🎉 गणरायाची
ढोल-ताशाच्या गजरात मोठ्या भक्तीभावाने प्रतिष्ठापना
🎉 पहिला
सार्वजनिक गणेश उत्सवाची परंपरा असलेला मानाचा आजोबा गणपतीची प्रतिष्ठापनाची
पुजा ट्रस्टी अध्यक्ष अॅड.गौरीशंकर फुलारी यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता संपन्न
🎉पोस्टाच्या
तिकिटावरून इंदिरा गांधी व राजीव गांधींचे फोटो काढण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ
युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांच्या
निवासस्थानासमोर आज जोरदार निदर्शने केली.
🎉 समीर गायकवाडला
अटक झाल्यानंतर सनातन संस्थेवर बंदी घालावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टीचे नेते
रामदास आठवले यांनी केली आहे.
🎉 नितिशकुमार
म्हणतात विकासाच्या मुद्यावर चर्चा करा. पण चर्चा करण्यासारखं काय आहे? गुजरात प्रथम स्थानावर आहे तर बिहार २१व्या.
- अरूण जेटली
🎉ग्रीनपीस
इंडियाची चौकशी CBI कडे सोपवण्याचा
प्रस्ताव सध्यातरी केंद्र सरकारने बासनात गुंडाळला आहे.
🎉नवी दिल्लीत
डेंग्युमुळे मरण पावलेल्यांची संख्या १५ झाली आहे.
🎉 राज्य सरकारला
मांसविक्री बंदी मागे घ्यायला लावणारा उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च
न्यायालयाने कायम ठेवला आहे. मांसविक्री बंदीसारखे निर्णय लोकांवर लादता येत
नाहीत असेही न्यायालयाने सुनावले आहे
🎉ग्रामपंचायतीच्या
निवडणुका लढवण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक करण्याच्या हरयाणाच्या
कायद्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे हरयाणामध्ये अशिक्षित
व्यक्तिनेदेखील निवडणूक लढवण्याचा मार्ग पुन्हा मोकळा झाला आहे.
🎉युवा
टेनीसपटूंना संधी मिळावी यासाठी लिआंडर पेसने न्यूझीलंडच्या दौ-यातून माघार
घेतली आहे.
|
For Advertise in this Section please connect 9422264829 or mail at sainik.darpan@gmail.com
!doctype>
गुरुवार, १७ सप्टेंबर, २०१५
ठळक घडामोडी
एक पद एक निवृत्तीवेतन साठी साताऱ्यात मोर्चा
सातारा - सैन्यदलाप्रमाणे अर्धसैनिक दलाच्या आजी-माजी सैनिकांना वन रॅंक वन पेन्शन व इतर सोयी सवलती मिळाव्यात, या मागणीसाठी जिल्ह्यातील अर्धसैनिक दलाच्या माजी सैनिकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले.
बीएसएफ माजी सैनिक वेलफेअर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष मोहन धोंडवड व उपाध्यक्ष अजित कट्टे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील बीएसएफच्या माजी सैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयापासून मोर्चास सुरवात केली. हा मोर्चा पोवई नाक्यावरून पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. मोर्चात सहभागी झालेल्या माजी सैनिकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी घोषणाबाजी केली. यावेळी दिलेल्या निवेदनात असोसिएशनने म्हटले आहे की, आर्मी, नेव्ही इतकेच कामकाज बीएसएफच्या जवानांना देखील असते. पण, सैन्य दलांप्रमाणे अर्धसैनिक दलांना कॅन्टीन सुविधा, नोकरीत आरक्षण, इतर शासकीय सुविधा मिळत नाहीत. आर्मीचा जवान व बीएसएफचा जवान यात फरक न करता त्यांनाही सैन्य दलाप्रमाणे सवलती मिळणे आवश्यक आहे. गुजरात, केरळ, गोवा, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाना, पंजाब, दिल्ली या राज्यांमध्ये सैन्य दलाप्रमाणे सर्व सोयी-सवलती अर्धसैनिक दलांना लागू केलेल्या आहेत. या सुविधा महाराष्ट्र राज्यातील अर्धसैनिक दलांच्या आजी- माजी सैनिकांना लागू कराव्यात. तसेच वन रॅंक वन पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी माजी बीएसएफ कमांडंट तानाजी पवार, कोल्हापूर माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष संजय खैरमोडे, बीएसएफ माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष मोहन धोंडवड, सचिव राजेंद्र शिंदे, उपाध्यक्ष अजित कट्टे तसेच जिल्ह्यातील बीएसएफचे माजी सैनिक उपस्थित होते.
[ सकाळ वृत्तसेवा ]
मंगळवार, १५ सप्टेंबर, २०१५
ठळक घडामोडी
⚡अहमदनगर:
भगवानगड पाणी पुरवठा योजनेसाठी १ कोटी ६१ लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता,
पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर आणि
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीतील बैठकीत निर्णय
⚡मुंबई: 'बेस्ट'तर्फे चर्चगेट ते अंधेरीदरम्यान १६५ अतिरिक्त बस सोडण्यात येणार
⚡पुणे: कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टने नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील खंडोबावाडी गाव घेतले दत्तक
⚡पुणे: कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टतर्फे दरवर्षी दिले जाणारे पुरस्कार यंदा रद्द, पुरस्काराचा निधी दुष्काळग्रस्तांसाठी वापरणार
⚡७/११ मुंबई बॉम्बस्फोटातील १२ दोषींच्या शिक्षेची सुनावणी उद्या होणार.
⚡वेस्टर्न रेल्वेची रखडपट्टी उद्यापर्यंत कायम, रेल्वे वाहतूक पूर्ववत होण्यास अजून १५ तास लागू शकतात.
⚡ मराठी भाषा येत असेल तरच मिळेल रिक्षाचा परवाना. रिक्षा परवान्यासाठी मराठी येणं गरजेचं - परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची माहिती.
⚡आपचे आमदार सोमनाथ भारती यांना हायकोर्टाचा दिलासा, १७ सप्टेंबरपर्यंत अटक होणार नाही.
⚡नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी 'नाम' फाऊंडेशनची स्थापना, एसबीआयच्या बँक अकाऊंटमध्ये थेट मदत जमा करता येणार.
⚡अहमदनगर: उत्सव काळात चाचणी परीक्षा न घेण्याचा आदेश धाब्यावर. १४ ते ३० या काळात नगर जिल्ह्यात शाळांच्या परीक्षा होणार
⚡पटेल आरक्षणास 'पटेलबाईं'चा 'हार्दिक' नकार
⚡मक्का येथे झालेल्या दुर्घटनेत ११ भारतीयांचा मृत्यू तर १९ जण जखमी- विकास स्वरुप, प्रवक्ता परराष्ट्र मंत्रालय
⚡पश्चिम रेल्वेवरील अपघातामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रकही बदलण्यात आले आहे.
⚡दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील रुग्णालयांना अचानक भेट दिली, दिल्लीत डेंग्यूची साथ आल्याच्या पार्श्वभूमीवर केला पाहणी दौरा.
⚡दुष्काळग्रस्तांसाठी बॉलिवूडही सरसावले, अभिनेता अक्षय कुमार बीडमधील दु्ष्काळग्रस्तांना करणार ९० लाखांची मदत. पुढील ६ महिन्यात अक्षयकडून मदतीसाठी दर महिना १५ लाख रुपये देण्यात येणार आहेत.
⚡ पश्चिम रेल्वेवरील अपघातानंतर घाबरलेल्या प्रवाशांनी लोकलमधून उडी मारली असून त्यात २ जण जखमी झाले आहेत. दरम्यान या अपघातामुळे रेल्वेचा खोळंबा झालेला असतानाच त्याचा परिणाम रस्ते वाहतुकीवरही झाला असून वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत
⚡इंदूर - अहमदाबाद महामार्गावर सरदारपूर २४ टन स्फोटक पदार्थ असलेला ट्रक आढळला, ट्रकचालक आणि अन्य एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
source[Internet News]
More details
हिंदी मे http://sainikdrpanhindi.blogspot.in/In English http://sainikdarpan.blogspot.in
सोमवार, १४ सप्टेंबर, २०१५
ठळक घडामोडी
▫स्वातंत्र्यवीर
सावरकरांवर आधीच्या सरकारांनी अन्याय केला असल्याची भावना व्यक्त करत या प्रखर
देशभक्ताला भारत रत्न पुरस्काराने गौरवण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय
राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
▫गजेंद्र चौहान यांच्या
नियुक्तीविरोधात आंदोलन करणा-या FTIIच्या विद्यार्थ्यांना अभिनेता आमिर खानचा
पाठिंबा.
▫राज्य सहकारी बँक
घोटाळाप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर आरोपपत्र. २८ सप्टेंबरला होणार
सुनावणी.
▫उद्योग करण्यासाठी कुठला
देश जास्त सुखकर आहे, या संदर्भातल्या वर्ल्ड बँकेच्या अहवालामध्ये १८९ देशांमध्ये भारत १४२व्या
स्थानावर आहे .
▫ ७/११ मुंबई साखळी
बॉम्बस्फोटातील १२ दोषींच्या शिक्षेवरील सुनावणी आज अपूर्ण राहिली असून उद्या
सुनावणी सुरू राहणार आहे.
▫शाहीस्नानासाठी ३ टीएमसी
पाण्याची गरज नाही. लोकांना पिण्यासाठी पाणी नसताना एवढं पाणी सोडण्याची काय गरज.
धर्म महत्वाचा की लोकांची तहान - हायकोर्टाने राज्यसरकारला फटकारले.
▫मालेगावमधील निमगाव येथे
नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत चोरी, तिजोरी फोडून १३ लाखांची रोकड पळवली.
▫दुष्काळाच्या मुद्यावर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संध्याकाळी घेणार पंतप्रधान नरेंद्र
मोदींची भेट.
▫बिहारमधील छपरा येथे
बांधकाम सुरु असलेल्या पुलाजवळ क्रेन कोसळली, सात जणांचा मृत्यू, क्रेनखाली आणखी काही जण
अडकल्याची शक्यता.
▫जम्मू काश्मीरमधील
बारामुल्ला जिल्ह्यात पट्टन गावातील जंगलात तीन मृतदेह आढळले, मृतदेहांवर गोळ्यांचे
निशाण, पोलिस
तपास सुरु.
▫ज्यांनी १५ वर्ष सत्ता
उपभोगली तेच रस्त्यावर उतरले आहेत, कोट्यावधींचा घोटाळा केलेल्यांना शेतक-यांचा पुळका आला आहे
- राज ठाकरे
▫महाराष्ट्र नवनिर्माण
सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौ-यावर, राष्ट्रवादीच्या जेलभरो आंदोलनावर राज यांची टीका.
▫मंत्रालयात मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाचे छत कोसळले. कार्यालयाचे नुकतेच नूतनीकरण
करण्यात आलेले असतानाच छत कोसळल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित.
▫पुणेकरांना बाप्पा
पावणार, गणेशोत्सवादरम्यान
पाणी कपातीतून दिलासा मिळण्याची शक्यता.
▫ राष्ट्रवादी काँग्रेसचे
जेलभरो आंदोलन, जालन्यात खासदार सुप्रिया सुळे व अन्य नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
▫नेमबाजी विश्वचषकात
पुरुष गटात भारताला कांस्य पदक, सर्वेश पारिख, संदीप कुमार व इसैय्या राजेंदर यांनी मिळवून दिले
कांस्य पदक
▫सानिया मिर्झा व लिएंडर
पेस हे देशातील तरुण खेळाडूंसाठी प्रेरणास्त्रोत आहेत - राहुल द्रविडची
प्रतिक्रिया
▫आयसीसी रँकिंगमध्ये
भारतीय संघ दुस-या क्रमांकावर, ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी
रविवार, १३ सप्टेंबर, २०१५
ठळक घडामोडी
शनिवार, १२ सप्टेंबर, २०१५
ठळक घडामोडी
⚡पुणे: 'डीजे' बंदीच्या विरोधात महाराष्ट्र
चित्ररथ-वाद्यवृंद श्रमिक महासंघाचा आंदोलनाचा इशारा .
⚡पालकमंत्री गिरीश बापट यांचं वक्तव्य म्हणजे सांस्कृतिक शोकांतिका... मास्तर म्हणून कान पकडणाऱ्या बापटांचे कान कोण पकडणार... नीलम गोऱ्हे यांची टीका...
⚡नाशिक: जोरदार पावसामुळे नदीची पातळी वाढली असून गोदापात्रात जाऊ नये अशी सूचना प्रशासनातर्फे भाविकांना करण्यात आली आहे.
⚡गणपती मूर्तीकारांना पोलिसांनी दिलेली नोटीस मागे, रात्री ९ नंतरच मूर्ती बाहेर काढण्याविषयी दिली होती नोटीस.
⚡ पुणे, नाशिक, धुळे, जळगावाता पावसाची हजेरी.
⚡पत्नीची हत्या करून पतीने केली आत्महत्या, पिंपरीतील गांधीनगर भागातील घटना. कौटुंबिक वादातून घटना घडल्याचा अंदाज.
⚡नाशिकमधील महा पर्वणीवर पावसाचे सावट, जोरदार पावसाला सुरूवात. प्रशासन चिंतेत.
⚡सत्ताधारी व विरोधकांनी शेतक-यांसाठी एकत्र यावं, त्यांना सावरण्यासाठी कोणीच नाहीये - मकरंद अनासपुरे.
⚡शेतक-यांना मदत ही मलमपट्टी आहे, मात्र त्यांना कायमचं उभं करायचं आहे. मदतीसाठी आलेल्या शेतक-यांना परत पाठवलं नाही, रकमेत तडजोड करून त्यांना मदत दिली. - मकरंद अनासपुरे.
⚡ उद्या नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये मुख्य पर्वणी स्नान असून त्यानिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले आहेत. त्यामुळे दर्शनासाठी ८ ते १० तास लागणार असून कलश दर्शन करण्याबाबत पोलिसांकडून भाविकांना लाऊड स्पीकरवरून आवाहन करण्यात येत आहे.
⚡गडचिरोली जिल्ह्यात आठ लाखांचे बक्षीस असलेल्या दोन नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे तर दोन नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
⚡ पुण्यात कायदयाचे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याचे वृत्त.
⚡एकमेकांची उणी-दुणी काढण्यापेक्षा, टीका करण्याऐवजी शेतक-यांना मदत करून, त्यांना दुष्काळाच्या संकटातून बाहेर काढणं महत्वाचं आहे - उद्धव ठाकरे.
⚡ बिहारप्रमाणे राज्यातील शेतक-यांना केंद्राने मदत करावी- उद्धव ठाकरे
⚡दुष्काळग्रस्त शेतक-यांसाठी शिवसेना करणार कन्यादान, पीडित शेतक-यांच्या मुला-मुलींच्या लग्नाचा खर्च उचलणार. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने राबवणार कन्यादान योजना - उद्धव ठाकरे
⚡ज्युनिअर वुमन्स हॉकीएशषिया कप: सेमीफायनलमध्ये जपानकडून भारत पराभूत, पेनल्टी शूटआऊटमध्ये जपानने भारताला ३-२ असे हरवले
शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०१५
ठळक घडामोडी
✨मुंबई: अंधेरीतील सेंट झेव्हियर्स शाळेतील विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांना अटक करण्यात आली असून त्यांना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
✨ एक हजार दिवसात देशातील १८ हजार गावांमध्ये विज पुरवणार - नरेंद्र मोदी
✨पुणे: FTIIच्या उपोषणकर्ता विद्यार्थी रुग्णालयात दाखल, शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने विद्यार्थ्यावर उपचार सुरू.
✨उल्हासनगरमध्ये केबल चालकावर गोळीबार, दोन अज्ञातांच्या गोळीबारात केबलचालक सच्चू जखमी.
✨ कोल्हापूर - सातारा येथे खावली गावात १५ दरोडेखोराने वॉचमनच्या पत्नीवर बलात्कार केल्याची घटना घडला आहे. दरोडा घालण्याच्या इराद्याने आले असल्याची माहीती
✨मुंबईतील १३ व १८ सप्टेंबर या दोन दिवसांची मांसविक्रीवरील बंदी उठवण्यात आली.
✨ वर्धा: लहान भावाने केली मोठा भाऊ, वहिनीची हत्या, देवळी तालुक्यातील धक्कादायक घटना. संप्पतीच्या वादातून हत्या झाल्याची माहिती.
✨पुण्यात २५० एनडीए कॅडेट्सना अन्नातून विषबाध, २४७ विद्यार्थ्यांना हॉस्पिटलमधील उपचारानंतर सोडण्यात आले असून तीन जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत.
✨माशांची कत्तल करावी लागत नाही, पाण्याबाहेर येताच मासे मृत्यू पावतात - राज्य सरकारचे उच्च न्यायालयात अजब उत्तर.
✨अंडी, मासे यांच्यावर बंदी का नाही घातली? मांसबंदीवरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला प्रश्न.
✨संसदेमध्ये काही राजकीय पक्षांनी जे वर्तन केले त्यामुळे आदर्श लोकशाही पायदळी तुडवली गेली असून त्यांना देशाची जनता माफ करणार नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी
✨जपानमध्ये सुमारे ३०० उद्योजकांपुढे भाषण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. मुंबई अहमदाबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेनला नाशिकमार्गे नेण्यात यावे असा प्रस्तावही त्यांनी मांडला असून त्याला जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन काउन्सिलने स्वीकृती दिल्याचे फडणवीसांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे.
✨उद्धव ठाकरे यांचा दुष्काळ दौरा रद्द झाला असला तरी शिवसेनेच्या नेत्यांनी एक हजार शेतक-यांना प्रत्येकी १० हजार रुपये देण्याची घोषणा केली. उद्या औरंगाबादला मात्र ठाकरे उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले
✨जपान ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धा, पारुपल्ली कश्यप उपांत्यपूर्व फेरीतून बाहेर, चॉ तीन चेनने २१-१४, २१-१८ असा पराभव केला.
✨अंगठ्याला दुखापत झाल्याने ऑस्ट्रेलियाचा क्रिकेपटू डेव्हिड वॉर्नर बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर.
गुरुवार, १० सप्टेंबर, २०१५
ठळक घडामोडी
केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता सहा टक्के वाढीव 'डीए'
नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सहा टक्के वाढीव महागाई भत्ता (डीए) जाहीर केला आहे. म्हणजे आतापर्यंत मूळ वेतनावर 113 टक्के मिळणारा महागाई भत्ता यापुढे 119 टक्के होईल. केंद्रीय मंत्रिमंडळाने आज या निर्णयाला मंजुरी दिली. 50 लाख सरकारी कर्मचारी आणि 56 लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळेल.
सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या आधारे ठरविलेल्या सूत्रानुसार ही वाढ देण्यात आली असून, यामुळे सरकारच्या तिजोरीवर यंदाच्या वर्षी (2015-16) 4436.76 कोटी रुपयांचा भार पडेल आणि दरवर्षी 6655.15 कोटी रुपयांचा बोजा सरकारी खजिन्यावर येईल.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत या निर्णयाची माहिती देताना सांगितले, की आर्थिक वर्षाच्या एक जुलैपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यापासून महागाई भत्ता मिळेल. आतापर्यंत वेतनावर 113 टक्के महागाई भत्ता दिला जात आहे. त्यात आणखी सहा टक्के वाढ होईल. त्याचप्रमाणे सातव्या वेतन आयोगाच्याही शिफारसी येणार असून, त्याही विचारात घेतल्या जातील.
वाढता खर्च...
50 लाख केंद्रीय कर्मचारी
56 लाख निवृत्त कर्मचारी
4436.76 कोटी रुपये सरकारी तिजोरीवर यंदाचा भार
6655.15 कोटी रुपये दरवर्षी पडणारा भार
[सकाळ न्यूज नेटवर्क]
बुधवार, ९ सप्टेंबर, २०१५
कविता : अच्छे दिन
अच्छे दिनचं घोडं कोणत्या देशात अडलं...
बघता बघता वर्ष सरलं
जगाचं पर्यटनही घडलं
खरं सांगा मोदी साहेब
अच्छे दिनचं घोडं नेमकं
कोणत्या देशात अडलं?
जगाचं पर्यटनही घडलं
खरं सांगा मोदी साहेब
अच्छे दिनचं घोडं नेमकं
कोणत्या देशात अडलं?
अमेरिकेत मॅडिसन
स्क्वेअर गाजवलं
जपानमध्ये जाऊनशान
ढोल बी वाजवलं
भाषणाशिवाय आमच्या
पदरात काय बरं पडलं
खरं सांगा मोदी साहेब
अच्छे दिनचं घोडं नेमकं
कोणत्या देशात अडलं?
स्क्वेअर गाजवलं
जपानमध्ये जाऊनशान
ढोल बी वाजवलं
भाषणाशिवाय आमच्या
पदरात काय बरं पडलं
खरं सांगा मोदी साहेब
अच्छे दिनचं घोडं नेमकं
कोणत्या देशात अडलं?
मंगोलिया नेपाळ अन्
चायना बी झाला
काळा पैसा सांगा
किती भारतात आला
की त्याचं बी जहाज
एखाद्या समुद्रात बुडलं
खरं सांगा मोदी साहेब
अच्छे दिनचं घोडं नेमकं
कोणत्या देशात अडलं
चायना बी झाला
काळा पैसा सांगा
किती भारतात आला
की त्याचं बी जहाज
एखाद्या समुद्रात बुडलं
खरं सांगा मोदी साहेब
अच्छे दिनचं घोडं नेमकं
कोणत्या देशात अडलं
कच्च्या तेलाचे भाव
जगामध्ये पडले
आपल्या इथे पेट्रोलचे भाव
गगनाला भिडले
असं उलट गणित कसं
तुमच्या राजवटीत घडलं
खरं सांगा मोदी साहेब
अच्छे दिनचं घोडं नेमकं
कोणत्या देशात अडलं
जगामध्ये पडले
आपल्या इथे पेट्रोलचे भाव
गगनाला भिडले
असं उलट गणित कसं
तुमच्या राजवटीत घडलं
खरं सांगा मोदी साहेब
अच्छे दिनचं घोडं नेमकं
कोणत्या देशात अडलं
रेशनवर मिळत नाही
तेल तांदूळ साखर
स्वस्त झालयं मरण
आणि महाग झाली भाकर
आता तुम्ही आमच्या देशात
राहणं बी सोडलं
खरं सांगा मोदी साहेब
अच्छे दिनचं घोडं नेमकं
कोणत्या देशात अडलं
तेल तांदूळ साखर
स्वस्त झालयं मरण
आणि महाग झाली भाकर
आता तुम्ही आमच्या देशात
राहणं बी सोडलं
खरं सांगा मोदी साहेब
अच्छे दिनचं घोडं नेमकं
कोणत्या देशात अडलं
आलंच विमान भारतावर
तर थोडं खाली बघा
शेतकऱ्याच्या काळजाला
पडल्या आहेत भेगा
उद्योग पती झाले गब्बर
अन् शेतकरी फासावर चढलं
खरं सांगा मोदी साहेब
अच्छे दिनचं घोडं नेमकं
कोणत्या देशात अडलं
तर थोडं खाली बघा
शेतकऱ्याच्या काळजाला
पडल्या आहेत भेगा
उद्योग पती झाले गब्बर
अन् शेतकरी फासावर चढलं
खरं सांगा मोदी साहेब
अच्छे दिनचं घोडं नेमकं
कोणत्या देशात अडलं
बीडचे भूमिपुत्र आणि प्रहारचे जेष्ठ पत्रकार, कीर्तनकार श्यामसुंदर सोन्नर
[आंतरजालावरून सदर]
एक पद एक निवृत्तीवेतन योजना संक्षेप
समान हुद्दा, समान निवृत्तिवेतन’ (वन रॅंक, वन पेन्शन-ओआरओपी) या मागणीसाठी माजी सैनिकांच्या गेली ४० वर्षे सुरू असलेली मागणी केंद्र सरकारने ५ सप्टेंबर रोजी मान्य केली
काय आहे ‘ओआरओपी’ योजना?
‘वन रॅंक, वन पेन्शन’ संकल्पना म्हणजे, सैन्य दलातून एकाच रॅकवरून सारखी वर्ष सेवा झाल्यानंतर वेगवेगळया वर्षी निवृत्त झालेल्या सैनिकाना सारखी पेन्शन देण्याचे तत्व म्हणजे वन रॅंक, वन पेन्शन होय.आतापर्यंत लष्करातून आधी निवृत्त झालेल्या सैनिकाना कमी पेन्शन, तर त्यानतर निवृत्त झालेल्या त्याच रॅंकच्या निवृत्त सैनिकाला जास्त पेन्शन अशी स्थिती होती
आंदलोनचा इतिहास
• चार दशकापूर्वी निवृत्त सैनिकानी वन रॅंक, वन पेन्शन संघटना स्थापन करून वन रॅंक, वन पेन्शन लागू करण्याची मागणी केली होती,मात्र सरकारी पातळीवरून माजी सैनिकाच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले गेले
• वन रॅंक, वन पेन्शन च्या मागणीसाठी : इंडियन एक्स सर्वीसेस मुव्हमेट या संघटनेने २००८ मध्ये आदोलन केले तर २००९ मध्ये माजी सैनिकानी उपोषण केले होते,तसेचआंदोलकानी तत्कालीन राष्टपतीकडे पदके परतकेली होती
• तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभापाटील यांना सुमारे दीडलाख निवृत्त सैनिकानीरक्ताने स्वाक्षरी करून निवेदने पाठवली होती काही राज्यानी निवृत्त सैनिकाच्या या मागणीला पाठिबा दर्शविला होता
• पंतप्रधान नरेद्रमोदी यांनी टीवटर,तसेच मन की बात या कार्यक्रमातून सरकार वन रॅंक, वन पेन्शन लागू करण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले होते मात्र मागणी पुर्ण होत नसल्याने दिल्लीतील जंतर मनतर येथे माजी सैनिकानी उपोषण सुरु केले होते
• जेष्ठ समाजसेवक अन्ना हजारे यांनीदेखील या आंदोलनाला पाठिबा दर्शविला होता
अशा आहेत तरतुदी
• - १ जुलै २०१४ पासून होणार अंमलबजावणी
• - थकीत रक्कम सहा महिन्यांच्या हप्त्यांत चार वर्षांत देणार
• - माजी सैनिकांच्या निवृत्तिवेतनात दर पाच वर्षांनी सुधारणा
• - वीर पत्नी आणि वय वर्षे सत्तरपुढे असलेल्यांना प्रथम लाभ
• - जवानांच्या निवृत्तिवेतनात दरमहा ३५००-४५०० वाढ अपेक्षित
• - थकीत रक्कम दहा ते बारा हजार कोटी रुपयांची
• - योजनेसाठी आठ ते दहा हजार कोटी रुपयांची तरतूद
सरकारचे निर्णय
• १ जुलै २०१४ पासून योजना लागू होणार
• दर पाच वर्षांनी योजनेची समीक्षा केली जाईल
• एकसदस्यीय समितीकडून समीक्षा केली जाईल
• निवृित्तवेतनासाठी २०१३ वर्ष आधारभूत मानले जाईल
निवृत्ती वेतनासाठीचे नियम
सेवा निवृत्तिवेतन : अखेरच्या पगाराच्या पन्नास टक्के. यासाठी अधिकारीपदावर असलेल्या व्यक्तीची २० वर्षे, तर त्या दर्जाखालील व्यक्तीची १५ वर्षे सेवा आवश्ययक
सामान्य कुटुंब निवृत्तिवेतन : अखेरच्या पगाराच्या तीस टक्के. कमीत कमी ३,५०० रुपये (व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास)
विशेष कुटुंब निवृत्तिवेतन : अखेरच्या पगाराच्या साठ टक्के. कमीत कमी ७ हजार रुपये.(कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्यास)
उदार कुटुंब निवृत्तिवेतन : अखेरच्या पगाराइतके. अधिकारी अथवा जवान हुतात्मा झाल्यास.
अपंग निवृत्तिवेतन : अखेरच्या पगाराच्या तीस टक्के. शंभर टक्के अपंग असल्यास कमीत कमी ३१०० रुपये
युद्धजखमी निवृत्तिवेतन : युद्धात जखमी होऊन शंभर टक्के अपंगत्व आल्यास शेवटच्या पगाराइतके. तसेच, अपंग होण्याच्या प्रमाणानुसार निवृत्तिवेतन कमी.
माजी सैनिकांचे आक्षेप
- १ एप्रिल २०१४ पासून योजना लागू करावी
- पाच वर्षांऐवजी दरवर्षी समीक्षा केली जावी
- एक सदस्यीयऐवजी पाचसदस्यीय समिती हवी
- स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्यांनाही लाभ मिळावा
- २०१३ मधील सर्वाधिक निवृत्तिवेतनच आधारभूत हवे
काय आहे परिस्थिती?
- २२.५० लाख देशभरातील माजी सैनिक
- ६ लाख देशभरातील वीर पत्नी
- ५५-६० हजार प्रत्येक वर्षी वाढणारी संख्या
- १.६९ लाख महाराष्ट्रातील माजी सैनिक
- ५२ हजार महाराष्ट्रातील वीर पत्नी
- ५४ हजार कोटी सध्याच्या निवृत्ती वेतनाची रक्कम
- ८-१० हजार कोटी आणखी तरतूद करावी लागणार
अधिक माहितीसाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा
[आंतरजालावरून सदर]
Labels:
२०१५,
एक पद एक निवृत्तीवेतन,
बातम्या,
योजना
परकीय व्यापार
परकीय व्यापार महासंचालनालयाने "निर्यात बंधू ॲट युवर डेस्कटॉप" हा ऑनलाईन प्रमाणपत्र कार्यक्रम सुरु केला
वाणिज्य विभागाच्या परकीय व्यापार महासंचालनालयाच्या निर्यात बंधू योजनेअंतर्गत, वाणिज्य सचिवांनी “Niryat Bandhu @ Your Desktop” या निर्यात-आयात उद्योगातील ऑनलाईन प्रमाणपत्र कार्यक्रमाचा आज शुभारंभ केला. अतिरिक्त सचिव आर.आर. रश्मी, परकीय व्यापार महासंचालक अनुप वाधवान, अतिरिक्त महासंचालक डी.के. सिंग आणि वाणिज्य विभागाचे अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.
नवीन आणि होतकरु निर्यातदारांमध्ये पोहोचणे आणि निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी मार्गदर्शन, समुपदेशन आदींच्या माध्यमातून नवीन निर्यातदारांना आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी तयार करणे हा निर्यात बंधू योजनेचा उद्देश आहे. 2014-15 या वर्षात, या योजनेअंतर्गत, 18 हजाराहून अधिक लोकांना मार्गदर्शन करण्यात आले. “Niryat Bandhu @ Your Desktop” या ऑनलाईन प्रमाणपत्र कार्यक्रमामुळे होतकरु निर्यातदारांना घरबसल्या थेट प्रसारणाच्या माध्यमातून निर्यात-आयात उद्योगासाठी आवश्यक कौशल्य शिकण्याची संधी मिळेल.
या कार्यक्रमाचा पहिला अभ्यासक्रम ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडण्यात सुरु होणार असून 60 जणांना प्रवेश मिळेल. यासाठी ऑनलाईन नोंदणी 10 सप्टेंबर 2015 पासून http://niryatbandhu.iift.ac.in/home.asp वर करता येईल.
[PIB] दिल्ली, 9-9-2015
मंगळवार, ८ सप्टेंबर, २०१५
एक पद एक निवृत्तीवेतन : आता वैमानिकांचीही मागणी
[वृत्तसंस्था]
Labels:
२०१५,
एक पद एक निवृत्तीवेतन,
बातम्या,
सैनिक
सोमवार, ७ सप्टेंबर, २०१५
एक पद एक निवृत्तीवेतन : स्वेच्छानिवृत्तिधारकांनाही
नवी दिल्ली / फरिदाबाद : लष्करी सेवेतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारणाऱ्या माजी सैनिकांनाही "वन रॅंक, वन पेन्शन‘चा (ओआरओपी) लाभ मिळेल, यामध्ये कोणताही भेदभाव केला जाणार नाही, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केल्यानंतर माजी सैनिकांनी आंदोलनाची तलवार म्यान केली. मोदींच्या घोषणेने आमचे समाधान झाले असून, आम्ही उपोषण मागे घेत आहोत; पण सरकारने आपले आश्वासन पाळले नाहीतर देशभर मोठे वादळ निर्माण करू, आमच्या अन्य काही शंकांचे समाधान होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे मेजर जनरल (निवृत्त) सतबीरसिंग यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
फरिदाबादमध्ये मेट्रो रेल्वे सेवेच्या उद्घाटनासाठी आलेल्या पंतप्रधान मोदी यांनी "ओआरओपी‘बाबत मोठी घोषणा करत सर्वांनाच धक्का दिला. "ओआरओपी‘बाबत काही लोक जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करत आहेत. लष्करामध्ये पंधरा वर्षांपेक्षा अधिककाळ नोकरी करणाऱ्या प्रत्येक जवानाला या निवृत्तिवेतन योजनेचा लाभ होणार असून, कर्तव्य बजावत असताना जखमी झाल्याने निवृत्ती घेणाऱ्यांनाही याचा लाभ मिळेल. "ओआरओपी‘च्या अंमलबजावणीसाठी आम्ही कोणताही पे कमिशन स्थापन केलेला नाही. आता दहा हजार कोटी रुपये द्यायचे असतील तर यामध्ये कोणतीही त्रुटी राहू नये म्हणून आम्ही स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, असे मोदी यांनी सांगितले. वरिष्ठ अधिकाऱ्यांप्रमाणेच हवालदार, शिपाई, नायक यांनाही या योजनेचा लाभ होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. शनिवारी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी स्वेच्छा निवृत्ती
स्वीकारणाऱ्यांना या योजनेचा लाभ होणार नसल्याचे सांगितल्याने माजी सैनिक संतापले होते.
काय म्हणाले मोदी - समितीच्या माध्यमातून त्रुटी दूर करू
- कॉंग्रेसला या योजनेचे गांभीर्य नाही
- मागील 42 वर्षांत कॉंग्रेसने काही केले नाही
- "ओआरओपी‘ कॉंग्रेसमुळे लटकले
- सरकारच्या चांगल्या धोरणांना कॉंग्रेसचा विरोध
- सरकारच्या आर्थिक धोरणांना यश
- आर्थिक संकटातही देश डगमगला नाही
स्वेच्छानिवृत्तीची सुविधा लष्करामध्ये सैनिकांना स्वेच्छानिवृत्तीची सुविधा मिळते. एखाद्या तुकडीमध्ये चार लोक असतील, यातील कोणा एकासच प्रमोशन मिळू शकते; पण त्याच रॅंकवर काम करणाऱ्या अन्य तिघांना संबंधितांचे आदेश पाळायचे नसतील तर ते स्वेच्छानिवृत्ती घेऊ शकतात. अशा पद्धतीने स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्यांना निवृत्तिवेतन योजनेचा लाभ घेता येत नाही, असे माजी सैनिकांचे म्हणणे होते.
आंदोलकांची घेतली भेट फरिदाबादच्या स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन होताच माजी सैनिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. या वेळी काही आंदोलकांनी मोदींना गुलाबपुष्प भेट देऊन त्यांच्याशी हस्तांदोलनही केले. मोदींनीही संधी साधत कॉंग्रेस सरकारचे वाभाडे काढले. मागील सरकारनेच हा प्रश्न प्रलंबित ठेवल्याचा आरोप मोदींनी या वेळी बोलताना केला.
स्वीकारणाऱ्यांना या योजनेचा लाभ होणार नसल्याचे सांगितल्याने माजी सैनिक संतापले होते.
काय म्हणाले मोदी - समितीच्या माध्यमातून त्रुटी दूर करू
- कॉंग्रेसला या योजनेचे गांभीर्य नाही
- मागील 42 वर्षांत कॉंग्रेसने काही केले नाही
- "ओआरओपी‘ कॉंग्रेसमुळे लटकले
- सरकारच्या चांगल्या धोरणांना कॉंग्रेसचा विरोध
- सरकारच्या आर्थिक धोरणांना यश
- आर्थिक संकटातही देश डगमगला नाही
स्वेच्छानिवृत्तीची सुविधा लष्करामध्ये सैनिकांना स्वेच्छानिवृत्तीची सुविधा मिळते. एखाद्या तुकडीमध्ये चार लोक असतील, यातील कोणा एकासच प्रमोशन मिळू शकते; पण त्याच रॅंकवर काम करणाऱ्या अन्य तिघांना संबंधितांचे आदेश पाळायचे नसतील तर ते स्वेच्छानिवृत्ती घेऊ शकतात. अशा पद्धतीने स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्यांना निवृत्तिवेतन योजनेचा लाभ घेता येत नाही, असे माजी सैनिकांचे म्हणणे होते.
आंदोलकांची घेतली भेट फरिदाबादच्या स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन होताच माजी सैनिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. या वेळी काही आंदोलकांनी मोदींना गुलाबपुष्प भेट देऊन त्यांच्याशी हस्तांदोलनही केले. मोदींनीही संधी साधत कॉंग्रेस सरकारचे वाभाडे काढले. मागील सरकारनेच हा प्रश्न प्रलंबित ठेवल्याचा आरोप मोदींनी या वेळी बोलताना केला.
"ओआरओपी‘बाबत सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक असून, माजी सैनिकांच्या सर्व शंकांचे निरसन करण्यात आम्हाला यश आले आहे.
वेंकय्या नायडू, केंद्रीय शहर विकासमंत्री
वेंकय्या नायडू, केंद्रीय शहर विकासमंत्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या आहेत; आम्ही त्यांचे आभार मानतो. आम्ही आमचे आंदोलन आता मागे घेत आहोत.
कर्नल (निवृत्त) पुष्पेंद्र सिंह
कर्नल (निवृत्त) पुष्पेंद्र सिंह
[वृत्तसंस्था]
Labels:
२०१५,
एक पद एक निवृत्तीवेतन,
पंतप्रधान नरेंद्र मोदी,
बातम्या,
सैनिक
रविवार, ६ सप्टेंबर, २०१५
एक पद एक निवृत्तीवेतन : स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्यांनाही लागू - पंतप्रधान नरेंद्र मोदी
फरीदाबाद - ‘समान हुद्दा, समान निवृत्तिवेतन’ (वन रॅंक, वन पेन्शन-ओआरओपी) योजनेतील स्वेच्छानिवृत्तीबाबत (व्हीआरएस) भ्रम पसरविले जात असून, पंधरा वर्षे नोकरी करणाऱ्या प्रत्येक जवानाला या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
दिल्ली-फरीदाबाद मेट्रोचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर फरीदाबाद येथे पंतप्रधानांनी सभा घेत हरियानाच्या विकासाबाबत आणि ओआरओपीविषयी स्पष्टीकरण दिले.
पंतप्रधान म्हणाले, ‘‘गेल्या 42 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ओआरओपीबाबत आमच्या सरकारने निर्णय घेतला. आम्ही सैनिकांना दिलेल्या वचनानुसार ही योजना लागू केली आहे. गेल्या 42 वर्षांमध्ये काहीही न केलेल्यांना आम्हाला विचारण्याचा काही हक्क नाही. या योजनेसाठी फक्त 3 हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती. पण, याची व्याप्ती पाहून आम्ही ही तरतूद 8 ते 10 हजार कोटींपर्यंत पोचविली आहे. देशासाठी आपले आयुष्य पणाला लावणाऱ्या सैनिकांसाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील. व्हीआरएस घेणाऱ्या जवानांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. सैन्यामधील प्रत्येक दहा जवानांपैकी एक जवान हरियानातील आहे. त्यामुळे हरियानाच्या अर्थव्यवस्थेला याचा फायदा होणार आहे. हरियानामध्ये स्त्री भ्रूण हत्येविरोधात लढाई चांगली सुरू आहे. हरियाना सरकारने मुलींच्या शिक्षणासाठी चांगली पावले उचलली आहेत. गुजरातनंतर हरियाना हे माझे दुसरे घर असून, मी येथे अनेक वर्षे राहिलो आहे. फरीदाबादची ओळख मिनी इंडिया अशी असून, देशातील प्रत्येक राज्यातील नागरिक येथे वास्तव्यास आहेत.‘‘
[वृत्तसंस्था]
Labels:
२०१५,
एक पद एक निवृत्तीवेतन,
पंतप्रधान नरेंद्र मोदी,
बातम्या,
सैनिक
माजी सैनिकांची पेन्शनकोंडी फुटली
नवी दिल्ली - ‘समान हुद्दा, समान निवृत्तिवेतन’ (वन रॅंक, वन पेन्शन-ओआरओपी) या मागणीसाठी माजी सैनिकांच्या गेली ४० वर्षे सुरू असलेल्या लढ्याला आज अखेर यश आले. ही मागणी केंद्र सरकारने मान्य केल्याची घोषणा संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. पर्रीकर यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर या योजनेवर नाराज असलेल्या माजी सैनिकांचे समाधान झाल्याचे रात्री उशिराच्या वृत्तात म्हटले आहे. मात्र, आपल्या महत्त्वाच्या सहापैकी एकच मागणी सरकारने मान्य केल्याचे सांगत माजी सैनिकांनी आपला लढा सुरूच ठेवण्याचा निर्णय केल्याचेही वृत्त आहे.
उपोषणाबाबत उद्या (रविवारी) अंतिम निर्णय घेतला जाईल, असे माजी सैनिक सतबीरसिंग यांनी सांगितले. दरम्यान, सरकारने माजी सैनिकांची फसवणूक केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
बहुचर्चित ‘ओआरओपी’ सरकारला मान्य असल्याची घोषणा संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दुपारी संरक्षण मंत्रालयामध्ये पत्रकार परिषदेत केली. ही घोषणा करताना आधीच्या ‘यूपीए’ सरकारवर शरसंधान करायला ते विसरले नाहीत. चार दशकांपासून ‘ओआरओपी’ची मागणी प्रलंबित होती. हा संतापाचा मुद्दा होता. ‘यूपीए’ सरकारने फेब्रुवारी २०१४ मध्ये ‘ओआरओपी’ची अंमलबजावणी २०१४-१५ मध्ये होईल, असे म्हटले होते; पण अंमलबजावणी कशा प्रकारे होईल, त्यासाठी आर्थिक तरतूद किती असेल, याचा स्पष्ट खुलासा केला नव्हता. तसेच यासाठी केलेली ५०० कोटी रुपयांची तरतूदही पुरेशी नव्हती. आधीच्या सरकारने अत्यंत अव्यवहार्य पद्धतीने लागू केल्याने आपल्या सरकारला अंमलबजावणीची घोषणा करण्यासाठी विलंब झाला, अशी टीका पर्रीकर यांनी केली. सरकारने माजी जवान तसेच तज्ज्ञांशी चर्चा करून ‘ओआरओपी’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंमलबजावणीसाठी आठ ते दहा हजार कोटी रुपयांचा बोजा पडणार असून, यात आणखी वाढ होईल, असाही त्यांनी केला.
‘ओआरओपी’ एक जुलै २०१४ पासून लागू केली जाईल. ‘एनडीए’ सरकारचा अर्थसंकल्प जून २०१४ मध्ये जाहीर झाला असल्याने जुलैपासून निवृत्तिवेतनाची अंमलबजावणी होईल. अर्थात, त्यासाठी २०१३ हे वर्ष आधारभूत असेल. माजी सैनिकांना निवृत्तिवेतनाचा फरक दर सहा महिन्यांनी याप्रमाणे दोन वर्षांत चार टप्प्यांमध्ये मिळेल, तर सैनिकांच्या विधवांना हा फरक एकरकमी मिळेल; परंतु, स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्यांना ‘ओआरओपी’ योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच, निवृत्तिवेतनाचा आढावा दर पाच वर्षांनी घेतला जाईल. यासाठी एकसदस्यीय न्यायिक समिती नेमली जाईल. ही समिती सहा महिन्यांत आपला अहवाल देईल, असे पर्रीकर यांनी जाहीर केले.
सरकारच्या या घोषणेचे सत्ताधारी भाजपने स्वागत केले व ‘ओआरओपी’ लागू करण्याचे पूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले. भाजपचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी ‘ओआरओपी’ लागू करण्याच्या निर्णयासाठी मोदी सरकारची प्रशंसा करावी तेवढी थोडी आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. काँग्रेसने केवळ ५०० कोटी रुपये ठेवले होते. मोदी सरकार आठ ते दहा हजार कोटी रुपये खर्च करेल. माजी सैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, असेही ते म्हणाले.
काँग्रेसने मात्र सरकारची घोषणा अत्यंत निराशाजनक असल्याची टिप्पणी केली. माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी या मुद्द्यावर काँग्रेसची भूमिका मांडताना सरकारने माजी सैनिकांची निराशा केली असल्याचे टीकास्त्र सोडले. ‘ओआरओपी’ची मागणी पहिल्यांदा ‘एनडीए’ सरकारने मान्य केली, हे संरक्षणमंत्र्यांचे सांगणे चुकीचे आहे. ही मागणी ‘यूपीए’ सरकारने आधीच मान्य केली होती. तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी अर्थसंकल्पी भाषणात त्याची स्पष्टपणे घोषणा केली होती. आता ‘एनडीए’ सरकार केवळ त्याची अंमलबजावणी करते आहे, असे असताना संरक्षणमंत्री म्हणतात की, चार दशकांनंतर एनडीए सरकार मान्य करते आहे. त्यांचे हे म्हणणे चुकीचे आहे, असा टोला अँटनी यांनी लगावला. तसेच ‘यूपीए’ सरकारने दहा वर्षांत माजी सैनिकांचे निवृत्तिवेतन तीन वेळा वाढविले. त्यासाठी सात हजार कोटी रुपये दिले होते. असे यापूर्वी कधीही झाले नव्हते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
सरकारने माजी जवान तसेच तज्ज्ञांशी चर्चा करून ‘ओआरओपी’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
- मनोहर पर्रीकर, संरक्षणमंत्री
सरकारने माजी सैनिकांची निराशा केली आहे.
- ए. के. अँटनी, माजी संरक्षणमंत्री
काँग्रेसने केवळ ५०० कोटी रुपये ठेवले होते. मोदी सरकार आठ ते दहा हजार कोटी रुपये खर्च करेल.
- शाहनवाज हुसेन, प्रवक्ते, भाजप
निवृत्ती वेतनासाठीचे नियम
- सेवा निवृत्तिवेतन : अखेरच्या पगाराच्या पन्नास टक्के. यासाठी अधिकारीपदावर असलेल्या व्यक्तीची २० वर्षे, तर त्या दर्जाखालील व्यक्तीची १५ वर्षे सेवा आवश्यक
- सामान्य कुटुंब निवृत्तिवेतन : अखेरच्या पगाराच्या तीस टक्के. कमीत कमी ३,५०० रुपये (व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास)
- विशेष कुटुंब निवृत्तिवेतन : अखेरच्या पगाराच्या साठ टक्के. कमीत कमी ७ हजार रुपये.(कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्यास)
- उदार कुटुंब निवृत्तिवेतन : अखेरच्या पगाराइतके. अधिकारी अथवा जवान हुतात्मा झाल्यास.
- अपंग निवृत्तिवेतन : अखेरच्या पगाराच्या तीस टक्के. शंभर टक्के अपंग असल्यास कमीत कमी ३१०० रुपये
- युद्धजखमी निवृत्तिवेतन : युद्धात जखमी होऊन शंभर टक्के अपंगत्व आल्यास शेवटच्या पगाराइतके. तसेच, अपंग होण्याच्या प्रमाणानुसार निवृत्तिवेतन कमी.
अशा आहेत तरतुदी
- १ जुलै २०१४ पासून होणार अंमलबजावणी
- थकीत रक्कम सहा महिन्यांच्या हप्त्यांत चार वर्षांत देणार
- माजी सैनिकांच्या निवृत्तिवेतनात दर पाच वर्षांनी सुधारणा
- वीर पत्नी आणि वय वर्षे सत्तरपुढे असलेल्यांना प्रथम लाभ
- जवानांच्या निवृत्तिवेतनात दरमहा ३५००-४५०० वाढ अपेक्षित
- स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) घेतलेल्यांना लाभ नाही
- थकीत रक्कम दहा ते बारा हजार कोटी रुपयांची
- योजनेसाठी आठ ते दहा हजार कोटी रुपयांची तरतूद
सरकारचे निर्णय
१ जुलै २०१४ पासून योजना लागू होणार
दर पाच वर्षांनी योजनेची समीक्षा केली जाईल
एकसदस्यीय समितीकडून समीक्षा केली जाईल
स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्यांना लाभ मिळणार नाही
निवृित्तवेतनासाठी २०१३ वर्ष आधारभूत मानले जाईल
माजी सैनिकांचे आक्षेप
१ एप्रिल २०१४ पासून योजना लागू करावी
पाच वर्षांऐवजी दरवर्षी समीक्षा केली जावी
एक सदस्यीयऐवजी पाचसदस्यीय समिती हवी
स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्यांनाही लाभ मिळावा
२०१३ मधील सर्वाधिक निवृत्तिवेतनच आधारभूत हवे
मंगल दिवस. भगवान कृष्ण पाठिंब्यासाठी आले. महाभारत संपले. सन्मान आणि प्रतिष्ठा कायम राखली. ६५ हजार कोटी रुपयांच्या पेन्शनच्या बिलात १६८ कोटी रुपये का वाचवले जात आहेत आणि मोठी नाराजी का ओढवून घेतली जात आहे? वयोवृद्ध निवृत्तांना लाभ देणे महत्त्वाचे आहे.
- अनिल चोप्रा, निवृत्त एअर मार्शल
काय आहे परिस्थिती?
२२.५० लाख देशभरातील माजी सैनिक
६ लाख देशभरातील वीर पत्नी
५५-६० हजार प्रत्येक वर्षी वाढणारी संख्या
१.६९ लाख महाराष्ट्रातील माजी सैनिक
५२ हजार महाराष्ट्रातील वीर पत्नी
५४ हजार कोटी सध्याच्या निवृत्ती वेतनाची रक्कम
८-१० हजार कोटी आणखी तरतूद करावी लागणार
काय आहे ‘ओआरओपी’ योजना?
‘वन रॅंक, वन पेन्शन’ संकल्पना म्हणजे, सैन्य दलात समानकाळ सारख्याच पदावर सेवा केलेले दोन माजी सैनिक जरी वेगवेगळ्या वेळी निवृत्त झाले, तरी त्या दोघांना सारखीच पेन्शन (निवृत्तिवेतन) मिळणे होय. म्हणजेच सारख्याच पदावर काम केलेले सैन्य दलातील जवान, अधिकारी कुठल्याही तारखेला निवृत्त झाले, तरी त्यांना ‘ओआरओपी’ योजनेमुळे समान निवृत्तिवेतन मिळणार आहे.
[सकाळ न्यूज नेटवर्क]
Labels:
२०१५,
एक पद एक निवृत्तीवेतन,
बातम्या,
सैनिक
शनिवार, ५ सप्टेंबर, २०१५
भाजपवर टीका करणे हा कॉंग्रेसचा छंद - नायडू
ते म्हणाले की, "ओआरओपीच्या मुद्याचे भाजपने कधीही राजकारण केले नाही. प्रत्येकवेळी भाजपवर टीका करणे हा कॉंग्रेसचा छंद बनला आहे‘ तसेच "जनतेच्या मागण्या पूर्ण न करणारे कॉंग्रेस दोषी आहे. त्यांनी केवळ घोषणाच केल्या‘ असेही नायडू पुढे म्हणाले. भारतीय लष्करातील माजी सैनिकांसाठीच्या "वन रॅंक वन पेन्शन‘ योजनेच्या अंमलबजावणीची केंद्र सरकारने आज (शनिवार) अधिकृत घोषणा केली. यावर कॉंग्रेस भाजप जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर नायडू यांनी कॉंग्रेसला प्रत्युत्तर दिले.
[वृत्तसंस्था]
Labels:
२०१५,
एक पद एक निवृत्तीवेतन,
बातम्या,
सैनिक
भाजपकडून जनतेची दिशाभूल - कॉंग्रेस
केंद्र सरकारने "वन रॅंक वन पेन्शन‘ची घोषणा केल्यानंतर कॉंग्रेस नेते तथा माजी संरक्षण मंत्री ए.के.ऍन्टोनी बोलत होते. ते म्हणाले की, "गेल्या 4 दशकांपासून मागील सरकारने याबाबत काहीही कारवाई केली नसल्याचा राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा मुद्दा निराधार आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीचे (युपीए) मागील सरकार मागील वर्षीच ओआरओपी जाहीर केली होती‘ तसेच संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ओआरओपीबाबत आज केलेली घोषणा निराशाजनक असल्याची टीकाही ऍन्टोनी यांनी केली आहे. त्यांनी युपीए सरकारच्या ओआरओपी योजनेत अमूलाग्र बदल केल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.
[वृत्तसंस्था]
Labels:
२०१५,
एक पद एक निवृत्तीवेतन,
बातम्या,
सैनिक
शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०१५
एक पद एक निवृत्तीवेतन: लढा आणखी तीव्र करू
नवी दिल्ली - पुढील आठवड्यात केंद्र सरकार "वन रॅंक वन पेन्शन‘ (ओआरओपी) लागू करण्यासंबंधीचा निर्णय सरकार जाहीर करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत बोलताना माजी सैनिकांनी या निर्णयात आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास लढा आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
"ओआरओपी‘चा लाभ 1 जुलै 2014 पासून देण्याची सरकारची योजना आहे. म्हणजेच 1 जुलै 2014 पासून ओआरओपीचे सर्व लाभ मिळतील. पंतप्रधानांनी ओआरओपीच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. परंतु आमच्या नियम व अटींनुसार हे विधेयक आल्यास त्याचे स्वागत केले जाईल; अन्यथा आम्ही आमचा लढा आणखी तीव्र करू, असे मत माजी मेजर जनरल सतबीर सिंह यांनी व्यक्त केले आहे. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी एप्रिल 2014 पासून करावी, अशी मागणी ही करण्यात आली आहे.
[वृत्तसंस्था]
Labels:
२०१५,
अण्णा हजारे,
एक पद एक निवृत्तीवेतन,
बातम्या,
सैनिक
माजी सैनिकांचे साखळी उपोषण
नागपूर - वन रॅंक वन पेन्शनच्या मागणीसाठी शुक्रवारी सकाळी दहा वाजतापासून युनायटेड फ्रंट ऑफ एक्स सर्विसमेनतर्फे संविधान चौकात साखळी उपोषण सुरू करणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीत या मागणीसाठी माजी सैनिकांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी नागपुरातील माजी सैनिकांनीसुद्धा आंदोलनाचे पाऊल उचलले आहे. १९८२ पासून सुरू असलेल्या माजी सैनिकांच्या मागणीकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले आहे. अनेक वर्षे प्रतीक्षा केल्यानंतर माजी सैनिकांनी आंदोलनाचा निर्णय घेतला. सैनिकांनी आपले सर्व तारुण्य लष्करात घालविले. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आणि वातावरणामध्ये देशाचे रक्षण केले आहे.
अनेक जण शहीद झालेत. याची जाणीव केंद्र सरकारने ठेवून वन रॅंक वन पेन्शनची मागणी पूर्ण करावी, याकरिता सैनिकांना आंदोलन करावे लागत आहे. याकरिता युनायटेड फ्रंट ऑफ एक्स सर्विसमेनचे मनोहर भातकुलकर, संदेश सिंगलकर, चंद्रशेखर कुळकर्णी, नीलेश व्यास, पुंडलिक सावंत, राजू धांडे, विलास दवणे, श्रीकांत गंगाथडे, देवेंद्र ठाकूर यांनी आंदोलनात अधिकाधिक माजी सैनिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
[सकाळ वृत्तसेवा]
Labels:
२०१५,
एक पद एक निवृत्तीवेतन,
बातम्या,
सैनिक
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)