|
ठळक घडामोडी
|
|
एक पद एक निवृत्तीवेतन साठी साताऱ्यात मोर्चा
सातारा - सैन्यदलाप्रमाणे अर्धसैनिक दलाच्या आजी-माजी सैनिकांना वन रॅंक वन पेन्शन व इतर सोयी सवलती मिळाव्यात, या मागणीसाठी जिल्ह्यातील अर्धसैनिक दलाच्या माजी सैनिकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले.
⚡⚡
🔶 आज दीड
दिवसाच्या बाप्पांचं विसर्जन, पुढच्या वर्षी
लवकर या, म्हणत बाप्पांना निरोप
⚡⚡
🔶पुणे - लोणावळा
मार्गावर रेल्वे रुळाखालील खडी वाहून गेल्याने पुणे - लोणावळा रेल्वे मार्गावरील
वाहतूक ठप्प.
⚡⚡
🔶एपीजे अब्दुल
कलाम मुस्लिम असूनही राष्ट्रभक्त होते - केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा
यांचे विधान
⚡⚡
🔶 औरंगाबाद,
लाडसांगवी गावातील दोन तरुण पुराच्या पाण्यात
अडकले.
पंतप्रधान नरेंद्र
मोदींची भेट घेतल्याचे वृत्त निराधार - एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांचे
स्पष्टीकरण
⚡⚡
🔶यवतमाळमध्ये
सोनाली कणके या विद्यार्थिनीची हत्या.
⚡⚡
🔶 हत्या ही
हत्याच असते, प्रसारमाध्यमांनीच
शीना बोरा प्रकरणाला हाय प्रोफाईल केस असल्याचा रंग दिला - के पी बक्षी
⚡⚡
🔶सीबीआयकडे तपास
सोपवल्याने आता शीना बोरा प्रकरणात सुरु झालेला वाद संपुष्टात येईल अशी आशा आहे
- के पी बक्षी
⚡⚡
🔶 औरंगबाद
जिल्ह्यातील शेलूत गावातील २०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.
⚡⚡
🔶 मुसळधार
पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील नद्यांना पूर, २५ गावांचा संपर्क तुटला.
⚡⚡
🔶जळगावः
शैक्षणिक संस्था, शाळा
महाविद्यालयांच्या परिसरात १०० मीटरवर असलेल्या सर्व पान टपऱ्या तात्काळ
हटवण्याचे आयुक्तांचे आदेश
⚡⚡
🔶मराठवाड्यात २३
तालुक्यांमध्ये गेल्या १८ तासात ६५ मीमी पेक्षा जास्त पाऊस
⚡⚡
🔶 मुंबई पुणे
एक्सप्रेस वेवर कामशेत बोगद्याजवळ पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला
⚡⚡
🔶 बाबासाहेब
पुरंदरेंविरोधात जहरी लिखाण करणा-यांविरोधात कधीच कोण बोलतं नाही - सनातन संस्था
⚡⚡
🔶 दाभोलकर व
पानसरे हत्याप्रकरणात आम्ही पोलिसांना सहकार्य केले, समीर गायकवाड निर्दोषच - सनातन संस्था
⚡⚡
🔶 सप्तश्रृंगी
गडाकडे जाणा-या घाट मार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प.
⚡⚡
🔶पाण्याच्या
पातळीत वाढ होत असल्याने गोदा घाट रिकामा करण्याचे पोलिसांचे आवाहन, बहुसंख्य भाविक स्नान अर्धवट सोडून परतीच्या
मार्गावर.
⚡⚡
🔶नाशिकहून
मुंबईला जाणाऱ्या महंतांच्या वाहनाला घोटीजवळ अपघात झाला असून महंत रामदुलारीदास
महाराज जखमी झाले आहेत.
⚡⚡
🔶जुना
पुणे-मुंबई हायवेवर पूरसदृश परिस्थिती, वाहतुकीसाठी हायवे केला बंद
- डोंगर दर्यावरचं पाणी
आलं रस्त्यावर
- एक्स्प्रेस वे आणि
जुन्या हायवेवर प्रचंड पाणी
- रात्रीपासून सुरू
असलेल्या पावसानं पुराची स्थिती
- डोंगरखोर्यातून
पाण्याचे लोट हायवेवर
- वाहतूक सुरू पण धीम्या
गतीनं
- सातोगावच्या हद्दीत 2 दुचाकी आणि एक टोम्पो वाहून गेला, पण जीवितहानी नाही
⚡⚡
🔶 तब्बल 70 वर्षांनंतर नेताजींबद्दलच्या फाईल्स
जनतेसाठी उघड
- केंद्रानेही आपल्याकडे
असलेल्या फाईल्स उघड कराव्यात -ममता बॅनर्जी
⚡⚡
🔶 बाप्पा पावला !,
मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात पावसाची जोरदार
हजेरी
⚡⚡
🔶 मुंबईचे नवे
पोलीस आयुक्त अहमद जावेद यांचे इंद्राणी आणि पीटरशी होते चांगले संबंध
⚡⚡
🔶 पंतप्रधान
नरेंद्र मोदींचा आज वाराणसी दौरा, अनेक विकासकामांची केली घोषणा
⚡⚡
🔶 पुण्यात
मनोरुग्ण वेटरने सहकार्यांवर चाकूहल्ला करून केली आत्महत्या, हल्ल्यात एकाचा मृत्यू
⚡⚡
🔶 दिल्लीत परदेशी
महिलेवर हल्ला करून पळणार्याला तरुणांनी पाठलाग करून पकडलं
⚡⚡
🔶 पाकिस्तानामध्ये
लष्कराच्या हवाई तळावर अतिरेकी हल्ला, आतापर्यंतच्या कारवाईत 13 अतिरेकी ठार
- तालिबानने स्वीकारली
हल्ल्याची जबाबदारी
⚡⚡
🔶 नाशिकच्या
रामकुंडात पार पडली शेवटची शाही स्नान पर्वणी
⚡⚡
🔶पाकिस्तानी
नौदलाच्या गोळीबारात गुजरातमधला एक मच्छिमार मरण पावला असून यासंदर्भात अधिक
चौकशी करायला भारतीय तटरक्षक दलाची तुकडी रवाना झाली आहे.
|
For Advertise in this Section please connect 9422264829 or mail at sainik.darpan@gmail.com
!doctype>
शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०१५
ठळक घडामोडी
मंदावलेल्या चाकाची कैफियत
आकडेवारी ही मोठी गमतीशीर बाब असते. ती सत्याकडे बोट दाखविण्याचे काम करीत असते; परंतु त्याकडे कसे पाहायचे, हे प्रत्येक जण आपापल्या मगदुरानुसार ठरवतो. उद्योगपूरक वातावरण निर्माण करण्याच्या बाबतीत कोणत्या राज्यांची कशी कामगिरी झाली, याविषयी केंद्राच्या औद्योगिक धोरण व संवर्धन खात्याने जागतिक बॅंकेचे तांत्रिक साह्य घेऊन तयार केलेल्या अहवालातील आकडेवारीच्या बाबतीतही हेच घडले असल्यास नवल नाही.
उद्योगांना पूरक वातावरण करण्यात गुजरात अव्वल, तर आंध्र प्रदेश आणि झारखंड अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर; तर महाराष्ट्र आठव्या स्थानावर असल्याचे हा अहवाल सांगतो. कपाळी मागास राज्ये असा शिक्का बसलेली झारखंड आणि छत्तीसगड ही राज्ये उद्योग क्षेत्रातील सुधारणा घडविण्यात पुढे जातात आणि महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडू ही महत्त्वाची राज्ये मागे पडतात, या कटू वास्तवाकडे या पाहणी अहवालाने निर्देश केला आहे.
आता "गुजरातच फर्स्ट‘ म्हणून मोदी समर्थकांनी जल्लोष करणे किंवा पहिल्या दहात सात "एनडीए‘ची राज्ये आहेत म्हणून पाठ थोपटून घेणे किंवा विविध राज्यांनी आत्मपरीक्षण करण्याऐवजी आपल्या पाठीमागे कितीतरी राज्ये आहेत, यात समाधान मानणे या आणि अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त होणे हे ओघानेच आले; पण जागतिक पातळीवर जागतिक बॅंकेने अशाच धर्तीवर केलेल्या पाहणीत भारत 142 व्या क्रमांकावर होता, हे पाहिले तर देश म्हणून केवढी मोठी मजल मारायची आहे, हेही लक्षात येते; पण अशा समग्र दृष्टिकोनाचा सध्या ठणठणाट दिसतो. तात्कालिक आणि संकुचित प्रतिसादाच्या पलीकडे जाऊन अशा पाहणी-अभ्यासांमधील तथ्यांश ध्यानात घेण्याची आणि त्या आधारे स्वतःमध्ये सुधारणा घडविण्याचा प्रयत्न करणे जास्त महत्त्वाचे आहे.
देशाची आर्थिक राजधानी ज्या राज्यात आहे, त्या महाराष्ट्राचा क्रमांक पार आठव्या स्थानावर जावा, याची म्हणूनच गंभीर नोंद घ्यायला हवी. मुळात सध्या राज्याची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे. त्यात दुष्काळासारख्या संकटाची भर पडली आहे. दैनंदिन खर्च भागविण्यासाठीही कर्ज काढण्याची वेळ आली आहे. कर्ज काढणे हे मुळातच वाईट, हे काही राज्याच्या दृष्टीने अजिबातच योग्य विधान नाही, हे खरे; पण कर्जाच्या माध्यमातून विकासाचा गाडा कितपत हालतोय, पायाभूत सुविधांचे प्रकल्प किती उभे राहताहेत, नव्याने होणारी गुंतवणूक किती, नवनवे उद्योगप्रकल्प उभे राहतात काय, रोजगाराचे पाट झिरपताहेत किंवा नाही, या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्या मार्गी लागल्या तर त्या आधारावरच आर्थिक समस्यांवर मात करता येते.
या आघाडीवर महाराष्ट्राने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. उद्योग प्रकल्पांची स्थापना, त्यासाठी जमिनीची उपलब्धता, वीज-पाणी-रस्ते या पायाभूत सुविधांची उपलब्धता, करांची सुटसुटीत रचना, योग्य ते पर्यावरण व कामगारविषयक नियमन व प्रशासकीय कार्यक्षमता या सर्वच आघाड्यांवर महाराष्ट्राला वेगाने सुधारणा घडवाव्या लागतील. याच्याशी संबंधित निकषांचाच या पाहणी अभ्यासात समावेश होता.
गेल्या काही वर्षांत या बाबतीत काहीच झाले नाही, असे नाही. उदाहरणार्थ नवा उद्योग सुरू करण्यासाठी ज्या वेगवेळ्या 76 प्रकारच्या परवानग्या मिळवाव्या लागत होती, त्यांची संख्या 25 पर्यंत कमी करण्यात आली आहे. प्रशासनात काही प्रमाणात उच्च तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे, वगैरे; परंतु या प्रयत्नांचा वेग आणि व्याप्ती पुरेशी नाही. ती वाढविण्यासाठी सुनिश्चित आणि दीर्घ पल्ल्याचे असे औद्योगिक आणि आर्थिक धोरण आखावे लागेल. पक्षोपक्षांच्या अजेंड्यांच्या पलीकडे राज्याच्या अर्थकारणाचा स्वतंत्र-स्वायत्त अजेंडा असतो, हे मान्य करणे आणि निदान त्याबाबतीत आपल्या तात्कालिक लाभाच्या पक्षीय भूमिकांना मुरड घालून सहमती निर्माण करणे हे आवश्यक असते.
गेल्या दोन दशकांतील राज्याचे राजकारण पाहिले तर निकोप स्पर्धेपेक्षा कुरघोड्यांना आणि लोकाभिमुखतेपेक्षा लोकानुनयाला महत्त्व देण्याची प्रवृत्ती फोफावल्याचे दिसते. त्यातच 1995 नंतर युत्या आणि आघाड्यांच्या राजकारणात सातत्यपूर्ण आर्थिक विकासावरचा फोकसच ढळला. त्यामुळेच वीजतुटवडा, अपुरे सिंचन यांसारख्या प्रश्नांशी अद्यापही झगडावे लागत आहे. याच पुरोगामी महाराष्ट्रात पूर्वी कार्यकर्त्यांचे आणि अभ्यासकांचेही मोहोळ होते. औपचारिक आणि अनौपचारिक "थिंक-टॅंक‘चे ते वैभव कसे काय लयास गेले, याचाही कधीतरी गंभीरपणे विचार केला पाहिजे. अशा एकूण परिस्थितीत वाटचालीची दिशा निश्चित करणे आणि प्रसंगी कठोर आर्थिक निर्णय घेत पुढे जाण्याचे आव्हान आहे. ते केवळ सत्ताधारी पक्षापुढेच नव्हे, तर एकूण राजकीय वर्गापुढे उभे ठाकले आहे. त्याचे स्वरूप लक्षात घेऊन पावले टाकली तर महाराष्ट्र उद्योगक्षेत्रात नंबर वनही होऊ शकतो, इतरांसाठी मॉडेलही बनू शकतो. तशी सुप्त क्षमता या राज्यात निश्चितच आहे; परंतु त्यासाठी एकाच नव्हे, तर अनेक आघाड्यांवर प्रयत्नांची बाजी लावावी लागणार आहे; पण त्याआधी प्रश्नांचे हे सर्वव्यापी स्वरूप समजावून घेतले पाहिजे.
Esakal : बुधवार, 16 सप्टेंबर 2015 - 01:00 AM IST
गुरुवार, १७ सप्टेंबर, २०१५
ठळक घडामोडी
🎉 गणरायाची
ढोल-ताशाच्या गजरात मोठ्या भक्तीभावाने प्रतिष्ठापना
🎉 पहिला
सार्वजनिक गणेश उत्सवाची परंपरा असलेला मानाचा आजोबा गणपतीची प्रतिष्ठापनाची
पुजा ट्रस्टी अध्यक्ष अॅड.गौरीशंकर फुलारी यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता संपन्न
🎉पोस्टाच्या
तिकिटावरून इंदिरा गांधी व राजीव गांधींचे फोटो काढण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ
युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांच्या
निवासस्थानासमोर आज जोरदार निदर्शने केली.
🎉 समीर गायकवाडला
अटक झाल्यानंतर सनातन संस्थेवर बंदी घालावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टीचे नेते
रामदास आठवले यांनी केली आहे.
🎉 नितिशकुमार
म्हणतात विकासाच्या मुद्यावर चर्चा करा. पण चर्चा करण्यासारखं काय आहे? गुजरात प्रथम स्थानावर आहे तर बिहार २१व्या.
- अरूण जेटली
🎉ग्रीनपीस
इंडियाची चौकशी CBI कडे सोपवण्याचा
प्रस्ताव सध्यातरी केंद्र सरकारने बासनात गुंडाळला आहे.
🎉नवी दिल्लीत
डेंग्युमुळे मरण पावलेल्यांची संख्या १५ झाली आहे.
🎉 राज्य सरकारला
मांसविक्री बंदी मागे घ्यायला लावणारा उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च
न्यायालयाने कायम ठेवला आहे. मांसविक्री बंदीसारखे निर्णय लोकांवर लादता येत
नाहीत असेही न्यायालयाने सुनावले आहे
🎉ग्रामपंचायतीच्या
निवडणुका लढवण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक करण्याच्या हरयाणाच्या
कायद्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे हरयाणामध्ये अशिक्षित
व्यक्तिनेदेखील निवडणूक लढवण्याचा मार्ग पुन्हा मोकळा झाला आहे.
🎉युवा
टेनीसपटूंना संधी मिळावी यासाठी लिआंडर पेसने न्यूझीलंडच्या दौ-यातून माघार
घेतली आहे.
|
एक पद एक निवृत्तीवेतन साठी साताऱ्यात मोर्चा
सातारा - सैन्यदलाप्रमाणे अर्धसैनिक दलाच्या आजी-माजी सैनिकांना वन रॅंक वन पेन्शन व इतर सोयी सवलती मिळाव्यात, या मागणीसाठी जिल्ह्यातील अर्धसैनिक दलाच्या माजी सैनिकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले.
बीएसएफ माजी सैनिक वेलफेअर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष मोहन धोंडवड व उपाध्यक्ष अजित कट्टे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील बीएसएफच्या माजी सैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयापासून मोर्चास सुरवात केली. हा मोर्चा पोवई नाक्यावरून पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. मोर्चात सहभागी झालेल्या माजी सैनिकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी घोषणाबाजी केली. यावेळी दिलेल्या निवेदनात असोसिएशनने म्हटले आहे की, आर्मी, नेव्ही इतकेच कामकाज बीएसएफच्या जवानांना देखील असते. पण, सैन्य दलांप्रमाणे अर्धसैनिक दलांना कॅन्टीन सुविधा, नोकरीत आरक्षण, इतर शासकीय सुविधा मिळत नाहीत. आर्मीचा जवान व बीएसएफचा जवान यात फरक न करता त्यांनाही सैन्य दलाप्रमाणे सवलती मिळणे आवश्यक आहे. गुजरात, केरळ, गोवा, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाना, पंजाब, दिल्ली या राज्यांमध्ये सैन्य दलाप्रमाणे सर्व सोयी-सवलती अर्धसैनिक दलांना लागू केलेल्या आहेत. या सुविधा महाराष्ट्र राज्यातील अर्धसैनिक दलांच्या आजी- माजी सैनिकांना लागू कराव्यात. तसेच वन रॅंक वन पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी माजी बीएसएफ कमांडंट तानाजी पवार, कोल्हापूर माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष संजय खैरमोडे, बीएसएफ माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष मोहन धोंडवड, सचिव राजेंद्र शिंदे, उपाध्यक्ष अजित कट्टे तसेच जिल्ह्यातील बीएसएफचे माजी सैनिक उपस्थित होते.
[ सकाळ वृत्तसेवा ]
मंगळवार, १५ सप्टेंबर, २०१५
ठळक घडामोडी
⚡अहमदनगर:
भगवानगड पाणी पुरवठा योजनेसाठी १ कोटी ६१ लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता,
पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर आणि
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीतील बैठकीत निर्णय
⚡मुंबई: 'बेस्ट'तर्फे चर्चगेट ते अंधेरीदरम्यान १६५ अतिरिक्त बस सोडण्यात येणार
⚡पुणे: कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टने नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील खंडोबावाडी गाव घेतले दत्तक
⚡पुणे: कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टतर्फे दरवर्षी दिले जाणारे पुरस्कार यंदा रद्द, पुरस्काराचा निधी दुष्काळग्रस्तांसाठी वापरणार
⚡७/११ मुंबई बॉम्बस्फोटातील १२ दोषींच्या शिक्षेची सुनावणी उद्या होणार.
⚡वेस्टर्न रेल्वेची रखडपट्टी उद्यापर्यंत कायम, रेल्वे वाहतूक पूर्ववत होण्यास अजून १५ तास लागू शकतात.
⚡ मराठी भाषा येत असेल तरच मिळेल रिक्षाचा परवाना. रिक्षा परवान्यासाठी मराठी येणं गरजेचं - परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची माहिती.
⚡आपचे आमदार सोमनाथ भारती यांना हायकोर्टाचा दिलासा, १७ सप्टेंबरपर्यंत अटक होणार नाही.
⚡नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी 'नाम' फाऊंडेशनची स्थापना, एसबीआयच्या बँक अकाऊंटमध्ये थेट मदत जमा करता येणार.
⚡अहमदनगर: उत्सव काळात चाचणी परीक्षा न घेण्याचा आदेश धाब्यावर. १४ ते ३० या काळात नगर जिल्ह्यात शाळांच्या परीक्षा होणार
⚡पटेल आरक्षणास 'पटेलबाईं'चा 'हार्दिक' नकार
⚡मक्का येथे झालेल्या दुर्घटनेत ११ भारतीयांचा मृत्यू तर १९ जण जखमी- विकास स्वरुप, प्रवक्ता परराष्ट्र मंत्रालय
⚡पश्चिम रेल्वेवरील अपघातामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रकही बदलण्यात आले आहे.
⚡दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील रुग्णालयांना अचानक भेट दिली, दिल्लीत डेंग्यूची साथ आल्याच्या पार्श्वभूमीवर केला पाहणी दौरा.
⚡दुष्काळग्रस्तांसाठी बॉलिवूडही सरसावले, अभिनेता अक्षय कुमार बीडमधील दु्ष्काळग्रस्तांना करणार ९० लाखांची मदत. पुढील ६ महिन्यात अक्षयकडून मदतीसाठी दर महिना १५ लाख रुपये देण्यात येणार आहेत.
⚡ पश्चिम रेल्वेवरील अपघातानंतर घाबरलेल्या प्रवाशांनी लोकलमधून उडी मारली असून त्यात २ जण जखमी झाले आहेत. दरम्यान या अपघातामुळे रेल्वेचा खोळंबा झालेला असतानाच त्याचा परिणाम रस्ते वाहतुकीवरही झाला असून वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत
⚡इंदूर - अहमदाबाद महामार्गावर सरदारपूर २४ टन स्फोटक पदार्थ असलेला ट्रक आढळला, ट्रकचालक आणि अन्य एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
source[Internet News]
More details
हिंदी मे http://sainikdrpanhindi.blogspot.in/In English http://sainikdarpan.blogspot.in
सोमवार, १४ सप्टेंबर, २०१५
ठळक घडामोडी
▫स्वातंत्र्यवीर
सावरकरांवर आधीच्या सरकारांनी अन्याय केला असल्याची भावना व्यक्त करत या प्रखर
देशभक्ताला भारत रत्न पुरस्काराने गौरवण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय
राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
▫गजेंद्र चौहान यांच्या
नियुक्तीविरोधात आंदोलन करणा-या FTIIच्या विद्यार्थ्यांना अभिनेता आमिर खानचा
पाठिंबा.
▫राज्य सहकारी बँक
घोटाळाप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर आरोपपत्र. २८ सप्टेंबरला होणार
सुनावणी.
▫उद्योग करण्यासाठी कुठला
देश जास्त सुखकर आहे, या संदर्भातल्या वर्ल्ड बँकेच्या अहवालामध्ये १८९ देशांमध्ये भारत १४२व्या
स्थानावर आहे .
▫ ७/११ मुंबई साखळी
बॉम्बस्फोटातील १२ दोषींच्या शिक्षेवरील सुनावणी आज अपूर्ण राहिली असून उद्या
सुनावणी सुरू राहणार आहे.
▫शाहीस्नानासाठी ३ टीएमसी
पाण्याची गरज नाही. लोकांना पिण्यासाठी पाणी नसताना एवढं पाणी सोडण्याची काय गरज.
धर्म महत्वाचा की लोकांची तहान - हायकोर्टाने राज्यसरकारला फटकारले.
▫मालेगावमधील निमगाव येथे
नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत चोरी, तिजोरी फोडून १३ लाखांची रोकड पळवली.
▫दुष्काळाच्या मुद्यावर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संध्याकाळी घेणार पंतप्रधान नरेंद्र
मोदींची भेट.
▫बिहारमधील छपरा येथे
बांधकाम सुरु असलेल्या पुलाजवळ क्रेन कोसळली, सात जणांचा मृत्यू, क्रेनखाली आणखी काही जण
अडकल्याची शक्यता.
▫जम्मू काश्मीरमधील
बारामुल्ला जिल्ह्यात पट्टन गावातील जंगलात तीन मृतदेह आढळले, मृतदेहांवर गोळ्यांचे
निशाण, पोलिस
तपास सुरु.
▫ज्यांनी १५ वर्ष सत्ता
उपभोगली तेच रस्त्यावर उतरले आहेत, कोट्यावधींचा घोटाळा केलेल्यांना शेतक-यांचा पुळका आला आहे
- राज ठाकरे
▫महाराष्ट्र नवनिर्माण
सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौ-यावर, राष्ट्रवादीच्या जेलभरो आंदोलनावर राज यांची टीका.
▫मंत्रालयात मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाचे छत कोसळले. कार्यालयाचे नुकतेच नूतनीकरण
करण्यात आलेले असतानाच छत कोसळल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित.
▫पुणेकरांना बाप्पा
पावणार, गणेशोत्सवादरम्यान
पाणी कपातीतून दिलासा मिळण्याची शक्यता.
▫ राष्ट्रवादी काँग्रेसचे
जेलभरो आंदोलन, जालन्यात खासदार सुप्रिया सुळे व अन्य नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
▫नेमबाजी विश्वचषकात
पुरुष गटात भारताला कांस्य पदक, सर्वेश पारिख, संदीप कुमार व इसैय्या राजेंदर यांनी मिळवून दिले
कांस्य पदक
▫सानिया मिर्झा व लिएंडर
पेस हे देशातील तरुण खेळाडूंसाठी प्रेरणास्त्रोत आहेत - राहुल द्रविडची
प्रतिक्रिया
▫आयसीसी रँकिंगमध्ये
भारतीय संघ दुस-या क्रमांकावर, ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी
रविवार, १३ सप्टेंबर, २०१५
ठळक घडामोडी
शनिवार, १२ सप्टेंबर, २०१५
ठळक घडामोडी
⚡पुणे: 'डीजे' बंदीच्या विरोधात महाराष्ट्र
चित्ररथ-वाद्यवृंद श्रमिक महासंघाचा आंदोलनाचा इशारा .
⚡पालकमंत्री गिरीश बापट यांचं वक्तव्य म्हणजे सांस्कृतिक शोकांतिका... मास्तर म्हणून कान पकडणाऱ्या बापटांचे कान कोण पकडणार... नीलम गोऱ्हे यांची टीका...
⚡नाशिक: जोरदार पावसामुळे नदीची पातळी वाढली असून गोदापात्रात जाऊ नये अशी सूचना प्रशासनातर्फे भाविकांना करण्यात आली आहे.
⚡गणपती मूर्तीकारांना पोलिसांनी दिलेली नोटीस मागे, रात्री ९ नंतरच मूर्ती बाहेर काढण्याविषयी दिली होती नोटीस.
⚡ पुणे, नाशिक, धुळे, जळगावाता पावसाची हजेरी.
⚡पत्नीची हत्या करून पतीने केली आत्महत्या, पिंपरीतील गांधीनगर भागातील घटना. कौटुंबिक वादातून घटना घडल्याचा अंदाज.
⚡नाशिकमधील महा पर्वणीवर पावसाचे सावट, जोरदार पावसाला सुरूवात. प्रशासन चिंतेत.
⚡सत्ताधारी व विरोधकांनी शेतक-यांसाठी एकत्र यावं, त्यांना सावरण्यासाठी कोणीच नाहीये - मकरंद अनासपुरे.
⚡शेतक-यांना मदत ही मलमपट्टी आहे, मात्र त्यांना कायमचं उभं करायचं आहे. मदतीसाठी आलेल्या शेतक-यांना परत पाठवलं नाही, रकमेत तडजोड करून त्यांना मदत दिली. - मकरंद अनासपुरे.
⚡ उद्या नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये मुख्य पर्वणी स्नान असून त्यानिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले आहेत. त्यामुळे दर्शनासाठी ८ ते १० तास लागणार असून कलश दर्शन करण्याबाबत पोलिसांकडून भाविकांना लाऊड स्पीकरवरून आवाहन करण्यात येत आहे.
⚡गडचिरोली जिल्ह्यात आठ लाखांचे बक्षीस असलेल्या दोन नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे तर दोन नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
⚡ पुण्यात कायदयाचे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याचे वृत्त.
⚡एकमेकांची उणी-दुणी काढण्यापेक्षा, टीका करण्याऐवजी शेतक-यांना मदत करून, त्यांना दुष्काळाच्या संकटातून बाहेर काढणं महत्वाचं आहे - उद्धव ठाकरे.
⚡ बिहारप्रमाणे राज्यातील शेतक-यांना केंद्राने मदत करावी- उद्धव ठाकरे
⚡दुष्काळग्रस्त शेतक-यांसाठी शिवसेना करणार कन्यादान, पीडित शेतक-यांच्या मुला-मुलींच्या लग्नाचा खर्च उचलणार. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने राबवणार कन्यादान योजना - उद्धव ठाकरे
⚡ज्युनिअर वुमन्स हॉकीएशषिया कप: सेमीफायनलमध्ये जपानकडून भारत पराभूत, पेनल्टी शूटआऊटमध्ये जपानने भारताला ३-२ असे हरवले
शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०१५
ठळक घडामोडी
✨मुंबई: अंधेरीतील सेंट झेव्हियर्स शाळेतील विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांना अटक करण्यात आली असून त्यांना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
✨ एक हजार दिवसात देशातील १८ हजार गावांमध्ये विज पुरवणार - नरेंद्र मोदी
✨पुणे: FTIIच्या उपोषणकर्ता विद्यार्थी रुग्णालयात दाखल, शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने विद्यार्थ्यावर उपचार सुरू.
✨उल्हासनगरमध्ये केबल चालकावर गोळीबार, दोन अज्ञातांच्या गोळीबारात केबलचालक सच्चू जखमी.
✨ कोल्हापूर - सातारा येथे खावली गावात १५ दरोडेखोराने वॉचमनच्या पत्नीवर बलात्कार केल्याची घटना घडला आहे. दरोडा घालण्याच्या इराद्याने आले असल्याची माहीती
✨मुंबईतील १३ व १८ सप्टेंबर या दोन दिवसांची मांसविक्रीवरील बंदी उठवण्यात आली.
✨ वर्धा: लहान भावाने केली मोठा भाऊ, वहिनीची हत्या, देवळी तालुक्यातील धक्कादायक घटना. संप्पतीच्या वादातून हत्या झाल्याची माहिती.
✨पुण्यात २५० एनडीए कॅडेट्सना अन्नातून विषबाध, २४७ विद्यार्थ्यांना हॉस्पिटलमधील उपचारानंतर सोडण्यात आले असून तीन जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत.
✨माशांची कत्तल करावी लागत नाही, पाण्याबाहेर येताच मासे मृत्यू पावतात - राज्य सरकारचे उच्च न्यायालयात अजब उत्तर.
✨अंडी, मासे यांच्यावर बंदी का नाही घातली? मांसबंदीवरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला प्रश्न.
✨संसदेमध्ये काही राजकीय पक्षांनी जे वर्तन केले त्यामुळे आदर्श लोकशाही पायदळी तुडवली गेली असून त्यांना देशाची जनता माफ करणार नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी
✨जपानमध्ये सुमारे ३०० उद्योजकांपुढे भाषण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. मुंबई अहमदाबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेनला नाशिकमार्गे नेण्यात यावे असा प्रस्तावही त्यांनी मांडला असून त्याला जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन काउन्सिलने स्वीकृती दिल्याचे फडणवीसांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे.
✨उद्धव ठाकरे यांचा दुष्काळ दौरा रद्द झाला असला तरी शिवसेनेच्या नेत्यांनी एक हजार शेतक-यांना प्रत्येकी १० हजार रुपये देण्याची घोषणा केली. उद्या औरंगाबादला मात्र ठाकरे उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले
✨जपान ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धा, पारुपल्ली कश्यप उपांत्यपूर्व फेरीतून बाहेर, चॉ तीन चेनने २१-१४, २१-१८ असा पराभव केला.
✨अंगठ्याला दुखापत झाल्याने ऑस्ट्रेलियाचा क्रिकेपटू डेव्हिड वॉर्नर बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर.
गुरुवार, १० सप्टेंबर, २०१५
ठळक घडामोडी
केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता सहा टक्के वाढीव 'डीए'
नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सहा टक्के वाढीव महागाई भत्ता (डीए) जाहीर केला आहे. म्हणजे आतापर्यंत मूळ वेतनावर 113 टक्के मिळणारा महागाई भत्ता यापुढे 119 टक्के होईल. केंद्रीय मंत्रिमंडळाने आज या निर्णयाला मंजुरी दिली. 50 लाख सरकारी कर्मचारी आणि 56 लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळेल.
सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या आधारे ठरविलेल्या सूत्रानुसार ही वाढ देण्यात आली असून, यामुळे सरकारच्या तिजोरीवर यंदाच्या वर्षी (2015-16) 4436.76 कोटी रुपयांचा भार पडेल आणि दरवर्षी 6655.15 कोटी रुपयांचा बोजा सरकारी खजिन्यावर येईल.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत या निर्णयाची माहिती देताना सांगितले, की आर्थिक वर्षाच्या एक जुलैपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यापासून महागाई भत्ता मिळेल. आतापर्यंत वेतनावर 113 टक्के महागाई भत्ता दिला जात आहे. त्यात आणखी सहा टक्के वाढ होईल. त्याचप्रमाणे सातव्या वेतन आयोगाच्याही शिफारसी येणार असून, त्याही विचारात घेतल्या जातील.
वाढता खर्च...
50 लाख केंद्रीय कर्मचारी
56 लाख निवृत्त कर्मचारी
4436.76 कोटी रुपये सरकारी तिजोरीवर यंदाचा भार
6655.15 कोटी रुपये दरवर्षी पडणारा भार
[सकाळ न्यूज नेटवर्क]
बुधवार, ९ सप्टेंबर, २०१५
कविता : अच्छे दिन
अच्छे दिनचं घोडं कोणत्या देशात अडलं...
बघता बघता वर्ष सरलं
जगाचं पर्यटनही घडलं
खरं सांगा मोदी साहेब
अच्छे दिनचं घोडं नेमकं
कोणत्या देशात अडलं?
जगाचं पर्यटनही घडलं
खरं सांगा मोदी साहेब
अच्छे दिनचं घोडं नेमकं
कोणत्या देशात अडलं?
अमेरिकेत मॅडिसन
स्क्वेअर गाजवलं
जपानमध्ये जाऊनशान
ढोल बी वाजवलं
भाषणाशिवाय आमच्या
पदरात काय बरं पडलं
खरं सांगा मोदी साहेब
अच्छे दिनचं घोडं नेमकं
कोणत्या देशात अडलं?
स्क्वेअर गाजवलं
जपानमध्ये जाऊनशान
ढोल बी वाजवलं
भाषणाशिवाय आमच्या
पदरात काय बरं पडलं
खरं सांगा मोदी साहेब
अच्छे दिनचं घोडं नेमकं
कोणत्या देशात अडलं?
मंगोलिया नेपाळ अन्
चायना बी झाला
काळा पैसा सांगा
किती भारतात आला
की त्याचं बी जहाज
एखाद्या समुद्रात बुडलं
खरं सांगा मोदी साहेब
अच्छे दिनचं घोडं नेमकं
कोणत्या देशात अडलं
चायना बी झाला
काळा पैसा सांगा
किती भारतात आला
की त्याचं बी जहाज
एखाद्या समुद्रात बुडलं
खरं सांगा मोदी साहेब
अच्छे दिनचं घोडं नेमकं
कोणत्या देशात अडलं
कच्च्या तेलाचे भाव
जगामध्ये पडले
आपल्या इथे पेट्रोलचे भाव
गगनाला भिडले
असं उलट गणित कसं
तुमच्या राजवटीत घडलं
खरं सांगा मोदी साहेब
अच्छे दिनचं घोडं नेमकं
कोणत्या देशात अडलं
जगामध्ये पडले
आपल्या इथे पेट्रोलचे भाव
गगनाला भिडले
असं उलट गणित कसं
तुमच्या राजवटीत घडलं
खरं सांगा मोदी साहेब
अच्छे दिनचं घोडं नेमकं
कोणत्या देशात अडलं
रेशनवर मिळत नाही
तेल तांदूळ साखर
स्वस्त झालयं मरण
आणि महाग झाली भाकर
आता तुम्ही आमच्या देशात
राहणं बी सोडलं
खरं सांगा मोदी साहेब
अच्छे दिनचं घोडं नेमकं
कोणत्या देशात अडलं
तेल तांदूळ साखर
स्वस्त झालयं मरण
आणि महाग झाली भाकर
आता तुम्ही आमच्या देशात
राहणं बी सोडलं
खरं सांगा मोदी साहेब
अच्छे दिनचं घोडं नेमकं
कोणत्या देशात अडलं
आलंच विमान भारतावर
तर थोडं खाली बघा
शेतकऱ्याच्या काळजाला
पडल्या आहेत भेगा
उद्योग पती झाले गब्बर
अन् शेतकरी फासावर चढलं
खरं सांगा मोदी साहेब
अच्छे दिनचं घोडं नेमकं
कोणत्या देशात अडलं
तर थोडं खाली बघा
शेतकऱ्याच्या काळजाला
पडल्या आहेत भेगा
उद्योग पती झाले गब्बर
अन् शेतकरी फासावर चढलं
खरं सांगा मोदी साहेब
अच्छे दिनचं घोडं नेमकं
कोणत्या देशात अडलं
बीडचे भूमिपुत्र आणि प्रहारचे जेष्ठ पत्रकार, कीर्तनकार श्यामसुंदर सोन्नर
[आंतरजालावरून सदर]
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)