नवी दिल्ली - कारगिल विजय दिनानिमित्त आज (रविवार) माजी सैनिकांनी ‘वन रॅंक वन पेन्शन‘ योजना त्वरित लागू करण्यासाठी धावण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.
दिल्लीतील धौला कुआँ परिसरातून माजी सैनिकांनी या अनोख्या आंदोलनास सुरवात केली. कारगिल युद्धात शहीद झालेले कॅप्टन विक्रम बत्रा यांचे वडील जी. एल. बत्रा यांनी याला हिरवा कंदील दाखविला. माजी सैनिकांच्या या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे दोन ऑक्टोबरपासून दिल्लीतील रामलीला मैदानावर बेमुदत उपोषण करणार आहेत.
माजी सैनिकांनी यापूर्वी ही योजना लागू करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलिले आहे. माजी सैनिकांनी देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
| |
[वृत्तसंस्था] |
Pages
▼
पेज
▼
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा