कर सवलतीत वाढ शक्य, मर्यादेपेक्षा जास्त रोखीच्या व्यवहारांसाठी पॅन अनिवार्य, निम्न, मध्यमवर्गीयांच्या हातात जास्त पैसा देणार - अर्थमंत्री अरुण जेटलीचे संकेत
आजपासून पुढील 5 दिवस आयकर विभागाकडून PAN कार्ड वाटप स्थगित, सॉफ्टवेअर अपग्रेडेशन करण्यासाठी घेतला निर्णय
दिलेल्या मुदतीत ज्यांनी आपला काळा पैसा जाहीर केला नाही, त्यांच्यावर आता कठोर कारवाई - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी आज आणि उद्या (दि. 5 व 6) मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता, भारतीय हवामानशास्त्र
इंद्राणी मुखर्जी शुद्धीवर, आता धोका टळला - डॉ. तात्याराव लहाने, जे जे रुग्णालयाचे डीन, इंद्राणी मुखर्जी यांचा आज जबाब घेणार- सूत्रांची माहिती
बीसीसीआयच्या इतिहासात अध्यक्षपदावर शशांक मनोहर दुस-यांदा बिनविरोध
आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा दुसरा टी-20 सामना कटक येथे सायं 7 वा.
जम्मू-काश्मीरमध्ये हंदवारा जिल्ह्यात दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत १ दहशतवादी ठार, ४ जवान शहीद
जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल 3 दिवसीय भारत दौर्यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे नमस्ते म्हणत केले स्वागत
भारत दौर्यावर आलेल्या जर्मनीच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची घेतली भेट
मुंबई - इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना आणि शाम रायच्या न्यायालयीन कोठडीत १९ ऑक्टोबरपर्यंत वाढ
सोमनाथ भारतींचा जामीन अर्ज आज सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला
दिल्ली सरकारच्या जाहिरातप्रकरणी ७ ऑक्टोबरला सुनावणी, अजय माकन यांनी दाखल केली याचिका
उत्तर प्रदेशमध्ये दलितांविरोधातील प्रकरणांवरील कारवाईसाठी वेगळी पोलिस स्थानके स्थापन करण्याचा सरकारचा निर्णय
रत्नागिरी - शहराजवळील गोळप सडा येथे शॉर्ट सर्किटमुळे एकाच वेळी ३ वाहनांनी घेतला पेट, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
व्हॉट्स अॅप सांगणार तुमचा बेस्ट फ्रेंड कोण? सोबतच आपल्या व्हॉट्स अॅप वापराबद्दलची देणार माहिती
कानपूरमध्ये भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय सामन्याचे तिकीट घेण्याची क्रिकेटप्रेमींची गर्दी, जमावावर नियंत्रणसाठी पोलिसांचा सौम्य लाठीमार
शेअर बाजार वधारला, सेन्सेक्स 564 अंकांनी वाढून 26, 785 तर निफ्टी 168 अंकांनी वाढून 8,199 अंकांवर बंद
अति दारिद्र्यातील नागरिकांची संख्या 2015 मध्ये प्रथमच जागतिक लोकसंख्येच्या 10% पेक्षा कमी - जागतिक बॅंक
केंद्र सरकारने 31 मार्च पर्यंत तूप आणि लोणीवरील आयात शुल्क 30 टक्क्यांवरुन 40 टक्के एवढे केले
'नटसम्राट' डॉ. श्रीराम लागूंची प्रकृती उत्तम, अफवा पसरवू नका - कुटुंबीयांची विनंती
कल्याण-डोंबिवलीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या 6500 कोटी रुपयांच्या पॅकेजमुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग नाही - भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे
लाव्हाचा सर्वात स्वस्त 3 जी स्मार्टफोन 'फ्लेअर ई 2' लॉन्च, किंमत अवघी 2,999 रुपये, लाव्हाच्या ऑफिशिअल वेबसाइटवर फोन उपलब्ध
बॉलीवूडची क्वीन कंगना राणावत विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘रंगून’साठी सध्या घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेतेय
नाशिक - गंगापूर धरणात वर्षभर पाणी पुरेल इतका साठा नसल्याने नाशिकमध्ये ८ ऑक्टोबरपासून एकवेळच होणार पाणीपुरवठा
नाशिक - आरटीओ कार्यालयात आजपासून हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी, कार्यालयातील १५० कर्मचार्यांकडून नियमाचे पालन
नाशिक - सध्या पितृपक्ष सुरू असल्याने भेंडी, गिलके, दोडके, गवार, चवळी आदि भाज्यांचे भाव वाढले असून भाज्यांची टंचाई निर्माण झालीय
नाशिक - शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत ३0 नोव्हेंबरपर्यंत, अर्ज त्वरित भरण्याचे मुंबई उपनगर समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांचे आवाहन
नाशिक - मालवाहतूकदार संप; केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बोलाविली बैठक, आज तोडगा निघण्याची शक्यता
नाशिक - रिक्षाचालकांच्या रद्द झालेल्या परवान्यांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या गृह विभागाकडून नुकताच जाहीर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा