Pages

पेज

गुरुवार, १७ सप्टेंबर, २०१५

एक पद एक निवृत्तीवेतन साठी साताऱ्यात मोर्चा

सातारा - सैन्यदलाप्रमाणे अर्धसैनिक दलाच्या आजी-माजी सैनिकांना वन रॅंक वन पेन्शन व इतर सोयी सवलती मिळाव्यात, या मागणीसाठी जिल्ह्यातील अर्धसैनिक दलाच्या माजी सैनिकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. 
 
बीएसएफ माजी सैनिक वेलफेअर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष मोहन धोंडवड व उपाध्यक्ष अजित कट्टे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील बीएसएफच्या माजी सैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयापासून मोर्चास सुरवात केली. हा मोर्चा पोवई नाक्‍यावरून पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. मोर्चात सहभागी झालेल्या माजी सैनिकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी घोषणाबाजी केली. यावेळी दिलेल्या निवेदनात असोसिएशनने म्हटले आहे की, आर्मी, नेव्ही इतकेच कामकाज बीएसएफच्या जवानांना देखील असते. पण, सैन्य दलांप्रमाणे अर्धसैनिक दलांना कॅन्टीन सुविधा, नोकरीत आरक्षण, इतर शासकीय सुविधा मिळत नाहीत. आर्मीचा जवान व बीएसएफचा जवान यात फरक न करता त्यांनाही सैन्य दलाप्रमाणे सवलती मिळणे आवश्‍यक आहे. गुजरात, केरळ, गोवा, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाना, पंजाब, दिल्ली या राज्यांमध्ये  सैन्य दलाप्रमाणे सर्व सोयी-सवलती अर्धसैनिक दलांना लागू केलेल्या आहेत. या सुविधा महाराष्ट्र राज्यातील अर्धसैनिक दलांच्या आजी- माजी सैनिकांना लागू कराव्यात.  तसेच वन रॅंक वन पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी माजी बीएसएफ कमांडंट तानाजी पवार, कोल्हापूर माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष संजय खैरमोडे, बीएसएफ माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष मोहन धोंडवड, सचिव राजेंद्र शिंदे, उपाध्यक्ष अजित कट्टे तसेच जिल्ह्यातील बीएसएफचे माजी सैनिक उपस्थित होते.
 
[ सकाळ वृत्तसेवा ]

२ टिप्पण्या:

  1. Jar bsf 35_ 37 ya vayat nivrutya hof astil tar tyani OROP jarur magavi. Jar seemevar Pakistan ne halla kelyavar bsf mage nahi geli tar OROP jarur milavi

    उत्तर द्याहटवा
  2. सैनिक दर्पण मध्ये आपले आणि प्रतिक्रियांचे स्वागत आहे.

    आपल्या विचारांशी सर्व सैनिक सहमत असतीलच.

    एक पद एक निवृत्ती सेवा त्या सर्वाना लागू करावी ज्यांचे निवृत्ती वय हे सैन्य प्रमाणेच आहे आणि आसवे.
    त्यांच्या सेवेच्या सर्व अटी व शर्ती ह्या सैनिकांसारख्या आहेत आणि असाव्यात .
    लढाई झाली तर त्यांनाही सीमेवर पाठवण्यात यावे आणि शांतीच्या काळात देखील त्यांना सीमेवर सेवाची संधी देण्यात यावी.

    धन्यवाद
    संपादक

    उत्तर द्याहटवा