Pages

पेज

रविवार, ८ ऑक्टोबर, २०१७

माजी सैनिकांनी दिला वयोवृध्दांना काठीचा आधार : जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनचा उपक्रम


अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने पाथर्डी तालुक्यातील जोहारवाडी येथील 52 वयोवृद्ध महिला व पुरुषांना एक आधार काठीचा या उपक्रमातंर्गत मोफत काठ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी माणिक दारोकर, दिलीपराव काळे, उद्धराव थोटे, सरपंच मच्छिंद्र सावंत, उपसरपंच कविता सावंत, फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, खजिनदार भाऊसाहेब करपे, सचिव निवृती भाबड, विश्‍वस्त संभाजी वांढेकर, जगन्नाथ जावळे, दिगंबर शेळके, प्रदीप कराळे, सुरेश चव्हाण, मानवधिकार संघटनेचे तालुकाध्यक्ष महेश वाघ, दादासाहेब सावंत, सीताराम सावंत, सुदाम सावंत, सुधीर कराळे, सागर म्हस्के, योगेश वांढेकर, लालासाहेब सावंत, सुरेश सावंत आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
मच्छिंद्र सावंत म्हणाले की, देशाच्या सिमेवर सैनिक नागरिकांना संरक्षण देत आहे. तर माजी सैनिक सामाजिक उपक्रमाद्वारे वयोवृध्दांना काठीचा आधार दिला आहे. जीवाची बाजी लावून देशाचे रक्षण करणारे सैनिक सेवानिवृत झाल्यावर आपल्या पेन्शनमधून समाजकार्य करतात ही अभिमानास्पद गोष्ट आहे. जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनचे चालू असलेले उपक्रम प्रेरणादायी व दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवाजी पालवे म्हणाले की, वयोवृध्द नागरिक घरातील अडगळ नसून, संस्कृती जोपासण्याचे काम ते करतात. ज्येष्ठ नागरिक हीच घरातील खरी संपत्ती असते. त्यामुळे घराला घरपण व शिस्त राहते. निवृती भाबड यांनी मनुष्यरुपी ईश्‍वराची सेवा फाऊंडेशनच्या वतीने चालू असल्याचे सांगून, घेण्यात आलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. भाऊसाहेब करपे  म्हणाले की, आपले असतित्व वडिलधार्‍या व मातेसमान असलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी जोडलेले आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींना सन्मान देणे हे सर्वांचे प्रथम कर्तव्य असल्याचे ते म्हणाले.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा