· वस्तू व सेवा कर (जीएसटी) विधेयक पुढील वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनातच पारित होईल - पंतप्रधान नरेंद्र मोदी
· चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 7.5% राहील - आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेने (आयएमएफ) व्यक्त केला अंदाज
· २-जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायालयाने १५ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली
· लवासा हे अतिशय सुंदर पण बेकायदेशीर शहर, लवासा विरोधातील लढा आणखी तीव्र करणार - सामाजिक कार्यकर्त्या, मेधा पाटकर
· छत्तीसगड मधील दर्भात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, १ नक्षलवादी ठार
· प्रवासी भारतीय दिनाच्या आयोजनात महत्त्वपूर्ण बदल, आता ‘भारत को जानो’ स्पर्धेचे आयोजन - परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज
· शेअरबाजार तेजीत, सेन्सेक्स १०२.९७ अंकांनी वधारला असुन २७,०३५.८५ वर बंद
· देशातील जातीय सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करणार्यांना कडक शासन - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
· दादरी प्रकरण, देशाची विविधता, सहिष्णुता आणि विभिन्नता या मूलभूत मूल्यांना धक्का लागू देणार नाही - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
· उत्पादनात घट झाल्याने कांदे, डाळींची आयात - माहिती अन्न, नागरी पुरवठा मंत्रालय
· रसायनशास्त्रामधील नोबेल पुरस्कार यंदा स्वीडनचे थॉमस लेदाल, अमेरिकेचे पॉल मॉड्रीच आणि आणि तुर्कीचे अझीज सँकार यांना जाहीर
· आयफोन 6S प्लसच्या भारतातील किमती उघड, आयफोन 6S बेस मॉडेल 60 हजार रु. तर आयफोन 6S प्लस 72 हजारांपासून उपलब्ध
· महाराष्ट्र विधिमंडळाचे कामकाज आता ऑनलाइन, संपूर्ण पेपरलेस कामकाज करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य
· अरुणाचल प्रदेशातील लोअर सुबानसिरी जिल्ह्यातील पेंज खोऱ्यामध्ये संशोधकांना 50 पेक्षाही अधिक फुलपाखरांच्या नव्या प्रजाती आढळल्या
· ऑलिम्पियन बॉक्सर आणि अर्जुन पुरस्कार विजेता बॉक्सर जय भगवान 1 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी निलंबित
· अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेने ५० वर्षांपूर्वी चंद्राचा पृष्ठभाग कसा होता, याचे छायाचित्र नुकतेच प्रसिद्ध केले
· दिल्ली - रेल्वे कर्मचार्यांना बोनस देण्याला कॅबिनेटची मंजुरी, १२.५ लाख कर्मचार्यांना मिळणार बोनसचा लाभ
· कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक पुढे ढकला, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी
· मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खालापूर जवळ शिवनेरी बसला अपघात;एकाचा मृत्यू, ९ जण जखमी, स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू
· नाशिक - नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड परिसरातील देवी मंदिर व सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा करणार्या मंडळांची जोरदार तयारी सुरू
· सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून प्रत्येकी 2 रुपये सुविधा कर, सप्तशृंगगड ग्रामपंचायत कळवण पंचायत समितीचा निर्णय
· नगरपंचायतीसाठी आता छापील नामांकनही ग्राह्य, अर्ज दाखल करण्याच्या वेळेतही 2 तासांनी वाढ
· गोसावी बहुउद्देशीय संस्थेमार्फत शेतकर्यांच्या अनाथ मुलांच्या संगोपनासाठी 'दान महोत्सव' सुरू, याद्वारे गावा-गावात जाऊन नागरिकांना मदतीचे आवाहन
· दिनविशेष - आज वन्य पशू दिन. ख्रिस्त पूर्व ३७६१-हिब्रू दिनदर्शिकेनुसार जगाचा पहिला दिवस. १९१९ - महात्मा गांधींनी ’नवजीवन’ हे वृत्तपत्र सुरू केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा