Pages

पेज

मंगळवार, १५ सप्टेंबर, २०१५

ठळक घडामोडी


अहमदनगर: भगवानगड पाणी पुरवठा योजनेसाठी १ कोटी ६१ लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीतील बैठकीत निर्णय

मुंबई: 'बेस्ट'तर्फे चर्चगेट ते अंधेरीदरम्यान १६५ अतिरिक्त बस सोडण्यात येणार

पुणे: कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टने नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील खंडोबावाडी गाव घेतले दत्तक

पुणे: कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टतर्फे दरवर्षी दिले जाणारे पुरस्कार यंदा रद्द, पुरस्काराचा निधी दुष्काळग्रस्तांसाठी वापरणार

७/११ मुंबई बॉम्बस्फोटातील १२ दोषींच्या शिक्षेची सुनावणी उद्या होणार. 

वेस्टर्न रेल्वेची रखडपट्टी उद्यापर्यंत कायम, रेल्वे वाहतूक पूर्ववत होण्यास अजून १५ तास लागू शकतात. 

मराठी भाषा येत असेल तरच मिळेल रिक्षाचा परवाना. रिक्षा परवान्यासाठी मराठी येणं गरजेचं - परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची माहिती. 

आपचे आमदार सोमनाथ भारती यांना हायकोर्टाचा दिलासा, १७ सप्टेंबरपर्यंत अटक होणार नाही.

नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी 'नाम' फाऊंडेशनची स्थापना, एसबीआयच्या बँक अकाऊंटमध्ये थेट मदत जमा करता येणार. 

अहमदनगर: उत्सव काळात चाचणी परीक्षा न घेण्याचा आदेश धाब्यावर. १४ ते ३० या काळात नगर जिल्ह्यात शाळांच्या परीक्षा होणार

पटेल आरक्षणास 'पटेलबाईं'चा 'हार्दिक' नकार


मक्का येथे झालेल्या दुर्घटनेत ११ भारतीयांचा मृत्यू तर १९ जण जखमी- विकास स्वरुप, प्रवक्ता परराष्ट्र मंत्रालय

पश्चिम रेल्वेवरील अपघातामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रकही बदलण्यात आले आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील रुग्णालयांना अचानक भेट दिली, दिल्लीत डेंग्यूची साथ आल्याच्या पार्श्वभूमीवर केला पाहणी दौरा. 

दुष्काळग्रस्तांसाठी बॉलिवूडही सरसावले, अभिनेता अक्षय कुमार बीडमधील दु्ष्काळग्रस्तांना करणार ९० लाखांची मदत. पुढील ६ महिन्यात अक्षयकडून मदतीसाठी दर महिना १५ लाख रुपये देण्यात येणार आहेत. 

पश्चिम रेल्वेवरील अपघातानंतर घाबरलेल्या प्रवाशांनी लोकलमधून उडी मारली असून त्यात २ जण जखमी झाले आहेत. दरम्यान या अपघातामुळे रेल्वेचा खोळंबा झालेला असतानाच त्याचा परिणाम रस्ते वाहतुकीवरही झाला असून वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत

इंदूर - अहमदाबाद महामार्गावर सरदारपूर २४ टन स्फोटक पदार्थ असलेला ट्रक आढळला, ट्रकचालक आणि अन्य एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
source[Internet News]
More details
 हिंदी मे http://sainikdrpanhindi.blogspot.in/
In English http://sainikdarpan.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा