Pages

पेज

बुधवार, १८ मे, २०१६

भारत-संयुक्त राष्ट्रसंघ यांच्या संयुक्त टपाल प्रशासनाद्वारे ‘वूमन-ही फॉर शी’ तिकीट जारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘वुमन - ही फॉर शी’ हे टपाल तिकीट संयुक्तरित्या जारी करण्यासंदर्भातली माहिती देण्यात आली. टपाल खाते आणि संयुक्त राष्ट्रसंघ टपाल प्रशासन (UNPA) यांच्यात या उद्देश्याने फेब्रुवारी 2016 मध्ये एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून हे तिकीट संयुक्तरित्या जारी करतांना, 20 से-टेनांटसचे पान तसेच 2 तिकीटे असलेल्‍या छोट्या पानाच्या स्वरुपात ही तिकीटे छापण्यात आली.

संयुक्त राष्ट्रसंघाचा ‘वूमन - ही फॉर शी’ हा उपक्रम लिंग समानतेसाठी एकता दर्शवणारी चळवळ आहे. सर्व सामाजिक व्याख्यांच्या संदर्भातील फायद्यांसाठी मानवजातीतील अर्ध्या भागाचा दुसऱ्या भागाला पाठिंबा देण्यासाठी एकत्र आणण्याची ही चळवळ आहे. हे संयुक्तरित्या जारी केलेले तिकीट जगभरातल्या सर्व महिलांच्या सक्षमीकरणाला समर्पित करण्यात आले आहे. यामुळे भारत सरकार ठामपणे समर्थन देत असलेल्या लिंग समानतेच्या मुद्याला मोठी चालना मिळेल. अश्याप्रकारे, टपाल खाते आणि UNPA यांच्यात 8 मार्च 2016 हा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याकरता संयुक्त टपाल तिकीट जारी करण्याबाबत एकमत झाले आहे.

PIB

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा