Pages

पेज

सोमवार, २३ मे, २०१६

कुपवाड्यातील चकमकीत महाराष्ट्राचा वीर पांडुरंग गावडे शहीद

शहीद पांडुरंग गावडे मूळचे सिंधुदुर्गातल्या आंबोली येथे राहणारे होते.

जैश-ए-मोहंमद संघटनेच्या दहशतवाद्यांशी लढताना जखमी झालेले भारतीय लष्करातील ‘राष्ट्रीय रायफल्स‘चे जवान पांडुरंग महादेव गावडे यांना आज वीरमरण आले. दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झालेल्या पांडुरंग गावडे यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांनी प्राण सोडला. शहीद पांडुरंग गावडे मूळचे सिंधुदुर्गातल्या आंबोली येथे राहणारे होते.
जम्मू-काश्मीरमधील सीमावर्ती भागातील कुपवाडा जिल्ह्यात काल जैश-ए-मोहंमदच्या अतिरेक्यांशी भारतीय जवानांची सुमारे नऊ तास चकमक चालू होती. दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देत पाच दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी यमसदनी धाडले होते. या चकमकीत दहशतवाद्यांशी लढताना राष्ट्रीय रायफल्सचे पांडुरंग महादेव गावडे, अतुल कुमार व इतर एक जवान गंभीर जखमी झाले. या हल्ल्यात गावडे गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे संरक्षण खात्याच्या अधिका-यांनी सांगितले.

शहीद वीर पांडुरंग गावडे यांना सलाम...
भावपूर्ण श्रधांजलि
अमर रहे…!!
जय हिंद

शनिवार, २१ मे, २०१६

एचव्हीओसी कर्मचाऱ्यांना सुधारीत स्वेच्छा निवृत्ती योजनेला मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, हिंदुस्थान व्हेजीटेबल ऑईल कॉर्पोरेशनच्या (HVOC) कर्मचाऱ्यांना 2007च्या प्रतिकात्मक वेतन श्रेणीवर आधारीत, सुधारित स्वेच्छा निवृत्ती योजना देण्याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. यानुसार कंपनीला सुमारे 27.56 कोटी रुपयांच्या योजनेतर अनुदानाच्या स्वरुपात केंद्रीय सहाय्य मिळेल. HVOC ही ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत असणारी कंपनी आहे.

ही कंपनी आजारी कंपनी झाल्यामुळे HVOCच्या कर्मचाऱ्यांवर वितरीत परिणाम झाला होता. कर्मचारी 1992च्या अत्यंत जुन्या वेतन श्रेणीत येतात. सुधारीत स्वेच्छा निवृत्ती योजना पॅकेजमुळे कर्मचाऱ्यांना भरपाईची योग्य रक्कम मिळेल.

PIB

गुरुवार, १९ मे, २०१६

फिजीच्या पंतप्रधानांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट

फिजीचे पंतप्रधान सेवानिवृत्त रिअल ॲडमिरल जोसैया वोरेक बेनीमारामा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधानांनी 20 फेब्रुवारी 2016 रोजी फिजीत प्रचंड विध्वंस करणाऱ्या “विंस्टन” चक्रीवादळामुळे झालेल्या जीवित आणि वित्त हानी बद्दल दु:ख व्यक्त केले. फिजी मध्ये मदत आणि पुनर्वसनाच्या कार्यात सर्वतोपरी सहाय्य करण्यासाठी भारत तयार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

चक्रीवादळानंतर भारताने दिलेली एक दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची मदत आणि 45 टन मदत सामुग्री बद्दल पंतप्रधान बेनीमारामा यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले.

ऑगस्ट 2015 मध्ये जयपूर  येथे आयोजित केलेल्या दुसऱ्या एफआयपीआयसी शिखर परिषदेत प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावरील देशांसोबत आपत्ती व्यवस्थापनात अधिक सहकार्य करण्यासाठी व्यक्त केलेल्या कटीबद्धतेचा पंतप्रधान मोदी यांनी पुनरुच्चार केला. या विभागात अंतराळ तंत्रज्ञान संशोधन केंद्राच्या स्थापनेच्या माध्यमातून आपसातील सहकार्य दृढ करण्याचाही यात समावेश आहे.

सौर आणि नवीकरणीय ऊर्जा, कृषी, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याच्या संधीबाबतही दोन्ही नेत्यादरम्यान चर्चा झाली.

PIB

बुधवार, १८ मे, २०१६

भारत-संयुक्त राष्ट्रसंघ यांच्या संयुक्त टपाल प्रशासनाद्वारे ‘वूमन-ही फॉर शी’ तिकीट जारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘वुमन - ही फॉर शी’ हे टपाल तिकीट संयुक्तरित्या जारी करण्यासंदर्भातली माहिती देण्यात आली. टपाल खाते आणि संयुक्त राष्ट्रसंघ टपाल प्रशासन (UNPA) यांच्यात या उद्देश्याने फेब्रुवारी 2016 मध्ये एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून हे तिकीट संयुक्तरित्या जारी करतांना, 20 से-टेनांटसचे पान तसेच 2 तिकीटे असलेल्‍या छोट्या पानाच्या स्वरुपात ही तिकीटे छापण्यात आली.

संयुक्त राष्ट्रसंघाचा ‘वूमन - ही फॉर शी’ हा उपक्रम लिंग समानतेसाठी एकता दर्शवणारी चळवळ आहे. सर्व सामाजिक व्याख्यांच्या संदर्भातील फायद्यांसाठी मानवजातीतील अर्ध्या भागाचा दुसऱ्या भागाला पाठिंबा देण्यासाठी एकत्र आणण्याची ही चळवळ आहे. हे संयुक्तरित्या जारी केलेले तिकीट जगभरातल्या सर्व महिलांच्या सक्षमीकरणाला समर्पित करण्यात आले आहे. यामुळे भारत सरकार ठामपणे समर्थन देत असलेल्या लिंग समानतेच्या मुद्याला मोठी चालना मिळेल. अश्याप्रकारे, टपाल खाते आणि UNPA यांच्यात 8 मार्च 2016 हा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याकरता संयुक्त टपाल तिकीट जारी करण्याबाबत एकमत झाले आहे.

PIB

राष्ट्रीय युद्ध स्मारक आणि राष्ट्रीय युद्ध संग्रहालयाच्या उभारणीसाठी जागा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, राष्ट्रीय युद्ध संग्रहालयासाठी प्रिन्सेस पार्क संकुल ही योग्य जागा राहील, या सर्वोच्च अधिकार सुकाणू समिती (EASC)ने घेतलेल्या निर्णयाची माहिती देण्यात आली.

राष्ट्रीय युद्ध स्मारकासंदर्भात, ऑक्टोबर 2015 मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आलेल्या मान्यतेनुसार, हे स्मारक इंडिया गेट इथल्या ‘सी’ तारकाकृती जागेवर उभारण्यात येईल.

PIB

इंदूर विमानतळाला ‘नाशिवंत माल केंद्र’ उभारण्यासाठी मंजूरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत इंदूर विमानतळावर नाशिवंत मालासाठी केंद्र उभारण्याकरता भारतीय विमानतळ प्राधिकरणाची (ए ए आय) 1 हजार 500 चौरस मीटर जागा भाड्याने देण्यासाठी मान्यता देण्यात आली.  ए ए आय मंडळाने केलेल्या ठरावानुसार ही मान्यता देण्यात आली.

नाशिवंत मालासाठी वाहतूक करणाऱ्या विमानतळांकरता या केंद्रात अत्याधुनिक निर्गमन व्यवस्था असेल. या केंद्रात एकाच छताखाली, व्यापाऱ्यांच्या सर्व गरजा पूर्ण करण्याकरता आणि मालाचा दर्जा कायम राखण्याकरता जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध असतील. MPWLC खाजगी सार्वजनिक भागीदारी अंतर्गत ही सुविधा उभारणार आहे.

नाशिवंत मालासाठी उभारण्यात येणाऱ्या या केंद्रामुळे स्थानिक जनतेच्या रोजगाराच्या गरजा पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तसेच या केंद्रात मोठी रोजगार क्षमताही आहे. ह्या केंद्राच्या व्यवस्थापनासाठी एकूण 113 जणांची आवश्यकता आहे.

पार्श्वभूमी

राज्यातल्या माळवा भागातील औषधे, कुक्कुट उत्पादने आणि बागायती उत्पादने यांच्या निर्यातीसाठी असणारी मोठी मागणी लक्षात घेऊन मध्य प्रदेश सरकारने इंदूर विमानतळावर हे केंद्र उभारण्यासाठी अनुकूलता दर्शवली होती. या केंद्रामुळे मध्य प्रदेश सरकारला कृषी आणि बागायती क्षेत्राला चालना देता येईल.

PIB

प्रत्येक देशाने दहशतवादाप्रती शून्य सहनशीलता दाखवावी - राष्ट्रपती

 राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी येत्या 24 ते 27 मे 2016 दरम्यान होणाऱ्या आगामी चीन दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्हीला मुलाखत दिली.

‘प्रत्येक देशाचे दहशतवादाप्रती शून्य सहनशीलतेचे धोरण असावे, असा भारताचा विश्वास असून, दहशतवादा विरुद्धची लढाई निर्णायक असावी,’ असे राष्ट्रपतींनी मुलाखतीत सांगितले. भारत आणि चीन हे दोन बहुसांस्कृतिक, बहुवांशिक बलाढ्य देश आहेत. दहशतवादाविरुद्ध लढा देण्यासाठी हे दोघे एकत्र आले, तर त्याचा नक्कीच प्रभाव पडेल, असा माझा दृढविश्वास आहे, असेही राष्ट्रपती म्हणाले.

PIB

मंगळवार, १७ मे, २०१६

एअर चीफ मार्शल अरुप राहा यांची “तेजस” या स्वदेशी लढाऊ विमानाद्वारे गगन भरारी

हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अरुप राहा यांनी आज बंगळूरु मधल्या HAL  इथं स्वदेशी बनावटीचं हलके लढाऊ विमान (तेजस) मधून गगन भरारी घेतली.

एअरोनॉटीकल डेव्हलपमेंट एजन्सी (ADA) ने “तेजस” चा आराखडा तयार केला असून  HAL ने बंगळुरु इथे त्याची निर्मिती केली आहे. हे लढाऊ विमान अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे.

एअर चीफ मार्शलनी स्वत: हे लढाऊ विमान उडवले आणि हवेतून हवेत तसेच आकाशातून जमिनीवर मारा करणारी क्षमता त्यांनी स्वत: हाताळली. तसेच विमानात असणाऱ्या अत्याधुनिक रडार आणि इतर प्रणालीचे स्वत: मूल्यमापन केलं. स्वत: लढाऊ विमानांचे कुशल वैमानिक असणाऱ्या अरुप राहा यांनी तेजसच्या उड्डाण क्षमतेची प्रशंसा केली. अशा प्रकारचे विमान निर्मिती केल्याबद्दल त्यांनी ADA आणि HAL चं अभिनंदन केलं.

बंगळुरु मधल्या  HAL येथे तेजस लढाऊ विमानांची निर्मिती केली जात असून, येत्या 1 जुलै 2016 रोजी या विमानांची पहिली तुकडी तयार करण्याचे भारतीय हवाई दलाचे उद्दिष्ट आहे. तसेच भारतीय हवाई दलाने अत्याधुनिक LCA MK1A संरचनेसाठी अतिरिक्त 80 तेजसची मागणीही नोंदवली आहे.

PIB

रविवार, १५ मे, २०१६

‘सच भारत अभियाना’तून नवा भारत निर्माण करू- राज्यपाल चे. विद्यासागर राव



मुंबई : सदवर्तन, कामाप्रती निष्ठा, मानवता आणि सर्वांच्या कल्याणाची सदिच्छा या साधनांचा वापर करून नव्या भारताच्या निर्माणासाठी ‘सच भारत अभियाना’च्या माध्यमातून उद्योग संस्थांनी योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी आज येथे केले. 

विविध औद्योगिक संस्थांचे प्रतिनिधीत्व करणारी ‘असोचेम’, शरि (SREI) फाऊंडेशन व इंडियन मर्चंट्स चेंबर यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल ट्रायडंट येथे ‘सच भारत संगम’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यपाल श्री. विद्यासागर राव बोलत होते. कार्यक्रमास डॉ. हरीप्रसाद कनोरिया, असोचेमचे अध्यक्ष सुनिल कनोरिया, इंडियन मर्चंट चेंबरचे अध्यक्ष दिलीप पिरामल, शरि फाऊंडेशनचे अध्यक्ष हेमंत कनोरिया हे उपस्थित होते. कार्यक्रमात विविध उद्योगपती, प्रमुख व्यावसायिक, राजकीय नेते यांच्यासह विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ उपस्थित होते. 

राज्यपाल पुढे म्हणाले की, प्रामाणिकता हेच आपले काम आणि व्यवसायाप्रती कर्तव्य असले पाहिजे. केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ भारत, स्वस्थ आणि शिक्षीत भारत हे अभियान भारतात अनेक उत्तम बदल घडविण्यासाठी राबविले जात आहे. नैतिक आचरणाप्रती निष्ठा या जीवनमूल्याचा प्रसार करण्यास सच भारत अभियान उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी श्री. विद्यासागर राव यांच्या हस्ते ‘नॅशनल स्पिरीच्युअल रिस्पॉन्सिबिलीटी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. 

शनिवार, १४ मे, २०१६

देशभरात स्वच्छ कार्यालय पंधरवडा मोहिमेचा प्रारंभ

देशभरातल्या सर्व सरकारी कार्यालयात स्वच्छता पाळली जावी यासाठी आज विशेष स्वच्छ कार्यालय पंधरवडा मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला. स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत विशेष संकल्पना घेऊन ही मोहीम राबवण्यात येत आहे. केंद्रीय नगरविकास मंत्री एम. वैंकय्या नायडू यांनी नवी दिल्लीतल्या निमार्ण भवन येथे कडुनिंबाचे रोप लावून या मोहिमेचा प्रारंभ केला. तसेच त्यांनी स्वच्छतेचा आढावा घेत या इमारतीची पाहणी केली. स्वच्छता उपक्रमात लक्षणीय सुधारणा झाली असली तरी अधिक सुधारणेला वाव असल्याचे नायडू यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत सांगितले.

PIB

रविवार, ८ मे, २०१६

दक्षिण चिनी समुद्रात चीनचा लष्करी सराव - - यूएनआय

बीजिंग - वादग्रस्त बनलेल्या दक्षिण चिनी समुद्रात मे महिन्यात विविध लष्करी सरावांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिली आहे. ‘मे महिन्यात चीनच्या लष्करातर्फे दक्षिण चिनी समुद्रात लष्करी सरावांचे आयोजन करण्यात आले असून, त्यात अत्याधुनिक युद्धनौका आणि पाणबुड्यांचा समावेश असे,‘‘ असे सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. तेलाचे मोठ्या प्रमाणात साठे असलेल्या दक्षिण चिनी समुद्रावर चीनने आपला हक्क सांगितला आहे. या समुद्रातून मोठ्या प्रमाणात व्यापार ही होतो, त्यामुळे चीनबरोबरच फिलिपाईन्स, ब्रुनेई, व्हिएतनाम, मलेशिया आणि तैवान आदी देशांनीही हक्क सांगितल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. दक्षिण चिनी समुद्रातील मे महिन्यात चीनकडून लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात अत्याधुनिक युद्धनौका, पानबुड्यांचा समावेश आहे, असे सांगण्यात आले.

सुनील लान्बा यांची नौदलप्रमुखपदी नियुक्ती - - यूएनआय

नवी दिल्ली - व्हाइस ऍडमिरल सुनील लान्बा यांची नौदलप्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. गुरुवारी ही घोषणा करण्यात आली. लान्बा हे सध्या नौदलाच्या पश्‍चिम मुख्यालयाचे प्रमुख होते. सध्याचे नौदलप्रमुख आर. के. धोवन हे 31 मे रोजी निवृत्त होणार आहेत. त्या दिवशी लान्बा पदभार स्वीकारतील. लान्बा हे नौकानयनशास्त्रातील तज्ज्ञ समजले जातात.
सिकंदराबाद येथील "डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेज‘चे ते माजी विद्यार्थी आहेत. "आएनएस सिंधुदुर्ग‘ व "आयएनएस दुनागिरी‘वर त्यांनी काम केले आहे. तीस वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी बजावलेल्या विशेष कामगिरीमुळे त्यांना परम विशिष्ट सेवा पदक व अति विशिष्ट पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. हिंदी महासागरात भारताच्या वाढत्या प्रभावाला चीनकडून आव्हान दिले जात असल्याच्या पार्श्‍वभूमीवर लान्बा यांची नौदलप्रमुखपदी झालेली निवड महत्त्वाची मानली जात आहे.

भारताचा चुकीचा नकाशा वापरल्यास १०० कोटी दंड - पीटीआय

नवी दिल्ली - भारताचा नकाशा चुकीच्या पद्धतीने प्रसिद्ध केल्यास आता सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आणि शंभर कोटी रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाणार आहे. जम्मू-काश्‍मीर आणि अरुणाचल प्रदेश हे अनुक्रमे पाकिस्तान आणि चीनचा भाग असल्याचे काही संकेतस्थळांवर प्रसिद्ध झाल्याच्या घटना घडल्याने केंद्र सरकारने याबाबतचा कायदा करण्याचा निर्णय घेतला आहे.
ट्‌विटर या सोशल नेटवर्किंग संकेतस्थळावरही काश्‍मीरचा काही भाग चीनमध्ये आणि जम्मू पाकिस्तानात दाखविण्यात आले होते. त्यामुळे भारत सरकारसह अनेक सामान्य नागरिकांनीही ट्‌विटरवर टीकेची झोड उठविली होती. त्यामुळे ट्‌विटरने तातडीने माफीही मागितली होती. मात्र, अशा घटना टाळण्यासाठी केंद्र सरकारने कडक उपाययोजना करण्याचे ठरविले आहे.
भौगोलिक माहिती नियामक विधेयक 2016 तयार करण्यात आले असून, त्याच्या मसुद्यानुसार भारताच्या कोणत्याही भागाची उपग्रह, विमाने, ड्रोन यांच्या साह्याने प्रतिमा घेऊन अतिरिक्त माहितीसह भौगोलिक माहिती प्रसिद्ध करण्यासाठी अथवा वितरीत करण्यासाठी सरकारकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. यामुळे भारताबाबत कोणतीही चुकीची माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावर इंटरनेटद्वारेही प्रसिद्ध न होण्याची काळजी घेतली जाणार आहे. हा कायदा मोडणाऱ्यास एक कोटी ते शंभर कोटी रुपयांपर्यंत दंड आणि सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते. गैरप्रचारावर लक्ष ठेवण्यासाठी एका आयोगाची स्थापना करण्याचाही केंद्र सरकारचा विचार आहे. या आयोगामध्ये सहसचिव दर्जाचा अधिकारी आणि तज्ज्ञांचा समावेश असेल.
विधेयकातील मसुद्यानुसार, गुगलसारख्या कंपनीला भारतामध्ये गुगल मॅप्स अथवा गुगल अर्थ चालविण्याकरिता सरकारकडून परवाना घेणे आवश्‍यक ठरणार आहे. या कंपन्यांना परवाना देऊनही त्यांनी नियमभंग केल्यास त्यांचा परवाना रद्द होऊ शकतो.
मसुद्यातील तरतुदी

  • नियामक मंडळाने परवानगी दिल्याशिवाय देशाची नकाशासह भौगोलिक माहिती प्रसिद्ध करता येणार नाही.
  • माहिती प्रसिद्ध करताना सरकारची परवानगी असल्याचे प्रमाणपत्र दिसणे आवश्‍यक.
  • हा प्रस्तावित कायदा संपूर्ण भारतासह परदेशात राहणारे सर्व भारतीय, सरकारी नोकरदार, विमाने आणि जहाजांमधील भारतीय नागरिक अथवा नोंदणीकृत संस्था यांना लागू असेल.
  • ओला, उबेरसारख्या सेवा देणाऱ्या कंपन्यांना अधिक सावध राहावे लागणार.

‘ऑगस्टा’ म्हणजे ‘बोफोर्स’ नाही - मनोहर पर्रीकर

 

नवी दिल्ली - ‘ऑगस्टा वेस्टलॅंड प्रकरणात तत्कालीन हवाई दलप्रमुख एस. पी. त्यागी तसेच गौतम खेतान यांनी केवळ वाहत्या गंगेत हात धुतले. पण ही गंगा नेमकी कुठे जाते आहे, याचा शोध घेणार आहोत. ‘बोफोर्स’मध्ये आम्ही जे करू शकलो नाही, ते ‘ऑगस्टा वेस्टलॅंड’मध्ये करून दाखवू,’ अशा शब्दांत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी लोकसभेत काँग्रेसला इशारा दिला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या प्रकरणाची कालबद्ध चौकशी व्हावी, या मागणीचा पुनरुच्चार करत काँग्रेसने सभात्याग करून सरकारवर अविश्‍वास व्यक्त केला.
राज्यसभेनंतर आज लोकसभेत ‘ऑगस्टा वेस्टलॅंड’ गैरव्यवहारावरील लक्षवेधीवरून सत्ताधारी भाजप विरुद्ध काँग्रेस अशा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. सत्ताधारी बाकांवरून होणाऱ्या आरोपांच्या वेळी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी बऱ्याचदा आक्रमक झाल्याचे दिसले. भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी, या प्रकरणात तत्कालीन संरक्षणमंत्री ए. के. अँटनी आणि पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना बेकायदेशीर काम कोणी करायला लावले, याचा सरकारने खुलासा करावा अशी मागणी केली, तर किरीट सोमय्या यांनी काँग्रेसकडे अंगुलीनिर्देश करताना या गैरव्यवहाराचा संबंध बड्या राजकीय नेत्याच्या मित्रपरिवाराशी असल्याचा आरोप केला. काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी, भाजपच्या आरोपांचे मायाजाल उद्‌ध्वस्त करण्यासाठी काँग्रेसकडे सज्जड पुरावे असल्याचा दावा करताना, सत्तेत येऊन दोन वर्षे होऊनही मोदी सरकारने चौकशी का नाही केली, असा सवाल केला. सोनिया गांधींचे, अहमद पटेल यांचे नाव कोठेही नसताना पीटर होलेट याच्या पत्रातील सांकेतिक उल्लेखांच्या आधारे काँग्रेस नेतृत्वाला लक्ष्य करणे सरकारने चालवले आहे. लाचखोरीबाबत चर्चेत आलेले कुटुंब हे त्यागी कुटुंब आहे. गांधी कुटुंब नव्हे, असाही दावा त्यांनी केला.
राज्यसभेत निवेदन छापाचे उत्तर देणारे संरक्षणमंत्री पर्रीकर आज मात्र विलक्षण आवेशात होते. कागदपत्रांचा कमीतकमी आधार घेत त्यांनी हिंदीत मुद्देसूद उत्तर दिले. याप्रकरणी काँग्रेसने थयथयाट करण्याचे कारण काय, असा सवाल करताना ‘ज्यांनी अळूची भाजी खाल्ली असेल, त्यांचाच घसा खवखवेल,’ असा टोला पर्रीकर यांनी लगावला. मात्र, अळूला हिंदीत शब्द न सापडल्याने मराठीतलाच अळू शब्द त्यांनी वापरताच एकच हशा पिकला होता. लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन या मदतीला धावून आल्या आणि ‘अरबी के पत्ते’ हा शब्द त्यांनी सांगितला. या गैरव्यवहाराचा पत्ता २०१२ मध्ये लागला असताना तेव्हाच खरेदी थांबवली असती तर पुढचे रामायण घडले नसते, असे सांगून पर्रीकर म्हणाले, की संरक्षण खात्याच्या व्यवहारांशी संबंधित नोंदी ठेवल्याच्या ठिकाणी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर तीन जुलै २०१४ ला गूढ आग लागली होती. त्यात बऱ्याच फायली खाक झाल्या. पुरावे नष्ट करण्याचा हा प्रकार असावा. परंतु, ‘ऑगस्टा’ प्रकरणातील तीन महत्त्वाच्या फायली सुरक्षित राहिल्या. या प्रकरणाची सीबीआय चौकशी केली जाईल, असे ते म्हणाले.
वादग्रस्त ठरलेल्या ‘फिनमेकानिका कंपनी’ला ‘मेक इन इंडिया’मध्ये स्थान का दिले या टीकेचा प्रतिवाद करताना पर्रीकर म्हणाले, की या कंपनीकडून उत्पादन होणारे सुटे भाग, दारूगोळा युद्धनौकांवरील तोफांसाठी महत्त्वाचा आहे, त्यामुळे या कंपनीशी इतर व्यवहार थांबवले असले तरी सुटे भाग खरेदी केले जातील. कुणीतरी भ्रष्टाचारातून पैसे कमावले म्हणून आम्ही देशाची सुरक्षा धोक्‍यात आणणार नाही. सरकारने केलेली कारवाई ही इटलीच्या न्यायालयाच्या निकालापूर्वीची आहे. परंतु, आतापर्यंतची कारवाई ही छोट्या माशांवर होती, असे सूचकपणे सांगताना ते म्हणाले, की संबंधित हेलिकॉप्टर खरेदीवर शिक्कामोर्तब २००८ मध्ये झाले. हवाई दलाचे तेव्हाचे प्रमुख त्यागी २००७ मध्येच निवृत्त झाले होते, त्यांना चिरीमिरी मिळाली असेल; पण खरेदीचा निर्णय करणाऱ्यांना किती मलिदा मिळाला असेल, असा खोचक प्रश्‍नही त्यांनी केला. यातील वाहती गंगा कुठल्या दिशेने निघाली होती त्याचा शोध घेतला जाणार असून, कोणाचीही गय केली जाणार नाही, असे स्पष्ट करताना पर्रीकर यांनी ‘बोफोर्स’मध्ये जे करणे शक्‍य झाले नव्हते, ते या वेळी करून दाखवले जाईल, असे विरोधकांना बजावले.
आम्ही तर इटली पाहिलीही नाही, आम्ही तर इटलीत कोणाला ओळखतही नाही, आम्ही कधी इटलीच्या लोकांना भेटलेलो नाही. मात्र तरीही इटलीच्या लोकांनीच ‘त्यांना’ (सोनिया गांधी) गुन्हेगार बनविले, आम्ही काय करणार?
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

'हिज्बुल'चे तीन दहशतवादी ठार - पीटीआय

श्रीनगर - दक्षिण काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये सुरक्षा दले आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकींमध्ये हिज्बुल मुज्जाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे तीन दहशतवादी ठार झाले. पुलवामा जिल्ह्यातील पांझगामा खेड्यामध्ये काही दहशतवादी दबा धरून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या परिसराला घेरले होते, अशी माहिती लष्कराच्या सूत्रांनी दिली. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना शरण येण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांनी उलट गोळीबार केला, याला सैनिकांनीही सडेतोड उत्तर दिले.

रविवार, १ मे, २०१६

1 मे - जागतीक कामगार दिन

जागतीक कामगार दिन -
आपण १ मे हा दिवस “महाराष्ट्र दिन” आणि “जागतिक कामगार दिन” म्हणून साजरा करतो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली म्हणून साजरा करतो हे समजलं पण “जागतिक कामगार दिन” हा सुद्धा १ मे रोजीच का असा प्रश्न बऱ्याच जणांना पडू शकतो. त्यासाठीच त्याची पूर्वपीठीका काय आहे ते थोडक्यात समजावून घेण्याचा प्रत्यत्न करणार आहोत.
दरवर्षी आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा जागतिक कामगार दिन हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा विशेष दिन आहे. दर वर्षी १ मे रोजी जगभरातील ८०हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो. तसेच १ मे, १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणूनही महाराष्ट्रात साजरा केला जातो.
कामगार दिन कसा सुरू झाला?
औद्योगिक क्रांती झाल्यानंतर कामगारांना रोजगार मिळू लागला परंतु त्यांची पिळवणूकही होत होती. कोणत्याही सुविधा न देता अल्प मजुरीच्या बदल्यास १२ ते १४ तास राबवून घेतले जात होते. याविरोधात कामगार एकत्र आले व कामगार संघटनांनी निर्मिती झाली. प्रत्येक कामगाराला केवळ ८ तास काम असावे, असा ठराव करण्यात आला. परंतु उद्योजक जुमानत नसल्याने मोठे आंदोलन उभारण्यात आले. त्यानंतर कामगार संघटनांची दोन आंतरराष्ट्रीय अधिवेशने झाली व १८९१पासून १ मे हा कामगारदिन पाळण्यात येतो.
कामगारांच्या प्रमुख मागण्या कोणत्या होत्या :-
१. कायद्याने ८ तासांचा दिवस
२. लहान मुलांना कामाला लावण्यावर बंदी
३. महिला कामगारांच्या कामावर मर्यादा
४. रात्रीचे काम व धोक्याचे काम यासाठी खास नियम
५. कायद्याने साप्ताहिक सुट्टी
६. कामाचा मोबदला वस्तुच्या रूपात न देता नगद द्यावा.
७. समान कामासाठी समान वेतन आणि संपूर्ण संघटना स्वातंत्र्य. कामगारांच्या प्रमुख माग
्या होत्या
देशाच्या पर्यायाने जगाच्या विकासात कामगारांच्या योगदानाला सलाम करण्यासाठी १ मे हा दिवस जगभरात कामगारदिन म्हणून पाळला जातो. या दिवशी जगातील ८0 देशांमध्ये सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात येते. कामगार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. कामगार संघटना तसेच उद्योजक व सरकारतर्फे उत्कृष्ट कार्य करणार्‍या कामगारांचा गौरव करण्यात येतो.
अनेक वर्षानंतर अधिकाधिक देशांतले कामगार १ मे दीनाच्या सोहळ्यात सामील होत गेले आणि कामगार वर्गाच्या आंतरराष्ट्रीय ऐक्याचा विस्तार वाढत गेला. औद्योगिक राष्ट्रांतील कामगारांच्या जोडीला वसाहती देशातील शहरामध्ये लाखो कामगार १ मे दिन साजरा करु लागले. १ मे दिवस आंरराष्ट्रीय ऐक्याचे, स्वातंत्र्याचे मानवाकडून होणा-या मानवाच्या पिळवणूकीचा अंत करण्याचा प्रतीक बनला. साम्राज्यवादी भांडवलदारी व्यवस्थेच्या निषेधाचा अत्यंत व्यापक आविष्कार १ मे दिवसात होऊ लागला. १ मे दिवस ही सगळ्या कामगार चळवळीची परंपरा झाली. १९०५ च्या १ मे या दिवसासाठी लेनिनने लिहिलेल्या पत्रकात म्हटले होते, “कामगाराकामगारात, राष्ट्राराष्ट्रात, धर्माधर्मात असणारे शत्रुत्व नष्ट करा. या शत्रुत्वाने फक्त लुटारूंचा आणि जुलूमशहांचाच फायदा होतो, कारण ते कामगारवर्गातील अज्ञातावर आणि दुफळीवरच जगत असतात. ज्यू आणि ख्रिश्चन, फिन आणि स्वीडश, आर्मेनियन आणि तातार, पोलिश आणि रशियन, ल्याटिन आणि जर्मन सारे भेदभाव विसरून समाजवादाच्या एका झेंडयाखाली आपण सारे आगेकूच करूया. सर्व देशातील कामगारांची ही ऐक्यशक्ती, आंतरराष्ट्रीय समाजवादाची संघशक्ती, १ मे दिनाला आपल्या दलांची पाहणी करते आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व यासाठीचा लढा निर्धाराने आणि अविचलपणे पुढे नेण्यासाठी आपले बल संघटीत करते.”
वर्षे लोटली तशतशा अधिकाधिक देशांतल्या तुकडया १ मे दिनाच्या सोहळ्यात सामील होत गेल्या आणि कामगार वर्गाच्या आंतरराष्ट्रीय ऐक्याचा विस्तार वाढत गेला. औद्योगिक राष्ट्रांतील कामगारांच्या जोडीला वसाहती देशातील शहरामध्ये लाखो कामगार १ मे दिवस साजरा करु लागले आणि १ मे दिवस आंरराष्ट्रीय ऐक्याचे, स्वातंत्र्याचे मानवाकडून होणा-या मानवाच्या पिळवणूकीचा अंत करण्याचा प्रतीक बनला. साम्राज्यवादी भांडवलदारी व्यवस्थेच्या निषेधाचा अत्यंत व्यापक आविष्कार १ मे दिनात होऊ लागला. १ मे दिवस ही सर्व कामगार चळवळीची परंपरा झाली.
भारतातील पहिला कामगार दिन :-
भारतातील पहिला कामगार दिन तत्कालीन मद्रास शहरात १ मे १९२३ रोजी पाळण्यात आला. लेबर किसान पार्टी हिंदुस्थान या संघटनेने हा दिवस पाळला होता. याच दिवशी भारतात सर्वप्रमथ लाल बावटा वापरण्यात आला. कामगार नेते सिंगरवेलू चेत्तीअर यांनी कामगार दिन कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला होता. मद्रास उच्च न्यायालयासमोरील जागेत हा दिवस साजरा झाला होता.
१ मे कामगार दिनाची क्रांतीकारक परंपरा
१२५ वर्षापूर्वीची क्रूर भांडवलशाही कामगार वर्गाचा एकही हक्क मानायला तयार नव्हती. परंतु ८ तासांचा दिवसाचा लढा युरोप अमेरिकेत अगोदरच आकार देऊ लागला होता. अमेरिकेत बाल्टीमोर शहरात ऑगस्ट १८६६ मध्ये भरलेल्या एका कामगार मेळाव्यात ८ तासाचा दिवस मागणारा सराव झाला. त्यानंतर दोन आठवडयांनी मार्कसने स्थापलेल्या पहिल्या इंटरनेशनलची परिषद जिनिव्हात भरली होती. ठरावात म्हटले होते, "कामाच्या दिवसाला कायद्याने मर्यादा घालणे ही प्रथम आवश्यक गोष्ट आहे. ती होत नाही तोपर्यंत कामगारवर्गाची सुधारणा आणि मुक्ती करण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरतील. कामाच्या दिवसावरील कायदेशीर मर्यादा म्हणून ही परीषद ८ तासाची सूचना करते." १८६६ पासून १८८६ पर्यंत कामगार चळवळ अनेक अग्निदिव्यांतून गेली. कित्येकांची कत्तल झाली. कित्येक फासावर गेले. पण चळवळीची आगेकूच चालूच राहिली.
मे १८८६ पर्यंत हजारो कामगार आणि अनेक संघटना ८ तासांच्या दिवसासाठी संप करण्यास कटिबध्द झाल्या होत्या. ह्या संपाने शिकागो शहरात सर्वात लढाऊ रूप धारण केले. हजारो कामगारांनी त्यात भाग घेतला. ३ मेला कामगारांवर पोलिसांनी केलेल्या हल्ल्यात सहा कामगार ठार झाले व अनेक जखमी झाले. त्याचा निषेध म्हणून ४ मेला मार्केट चौकात कामगारांचे निदर्शन होते. निषेधसभा शांततेने पार पडली पण नंतर पोलिसांनी अचानक हल्ला चढवला. जमावावर एक बॉम्ब फेकण्यात आला व त्यात एकपोलिस अधिकारी ठार झाला. नंतर उडालेल्या चकमकीत चार कामगार व काही पोलिस ठार झाले. आल्बर्ट पार्सान्स, ऑगस्ट स्पायज, ऍडॉल्फ फिशर आणि जॉर्ज एंगेल या कामगार पुढा-यांना खटल्यात गुंतवून फाशी देण्यात आले. आणखी कित्येक लढाऊ कार्यकर्त्यांना दीर्घ मुदतीच्या कारावासाच्या शिक्षा झाल्या. खटल्यामध्ये आरोपीनी धीरोदात्तपणे आपली बाजू मांडली. स्वत:चा बचाव करताना त्यांनी शासनावर प्रत्यारोपाची सरबत्ती केली. पार्सन्स पोलिसांना सापडला नव्हता पण स्वत:हून तो कोर्टात हजर झाला आणि आपल्या सहका-यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिला. ११ नोव्हेंबर रोजी या चौघांना फाशी झाली. स्पायजचे शेवटचे शब्द होते, "अशी एक वेळ येईल की जेव्हा आमचे मौन आमच्या शब्दांमध्ये जास्त बोलके ठरेल."
कामगारांच्या प्रमुख मागण्या होत्या
१. कायद्याने ८ तासांचा दिवस
२. लहान मुलांना कामाला लावण्यावर बंदी
३. महिला कामगारांच्या कामावर मर्यादा
४. रात्रीचे काम व धोक्याचे काम यासाठी खास नियम
५. कायद्याने साप्ताहिक सुट्टी
६. कामाचा मोबदला वस्तुच्या रूपात न देता नगद द्यावा.
७. समान कामासाठी समान वेतन आणि संपूर्ण संघटना स्वातंत्र्य.
परंतु केवळ आर्थिक मागण्यांचा कार्यक्रम जाहीर करून भागणार नाही. "आंतरराष्टीय प्रमाणावर एक वर्ग म्हणून संघटीत झालेले कामगारच श्रमिक जनतेला व सा-या मानवजातीला मुक्त करू शकतात, भांडवल ताब्यात घेऊन उत्पादन साधने सार्वजनिक मालकीची करण्यासाठी या वर्गानेच राजकीय सत्ता हस्तगत केली पाहिजे" अशा प्रकारे कामगार वर्गाचा तात्कालीक मागण्याचा लढा समाजवादाच्या अंतिम उद्दीष्टाशी जोडण्यात आला होता.
आंतरराष्ट्रीय परिषदेला फार मोठा प्रेतिसाद मिळाला. युरोपच्या बहुतेक देशात औद्योगिक शहरामध्ये १ मे १८९० रोजी लाखो कामगार रस्त्यावर उतरले. जर्मनी, फ्रान्स आणि डेन्मार्कमध्ये काही शहरात प्रचंड निदर्शने झाली. व्हिएन्नामध्ये एक लाख कामगार बुडापेस्ट मध्ये साठ हजार मार्सेल्स व ल्यॉन्समध्ये २५ ते ४० हजार प्रागमध्ये ३५ हजार, रूलै, लिला, स्टॉकहोम, शिकागो वगैरे शहरात २० ते ३० हजार वॉर्सामध्ये २० हजार आणि स्पेनच्या वर्सिलोना शहरात सुमारे एक लाख कामगारांनी एक मेच्या संपात भाग घेतला. रशियात तर ट्रेड युनियन चळवळीवर बंदी होती आणि राजकीय पक्ष बेकायदेशीर होते. तेथे मेदिनाला सामुदायिक धरपकड, तुरूंगवास, गोळीबार यांचे सत्र चालूच असायचे परंतु तरीही मे दीनाला वाढात प्रतिसाद मिळत गेला. आणि लोकशाहीच्या लढयात मे दिनाचे महत्त्व वाढत गेले.
वर्षे लोटली तशतशा अधिकाधिक देशांतल्या तुकडया मे दीनाच्या सोहळ्यात सामील होत गेल्या आणि कामगार वर्गाच्या आंतरराष्ट्रीय ऐक्याचा विस्तार वाढत गेला. औद्योगिक राष्ट्रांतील कामगारांच्या जोडीला वसाहती देशातील शहरामध्ये लाखो कामगार मे दिन साजरा करु लागले आणि मे दिन आंरराष्ट्रीय ऐक्याचे, स्वातंत्र्याचे मानवाकडून होणा-या मानवाच्या पिळवणूकीचा अंत करण्याचा प्रतीक बनला. साम्राज्यवादी भांडवलदारी व्यवस्थेच्या निषेधाचा अत्यंत व्यापक आविष्कार मे दिनात होऊ लागला. मे दिन ही समग्र कामगार चळवळीची परंपरा झाली. १९०५ च्या मे दिनासाठी लेनिनने लिहिलेल्या पत्रकात म्हटले होते, "कामगाराकामगारात, राष्ट्राराष्ट्रात, धर्माधर्मात असणारे शत्रुत्व नष्ट करा. या शत्रुत्वाने फक्त लुटारूंचा आणि जुलूमशहांचाच फायदा होतो, कारण ते कामगारवर्गातील अज्ञातावर आणि दुफळीवरच जगत असतात. ज्यू आणि ख्रिश्चन, फिन आणि स्वीड, आर्मेनियन आणि तातार, पोलिस आणि रशियन, लेट आणि जर्मन सारे भेदभाव विसरून समाजवादाच्या एका झेंडयाखाली आपण सारे आगेकूच करूया. सर्व देशातील कामगारांची ही ऐक्यशक्ती, आंतरराष्ट्रीय समाजवादाची संघशक्ती, मे दिनाला आपल्या दलांची पाहणी करते आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व यासाठीचा लढा निर्धाराने आणि अविचलपणे पुढे नेण्यासाठी आपले बल संघटीत करते."
गेली ७० पेक्षा अधिक वर्षे आपल्या भारतात कामगार वर्ग मे दिन साजरा करीत आला आहे. खरे म्हणजे ८ तासाच्या कामाच्या दिवसाची मागणी कलकत्याच्या रेल्वे कामगारांनी १८६२ सालीच केली होती. दुसरे महायुध्द सुरू झाले तेव्हा पहिला युध्दविरोधी संप मुंबईत कम्युनिस्टांनी संघटीत केला. २ ऑक्टोबर १९३९ रोजी मुंबईत युध्दविरोधी निषेध संपाची घोषणा केली. ९० हजार कामगारांनी त्यात भाग घेतला. कामगारांच्या सभेत एकमताने मान्य झालेल्या ठरावात म्हटले होते, "साम्राज्यवादी सत्ता ज्यांना अत्यंत विनाशक युध्दाच्या खाईत लोटू पहात आहेत त्या जगातील जनतेला आणि आंतरराष्ट्रीय कामगारवर्गाला ही सभा ऐक्यभावाचा संदेश पाठवित आहे. या सभेच्या मते हे युध्द म्हणजे आंतरराष्ट्रीय कामगारवर्गाला एक आव्हान आहे आणि मानवतेविरूध्दच्या ह्या साम्राज्यवादी कारस्थानांचा धुव्वा उडविणे हे विभिन्न देशांतील कामगारांचे आणि जनतेचे कर्तव्य आहे असे ही सभा जाहीर करीत आहे
मित्रांनो, २१ एप्रिल १८५६ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये कामगारांनी एक दिवसाचा संप केला. त्यांची प्रमुख मागणी होती.
८ तास कामाचे
८ तास करमणूकीचे
८ तास विश्रांतीचे
*संयुक्त महाराष्ट्र व कामगार चळवळ*
महाराष्ट्र  राज्याच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाली. भारतीय स्वातंत्र्याची ५०वर्षे पूर्ण होणे आणि ती साजरी होणे हे समजण्यासारखे आहे. पण एखाद्या राज्याच्या सुवर्णमहोत्सवाला वाढदिवस या पलिकडे काय महत्त्व आहे ? असा प्रश्न कोणी विचारला तर तो गैर म्हणता येणार नाही. पण त्याचे खरे उत्तर असे आहे, की महाराष्ट्र राज्याची स्थापनेचा सुवर्णमहोत्सव हा एका तत्त्वनिष्ठ लोकशाही चळवळीचा गौरव आहे. ते राज्य मराठी आहे म्हणून नव्हे , तर हे राज्य ज्या वैचारिक-राजकीय प्रक्रियेतून निर्माण झाले, ती आजच्या समस्यांसाठी महत्वाची आहे म्हणूनच.   
१९५०  मध्ये प्रगतीशील लोकशाही  राज्याची प्रतिज्ञा या देशाने भारतीय घटनेच्या रूपाने घेतली. त्याच सूत्राला धरून, मराठी  भाषिकांचे राज्य स्थापन करण्याची मागणी घेऊन १९५० ते १९६० च्या दरम्यान् चळवळ झाली, तिचा आधार भाषिक विभाजनाचा नव्हता, तर लोकभाषेच्या आधारावर देशाचे  राजकीय व्यवस्थापन करण्याचा, म्हणजे खऱ्या अर्थाने लोकशाही राज्याचा होता. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे नेतृत्व डाव्या कामगार –शेतकरी नेत्यांकडे होते. हा केवळ योगायोग नाही. समाजवादी भारतात समाजवादी महाराष्ट्र हा सर्व जनतेचा ध्येयवाद होता.ती त्यांची स्वातंत्र्य चळवळीतून आलेली आकांक्षा होती.
ते राज्य निर्माण करण्यासाठी  भाषावार प्रांतरचना निर्माण  होणे आवश्यक होते. शिवाय  ते तत्त्व  फक्त महाराष्ट्रासाठी  नव्हते. गुजरात, आंध्र, तेलंगण, मद्रास-तामिळनाडू या साऱ्यांसाठी एकच सूत्र होते. मराठीपणाच्या नावाने दंगे पेटविणारा द्वेष त्या आंदोलनात नव्हता की विधानसभेत राडेबाजी आणि परीक्षा केंद्रांवर हल्ले करण्याची बौद्धिक दिवाळखोरी नव्हती. राजकारणामधील एखादी सुपारी नव्हती की स्पर्धात्मक बोली नव्हती.
आणि म्हणूनच  या मराठी राज्याची लोकशाही  मागणी जेंव्हा प्रत्यक्षात  आणायची तो मूहूर्त जागतिक कामगार दिनाचा ठरविण्यात  आला.म्हणूनच १मे, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन हे एकाच दिवशी येतात. हा काहींना  केवळ एक योगायोग आहे, असे  वाटते. कारण त्या कोणालाच याची आठवण नाही की, मुंबईसह आजच्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी या राज्यातील कामगार-शेतकरी वर्गाने डावे पक्ष, डावे विचारवंत, साहित्यिक आणि नेते यांच्या नेतृत्वाखाली चळवळ केली होती. त्यासाठी लढा करताना १०५ कार्यकर्त्यांनी प्राणार्पण केले. त्यांचे नेतृत्व करणारे आचार्य अत्रे ,कॉम्रेड डांगे, कॉम्रेड मिरजकर, साथी एस्. एम्. जोशी, क्रांतिसिंह कॉम्रेड नाना पाटील, दादासाहेब गायकवाड या सारखे दिग्गज नेते हे कामगार-शेतकरीवर्गाची ध्वजा हातात घेतलेले नेते होते.
त्या  मराठी राज्याची द्वाही सह्याद्री आणि सातपुड्याच्या डोंगरकपाऱ्यांमध्ये घुमवून महराष्ट्राच्या शरीरावर रोमांच उभे करणारे  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि अमर शेख हे त्याच लाल राजकीय मातीचे पुत्र होते. कामगार चळवळ त्यांच्या रक्तामध्ये होती. तीच त्यांच्या जीभेवरून बोलत होती.मुंबईसह मराठी भाषिकांचे राज्य  आणि कामगार- शेतकऱ्यांच्या राज्याचे स्वप्न हे या सर्वांच्या विचारामध्ये दुधामध्ये साखर मिसळावी त्या रीतीने त्यांच्या विचारामध्ये एकजीव झालेले होते.
संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती ही कामगार-शेतकऱ्यांच्या चळवळीमधून झालेली आहे. किंबहुना कामगार चळवळ आणि महाराष्ट्राची निर्मिती हे वेगळे करताच येणार नाहीत, इतके त्यांच्यामध्ये एकत्व आहे केवळ गतवैभवाच्या गोष्टी काढण्यासाठी नाही, तर त्यातून  वर्तमानातील काही राजकीय समस्यांना सामोरे जाण्यासाठी निश्चित सूत्रे मिळू शकतात
संयुक्त महाराष्ट्राचा  वर्गीय –आर्थिक पाया
मुळात संयुक्त महाराष्ट्रासाठी  लढा करावा लागला त्याचे कारण मुंबई. मुंबईचा  .महाराष्ट्रामध्ये समावेश करण्यावरून खरा संघर्ष निर्माण झाला. त्याचे कारण मुंबई ही राज्याचीच नव्हे, तर देशाची आर्थिक राजधानी होती. मालक वर्ग अमराठी होता, तर कामगार मात्र प्रामुख्याने मराठी भाषिक होते.
देशामध्ये भाषावर प्रांतरचना निर्माण  करण्याचा ठराव कॉंग्रेसने तसे म्हणले,तर 1920 सालीच केलेला होता.अगदी लोकमान्य टिळकांनीदेखील  1893 साली अशाच प्रकारची कल्पना,एकूण भारताच्या संदर्भात  मांडलेली होती.  संयुक्त महाराष्ट्राची मागणी आणि संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापन 1946 मध्येच झाली होती. परंतु महाराष्ट्राचा प्रश्र्न हा अधिक जटील बनला होता, मुख्यतः मुंबई आणि विदर्भाच्या मुद्यावर. त्यातल्या त्यात मुंबईचा समावेश महाराष्ट्रात करण्याचा मुद्दा फारच ताणला जाणार होता. त्याचे कारण त्याच्या मुळाशी अगदी उघड असा आर्थिक मुद्दा होता. शिवाय वर्गसंघर्ष होता. 1952 मध्ये आंध्र प्रदेशाच्या मागणीसाठी प्रचंड चळवळ झाली. आमरण उपोषणामध्ये श्रीरामलू यांचा मृत्यू झाला. त्यानंतर स्वतंत्र आंध्राच्या मागणीला  नेहरू यांना मान्यता द्यावी लागली.  त्याच धर्तीवर मराठी महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी चळवळ जोर येणे अपरिहार्यच होते.
मुंबईच्या प्रश्नावर झालेल्या विराट  चळवळीचा पाया  केवळ भाषिक  नव्हता,तर वर्गीय होता. मुंबईतील बड्या भांडवलदार मंडळींना मराठी राज्यापेक्षा केंद्रशासित किंवा स्वतंत्रच राहणे  पसंत होते.त्यामध्ये पुरूषोत्तम ठाकूरदास यांच्या नेतृत्वाखालील बॉम्बे सिटीझन्स कमिटी होती. टाटांसारख्या बड्या भांडवलदारांनी गिरणीमालकांनी ,स.का. पाटील, मोरारजी देसाई  यांच्यासारख्या कॉंग्रेसी नेत्यांनी,मुंबईमध्ये 43टक्के लोकसंख्या मराठी असूनदेखील, मुंबई ही महाराष्ट्राला जोडता कामा नये, असे अतिशय आग्रहाने मांडले होते.
पण त्याचे कारण भांडवलदार  अमराठी होते असे नाही. तर, जे मराठी होते,ते मुख्यतः  गिरणी कामगार,छोटे व्यापारी,  हमाल, आणि काही प्रमाणात  तृतीय श्रेणी कर्मचारी  किंवा शिक्षक मध्यमवर्गीय होते. शिवाय  यातील बहुसंख्य सर्व वर्ग मुंबईत मुळात कामगार किंवा श्रमिक म्हणून डाव्यांच्या नेतृत्वाखाली प्रत्यक्ष कामगार संघटनांमध्ये होता.  मध्यमवर्गीय एकूण  मराठी वैचारिक विश्वातदेखील लोकशाही समाजवादी विचारांचाच अप्रत्यक्ष प्रभाव होता. या सर्वांची धास्ती या भांडवलदारांना होती.
स्वातंत्र्य चळवळीमध्ये 1920 पर्यंत टिळक, गोखलेयांच्यासारख्या  मराठी  नेत्यांचे , तर सामाजिक मुक्तीच्या  चळवळीत तर देशात  महात्मा  फुले आणि डॉ.बाबासाहेब  आंबेडकरांचेच निर्विवाद  नेतृत्व होते. 1922 नंतर महात्मा  गांधींच्या नेतृत्वाखाली लढा जास्त व्यापक आणि सार्वत्रिक झालेला असला, तरी त्यामध्ये मराठी कामगार आणि शेतकऱ्यांचा जो उत्साह आणि सहभाग होता, त्याची तुलना फक्त बंगालशीच होऊ शकत होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ही सर्व उर्जा संयुक्त महारष्ट्राच्या मागणीसाठी  पुन्हा रस्त्यावर आली होती. 
लढले ते कामगार आणि शेतकरी
भांडवलदारांच्या विचारामागील  प्रमुख कारण असे होते  की,  मराठी भाषिक राज्यातील  मुंबईमध्य़े सरकारवर भांडवलदारांपेक्षा  कामगार-शेतकऱ्य़ांचा, समाजवादी  विचाराचाच जास्त प्रभाव  राहील, अशी त्यांची अटकळ  होती. कारण त्या लढ्याचे  नेते होते, कॉम्रेड डांगे,  एस्. एम्. जोशी आचार्य अत्रे, त्याचे कवी होते, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि अमर शेख.हे सर्व एक तर कम्युनिस्ट किंवा समाजवादी. त्यांचे जनतेला आवाहन केवळ मराठी भाषिकांच्या राज्याचे नव्हते. नवा महाराष्ट्र समाजवादी असेल, असे ते काहीसे स्वप्र स्वरूपात मांडत होते. त्यामुळे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा केला तो कामगारांनी, आणि भावनिकदृष्ट्या त्यांच्याशी नाळ जोडलेल्या शेतकऱ्यांनी.
संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश 
यशवंतराव चव्हाणांच्या हातातून  आणला गेला. संयुक्त महाराष्ट्राची  मागणी मान्य झाल्यानंतरच्या काळात, मुंबई वगळता काँग्रेसला त्यांचे स्थान पुन्हा प्राप्त झाले.कारण त्यानंतरच्या काळात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सहकार क्षेत्राचा फार वेगाने विकास होत गेला. त्यामधून साखर कारखान्यांची मोठ्याप्रमाणात निर्मिती झाली.
 

अब हमारे रास्ते हम तय करेंगे

१९९९ साल.....कारगीलमध्ये पाकिस्तानी घुसखोर शिरले होते. त्यांचे नेमके तळ कुठे आहेत हे जाणून घेण्याची ठोस यंत्रणा आपल्याकडे नव्हती. भारताने अमेरिकेकडे अशा यंत्रणेसंबंधी मदत मागितली. आणि अमेरिकेने त्यास नकार दिला. त्या क्षणापासून आपल्या देशात अशी व्यवस्था निर्माण करण्याचे स्वप्न आपल्या शास्त्रज्ञांनी पाहिले आणि त्या दिशेने प्रयत्नदेखील सुरु केले!!

आज या प्रयत्नांचा अखेरचा टप्पा आपण गाठला. अथक मेहनतीनंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांनी आज सातवा आणि अखेरचा नेव्हिगेशन उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केला. आता भारताकडे जीपीएस आणि ग्लोनास सारखे स्वतःचे साधन असेल.

अत्यंत गौरवाच्या या क्षणी मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी अतिशय सूचक उद्गार काढले;
"'अब हमारे रास्ते हम तय करेंगे। कैसे जाना है, कैसे पहुंचना है, ये हमारी अपनी तकनीक के माध्यम से होगा।"
आपल्या साऱ्यांसाठीच हा अभिमानाचा क्षण आहे. या उपक्रमात सामील सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन आणि आभारदेखील!!