मुंबई
- रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात कपात केल्यानंतर आणि व्याजदरांबाबतच्या आकडेमोडीची नवीन
यंत्रणा सुरू केल्यानंतर बॅंकांनी व्याजदर कपात सुरू केली आहे. स्टेट बॅंकेने आपले
गृहकर्जांचे दर 0.10 टक्क्याने कमी करून 9.45 टक्क्यांपर्यंत आणले आहेत. महिला
कर्जदार असल्यास हाच दर 9.40 टक्के इतका झाला आहे. नवीन दर एक एप्रिलपासून लागू झाले
आहेत. बॅंकेने आपल्या वेबसाइटवर ही माहिती प्रसिद्ध केली आहे. आयसीआयसीआय बॅंकेचे गृहकर्जही
स्टेट बॅंकेइतक्याच दराने उपलब्ध होणार आहे. मात्र, पाच कोटी रुपयांपुढील गृहकर्जासाठी
9.65 टक्के व्याजदर असेल.
- - पीटीआय
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा