उमर फयाज यांच्या मारेक-यांना सोडणार नाही - लष्करप्रमुख बिपीन रावत
नवी दिल्ली, दि. 16 - लेफ्टनंट उमर फयाज यांच्या मारेक-यांविरोधात कठोर कारवाई करणार, असा विश्वास लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी व्यक्त केला.
फयाज यांची हत्या करून काश्मीर खो-यात दहशतवाद पसरवणा-यांविरोधात एकजूट करण्याचे आवाहन रावत यांनी यावेळी केले. लेफ्टनंट फयाज काश्मीर खोर्यातील होते. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी मोठी मेहनत घेतली होती. यानंतर डिसेंबर 2016 मध्ये फयाज यांची राजपुताना रायफल्समध्ये नियुक्ती झाली होती. विवाह सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या केली. काश्मीर खो-यातील तरूणांनी फयाज यांच्या मारेकर्यांविरोधात विरोधात करायला हवा. आता दहशतवाद्यांविरोधात एकजूट होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. फयाज यांच्या हत्येमागे हिज्बुल मुजाहिद्दीनच्या तीन संशयित दहशतवाद्यांचा हात असल्याचे जम्मू काश्मीर पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा