Pages

पेज

गुरुवार, १९ मे, २०१६

फिजीच्या पंतप्रधानांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट

फिजीचे पंतप्रधान सेवानिवृत्त रिअल ॲडमिरल जोसैया वोरेक बेनीमारामा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधानांनी 20 फेब्रुवारी 2016 रोजी फिजीत प्रचंड विध्वंस करणाऱ्या “विंस्टन” चक्रीवादळामुळे झालेल्या जीवित आणि वित्त हानी बद्दल दु:ख व्यक्त केले. फिजी मध्ये मदत आणि पुनर्वसनाच्या कार्यात सर्वतोपरी सहाय्य करण्यासाठी भारत तयार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

चक्रीवादळानंतर भारताने दिलेली एक दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची मदत आणि 45 टन मदत सामुग्री बद्दल पंतप्रधान बेनीमारामा यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले.

ऑगस्ट 2015 मध्ये जयपूर  येथे आयोजित केलेल्या दुसऱ्या एफआयपीआयसी शिखर परिषदेत प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावरील देशांसोबत आपत्ती व्यवस्थापनात अधिक सहकार्य करण्यासाठी व्यक्त केलेल्या कटीबद्धतेचा पंतप्रधान मोदी यांनी पुनरुच्चार केला. या विभागात अंतराळ तंत्रज्ञान संशोधन केंद्राच्या स्थापनेच्या माध्यमातून आपसातील सहकार्य दृढ करण्याचाही यात समावेश आहे.

सौर आणि नवीकरणीय ऊर्जा, कृषी, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याच्या संधीबाबतही दोन्ही नेत्यादरम्यान चर्चा झाली.

PIB

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा