रिसोर्ससॅट २-ए हा उपग्रह रिसोर्ससॅट १ आणि २ च्या मालिकेतील उपग्रह आहे
इस्त्रोने रिसोर्ससॅट २-ए या उपग्रहाचे केले यशस्वी प्रक्षेपण
चेन्नई – भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्त्रो) ने आणखीन एक मोहीम यशस्वी केली आहे. इस्त्रोने श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून पीएसएलव्ही सी-३६ च्या मदतीने रिसोर्ससॅट २-ए या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. सकाळी १० वाजून २४ मिनिटांनी इस्त्रोने हा उपग्रह अंतराळात सोडला. (व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)
रिसोर्ससॅट २-ए हा उपग्रह रिसोर्ससॅट १ आणि २ च्या मालिकेतील उपग्रह आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून भारताची लजसंसाधने, खनिजांची माहिती आणि वनसंपदेबाबत माहिती मिळणं शक्य होणार आहे. यापूर्वीचे रिसोर्ससॅट १ आणि २ हे उपग्रह २००३ आणि २०१२ मध्ये अवकाशात सोडण्यात आले होते.
श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून पीएसलव्ही सी-३६ या प्रक्षेपकाद्वारे रिसोर्ससॅट २-ए उपग्रह आकाशात सोडण्यात आला. हा उपग्रहा ५ वर्ष सेवा देणार आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात पीएसएसलव्हीने आठ उपग्रहांना यशस्वीरित्या अवकाश कक्षेत स्थिर केले होते. रिसोर्ससॅट २-ए हा उपगृह पृथ्वीच्या कक्षेत ८१७ किलोमीटर अंतरावर फिरत राहणार आहे.
By sunil desale | Published: December 7, 2016 12:16 PM IST Email
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा