Pages

पेज

रविवार, १२ ऑगस्ट, २०१८

मंचरमध्ये आज माजी सैनिकांचा मेळावा

मंचर - आंबेगाव तालुक्‍यातील माजी सैनिकांचा वार्षिक मेळावा रविवार (दि. 12) सकाळी 10 वाजता पिंपळगाव फाटा-एस कॉर्नर मंचर येथील गणराज मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती माजी सैनिक संघाचे आंबेगाव तालुक्‍याचे अध्यक्ष विलास अभंग व सचिव यशवंत गांजाळे यांनी दिली. माजी सैनिक मेळाव्यामध्ये विविध विषयावर चर्चा होणार आहे. त्यामध्ये निवृत्तीवेतन, कॅन्टीन, वैद्यकीय सुविधा, पाल्यांच्या शैक्षणिक सवलती यावर चर्चा होईल. याशिवाय आयुर्वेदिक शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा