Pages

पेज

मंगळवार, ४ सप्टेंबर, २०१८

हवाई दलाचं मिग-27 विमान कोसळलं; वैमानिक सुखरुप

अपघाताचं कारण अद्याप अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: September 4, 2018 09:55 AM | Updated: September 4, 2018 10:09 AM

Indian Air Force MiG 27 crashes near Rajasthans Jodhpur | हवाई दलाचं मिग-27 विमान कोसळलं; वैमानिक सुखरुपहवाई दलाचं मिग-27 विमान कोसळलं; वैमानिक सुखरुप

जोधपूर: हवाई दलाचं मिग-27 विमान राजस्थानातील जोधपूरमध्ये कोसळलं आहे. या अपघातातून वैमानिक सुखरुप बचावल्याची माहिती मिळते आहे. या अपघाताचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पूर्व जयपूरमधील बनाड पोलीस स्टेशनच्या परिसरात असलेल्या देवलिया गावाजवळ हवाई दलाचं विमान कोसळलं. विमान कोसळण्याच्या आधी वैमानिक सुरक्षित बाहेर आला.

Indian Air Force MiG 27 crashes near Rajasthan's Jodhpur, Pilot safe; More details awaited. pic.twitter.com/bVa9LiTZgv

— ANI (@ANI) September 4, 2018


हवाई दलाचं मिग-27 विमान मोकळ्या जागेत कोसळलं. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. विमान जमिनीवर कोसळताच आगीचे लोट उसळले. यानंतर स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि हवाई दलाचे अधिकारीदेखील घटनास्थळी पोहोचले आहेत. तांत्रिक कारणामुळे या विमानाचा अपघात झाला असावा, अशी प्राथमिक शक्यता हवाई दलाकडून वर्तवण्यात आली आहे. मात्र या घटनेची चौकशी करुन अपघाताचं नेमकं कारण शोधण्यात येईल, अशी माहिती हवाई दलाकडून देण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा