Pages

पेज

सोमवार, २० जुलै, २०१५

एक हुद्द एक निवृत्तीवेतन : आंदोलन करणारे ताब्यात

अंबाला (हरियाना)- "वन रॅंक वन पेन्शन‘ (ओआरओपी) च्या अंमलबजावणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुमारे 20 हून अधिक माजी सैनिकांना आज (सोमवार) पोलिसांनी ताब्यात घेतले.

गडकरी यांचा ताफा ज्या रस्त्यावरून जाणार होता, त्याठिकाणी आंदोलनकर्ते तयारीत होते. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना ताब्यात घेतले आणि नंतर सोडून दिले. अंबाला कॅंटोन्मेंटजवळ इंदिरा चौक येथे माजी सैनिकांनी घोषणाबाजी करत "ओआरओपी‘ची अंमलबजावणी करण्याची जोरदार मागणी केली.

[वृत्तसंस्था]

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा