येत्या ऑगस्टपासून वन रॅंक, वन पेन्शन व भूसंपादन विधेयकासह शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ आदी विविध राज्यांत मेळावे होतील व ऑक्टोबरला रामलीला मैदानावर जय जवान, जय किसान मेळावा होईल, असेही हजारे यांनी जाहीर केले. या वेळी मोदी सरकारच्या मंत्र्यांच्या घरासमोर भजन आंदोलन केले जाईल, असेही त्यांनी जाहीर केले. मोदी सरकार सत्तेवर येताच दिलेल्या आश्वासनांऐवजी भूसंपादनासारख्या भलत्याच मुद्यांची संशयास्पद घाई करीत आहेत. लोकपाल विधेयक राष्ट्रपतींची सही होऊन तयार असूनही मोदी सरकार त्याचे नावही काढत नाही, असेही हजारे यांनी सांगितले. दुसरीकडे दिल्लीतील केजरीवाल सरकारही लोकपालाच्या मुद्यावर गप्प आहे. त्यांनाही इगो प्रॉब्लेमची बाधा झाली आहे. तेव्हा खुर्चीचा हा गुणधर्मच आहे काय असे वाटते, असा टोला अण्णा यांनी लगावला. केजरीवाल यांनी आज रात्री भेटण्यास येतो, असा निरोप पाठविला आहे. मात्र, त्यांना मी राजकारणावर चर्चा होणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले आहे. केजरीवाल यांना केंद्र सरकार कामे करू देत नाही असे वाटत असले, तरी टाळी एका हाताने वाजत नाही, असेही निरीक्षण त्यांनी नोंदविले. जर कलंकित लोकांना तुम्ही तिकिटे देणार असाल, तर इतरांत व तुमच्यात काय फरक आहे, या आपल्या प्रश्नाला केजरीवाल यांच्याकडे तेव्हाही उत्तर नव्हते व आताही नाही, असेही हजारे म्हणाले.
- - वृत्तसंस्था
| |
For Advertise in this Section please connect 9422264829 or mail at sainik.darpan@gmail.com
!doctype>
सोमवार, २७ जुलै, २०१५
माजी सैनिकांसाठी अण्णा हजारे मैदानात
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा