Pages

पेज

मंगळवार, २७ फेब्रुवारी, २०१८

क्रीडा गुणांच्या सवलतीसाठी ऑनलाइन अर्ज बंधनकारक

 

पुणे- राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी होणाऱ्या खेळाडूंना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण दिले जातात. त्यासाठी दहावी व बारावी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने मुख्याध्यापक तथा प्राचार्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांनी केले आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा हक्‍क अधिनियम - 2015 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी फेब्रुवारी-मार्च 2018 मध्ये दहावी व बारावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीवे वाढीव गुण देण्यात येते. त्यासाठी ऑनलाइन पत्रतीने प्रस्ताव सादर करणे आवश्‍यक आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य व शिक्षकांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज जमा करून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे दि. 15 एप्रिलपर्यंत जमा करण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर येणाऱ्या प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही, असे जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांनी सांगितले. अर्जासाठी पुढील संकेतस्थळ : https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा