अहमदनगर (प्रतिनिधी)- माजी सैनिकांनी हाती घेतलेली वृक्षरोपणाची चळवळ लोककल्याणकारी आहे. वृक्षरोपण व संवर्धन काळाची गरज बनली असून, भावी पिढीच्या कल्याणासाठी प्रत्येकाने वृक्षरोपण करण्याचे आवाहन ह.भ.प. राम महाराज घुले यांनी केले.
माजी सैनिकांच्या जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने तपोवन येथील दत्त मंदिर परिसरात राबविण्यात आलेल्या वृक्षरोपण अभियान कार्यक्रमाप्रसंगी राम महाराज घुले बोलत होते. प्रारंभी राम महाराज घुले, मा.नगरसेवक निखील वारे, ह.भ.प.आव्हाड महाराज, उद्योजक प्रशांत कोळपकर, निवृत्त तहसिलदार संजय परदेशी, उद्योजक मारूती कराळे यांच्या हस्ते वृक्षरोपणाने या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, भाऊसाहेब कर्पे, निवृत्ती भाबड, संतोष शिंदे, भाऊसाहेब देशमाने, संजय पाटेकर, बन्सी दारकुंडे, प्रभू म्हस्के, सुनिल गुंजाळ, लेंडाळ, गणेश पालवे, आनंदा गिते, बळवंत पालवे, बाबासाहेब आव्हाड, भिवाजी डमाळे, बाबासाहेब चौधरी, मंदिर ट्रस्टचे अर्जुन बडे, आश्विन गडाख, दत्तात्रय डांगे, गामे सर, याशिम शेख, प्रविण म्हस्के, बबन वाबळे, अमिन इनामदार, सुमित अकोलकर, बाजीराव भालेराव, बाळासाहेब जाधव, विठ्ठल पवार आदिंसह माजी सैनिक उपस्थित होते.
पुढे राम महाराज घुले म्हणाले की, वाढते शहरीकरण व औद्योगिकरणाने मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल झाली. यामुळे निसर्गचक्र बिघडले असून, निरोगी व आनंदी जीवणासाठी वृक्षरोपण करणे अत्यावश्यक आहे. माजी सैनिकांनी हाती घतेलेली वृक्षरोपण चळवळ कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
निखील वारे म्हणाले की, सैनिकांच्या रक्तातच देशभक्ती भिनलेली असते. जिवावर उदार होऊन ते देश रक्षणाचे कार्य करीत असतात. देश रक्षणाचे कर्तव्य बजावून सामाजिक कार्यात माजी सैनिकांनी घेतलेल्या पुढाकाराने मोठा बदल घडणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाऊसाहेब देशमाने यांनी फाऊंडेशनच्या विविध सामाजिक कार्याची व वृक्षरोपण, संवर्धन उपक्रमाची माहिती दिली. दत्तात्रय डांगे यांनी कॉलनी मधील सर्वाना वृक्ष दत्तक देऊन त्याचे संवर्धन केले जाणार असल्याचे स्पष्ट केले. मेजर संजय पाटेकर व सुमित अकोलकर यांनी उपस्थितांचे आभार मानले
Pages
पेज
सोमवार, १० सप्टेंबर, २०१८
माजी सैनिकांनी हाती घेतलेली वृक्षरोपण चळवळ लोककल्याणकारी -राम महाराज घुले
मंगळवार, ४ सप्टेंबर, २०१८
हवाई दलाचं मिग-27 विमान कोसळलं; वैमानिक सुखरुप
अपघाताचं कारण अद्याप अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: September 4, 2018 09:55 AM | Updated: September 4, 2018 10:09 AM
हवाई दलाचं मिग-27 विमान कोसळलं; वैमानिक सुखरुप
जोधपूर: हवाई दलाचं मिग-27 विमान राजस्थानातील जोधपूरमध्ये कोसळलं आहे. या अपघातातून वैमानिक सुखरुप बचावल्याची माहिती मिळते आहे. या अपघाताचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पूर्व जयपूरमधील बनाड पोलीस स्टेशनच्या परिसरात असलेल्या देवलिया गावाजवळ हवाई दलाचं विमान कोसळलं. विमान कोसळण्याच्या आधी वैमानिक सुरक्षित बाहेर आला.
Indian Air Force MiG 27 crashes near Rajasthan's Jodhpur, Pilot safe; More details awaited. pic.twitter.com/bVa9LiTZgv
— ANI (@ANI) September 4, 2018
हवाई दलाचं मिग-27 विमान मोकळ्या जागेत कोसळलं. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. विमान जमिनीवर कोसळताच आगीचे लोट उसळले. यानंतर स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि हवाई दलाचे अधिकारीदेखील घटनास्थळी पोहोचले आहेत. तांत्रिक कारणामुळे या विमानाचा अपघात झाला असावा, अशी प्राथमिक शक्यता हवाई दलाकडून वर्तवण्यात आली आहे. मात्र या घटनेची चौकशी करुन अपघाताचं नेमकं कारण शोधण्यात येईल, अशी माहिती हवाई दलाकडून देण्यात आली आहे.
दोघा नाशिककर सायकलीस्ट्सने पूर्ण केली डेथ रेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow | Published: September 3, 2018 06:55 PM | Updated: September 3, 2018 06:56 PM
दोघा नाशिककर सायकलीस्ट्सने पूर्ण केली डेथ रेस
नाशिक : नाशिककर सायकलीस्ट्स किशोर काळे, संगमनेरचे विजय काळे यांनी जगातील अवघड स्पर्धांपैकी एक समजली जाणारी तथा डेथ रेस असे टोपण नाव मिळालेली भूतान - टूर आॅफ द ड्रॅगन ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली आहे. एकाच वर्षात चार भारतीय सायकलीस्टसने स्पर्धा पूर्ण करण्याची ही पहलीच वेळ आहे. उत्तराखंड मधील दोघांनीही ही रेस पूर्ण करण्यात यश मिळवले आहे.
1 सप्टेंबर रोजी झालेल्या टूर आॅफ ड्रॅगनच्या नवव्या आवृत्तीत जगभरातून एकूण 35 सायकलीस्ट्सने सहभाग नोंदवला. किशोर काळे यांनी 17 तासात तर विजय काळे यांनी 18 तासात ही स्पर्धा पूर्ण केली. यावेळी स्पर्धा पूर्ण करणार्या दोघा सायकलीस्ट्सचा सत्कार भूतान आॅलिम्पिक कमिटीचे चेअरमन यांच्या हस्ते करण्यात येतो.
सायकलिंगचे कॅपिटल होऊ बघणार्या नाशिक शहरातील चार सायकलीस्ट्सने ही स्पर्धा पूर्ण केली आहे हे विशेष. या आधी 2012 मध्ये डॉ. महेंद्र महाजन तर गेल्या वर्षी 2017 मध्ये डॉ. हितेंद्र महाजन यांनी ही स्पर्धा पूर्ण केली आहे. तर आता 2018 मध्ये किशोर काळे ,विजय काळे यांनी ही किमया साधली आहे.हिमालयाचे विहंगम दृश्यांची अनुभूती अनुभवण्याची संधी स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर मिळते. एकूण चार घाट चढून उतरायचे असतात. त्यातील शेवटचा घाट सलग 40 किमीच्या चढायचा असल्याचे शेवटपर्यंत स्पर्धेतील आव्हान जिवंत असते. त्यामुळे सहकार्यांचा तगडा पाठिंबा असल्याशिवाय हे शक्य नव्हते.
शारीरिक, मानसिक संयमाची परीक्षा पाहणारी स्पर्धा - डॉ. रवींद्र सिंघल
प्रचंड थंडीच्या वातावरणात सकाळी सात वाजता स्पर्धेला सुरुवात झाली होती. शरीरासह मनाच्या संयमाची ही एक कसोटीच समजून मी स्पर्धेत उतरलो. दैनंदिन सराव जिद्द आणि ध्येयाच्या जोरावर या स्पर्धेचे तीनही अवघड टप्पे मी निर्धारित वेळेपेक्षा २२ मिनिटे अगोदर पूर्ण करण्यास यशस्वी ठरलो.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow | Published: September 3, 2018 07:17 PM | Updated: September 3, 2018 07:20 PM
शारीरिक, मानसिक संयमाची परीक्षा पाहणारी स्पर्धा - डॉ. रवींद्र सिंघल
ठळक मुद्देनाशिककरांच्या वतीने सिंघल यांचे भव्य स्वागत स्पर्धेचे तीनही अवघड टप्पे निर्धारित वेळेपूर्वी ४७ मिनिटे आधीच पार
नाशिक : फ्रान्समध्ये झालेली जागतिक स्तरावरील ‘आयर्नमॅन’ ही स्पर्धा शारिरिक-मानसिक संयमाची कसोटी पाहणारी होती; मात्र आयुष्यातील हा अत्यंत वेगळा अनुभव देणारा क्षण होता, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी केले. शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पाथर्डीफाटा येथे करण्यात आलेल्या जाहिर सत्काराप्रसंगी ते बोलत होते.
स्पर्धा जिंकल्यानंतर नाशिकला सिंगल यांचे सोमवारी (दि.३) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास आगमन झाले. शहराच्या वेशीवर नाशिककरांसह पोलीस आयुक्तालयातील अधिका-यांच्या उपस्थितीत सिंगल यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्यांचे कुटुंबीयदेखील उपस्थित होते. यावेळी सिंघल म्हणाले, प्रचंड थंडीच्या वातावरणात सकाळी सात वाजता स्पर्धेला सुरुवात झाली होती. शरीरासह मनाच्या संयमाची ही एक कसोटीच समजून मी स्पर्धेत उतरलो. दैनंदिन सराव जिद्द आणि ध्येयाच्या जोरावर या स्पर्धेचे तीनही अवघड टप्पे मी निर्धारित वेळेपेक्षा २२ मिनिटे अगोदर पूर्ण करण्यास यशस्वी ठरलो. वयाची पन्नाशी गाठल्यानंतर अशा प्रकारची खडतर स्पर्धेत विजेतेपद पटकाविणे हे मोठे आव्हान होते; मात्र दैनंदिन व्यायाम, सायकलिंगची सराव असल्यामुळे आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर मी स्पर्धा जिंकू शकलो.
पाथर्डीफाट्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या आवारात नाशिक पोलीस आयुक्तालय व तमाम नाशिककरांच्या वतीने सिंघल यांचे पोलीसांच्या बँण्ड पथकाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी सिंघलयांच्यासमवेत त्यांचे वडील झिलेसिंग सिंगल, आई कांतादेवी सिंगल तसेच ‘आयर्नमॅन’ स्पर्धेतील स्पर्धक राहिलेली त्यांची कन्या रविजासह पत्नी विनिता सिंघल यादेखील उपस्थित होत्या. यावेळी उपआुयक्त विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे, लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्त बापू बांगर, शांताराम आडके, अशोक नखाते, शांताराम पाटील, मोहन ठाकूर, अजय देवरे, पोलीस निरिक्षक सोमनाथ तांबे, मधुकर कड यांच्यासह अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
तळेगाव रोहीत दत्तू भोकनळचे स्वागत
तालुक्यातील तळेगाव रोही येथील भूमिपुत्र व रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा लष्करातील जवान दत्तू बबन भोकनळ संघाने सांघिक सुवर्णपदक मिळविल्याबद्दल त्याचे सोमवारी जन्मगावी जंगी स्वागत करण्यात आले.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow | Published: September 4, 2018 01:40 AM | Updated: September 4, 2018 01:41 AM

तळेगाव रोहीत दत्तू भोकनळचे स्वागत
चांदवड : तालुक्यातील तळेगाव रोही येथील भूमिपुत्र व रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा लष्करातील जवान दत्तू बबन भोकनळ संघाने सांघिक सुवर्णपदक मिळविल्याबद्दल त्याचे सोमवारी जन्मगावी जंगी स्वागत करण्यात आले. सकाळी १० वाजेच्या सुमारास त्यांचे आगमन होताच फटाक्याची आतषबाजी, तर पार्थ अॅकडमीच्या वतीने तळेगावरोही व परिसरात उघडया जीपवरुन भोकनळची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर तळेगावरोही येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या प्रांगणात सत्कार समारंभ पा पडला. अध्यक्षस्थानी राधाजी पाटील भोकनळ होते तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार डॉ.राहुल अहेर, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, संजय पवार,अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, पंचायत समितीचे सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, उपसभापती अमोल भालेराव, बाजार समितीचे उपसभापती नितीन अहेर, अशोक भोसले, बाळासाहेब वाघ, सुनील शेलार, जिल्हा परिषद सदस्य डॉ.सयाजीराव गायकवाड, अरुण न्याहारकर, वर्धमान पांडे, अनिल काळे, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, विलास ढोमसे, शहाजी भोकनळ, देवीदास अहेर, विश्वासराव देवरे,निवृत्ती घुले, सरपंच साधना पाटील,अनिल पाटील आदिसह मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दत्तु भोकनळ यांचा सत्कार करण्यात आला. प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन, स्वागतगीत विद्यालयातील संगीत चमुने सादर केले तर प्रास्तविक दीपक काळे यांनी केले. शिवाजीराव पाटील यांनी अनेक किस्से सांगत त्यास आर्थिक मदत करावी असे आवाहन केले. यावेळी पार्थ अॅकडमीच्या विद्यार्थ्यांनी गीत व नृत्यात दत्तूची गाथा सादर केली . तिरंगी ध्वजाच्या रंगाचे पोशाख परिधान करुन विद्यार्थ्यांनी मनोरा रचला तसेच लाठी काठीचे प्रदर्शनही केले. सत्काराला उत्तर देतांना दत्तू भोकनळ याने भविष्यात भारताचे नाव येत्या आॅलिम्पिकमध्ये पुढे नेणार असल्याचा आत्मविश्वास व्यक्त केला. या समारंभास तालुक्यातील नागरीक उपस्थित होते.
सेवा-सवलतीसाठी पाठपुरावा करू : चव्हाण
च्खासदार चव्हाण यांनी तळेगावरोही सारख्या दुष्काळी भागात पाणी नसतांना दत्तुने भारताचे नाव पाण्याशी संलग्न खेळातुन मिळविले. याचा सार्थ अभिमान असून मुख्यमंत्री फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दत्तूच्या मानधन व सेवा सवलतीसाठी पाठपुरावा करु असे आश्वासन दिले. माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी दत्तूने आॅलिम्पिकमध्ये देशाचे नाव उंचवावे यासाठी आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले. तर नाईक यांनी दत्तूला शासकीय नोकरी तसेच दहा लाखाचे बक्षिस देणार असल्याचे सांगीतले. आमदार अहेर यांनीही दत्तूच्या यशाबद्दल कौतुक केले.
अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून राजस्थानमधील कन्येची नियुक्ती
जयपूर - अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून राजस्थानमधील जयपूर शहरातील कोटपुतली या छोट्याशा भागातील मंजरी चावला हिची नियुक्ती करण्यात आली आहे. ती कॅलिफोर्नियाच्या सर्वोच्च न्यायालयात सॅन फ्रान्सिस्को बार न्यायालयात न्यायाधीश म्हणून रुजू झाली आहे.
२४ जुलै १९७७ला प्रागपुरा येथे मंजरीचा जन्म झाला होता. तिचे आजोबा चंदूलाल शिक्षक व समाजसेवक होते. तिचे वडील डॉ. संतप्रकाश चावला हे कॅन्सर रोगतज्ज्ञ आहेत. तिने परदेशातच शिक्षण पूर्ण केले आहे. लहानपणापासूनच मंजरी अभ्यासात हुशार होती. तिचे काका महेंद्र चावला कोटपुतली गावात बीडीएम रुग्णालयामध्ये डॉक्टर आहेत. मंजरी न्यायाधीश झाल्याची बातमी तिच्या गावात पसरताच तिच्या यशासाठी गावात मिठाई वाटून सर्वांनी आनंद व्यक्त केला.
Dailyhunt
राफेलवरून गदारोळ होत असतानाच 3 विमाने हिंदुस्थानात दाखल
सामना ऑनलाईन । ग्वाल्हेर
हिंदुस्थानी हवाईदलासाठी फ्रान्सकडून विकत घेण्यात यायच्या राफेल लढाऊ विमानांच्या करारावरून देशात मोठा गदारोळ होत आहे. विरोधकांनी सत्ताधारी एनडीएला या प्रकरणी टीकेचे लक्ष्य केले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी फ्रान्सचे वैमानिक तीन राफेल घेऊन ग्वाल्हेरमध्ये दाखल झाल्याने सर्वच थरात आश्चर्य व्यक्त होत आहे. फ्रेंच वैमानिक ग्वाल्हेरच्या महाराजपूर हवाई स्थानकावरून हिंदुस्थानी लढाऊ वैमानिकांना राफेल उड्डाणाचे आणि त्यातील तांत्रिक सुविधा वापरण्याचे प्रशिक्षण देणार आहेत. त्याबदल्यात हिंदुस्थानी वैमानिक फ्रांसच्या वैमानिकांना मिरज-2000 या लढाऊ विमानांच्या उड्डाणासह तांत्रिक प्रशिक्षण देणार आहेत. देशात आलेली तीन राफेल 3 दिवस येथे मुक्काम करणार आहेत.
संसदेत आणि संसदेबाहेर विरोधकांनी राफेल विमान खरेदी करारावरून केंद्रातील एनडीए सरकारला घेरले आहे. तरीही राफेल विमानाचा ताफा हिंदुस्थानात दाखल झाल्याने उच्च स्तरीय परवानगीनेच फ्रान्स आणि हिंदुस्थानी वैमानिकांनी प्रशिक्षण व तंत्रज्ञान आदानप्रदानाचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरचा महाराजपूर एअर बेस हा हिंदुस्थानी हवाई दलाचा प्रमुख तळ मानला जातो. रविवारी राफेल आणि मिराज प्रशिक्षण मोहिमेची प्राथमिक तयारी पूर्ण करण्यात आली. राफेलच्या कार्यप्रणालीशी परिचित होण्यासाठीच हिंदुस्थानी वैमानिक फ्रेंच वैमानिकांकडून उड्डाण व तांत्रिक प्रशिक्षण घेणार आहेत.राफेल हिंदुस्थानात थांबण्याचे कारण खराब हवामान असे सांगितले जात असले तरी हा प्रशिक्षण कार्यक्रम सरकारच्या राफेल खरेदीच्या ठाम धोरणाचाच भाग असल्याचे उघड झाले आहे.
हिंदुस्थानी लढाऊ वैमानिकांना प्रशिक्षणासाठी फ्रान्सला पाठवणार
हिंदुस्थानी हवाई दलात 36 राफेल विमाने सामील करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. त्यानुसार हिंदुस्थानच्या निवडक प्रशिक्षित लढाऊ वैमानिकांना राफेलच्या प्रशिक्षणासाठी फ्रान्सला पाठवले जाणार आहे. या विमानांच्या दोन स्क्वाड्रन हवाई दलात सामील होणार आहेत. त्यांची तैनाती हरियाणा आणि पश्चिम बंगाल राज्यात करण्याबाबत संरक्षण मंत्रालय आणि हिंदुस्थानी हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अंतिम चर्चा होत आहे.
36 राफेल टप्प्याटप्प्याने येणार
59 हजार कोटी रुपयांच्या राफेल खरेदी करारानुसार नोव्हेंबर 2019 ते एप्रिल 2022 या कालावधीत 36 राफेल विमाने हिंदुस्थानात येणार आहेत.ती टप्प्याटप्प्याने हिंदुस्थानी हवाई दलात सामील होणार आहेत. इंडो -फ्रान्स संरक्षण सहकार्य करारानुसार हिंदुस्थान आणि फ्रान्स एकमेकांना लढाऊ विमानांच्या उड्डाणाचे व तांत्रिक प्रशिक्षणाची देवाणघेवाण करणार असल्याचे फ्रांसच्या हिंदुस्थानातील राजदूतांनी स्पष्ट केले आहे. फ्रान्स त्यांच्याच मिराज- 2000 या हिंदुस्थानी ताफ्यात सामील झालेल्या विमानाचे नूतनीकरण कार्यही पार पाडणार आहे. त्याबदल्यात फ्रेंच वैमानिकांना मिराज उड्डाणाचे प्रशिक्षण हिंदुस्थानी वैमानिक देणार आहेत.
हिंदुस्थान -फ्रान्स लष्करी सहकार्य कराराला 20 वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने फ्रांसच्या राफेल टीमने हिंदुस्थानात तीन दिवस मुक्काम करायचे ठरवले आहे. या मुक्कामात विमान उड्डाण व तांत्रिक माहिती देवाण घेवाणीचे महत्त्वपूर्ण कार्य पार पाडले जाणार आहे.
-हिंदुस्थानातील फ्रेंच राजदूत
रविवार, २ सप्टेंबर, २०१८
पोस्टमन देणार ग्राहकांना आता घरपोच बँकिंग सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow | Published: August 31, 2018 10:51 PM | Updated: September 1, 2018 12:18 AM
पोस्टमन देणार ग्राहकांना आता घरपोच बँकिंग सेवा
नाशिक : शहरातील मुख्य टपाल कार्यालयासह दिंडीरी येथील उप टपाल कार्यालय व त्याच्या अखत्यारीतील आणखी तीन अशा विभागातील एकूण पाच केंद्रांवर शनिवारी (दि.१) इंडिया पोस्ट पेमेंटस बँकेच्या कामकाजाचा शुभारंभ होत आहे. नाशिक विभागात सध्या ३२ पोस्ट आॅफिस असून, सुमारे ३३२ कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही पोस्टाची बँक गावागावांमध्ये ग्राहकांच्या दारात पोहोचणार असून, ग्राहकांना घरपोच बँकिंगची सेवा मिळणार आहे. देशभरातील तब्बल १ लाख ५५ हजार कार्यालये आणि भारतीयांचा विश्वास असणाºया टपाल खात्यावर अधिकाधिक नागरिकांपर्यंत बँकिंग सुविधा पोहोचविण्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याने प्रत्येकापर्यंत बँकिंग पोहचविण्याच्या मोहिमेला खºया अर्थाने बळ मिळणार आहे.
भारत सरकारने बँकांचे राष्ट्रीयीकरण केले त्याला गेल्या १९ जुलै रोजी ४९ वर्षे पूर्ण झाली. शेती क्षेत्राला पुरेसा पतपुरवठा करता यावा, देशात बँकिंगचा वेगाने प्रसार व्हावा, शहरांसोबत ग्रामीण भागाला बँकिंगचे लाभ मिळावेत आणि त्यावेळी ७० टक्क्यांपेक्षाही अधिक नागरिक बँकिंगच्या बाहेर होते, त्यांना बँकिंगमध्ये आणता यावे, असा या ऐतिहासिक निर्णयाचा उद्देश होता. गेल्या ४९ वर्षांत देशातील अर्थव्यवस्थने बँकिंगचा एक मोठा पल्ला गाठला असला तरी हे उद्देश अद्याप पूर्णपणे साध्य झालेले नाही. राष्ट्रीयीकरणातून बँकिंगचा विस्तार झाला आणि त्या उद्देशाच्या दृष्टीने कामही झाले, मात्र प्रत्येक भारतीय नागरिकाला बँकिंगमध्ये लाभ अद्यापही मिळू शकलेला नाही. त्यामुळेच २०१४ मध्ये जनधन बँक खात्याची योजना सुरू झाली. या योजनेअंतर्गत विक्रमी साडेबत्तीस कोटी नागरिकांनी बँकेत जनधन खाते काढले असले तरीही काही नागरिकांना हा लाभ अजूनही मिळालेला नाही, तर ज्यांनी खाती काढली त्यांना बँक गावा बाहेर असल्याने तसेच बँकचे व्यवहार करण्यास भीती वाटल्याने यासारख्या वेगवेगळ्या कारणांनी बँकिंग करता येत नाही. सबसिडीचे वाटप जनधन खात्यातून करण्याचा आणि गरजू नागरिकांना सर्व मदत याच खात्यांतून देण्याचा निर्णय सरकारने घेतला. पण त्यानंतरही सबसिडी आणि इतर मदत खात्यात जमा करून घेण्यापलीकडे या खात्यांचा वापर होत नाही, असेही लक्षात आले. या प्रश्नाचे एक चांगले उत्तर सरकारला सापडले असून, इंडिया पोस्ट पेमेंट््स बँकेची शनिवारी होणारी सुरुवात हा त्याचाच एक भाग आहे.
या सेवा देणार पोस्ट बँक
एका लाखापर्यंतच्या ठेवी स्वीकारणे, मोबाइल पेमेंटस, रिटन्स सेवा, डेबिट कार्ड, नेट बँकिंग अशा सर्व सेवा ती देईल. परंतु, या बँकेतून क्रेडीट कार्ड मिळणार नाही. असंघटित कामगार आणि कमी उत्पन्न गटातील नागरिकांना बँकिंग सुविधा मिळावी, हाच या बँकेचा उद्देश असल्याने त्यानुसार सेवा पुरविण्याची योजना या बँकने केली आहे. बँक सेवा शुल्क आकारून नागरिकांना घरपोच सेवा देणार आहे. मात्र ग्राहकांची क्षमता किती आहे, हे मात्र तपासून त्यात सरकारला फेरफार करावे लागणार आहेत. उदा. रोख काढणे, रोख जमा करणे यासाठी १५ रुपये (घरपोच सेवा) तर काही केंद्रांवर जाऊन या सेवा घेण्यासाठी २५ रुपये द्यावे लागणार आहेत. पण इंटरनेट व्यवहार करणाºयास कोणतेही शुल्क ठेवण्यात आलेले नाही. क्यूआर कोडमार्फ त आपल्या खात्यात व्यवहार करण्याची सोयही बँक देणार आहे. त्यामुळे बँक खाते लक्षात ठेवण्याचीही गरज पडणार नाही.
१०० टक्के बँकिंगकडे वाटचाल
भारतातील निरक्षर नागरिक, वयस्कर नागरिक आणि बँकेची भाषा न समजणारे सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी ही सेवा अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. टपाल किंवा पोस्ट खात्याशी सर्वसामान्य नागरिकांचे असलेले परंपरागत नाते आणि पोस्ट खात्याचा देशभर असलेला प्रचंड विस्तार, यामुळे हा बदल आपल्या देशाला १०० टक्के बँकिंगकडे घेऊन जाणार आहे.
४सरकारची १०० टक्के मालकी असलेल्या पोस्ट खात्याने ही जबाबदारी घेतली असल्याने बँकेसाठी जागा, कर्मचारी आणि विस्तार याबाबी सोप्या झाल्या आहेत. पोस्टाकडे असलेली अतिरिक्त जागा, इमारती आणि साधने नव्या बँकेसाठी वापरली जातील. नाशिक विभागात शहरातील मुख्यालयाअंतर्गत ३२ टपाल कार्यालयांमध्ये पोस्टमन, क्लार्क एमटीएस व अधिकारी मिळून जवळपास ३३२ कर्मचाºयांचे मनुष्यबळ पोस्टाकडे आहे. सध्या पोस्टाचे बचत खाते, अल्पबचत, मासिक उत्पन्न योजना, ज्येष्ठ नागरिक, समयबद्ध एक, दोन-तीन वर्षांसाठी व पाच वर्षांसाठीची योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) व सुकन्यासारख्या विविध योजनांच्या माध्यमातून चार लाख ७५ हजार ग्राहक आहेत. आता पोस्ट पेमेंट बँके च्या माध्यमातून विभागातील घराघरापर्यंत पोहचण्याचे लक्ष असल्याची माहिती वरिष्ठ पोस्टमास्टर एम. एस. अहिरराव यांनी दिली आहे.
संरक्षण साहित्याच्या उत्पादनात सहभागी व्हावे : रिअर अॅडमिरल व्ही. एम. डॉस
मेक इन इंडिया अंतर्गत भारतीय नौदलाच्या वतीने आयात केल्या जाणाऱ्या सामग्रीस पर्याय म्हणून नौदलातील रशियन हेलिकॉप्टर्स व विमानांचे देशांतर्गत उत्पादन, संबंधित सेवा व व्यवस्थेसाठी नाशिकमधील उद्योगांना उत्पादनाच्या मोठ्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. देशांतर्गत उत्पादनामुळे आयातीद्वारे बाहेरच्या देशात जाणारी गंगाजळी रोखता येऊ शकेल. नाशिकमधील उद्योगांची उच्च क्षमता असून, संरक्षण साहित्याच्या उत्पादनात सहभागी व्हावे, असे आवाहन नौदलाचे रिअर अॅडमिरल व्ही. एम. डॉस यांनी केले आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow | Published: September 1, 2018 01:00 AM | Updated: September 1, 2018 01:00 AM
संरक्षण साहित्याच्या उत्पादनात सहभागी व्हावे : व्ही. एम. डॉस
सातपूर : मेक इन इंडिया अंतर्गत भारतीय नौदलाच्या वतीने आयात केल्या जाणाऱ्या सामग्रीस पर्याय म्हणून नौदलातील रशियन हेलिकॉप्टर्स व विमानांचे देशांतर्गत उत्पादन, संबंधित सेवा व व्यवस्थेसाठी नाशिकमधील उद्योगांना उत्पादनाच्या मोठ्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. देशांतर्गत उत्पादनामुळे आयातीद्वारे बाहेरच्या देशात जाणारी गंगाजळी रोखता येऊ शकेल. नाशिकमधील उद्योगांची उच्च क्षमता असून, संरक्षण साहित्याच्या उत्पादनात सहभागी व्हावे, असे आवाहन नौदलाचे रिअर अॅडमिरल व्ही. एम. डॉस यांनी केले आहे. निमात आयोजित नेव्हल एव्हिएशन इंडस्ट्री इंटरॅक्शन या महत्त्वाकांक्षी उपक्र मात ते बोलत होते. डॉस यांनी पुढे सांगितले की, १९९० नंतरच्या मुक्त धोरणामुळे संरक्षण क्षेत्रातील देशांतर्गत उत्पादनास चालना मिळाली आहे.नाशिक हे एचएएल मिग विमान उत्पादनाचे प्रमुख केंद्र असून, नौदलातील रशियन बनावटीची विमाने, हेलिकॉप्टर्स व विमानांचे देशांतर्गत उत्पादन, संबंधित सेवा व व्यवस्थेसाठी नाशिकमधील उद्योगांना उत्पादनाच्या संधी निर्माण झाल्या आहेत. संरक्षण साहित्याच्या उत्पादनात सहभागी व्हावे, असेही त्यांनी सांगितले. कमांडर राजेश बाबू यांनी सांगितले की, देशांतर्गत उत्पादनाविषयी आढावा घेऊन उत्पादनक्षम साहित्याची यादी व अपेक्षति उत्पादन याची माहिती उपलब्ध करून दिली जाईल. दुसºया सत्रात नौदलातर्फे पॉवर पॉइन्ट प्रेझेंटेशनद्वारे देशांतर्गत उद्योगातून साहित्याची खरेदी, डिझाइन, डेव्हलपमेंट, देखभाल, असा संबंधित सेवा देशातून उत्पादित करून घेण्यात येणार असून, त्यांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे कमांडर एन. बालकृष्णन यांनी सांगितले. यावेळी कॅप्टन चेतन घाग, कमांडर जी. एस. संदीप, कमांडर जी. प्रभाकर आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक भाषणात निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांनी नाशिकमधील औद्योगिक वातावरण व उद्योगांची क्षमता याची माहिती दिली. मेक इन नाशिक समितीचे अध्यक्ष श्रीकांत बच्छाव यांनी स्वागत केले. यावेळी शशिकांत जाधव, कैलास अहेर, सुधाकर देशमुख, संजय सोनवणे, उदय रकिबे, मनीष रावळ, हर्षद ब्राह्मणकर, राजेश गडाख, श्रीपाद कुलकर्णी, कमलेश नारंग, तेजपाल बोरा, गौरव धारकर आदींसह उद्योजक उपस्थित होते.
निमाच्या पुढाकाराने उपक्रम
खासगी क्षेत्रातील उद्योगांना व्यवसायवाढीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नौदलातर्फे विविध उपक्र म राबविण्यात येत आहेत. नाशिकमध्ये निमाच्या पुढाकाराने प्रथमच हा उपक्र म राबविण्यात येत असून, नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राच्या वाटचालीस चालना मिळणार आहे. नाशिकच्या उद्योगांमध्ये संरक्षण सामुग्री उत्पादनाची क्षमता असल्याने या उद्योगांनी संरक्षण साहित्य उत्पादनात सहभाग घ्यावा. देशातून बाहेर जाणारी गंगाजळी रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन डॉस यांनी केले आहे.
शनिवार, १ सप्टेंबर, २०१८
दत्तू
खेडेगावात लहानाचा मोठा झालेला दत्तू. रिओ आॅलिम्पिकचं त्याचं पदक केवळ सहा सेकंदानं हुकल्यामुळे साऱ्या जगाला तो माहीत झाला.
By राकेशजोशी | Follow | Published: August 31, 2018 02:01 AM | Updated: August 31, 2018 02:06 AM

दत्तू
ठळक मुद्देअंगात जिगर आणि मनात ऊर्मी ऐन स्पर्धेच्या वेळी तो आजारी मेहनत आणि कर्तृत्वाच्या जोरावर लष्करात नोकरीआता त्याचं लक्ष लागलं आॅलिम्पिककडे..
दत्तू
- राकेश जोशी
खेडेगावात लहानाचा मोठा झालेला दत्तू.
रिओ आॅलिम्पिकचं त्याचं पदक
केवळ सहा सेकंदानं हुकल्यामुळे
साऱ्या जगाला तो माहीत झाला.
आत्ताही आशियाई स्पर्धेत
आजारपणामुळे त्याचं वैयक्तिक पदक हुकलं;
पण सांघिक प्रकारात त्यानं
जिद्दीनं सुवर्ण पटकावलंच.
त्याच्या जिद्दीचा प्रवास सोपा कधीच नव्हता..
दत्तू भोकनळ. अंगात जिगर आणि मनात ऊर्मी असली की काय घडू शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दत्तू. हातातोंडाची गाठ घालता घालता आणि परिस्थितीशी झगडताना मेटाकुटीला येत असताना गरीब घरातील दत्तू आंतरराष्टÑीय पातळीवर काही कामगिरी करील असं कोणाच्याच ध्यानीमनी नव्हतं. त्याच्या गावातल्याच काय, पण घरातल्यांनाही तसं कधी वाटलं नव्हतं. कोणाला माहीत होता हा दत्तू? पण २०१६ च्या रिओ आॅलिम्पिकमध्ये नौकानयनात त्याचं पदक सहा सेकंदांनी हुकलं आणि दत्तू अख्ख्या दुनियेला माहीत झाला. त्यामुळेच आत्ता आशियाई स्पर्धेतही साºया नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या; पण त्याचं वैयक्तिक पदक हुकलं. सहाव्या क्रमांकावर तो फेकला गेला. अर्थात याचं कारण होतं त्याची तब्येत. ऐन स्पर्धेच्या वेळी तो आजारी पडला होता. त्याच्या अंगात ताप होता. यशानं त्याला हुलकावणी दिली.
याच कारणामुळे दत्तूला सांघिक प्रकारातूनही संघाबाहेर ठेवण्यात येणार होते, पण जिद्दी दत्तू हार मानायला तयार नव्हता आणि संघ व्यवस्थापनाचाही त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. त्यामुळे दुसºयाच दिवशी झालेल्या सांघिक नौकानयन स्पर्धेत दत्तूला सहभागी करून घेण्यात आलं आणि दत्तूनंही आपल्यावरील विश्वासाला मग तडा जाऊ दिला नाही. या संघानं सुवर्णपदक जिंकलं आणि भारताच्या खात्यावर आणखी एका सुवर्णाची नोंद झाली.पण दत्तूला कोणतंच यश सहजासहजी मिळालं नाही. त्याचा आजवरचा प्रवास कायमच संघर्षानं भरलेला राहिला आहे.
तळेगाव रोही हे नाशिकच्या चांदवड तालुक्यातील जेमतेम दहा हजार लोकसंख्येचं गाव. गावात कोणत्याही मूलभूत सोयीसुविधा नाहीत. अशा वातावरणात वाढलेल्या दत्तूचा एकमेव आधार म्हणजे त्याचा स्वत:वरचा विश्वास. आत्मविश्वास. त्याच बळावर त्यानं लहानपणीच आपल्या अंगावर पडलेल्या जबाबदाºया केवळ समर्थपणे पेलल्याच नाहीत, तर या आत्मविश्वासाचं, जिद्दीचं रूपांतर यशातही केलं.
त्याचे प्राथमिक शिक्षण गावातीलच प्राथमिक शाळेत झालं. पाचवी ते बारावीपर्यंतचं शिक्षण संत ज्ञानेश्वर विद्यालयात झालं. दहावीत असतानाच वडील वारले. कर्तेपणाची जबाबदारी अंगावर आलेल्या दत्तूनं मग ‘ज्येष्ठाची’ भूमिका पार पाडताना आईच्या मदतीने घरगाडा हाकला. मिळेल ते आणि पडेल ते काम करत घराचा गाडा हाकताना मेहनत आणि कर्तृत्वाच्या जोरावर २०१२ मध्ये लष्करात नोकरी मिळवली.
त्यावेळी त्याचं फारसं शिक्षणही झालेलं नव्हतं. सैन्य दलात असतानाच त्यानं बारावीची परीक्षा लासलगाव येथून दिली. लष्करात कठोर परिश्रम, चिकाटी, जिद्दीच्या बळावर त्यानं नुसते प्रशिक्षणच नव्हे तर पुणे येथे नौकानयनाचे धडेही तितक्याच एकाग्रतेने गिरवले.
खरं तर लष्करात सरावाचा भाग म्हणून दत्तू बास्केटबॉल खेळायचा. मात्र त्याची उंची आणि शरीरयष्टी पाहून वरिष्ठांनी त्याला नौकानयन संघात समाविष्ट केले. इथूनच त्याच्या आयुष्याला वेगळं वळण लागलं. नौकानयन म्हणजे काय, ते कसं करतात, त्याचं तंत्र काय, यातलं ओ की ठो दत्तूला माहीत नव्हतं, पण लवकरच त्यानं ते सारं आत्मसात केलं. अंगातील शिस्तीमुळे थोड्याच काळात त्यानं त्यावर वर्चस्व मिळवलं आणि तो त्यात चांगलाच रमलाही. या खेळातील बारकावे, तांत्रिक गोष्टी त्यानं मेहनतीनं शिकून घेतल्या. त्याचा अर्थातच अपेक्षित परिणाम झाला आणि भल्याभल्यांना मागे टाकत २०१४ साली त्याने राष्ट्रीय नौकानयन अजिंक्यपद स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची कमाई केली. त्यानंतर २०१५ साली चीन येथे झालेल्या आशियाई नौकानयन अजिंक्यपद स्पर्धेत दत्तूने सिंगल स्कल प्रकारात रौप्यपदक पटकावलं. २०१८च्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक पटकावले.
आपल्या कर्तबगारीमुळे आज दत्तू सगळ्यांना माहीत झाला आहे; पण त्याचं बालपण फारच कष्टात आणि गरिबीत गेलं.
५ एप्रिल १९९१ रोजी तळेगाव रोही येथील गरीब शेतकरी कुंटुबात त्याचा जन्म झाला. वडील बबन. विहिरी खोदाईचे काम करायचे. आयुष्यभर काबाडकष्टाचेच दिवस पाहिल्याने ते आजारी पडले आणि त्यातच त्यांचा अंत झाला. दत्तू आणि आई आशा. यांच्यावरच मग साºया कुटुंबाची जबाबदारी आली. त्यासाठी लवकरात लवकर काहीतरी कमाई करणं, घराला हातभार लावणं गरजेचं होतं. शारीरिक कष्टात कधीच माघार न घेतलेल्या दत्तूनं लष्करात प्रवेश मिळवला. आता आर्थिक आणि मानसिक चिंता मिटेल असं वाटत होतं; पण नशीब हात धुऊन दत्तूच्या मागं लागलं होतं.
आॅलिम्पिक स्पर्धेसाठी दत्तूची तयारी सुरू होती. दत्तू कोरिया येथे फिसा अशिया अॅण्ड ओशियाना कॉण्टिनेण्टल आॅलिम्पिक क्वॉलिफिकेशन स्पर्धेसाठी रवाना झाला होता. त्याचवेळी आई (आशाबाई ऊर्फ अक्का) घरात पाय घसरून पडली. अपघात वरवर किरकोळ वाटत असला तरी तसं नव्हतं. मेंदूला मार लागल्याने आईला स्मृतिभंश झाला. कोणालाच ती ओळखू शकत नव्हती.
रिओ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरल्याच्या आनंदात दत्तू जेव्हा आईला पेढा भरविण्यासाठी घरी पोहोचला तेव्हा आईनं दत्तूला ओळखलेच नाही. ज्या आईवर दत्तूचं जीवापाड प्रेम, वडील गेल्यानंतर जिनं आपलं पालनपोषण केलं, ती आई आपल्याला ओळखू शकत नाही याचं दत्तूला खूप दु:ख झालं. हे दु:ख उराशी बाळगत आॅलिम्पिक स्पर्धेसाठी दत्तू रवाना झाला. ऐन आॅलिम्पिक स्पर्धेदरम्यान ही घटना घडल्यामुळे नाही म्हटलं तरी दत्तू विचलित झाला. अर्ध लक्ष सरावाकडे, स्पर्धेकडे आणि अर्ध लक्ष आईकडे, अशी त्याची अवस्था झाली होती. स्पर्धा संपल्या संपल्या दत्तू परत घरी आला. पण लवकरच आई वारली.
जागतिक रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत अवघ्या ६ सेकंदांच्या फरकाने पदकाच्या शर्यतीमधून बाहेर पडावं लागल्याचं दु:ख होतंच, त्यात आई गेली. पण त्यातून सावरत दत्तूने नव्या उमेदीने सुरुवात केली. यंदाच्या आशियाई क्र ीडा स्पर्धेत एकेरीच्या पदकानं त्याला हुलकावणी दिली; पण त्यामुळेच जिद्दीनं पेटून उठलेल्या दत्तूनं सांघिक प्रकारात देशाला सुवर्ण मिळवून देण्यात मोलाचा हातभार लावला. हे पदक माझ्या आईसाठी आहे असं दत्तू सांगतो. या पदकानं त्याला पुन्हा नवी उमेद मिळवून दिली आहे. आता त्याचं लक्ष लागलं आहे ते आॅलिम्पिककडे..


