभावी वापर करण्याची योजना आहे. अशाच काही योजना ‘गुगल’ही राबविणार आहे. तज्ज्ञांच्या मते येत्या तीन-चार वर्षांत सर्व जग विविध माध्यमांतून कनेक्ट होण्याची शक्यता आहे. मात्र कनेक्टिव्हिटीसाठी उपग्रह, ड्रोन आणि ‘वाय-फाय’शिवाय अन्य पर्यायांचा जगभर शोध घेण्यात येत आहे. त्यातून प्रकाशातून डेटा ट्रान्स्फर करणाऱ्या ‘लाय-फाय’चा शोध लागला आहे.
आर्थिक प्रगतीसाठी उपलब्ध संधीचा लाभ उठवायचा असेल, तर औद्योगिक क्षेत्रात मोठी क्रांती आवश्यक आहे. तेव्हा औद्योगिक वाढीचा दर वाढविण्यासाठी करप्रणालीत दूरगामी सुधारणा कराव्या लागतील.