Pages

पेज

मंगळवार, १७ मे, २०१६

एअर चीफ मार्शल अरुप राहा यांची “तेजस” या स्वदेशी लढाऊ विमानाद्वारे गगन भरारी

हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अरुप राहा यांनी आज बंगळूरु मधल्या HAL  इथं स्वदेशी बनावटीचं हलके लढाऊ विमान (तेजस) मधून गगन भरारी घेतली.

एअरोनॉटीकल डेव्हलपमेंट एजन्सी (ADA) ने “तेजस” चा आराखडा तयार केला असून  HAL ने बंगळुरु इथे त्याची निर्मिती केली आहे. हे लढाऊ विमान अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे.

एअर चीफ मार्शलनी स्वत: हे लढाऊ विमान उडवले आणि हवेतून हवेत तसेच आकाशातून जमिनीवर मारा करणारी क्षमता त्यांनी स्वत: हाताळली. तसेच विमानात असणाऱ्या अत्याधुनिक रडार आणि इतर प्रणालीचे स्वत: मूल्यमापन केलं. स्वत: लढाऊ विमानांचे कुशल वैमानिक असणाऱ्या अरुप राहा यांनी तेजसच्या उड्डाण क्षमतेची प्रशंसा केली. अशा प्रकारचे विमान निर्मिती केल्याबद्दल त्यांनी ADA आणि HAL चं अभिनंदन केलं.

बंगळुरु मधल्या  HAL येथे तेजस लढाऊ विमानांची निर्मिती केली जात असून, येत्या 1 जुलै 2016 रोजी या विमानांची पहिली तुकडी तयार करण्याचे भारतीय हवाई दलाचे उद्दिष्ट आहे. तसेच भारतीय हवाई दलाने अत्याधुनिक LCA MK1A संरचनेसाठी अतिरिक्त 80 तेजसची मागणीही नोंदवली आहे.

PIB

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा