अहमदनगर (प्रतिनिधी)- माजी सैनिकांनी हाती घेतलेली वृक्षरोपणाची चळवळ लोककल्याणकारी आहे. वृक्षरोपण व संवर्धन काळाची गरज बनली असून, भावी पिढीच्या कल्याणासाठी प्रत्येकाने वृक्षरोपण करण्याचे आवाहन ह.भ.प. राम महाराज घुले यांनी केले.
माजी सैनिकांच्या जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने तपोवन येथील दत्त मंदिर परिसरात राबविण्यात आलेल्या वृक्षरोपण अभियान कार्यक्रमाप्रसंगी राम महाराज घुले बोलत होते. प्रारंभी राम महाराज घुले, मा.नगरसेवक निखील वारे, ह.भ.प.आव्हाड महाराज, उद्योजक प्रशांत कोळपकर, निवृत्त तहसिलदार संजय परदेशी, उद्योजक मारूती कराळे यांच्या हस्ते वृक्षरोपणाने या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, भाऊसाहेब कर्पे, निवृत्ती भाबड, संतोष शिंदे, भाऊसाहेब देशमाने, संजय पाटेकर, बन्सी दारकुंडे, प्रभू म्हस्के, सुनिल गुंजाळ, लेंडाळ, गणेश पालवे, आनंदा गिते, बळवंत पालवे, बाबासाहेब आव्हाड, भिवाजी डमाळे, बाबासाहेब चौधरी, मंदिर ट्रस्टचे अर्जुन बडे, आश्विन गडाख, दत्तात्रय डांगे, गामे सर, याशिम शेख, प्रविण म्हस्के, बबन वाबळे, अमिन इनामदार, सुमित अकोलकर, बाजीराव भालेराव, बाळासाहेब जाधव, विठ्ठल पवार आदिंसह माजी सैनिक उपस्थित होते.
पुढे राम महाराज घुले म्हणाले की, वाढते शहरीकरण व औद्योगिकरणाने मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल झाली. यामुळे निसर्गचक्र बिघडले असून, निरोगी व आनंदी जीवणासाठी वृक्षरोपण करणे अत्यावश्यक आहे. माजी सैनिकांनी हाती घतेलेली वृक्षरोपण चळवळ कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
निखील वारे म्हणाले की, सैनिकांच्या रक्तातच देशभक्ती भिनलेली असते. जिवावर उदार होऊन ते देश रक्षणाचे कार्य करीत असतात. देश रक्षणाचे कर्तव्य बजावून सामाजिक कार्यात माजी सैनिकांनी घेतलेल्या पुढाकाराने मोठा बदल घडणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाऊसाहेब देशमाने यांनी फाऊंडेशनच्या विविध सामाजिक कार्याची व वृक्षरोपण, संवर्धन उपक्रमाची माहिती दिली. दत्तात्रय डांगे यांनी कॉलनी मधील सर्वाना वृक्ष दत्तक देऊन त्याचे संवर्धन केले जाणार असल्याचे स्पष्ट केले. मेजर संजय पाटेकर व सुमित अकोलकर यांनी उपस्थितांचे आभार मानले
Pages
▼
पेज
▼

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा