Pages

पेज

रविवार, ७ फेब्रुवारी, २०१६

नवी दिल्लीच्या माननीय सशस्त्र दल आयोग (मुख्य पीठ) च्या आदेशांचे पालन करत, भारतीय हवाई दलात एअर मार्शल दर्जाचे विशिष्ट संख्येपेक्षा अतिरिक्त पद निर्माण करणे

नवी दिल्लीच्या माननीय सशस्त्र दल आयोगाच्या (मुख्य पीठ) आदेशांचे  पालन करत, भारतीय  हवाई दलात 17 महिन्यांसाठी एअर मार्शल दर्जाचे विशिष्ट  संख्येपेक्षा अतिरिक्त पद निर्माण करायला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. हे पद 1 डिसेंबर 2014 ते 30 एप्रिल 2016 या कालावधीसाठी असेल. एअरोनॉटीकल अभियंता शाखेत सध्या परवानगी असलेल्‍या एअर मार्शलच्या पदांपेक्षा या पदाची निर्मिती  अतिरिक्त असेल. यामुळे  मंत्रालयाला एव्हीएम  संजय शर्मा यांच्या पदोन्नतीबाबत मंत्रीमंडळाच्या नियुक्ती समितीची मान्यता मिळवणे शक्य होईल.  नवी दिल्लीतल्या माननीय सशस्त्र दल आयोगाच्या मुख्य पीठाच्या निर्देशांचे पालनही याद्वारे होईल.

या निर्मितीमुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचेही पालन होईल. एसीसीच्या विशेष पदोन्नती मंडळ 2014 च्या मान्यतेनंतर एव्हीएम संजय शर्मा यांचा 1 डिसेंबर 2014  पासून पूर्वलक्षी प्रभावाने  एअर मार्शल पदासाठीच्या पदोन्नतीसाठी विचार केला जाईल.

  - केंद्रीय मंत्रिमंडळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा