Pages

पेज

सोमवार, २० ऑगस्ट, २०१८

शिक्रापूरच्या यशकीर्तीकडून सैनिकांना राख्या

शिक्रापूर- येथील यशकीर्ती सामाजिक संस्थेच्या महिलांनी सैनिकांसोबत नाते जोडले असून त्यांनी सीमेवर भारताचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना रक्षाबंधन निमित्ताने एक हजार राख्या आणि शुभेच्छा पत्र पाठविले.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील यशकीर्ती सामाजिक संस्था सैनिकांना एक हजार राख्या पाठवून सैनिकांचे हात आपल्या सीमेचे रक्षण करण्यासाठी असून बळकट केले आहेत. याप्रसंगी यशकीर्ती सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा मंगल सासवडे, सचिव वैशाली खेडकर, भाग्यश्री जाधव, कविता जकाते, सीमा भाऊसार, उषा कळमकर, संगिता तावरे, निर्मला तोडकर, वैष्णवी भाऊसार, ओवी जाधव तसेच माहेर संस्थेच्या कार्यकर्त्या सुरेखा थिटे यांसह आदी उपस्थित होते.
या महिलांनी सैनिकांना राख्या पाठविताना सिमेवरील सैनिकांना पत्राद्वारे तुम्ही सिमेवर रक्षण करणारे आमचे खरे भाऊ आहात. त्यामुळे आम्ही तुमच्या बहिणी म्हणून तुम्हाला राखी पाठवत आहोत. तुम्ही आमचे रक्षण करो, अशी आम्ही प्रार्थना करतो. आम्ही तुमच्या सख्ख्या नाहीत परंतु पक्क्‌या बहिणी असल्याचे महिलांनी पत्राद्वारे सांगितले आहे. यावेळी शिक्रापूर येथील माजी सैनिक संघाच्या माध्यामतून या राख्या टपालने सीमेवरील सैनिकांना पाठविण्यात आल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा